बडबडगीत - ’ झर्याकाठच्या वस्तीचे ...
मुलांना शब्दांचा अर्थ कळ्ण्यापूर्वीच बडबडगीतांच्या स्वरांची भाषा समजू लागते.
’झर्याकाठच्या वस्तीचे
काय आहे नाव ?’
’ते म्हणे आहे एक
विलक्षण गाव
गावाची मोठी वेस
सदा घोकत असते
दिसते तसे नसते हो
नसते तसे दिसते !
दिवसातून तीन वेळा
सगळे गाव उठते
स्वतःभोवती चार वेळा
गरगर फिरते
गावातले सगळे प्राणी
उगाच घाईत असतात
जमिनीपासून एक फूट
उंचीवरुन चालतात
माणसे, म्हशी, बैल, घोडे
सगळे प्राणी बिलंदर
सकाळी सहा फूट तर
रात्री होतात वीतभर !
गावातली लहानमोठी
घरे गोंधळ करतात
झाडांच्या फांद्यांना
लोंबकळत असतात
एखादे घर कधी
आकाशात उडते
उडणार्या पक्ष्यामागे
दिसेनासे होते
झर्याकाठचे गाव असे
बघा विलक्षण
बाबांना विचारा, तिथे
कसे जायचे आपण ?
N/A
References :
कवी - मा. गो. काटकर
Last Updated : January 17, 2018
TOP