बडबड गीत - शेतकरीदादा तुमचं चाललंय क...
बडबड गीत
शेतकरीदादा तुमचं चाललंय काय?
कांही नाही
मग गहू पेरा भराभरा
पाउसभाऊ तुमचं चाललंय काय?
कांही नाही
मग पाउस पाडा भराभरा
गाडीवाले दादा तुमचं चाललंय काय?
काही नाही
गहू आणा घरा भराभरा
सुपलीबाइ तुमचं चाललंय काय?
काही नाही
मग गहू पाखडा भराभरा
जातेदादा तुमचं चाललंय काय?
काही नाही
मग गहू दळा भराभरा
चाळणीबाई तुमचं चाललंय काय?
काही नाही
मग चाळा गहू भराभरा
परातबाई तुमचं चाललंय काय?
काही नाही
मग पीठ मळा भराभरा
लाटणेराव तुमचं चाललंय काय?
काही नाही
मग पोळ्या लाटा भराभरा
तवेदादा तुमचं चाललंय काय?
काही नाही
मग भाजा पोळ्या भराभरा
ताटोबा तुम्ही करताय काय?
काही नाही
मग वाढा पोळ्या भराभरा
मग मी आता करू काय?
करतो करतो
तूप पोळी खातो भराभरा !!
N/A
N/A
Last Updated : January 17, 2018

TOP