मराठी पदें - पदे २५१ ते २५५
वेदान्तशास्त्र हे नुसते बुध्दिगम्य व वाक्चातुर्यदर्शक शास्त्र नसून प्रत्यक्ष अनुभवगम्य शास्त्र आहे हे या ग्रन्थातून स्पष्ट होते.
पद २५१
तैसें मन जालें मन जालें । सद्गुरुनें मज कथिलें ॥धृ॥
स्थूळदेह हा आपुला विराटपुरुषालागिं मिळाला ॥१॥
लिंगदेह जो कांहीं हिरण्यगर्भा वाचुनि नाहीं ॥२॥
कारण देह तिसरा माया कार्यरूप हा सारा ॥३॥
साक्षी प्रत्यगात्मा तो गुरु निरंजन परमात्मा ॥४॥
पद २५२
याजपरि होउनि रहा रे ज्ञानी हो । नाहीं तरि भवपुरी वाहा रे ॥धृ॥
हें जग अवघें भगवान । आतां कोणापाशीं घ्या सन्मान ।
कोणा दाखवावें दांभिकपण । आतां कोणाचें दुखवावें मन रे ॥१॥
अवघा सच्चित्सुख भरलासे । क्रोधयां वाकवनाचे त्रासे ।
सांडा कुटिळपणाचें पिंसे । माना साधू तितुके गुरु असे रे ॥२॥
पहा आपुलें रूप निर्मळ । मन अवरुनि घ्या सकळ ।
हे अमानित्वादि धर्म । माना विषयभोग विटाळ रे ॥३॥
नको आतां जन्ममरण । सांडा गृहदारासुतधन ।
जगि वार्ता समानपण । श्रीहरिसी भजा अमिन्न रे ॥४॥
स्वयं होउनि नीरंजन । द्यारे जनसंगा सोडून ।
करा वेदांताचे विवरण । घ्यारे परमतत्व दर्शन रे ॥५॥
पद २५३
ते धाले । बोध रसायन प्याले । सुखसिंधूत बुडाले ॥
स्वस्वरुपीं स्थिर जाले । धन्य धन्य ह्मणवुनिया वचनें ढेंकर दीले ॥१॥
ते गेले । ब्रह्मकवच दृढल्याले । घेउनि विवेक भाले ॥
मारुनि भेद रिसाले । विजयश्रीनें फुगुनि लोकीं माईनासे जाले ॥२॥
ते आले । निजसदनांत रिघाले । सुखशय्यारूढ जाले ।
सदा झुलति मतवाले । सहजसमाधि मुद्रा लागुन अंतर्बाह्य निवाले ॥३॥
ते जाले । जितचि असतां मेले । मरोनि सांगूं ठेले ॥
शांतिरसाचे ओले । माया - अंजनरहित निरंजन रघुविरगुरुचे चेले ॥४॥
पद २५४
ये करविरनिवासिनि भवनाशिनि विश्वकाशिनि दु:खशोषिनि ।
नानावेषिनी चित्प्रकाशिनी भक्ततोषणी लक्ष्मी सुवासिनी ॥धृ०॥
तुझे अधरिचा रंग पाहुनि विष्णू झाला दंग त्याला नसतांहि
जाला साकार सांग तुझें अलकाचा पुंग पाहुनि देव जाले भंग ॥१॥
करिति गुंजारव तुंग पाहुनि नेत्रीचा पांग हरिण होउनि ठेले दंग ॥
गेले वना सोडुनि संग फिरति चुंग असुनिया वनीं ॥२॥
पाहुनि वदन अरविंद चंद्रक्रांति करुनि मंद जाला तव चरणीं ।
सरळनासिक स्फुंद दंतपंक्ति कळ्या कुंद भाळ विशाळ रुंद वाणि ।
वट सुगंध येति परिमळ मिलिंद पाहुनि तुझा कटिबंद सिंह तो ।
निया फंद होउनि वहन सोसी बंद जगत्कंद माय त्रेलोक्यपावन ॥
आदिशक्ति जगन्माय जाल्या साह्य तुझे पाय आम्हालागीम उणे काय ।
देई देई निजठाय तुजवांचुनि उपाय व्यर्थ करोनिया काय वृथाश्रम ।
हाय हाय करि पूर्ण कृपासाह्य निजप्राप्ति जेणें होय देई ऐसाचि न्याय ।
निरंजनी मनीं असे करी तैसे चित्सौदामिनी ॥३॥
पद २५५
ही शारदा । सर्वकळा विशारदा । वेदाची मर्यादा ।
वारण करिती खेदा । भक्तजनांचें रक्षण करिते देउनि पूर्णानंदा ॥१॥
हे भारति । गाढतमा संहारति । ज्योतीची निजज्योति ।
गिवसुनि दे निजमोती । सर्व जगातें निर्माणत्वें वर्ते जीची ख्याती ॥२॥
सरस्वती । ब्रह्माची जे मति । विरक्ताची गति ।
चातुर्याची दाती । सर्वारंभीं पूजुनिया नरसुरवर जीतें गाती ॥३॥
हे वाणि । चैतन्याची खाणी । शब्दाब्धीचें पाणी ।
शास्त्र जीचे निशाणी निरंजन रघुनाथ गुरूची जाणा हे अभिधानी ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : November 24, 2016
TOP