मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|बालसाहित्य|बडबड गीते|
जन्मापासून एकटा दूर दू...

बडबडगीत - जन्मापासून एकटा दूर दू...

मुलांना शब्दांचा अर्थ कळ्ण्यापूर्वीच बडबडगीतांच्या स्वरांची भाषा समजू लागते.


जन्मापासून एकटा

दूर दूर आकाशात

पृथ्वी भोवती अखंड

फिरतो मी दिनरात

इथे सगळे ओसाड

नाही हवा, नाही पाणी

झाडे, वेली, तृण, फुले

नाहीत पक्ष्यांची गाणी

नुकतेच मी पाहिले

माणूस असतो कसा !

माझ्या मनी उमटला

त्याच्या कर्तुत्वाच्या ठसा

एक दिवशी मी खास

चांद्रयानात बसून

मोठया डौलात, खुशीत

पृथ्वीवर उतरेन

चार दिवस मजेत

माणसांमध्ये राहीन

मुलाबाळांचा मी मामा

त्यांचे कौतुक करीन

वत्सल पृथ्वीमातेच्या

अंगावरती लोळून

पुन्हा जाईन स्वस्थळी

चांद्रयानात बसून .

N/A

References :

कवी - मा. गो. काटकर

Last Updated : January 17, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP