दहा घरातल्या अकरा भावल्या
भातुकली खेळाया लागल्या
शेराचा साखरभात त्यानी केला
एक बोळक्यात झाकून ठेवला
तेव्हा बोळक्याला दोन पाय फुटले
मोठया खुशीत ते भावल्यांना म्हणाले
’भावल्यांनो, तुम्ही छान काम केले,
माझे रिकामे पोट तुडुंब भरले !’
असे म्हणून बोळके धावत सुटले
हा हा म्हणता ते दिसेनासे झाले
दहा घरातल्या अकरा भावल्या
घाबरुन केव्हाच घरात पळाल्या
भावल्या समोर आता प्रश्न असा
बोळक्याचा शोध कोण लावणार कसा !