बडबडगीत - एकदा स्वातंत्र्य दिनी ...
मुलांना शब्दांचा अर्थ कळ्ण्यापूर्वीच बडबडगीतांच्या स्वरांची भाषा समजू लागते.
एकदा स्वातंत्र्य दिनी
खूप गंमत झाली
एक परी पाहुणी म्हणून
आमच्या शाळेत आली
परीने तिरंगी झेंडा
आभाळात चढविला,
तेव्हा आम्ही टाळ्यांचा
कडकडाट केला.
परीच्या हस्ते मग
खाऊवाटप झाले
मी हुशार म्हणून मला
दोन पुडे मिळाले.
नंतर त्या परीने
छान भाषण केले,
खरं सांगू, खाऊ सारखे
मला ते आवडले.
अखेर राष्ट्रगीत
परीनेच म्हटले
म्हणतात ते जगात
चहूकडे घुमले
समारंभ संपला
परी म्हणाली, नमस्ते !’
आणि ती उडून गेली
कुणास ठाऊक, कुठे ते !
N/A
References :
कवी - मा. गो. काटकर
Last Updated : January 17, 2018

TOP