मराठी पदें - पदे १२६ ते १३०
वेदान्तशास्त्र हे नुसते बुध्दिगम्य व वाक्चातुर्यदर्शक शास्त्र नसून प्रत्यक्ष अनुभवगम्य शास्त्र आहे हे या ग्रन्थातून स्पष्ट होते.
पद १२६
जरि तुज निजहित वाटल व्हावें । तरि गुज ऐकावें ।
हरिहर एकचि मानुनिया मनिं । शरन तया जावें ॥धृ॥
वोतन धनकण घरसुतजाया । सर्वहि त्यागावें ।
सांडुनि लौकिक थोरपणातें । श्रीहरिगुण गावे ।
भक्तिबळें निजप्रमळ वचनें । दिनिनिशिं अळवावें ॥१॥
निश्चय पाहुनी भक्तजनाचा । श्रीहरि पावतसे ।
धावुनिया पय पाजित जननी । बाळालागि जसें ।
भाव जयापरि त्याजपरी हरी । भक्तालागिं असे ॥२॥
जवंवरि हरिहर पूर्ण दयाकर । जाले तुज नाहीं ।
तववरि सद्गुरु शास्त्रहि अद्वय । न मिळे तुज कांहीं ।
यास्तव मनुजा तनमय अर्पण । करि हरिहरपायीं ॥३॥
निरंजन हें साधन करुनी । गिरनारा गेला ।
दत्तत्रयगुरु पाहुनि नयनीं । पूर्णपणें धाला ।
निजस्वरुपातें पाहुनिया मग । अंतरिं नीवाला ॥४॥
पद १२७
बाजी हे बाजी अजि उमजूनि करी ईश्वर राजी ।
भ्रमदायक समजुनि माया चंचळमन अवरि वाजी ॥ध॥
धनसंपत्ति वाडे हुडे पालख्या हत्ती घोडे ॥
जायासुत लाडेकोडें सांभाळीं मी मागेपूढें ॥
सत्यत्वें मानुनि यासी भुलले जन अवघे वेडे ॥१॥
भिथ्या हें सर्वहि असतां दिसताहे सत्यावाणी ॥
रविरश्मि उखर भूमिसि भासतसे जैसें पाणी ॥
कीं गगनीं गंधर्वांच्या उभवील्या नगरश्रेणी ॥२॥
कोईचा आंबा केला मोठासा गारुडियानें ।
घटिकेमधिं आणिलीं त्याला फळपुष्पें आणिक पानें ॥
परिणामीं शोधुनिया पाहतां भ्रमदायक होणेंजाणें ॥३॥
शिवमूर्ती अंतरयामीं वसली ते नयनीं पाहू ।
एकत्वें सारुनि पूजा अद्वय तूं होउनि राहे ।
रघुविरसद्गुरु वचनें निरंजन पद हें लाहे ॥४॥
पद १२८
निश्चय पूर्ण करा पूर्ण करा । गुरुवचनें भव सारा ॥धृ॥
श्रुतिशास्त्राची उक्ति । होती गुरुवचनानें मुक्ती ॥१॥
गुरुचरणीं मन जडलें । त्याला सर्वहि साधन घडलें ॥२॥
गुरुवचनीं जो रहातो । तो नर नारायणरुप होतो ॥३॥
गुरुपदीं निश्चय होतां । येतें निरंजनपद हातां ॥४॥
पद १२९
निशिदिनिं हरिभजनीं हरिभजनीं । रतली ज्याची वाणी ॥धृ॥
मेरुकोटी सुवर्ण । त्याला घडलें पृथ्वीदान ॥१॥
अश्वमेध शत केले । तेणें पितर समूळ उद्धरले ॥२॥
तो नर धन्य ह्मणावा । हरिप्रतिमारूप गणावा ॥३॥
श्रीहरिचे गुण गातां । येतें निरंजन पद हाता ॥४॥
पद १३०
तो गिरिकंदरी या घरीं । राहो अन्य प्रकारीं ॥धृ॥
जगनग सर्व पसारा । पाहे चिन्मय आत्मसारा ॥१॥
विचार अंतरिं फळला । ज्याचा भेदाभेद गळाला ॥२॥
इंद्रिय वळसा बळला । जुनाट वासन वेल जळाला ॥३॥
रघुविर गुरुपदीं जडला । ज नर निरंजन रूप जाला ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : November 24, 2016
TOP