बडबडगीत - परकर पोलकं जरीचा काठ ,...
मुलांना शब्दांचा अर्थ कळ्ण्यापूर्वीच बडबडगीतांच्या स्वरांची भाषा समजू लागते.
परकर पोलकं
जरीचा काठ,
चमचम टिकली
कुंकवाचा थाट
कानांत लोलक
लोंबते डूल
केसांत खोवलंय
गुलाबाचं फूल
गळयात सर
मोहनमाळ
पायांत घुंगुर
रुमझुम चाळ
लखलख लखलख
कंबरपट्टा
अस्सा केलाय
नट्टापट्टा
आरशा आरशा
खरं सांग ना -
खूप खूप सुंदर मी
दिसतेय ना ?
N/A
References :
कवयित्री - वृंदा लिमये
Last Updated : January 17, 2018

TOP