बडबड गीत - वाढलं झाड सर ...
बडबड गीत
वाढलं झाड सर सर सर
बघताच गेलं वर वर वर
वर वर वर बघा गेलं झाड
लपून बसलं ते ढगा आड
ढग झाले जरी पाणी पाणी
गाऊ लागे गोड गोड गाणी
हसता हसता पाणी पडले
पाण्याची त्या झाली फुले
- दिलीप खापरे
N/A
N/A
Last Updated : January 17, 2018

TOP