मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|बालसाहित्य|बडबड गीते|
छोटे घरकुल पण पहा कशी को...

बडबडगीत - छोटे घरकुल पण पहा कशी को...

मुलांना शब्दांचा अर्थ कळ्ण्यापूर्वीच बडबडगीतांच्या स्वरांची भाषा समजू लागते.


छोटे घरकुल

पण पहा कशी कोपर्‍यात

मांडली ही चूल

तांदूळ होते सात

पण पहा कसा झाला आहे

पातेलीभर भात

चिमूटभर पीठ

पण पहा कशा झाल्या तीन

भाकर्‍या नीट

पान घेतले

सकाळपासून आहे माझे

सोनुले भुकेले

वाढले पिठले

खरं सांगा तोंडाला ना

पाणी सुटले ?

N/A

References :

कवी - वा. गो. मायदेव

Last Updated : January 17, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP