मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|बालसाहित्य|बडबड गीते|
टक् ‌ टक् ‌ करुनी सुतार प...

बडबडगीत - टक् ‌ टक् ‌ करुनी सुतार प...

मुलांना शब्दांचा अर्थ कळ्ण्यापूर्वीच बडबडगीतांच्या स्वरांची भाषा समजू लागते.


टक्‌ टक्‌ करुनी सुतार पक्षी

झाडावरती घरटे कोरी

तुर्‍यासारखी डोक्यावरती

लालभडक टोपीही न्यारी

कठीण लांबट चोच आणखी

सोनेरी पंखाची पाठ

ऐट अशी की बसल्यावरती

पायाचाही दिसतो थाट

N/A

References :

कवी - कल्याण इनामदार

Last Updated : January 17, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP