बडबडगीत - पोपटरावाने घेतली जागा ...
मुलांना शब्दांचा अर्थ कळ्ण्यापूर्वीच बडबडगीतांच्या स्वरांची भाषा समजू लागते.
पोपटरावाने घेतली
जागा मोठी झकास
तिथे त्यांनी चालविला
एस्. एस्. सीचा क्लास
पोपटराव शिकवितो
संस्कृत आणि मराठी
बगळ्याची हिंदीची
तयारी भली मोठी
सोशल स्टडीजवर
कावळ्याची खूप सत्ता
सायन्स विषय तर
साळुंकीचा आवडता
कोंबडीचा इंग्रजीचा
अभ्यास आहे पक्का
घारीचे गणित म्हणजे
हुकुमाचा एक्का
मोजून एक लाख
पशुपक्षी मंडळी
सगळ्या केंद्रातून
परीक्षेला बसली.
निकालाच्या दिवशी
अशी गंमत झाली
पोपटक्लासची मैना
लाखात पहिली आली
N/A
References :
कवी - मा. गो. काटकर
Last Updated : January 17, 2018

TOP