रविदासकृत पदें
अनेककविकृत पदें.
पद १ लें
धाडूं नको वनिं राम । कैकई ! धाडूं नको वनिं राम ॥ध्रुवपद.॥
राज्यधनादिक सर्वहि देतों । पशुदासांसह धाम ॥कैकई०॥१॥
काकुळती मी फार करितसें । दे हा जलधारश्याम ॥कैकई०॥२॥
दुष्टपंणें मज न कष्टवावें । धरीं बुद्धिशिं श्याम ॥कैकई०॥३॥
एवढें महत्त्व या तिहिं लोकीं । कां करितिस दुर्नाम ॥कैकई०॥४॥
हे रविदासप्रभु वनिं जातां । होइन मी निरभिमान ॥कैकई०॥५॥
पद २ रें
झडकरि वसनें आण । दयाळा ! झडकरि वसनें आण ॥ध्रुवपद.॥
सासुरवासी आम्ही वृजवासी । ललना निश्चय जाण ॥दयाळा०॥१॥
गृहिं सासु स्वशुर दीरादिक । कळतां घेतिल प्राण ॥दयाळा०॥२॥
वृजजन कोणी स्थळिं या येतां । होइल दाणादाण ॥दयाळा०॥३॥
हे रविदासप्रभु तमन अर्पण । करुनि वाहाती आण ॥दयाळा०॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : March 18, 2017
TOP