मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|अनेककविकृत पदें|
बल्लवकविकृत पद

बल्लवकविकृत पद

अनेककविकृत पदें.


मर्जी देवाची देवाची । मिथ्या धांव मनाची ॥ध्रुवपद.॥
मनांत येतें हत्तीघोडे पालखींत बैसावें ।
देवाजीचे मनांत याला पायीं चालवावें ॥मर्जी०॥१॥
लोड तिवाशा नरम बिछाना सुंदर कांता व्हावी ।
देवाजीच्या मनांत पाठीं कर्कशा लावाली ॥मर्जी०॥२॥
महाल मुलुखमें पूर्ण खजीना घरांत पैका व्हावा ।
देवाजीच्या मनांत याला दरिद्री ठेवावा ॥मर्जी०॥३॥
बल्लव म्हणे मनांत येतें कांहीं न करावें ।
अहोरात्र सोडुन धंदा देवा आळवावें ॥मर्जी०॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : March 17, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP