बडबड गीत - लवकर उठा लवकर ...
बडबड गीत
लवकर उठा लवकर उठा
सांगतं कोण?
घड्याळाचा गजर
आणखी कोण?
दात मग घासा दात घासा
सांगतं कोण?
पेस्ट न ब्रश
आणखी कोण?
चूळ भरा मग चूळ भरा
सांगतं कोण?
गरम पाणी
आणखी कोण?
आंघोळ करा आंघोळ करा
सांगतं कोण?
बादली न तांब्या
आणखी कोण?
वंदन करा देवाला करा
सांगतं कोण?
घण घण घंटी
आणखी कोण?
दूध प्या गरम दूध प्या
सांगतं कोण?
चांदीचा ग्लास
आणखी कोण?
अभ्यास कर अभ्यास कर
सांगतं कोण?
पाटी न दप्तर
आणखी कोण?
जेवण कर जेवण कर
सांगतं कोण?
ताट न वाटी
आणखी कोण?
शाळेला जा शाळेला जा
सांगतं कोण?
शाळेचा गणवेश
आणखी कोण?
पाढे म्हणा पाढे म्हणा
सांगतं कोण?
शाळेतल्या बाई
आणखी कोण?
शाळा सुटली शाळा सुटली
सांगतं कोण?
शाळेची घंटा
आणखी कोण?
शुभं करोती शुभं करोती
म्हणणार कोण?
मी,दादा न ताई
दुसरं कोण?
अंगाई गीत अंगाई गीत
म्हणणार कोण?
आईची माया
आणखी कोण?
N/A
N/A
Last Updated : January 17, 2018
TOP