मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|बालसाहित्य|बडबड गीते|
आजी म्हणते , ’विठुराजा ’ ...

बडबडगीत - आजी म्हणते , ’विठुराजा ’ ...

मुलांना शब्दांचा अर्थ कळ्ण्यापूर्वीच बडबडगीतांच्या स्वरांची भाषा समजू लागते.


आजी म्हणते, ’विठुराजा’

गावात झाल्या तिन्‌सांजा

आजी म्हणते, ’हरी हरी’

लामणदिवे घरी घरी

आजी म्हणते, ’रख्‌माराणी’

घमघमली रे धूपदाणी

आजी लावते मागिलदार

दिव्या दिव्या दीपोत्कार

N/A

References :

कवयित्री - आरती प्रभू

Last Updated : January 17, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP