मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|बालसाहित्य|बडबड गीते|
इवल्या इवल्या चोचीमधुनी ...

बडबडगीत - इवल्या इवल्या चोचीमधुनी ...

मुलांना शब्दांचा अर्थ कळ्ण्यापूर्वीच बडबडगीतांच्या स्वरांची भाषा समजू लागते.


इवल्या इवल्या चोचीमधुनी

चिव् चिव् चिमणी टिपते दाणे

भुर्कन् उडते इकडून तिकडे

पंख पसरुनी गोजीरवाणे

उजाडल्यापासून सारखी

चिवचिवाट अन् गडबड घाई

झाडावरले घरटे सोडून

उनाडते ही चिमणीताई

N/A

References :

कवी - कल्याण इनामदार

Last Updated : January 17, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP