’मराठीचा’ तास येतो
वर्ग खूश होतो
हसर्या मुखाने त्याला -
डोक्यावर घेतो.
’इंग्रजीचा’ तास येतो.
वर्ग चिंताक्रांत
बसे स्तब्ध, कपाळाला
लावुनीया हात
’हिंदी’ तासाची वर्गाला
कधी नाही सजा
क्या कहूँ मैं, क्या है उसकी -
छोटी बडी मजा
’गणिताचा’ तास येतो
आणि थक्क होतो
सारा वर्ग भरलेला
चक्क झोपी जातो !