मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य|स्कंध १० वा|पूर्वार्ध|
अध्याय ७ वा

स्कंध १० वा - अध्याय ७ वा

सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य

७४
परीक्षिति म्हणे मुने, हरिलीला । ऐकूनियां झाला हर्ष बहु ॥१॥
श्रवणें ज्या दु:ख तेंवी दु:खमूळ- । वासना, समूळ नष्ट होती ॥२॥
भक्त-भगवंतप्रेम वृद्धि पावे । चरित्र कथावें तेंचि मज ॥३॥
निवेदिती मुनि कृष्णभगवान । उपडा वळून खेळे आतां ॥४॥
वाढदिवस तो पातला म्हणूनि । पाचारी सदनीं गोपींग्रति ॥५॥
यशोदा आनंदें करिते मंगल । चर्चियेलें तैल सुगंधित ॥६॥
वासुदेव म्हणे वाद्य-वेदघोष । नंदसदनांत तदा होई ॥७॥

७५
अभ्यंगस्नान त्या घालूनि यावरी । अंगी-टोपी करी माता कृष्णा ॥१॥
मूल्यवान बहु घाली अलंकार । कस्तुरीतिलक लावियेला ॥२॥
गोरोचनाची ते तीटही लाविली । सर्वांगीं मर्दिली श्रेष्ठ उटि ॥३॥
अंजनही नेत्रीं शोभलें सुरेख । पुढती वेदमंत्रघोष होई ॥४॥
पुण्याहवाचनें रक्षाबंधन तें । करुनि विप्रांतें तुष्ट केलें ॥५॥
अन्न, वस्त्र, फळें, धेनुदान । हर्षित ब्राह्मण, सदनीं गेले ॥६॥
वासुदेव म्हणे गात गात ओंव्या । पालखीं घातला बाळकृष्ण ॥७॥

७६
गाडयाखालीं तो पालख । ठेऊनियां अंगणांत ॥१॥
मग गौळणींच्या ओंटया । भरी आनंदें यशोदा ॥२॥
इकडे जागृत श्रीहरी । क्षुधापीडित सत्वरी ॥३॥
करुं लागला रुदन । बहु हालवी चरण ॥४॥
कळलें नाही यशोदेसी । रंगली ते समारंभीं ॥५॥
वासुदेव म्हणे हरि । चरण हालवी वरि वरि ॥६॥

७७
चरणस्पर्शानें उलटला गाडा । जाहला चुराडा सकल त्याचा ॥१॥
दधि-दुग्धपात्रें सांडूनियां गेलीं । पाहूनि तैं भ्याली नंदभार्या ॥२॥
विस्मयें धांवूनि येती गोपगोपी । अरिष्ट बाळासी म्हणती काय ॥३॥
काय हें दुश्चिन्ह तयांसी न कळे । घोरकर्म केलें म्हणती कोणी ॥४॥
क्रीडामग्न बाळें होतीं जीं सन्निध । मारियेली लाथ म्हणती कृष्णें ॥५॥
तेणेंचि हा गाडा मोडूनियां गेला । सत्य तें कोणाला वाटेचिना ॥६॥
वासुदेव म्हणे सामर्थ्य प्रभूचें । केंवी मानवातें सत्य वाटे ॥७॥

७८
मानूनियां भूतबाधा । हृदयीं कवटाळी यशोदा ॥१॥
पाचारुनि ब्राह्मणांसी । लावी अंगारा बाळासी ॥२॥
पुढती गाडा करुनि नीट । यज्ञें करिती ग्रहशांत ॥३॥
विप्रांवरी बहु श्रद्धा । पठण करविती त्यां मंत्रां ॥४॥
ग्रहनिवारक होम । करुनि देती विप्रां दान ॥५॥
धेनु बहु सालंकृत । हर्षे अर्पिती विप्रांस ॥६॥
विप्राआशीर्वादें गोप । मनीं जाहले नि:शंक ॥७॥
वासुदेव म्हणे पुण्य - । अर्पी आशीर्वादें सुज्ञ ॥८॥

७९
निवेदिती शुक राया, योगाभ्यासी । मंत्रज्ञ विप्रांची वाणी सत्य ॥१॥
पुढती एकदां यशोदेच्या अंकीं । जडता कृष्णासी येई बहु ॥२॥
पर्वतचि भासे तिज अंकावरी । ठेवी भूमीवरी अंतीं माता ॥३॥
अरिष्टचि कांहीं वाटूनि यशोदा । म्हणे अधोक्षजा, रक्षीं बाळा ॥४॥
प्रार्थूनि प्रभूसी गेली गृहकृत्या । कंस धाडी तदा दैत्य एक ॥५॥
तृणावर्त नामें दैत्य तो आवर्त- । होऊनि, बाळांस उडवी नभीं ॥६॥
वासुदेव म्हणे येती वावटळी । सर्वत्र गोकुळीं तेणें धूळ ॥७॥

८०
गोकुळांत धूळ सर्वत्र पसरे । धुळीनें कोदलें सर्व नभ ॥१॥
श्रवणें ज्या दु:ख तेंवी दु:खमूळ - । वासना, समूळ नष्ट होती ॥२॥
भक्त-भगवंतप्रेम वृद्धि पावे । चरित्र कथावें तेंचि मज ॥३॥
निवेदिती मुनि कृष्णभगवान । उपडा वळून खेळे आतां ॥४॥
वाढदिवस तो पातला म्हणूनि । पाचारी सदनीं गोपींप्रति ॥५॥
यशोदा आनंदें करिते मंगल । चर्चियेलें तैल सुगंधित ॥६॥
वासुदेव म्हणे वाद्य-वेदघोष । नंदसदनांत तदा होई ॥७॥

७५
अभ्यंगस्नान त्या घालूनि यावरी । अंगी-टोपी करी माता कृष्णा ॥१॥
मूल्यवान बहु घाली अलंकार । कस्तुरीतिलक लावियेला ॥२॥
गोरोचनाची ते तीटही लाविली । सर्वांगीं मर्दिली श्रेष्ठ उटी ॥३॥
अंजनही नेत्रीं शोभलें सुरेख । पुढती वेदमंत्रघोष होई ॥४॥
पुण्याहवाचनें रक्षाबंधन तें । करुनि विप्रांतें तुष्ट केलें ॥५॥
अन्न, वस्त्र, फळें, धेनुदान । हर्षित ब्राह्मण, सदनीं गेले ॥६॥
वासुदेव म्हणे गात गात ओंव्या । पालखीं घातला बाळकृष्ण ॥७॥

७६
गाड्याखालें तो पालख । ठेऊनियां अंगणांत ॥१॥
मग गौळणींच्या ओंट्या । भरी आनंदें यशोदा ॥२॥
इकदे जागृत श्रीहरी । क्षुधापीडित सत्वरी ॥३॥
करुं लागला रुदन । बहु हालवी चरण ॥४॥
कळलें नाही यशोदेसी । रंगली ते समारंभीं ॥५॥
वासुदेव म्हणे हरि । चरण हालवी वरि वरि ॥६॥

७७
चरणस्पर्शानें उलटला गाडा । जाहला चुराडा सकल त्याचा ॥१॥
दधि-दुग्धपात्रें सांडूनियां गेलीं । पाहूनि तैं भ्याली नंदभार्या ॥२॥
विस्मयें धांवूनि येती गोपगोपी । अरिष्ट बाळासी म्हणती काय ॥३॥
काय हें दुश्चिन्ह तयांसी न कळे । घोरकर्म केलें म्हणती कोणी ॥४॥
क्रीडामग्न बाळें होतीं जीं सन्निध । मारियेली लाथ म्हणती कृष्णें ॥५॥
तेणेंचि हा गाडा मोडूनियां गेला । सत्य तें कोणाला वाटेचिना ॥६॥
वासुदेव म्हणे सामर्थ्य प्रभूचें । केंवी मानवातें सत्य वाटे ॥७॥

७८
मानूनियां भूतबाधा । हृदयीं कवटाळी यशोदा ॥१॥
पाचारुनि ब्राह्मणांसी । लावी अंगारा बाळासी ॥२॥
पुढती गाडा करुनि नीट । यज्ञें करिती ग्रहशांत ॥३॥
विप्रांवरी बहु श्रद्धा । पठण करविती त्यां मंत्रां ॥४॥
ग्रहनिवारक होम । करुनि देती विप्रां दान ॥५॥
धेनु बहु सालंकृत । हर्षे अर्पिती विप्रांस ॥६॥
विप्र आशीर्वादें गोप । मनीं जाहले नि:शंक ॥७॥
वासुदेव म्हणे पुण्य - । अर्पी आशीर्वादें सुज्ञ ॥८॥

७९
निवेदिती शुक राया, योगाभ्यासी । मंत्रज्ञ विप्रांची वाणी सत्य ॥१॥
पुढती एकदां यशोदेच्या अंकीं । जडता कृष्णासी येई बहु ॥२॥
पर्वतचि भासे तिज अंकावरी । ठेवी भूमीवरी अंतीं माता ॥३॥
अरिष्टचि कांहीं वाटूनि यशोदा । म्हणे अधोक्षजा, रक्षीं बाळा ॥४॥
प्रार्थूनि प्रभूसी गेली गृहकृत्या । कंस धाडी तदा दैत्य एक ॥५॥
तृणावर्त नामें दैत्य तो आवर्त - । होऊनि, बाळांस उडवी नभीं ॥६॥
वासुदेव म्हणे येती वावटळी । सर्वत्र गोकुळीं तेणें धूळ ॥७॥

८०
गोकुळांत धूळ सर्वत्र पसरे । धुळीनें कोदलें सर्व नभ ॥१॥
धूलिमग्न नेत्र होती सकळांचे । अंतरीं गोपांतें भय बहु ॥२॥
कोणासी कांहींचि दिसेनासें होई । इतुक्यांत नाहीं म्हणती कृष्ण ॥३॥
खेळे तो ज्या स्थळीं जावयासी तेथें । धांवता न दिसे वाट कोणा ॥४॥
घाबरुनि तदा ओक्साबोक्शीं माता । रडूं लागे तदा सकलां खेद ॥५॥
वासुदेव म्हणे यशोदा मूर्छित । जाहली न तिज भान कांहीं ॥६॥

८१
जातां ऐसा कांहीं काळ । शांत होईअ वावटळ ॥१॥
धूळ पडेनाशी होई । गोप येती नंदागृहीं ॥२॥
कृष्ण दिसेना गोपींसी । तदा रुदन मांडिती ॥३॥
महायत्नें तृणावर्त । नभीं नेई श्रीकृष्णास ॥४॥
पुढती तोले न तो तया । गति खुंटलि तेधवां ॥५॥
गुरु अनंत विश्वांचा । केंवी तोले तृणावर्ता ॥६॥
अंतीं राक्षसस्वरुपें । कृष्णवधार्थ तो झटे ॥७॥
वासुदेव म्हणे नभीं । तदा होई मौज मोठी ॥८॥

८२
मारिली गळ्यासी मिठी श्रीकृष्णानें । सोडवूं प्रयत्नें म्हणे दैत्य ॥१॥
परी जाड्य त्याचें पर्वतासमान । दैत्य पावे शीण तेणें बहु ॥२॥
शेवटीं कृष्णानें दावितांचि गळा । कासावीस झाला तृणावर्त ॥३॥
नुमटे शब्दही श्वास होई रुद्ध । बटाबटा नेत्र पुढती येती ॥४॥
अंतीं तृणावर्त मरुनियां गेला । देह कोसळला चतुष्पथीं ॥५॥
शिळेवरी देह पडूनियां भग्न । त्रिपुरासमान नष्ट होई ॥६॥
वासुदेव म्हणे वक्षस्थळीं कृष्ण । गोपिका पाहून भयग्रस्त ॥७॥

८३
धांवूनि कृष्णासी गोपी उचलूनि । यशोदासदनीं धांव घेती ॥१॥
प्रचंड दैत्याचें पाहूनियां प्रेत । आश्चर्यचकित होती गोप ॥२॥
घोर प्रसंगीं या वांचला श्रीकृष्ण । विस्मयानें मन थक्क होई ॥३॥
आजवरी ऐसें जाहलें न कदां । प्राण बालकाचा सुरक्षित ॥४॥
म्हणताती कोणी दुष्टासी दुष्कर्म । सज्जना फल देई ॥५॥
म्हणताती अन्य थोर महापुण्य । पूर्वीचें म्हणून वांचला हा ॥६॥
वासुदेव म्हणे वसुदेववाणी । आणूनियां ध्यानीं रमती गोप ॥७॥

८४
अन्य एक्या दिनीं अंकावरी माता । घेऊनि पाजितां कृष्णाप्रति ॥१॥
चुंबी हास्यमुख तेंवी कुरवाळी । जांभई दिधली तोंचि कृष्णें ॥२॥
चंद्र, सूर्य, नभ, नक्षत्रें, समुद्र । नद्या तैं पर्वत वदनीं पाही ॥३॥
आश्चर्य पावूनि कांपलें शरीर । अंतीं घट्ट नेत्र मिटूनि घेई ॥४॥
वासुदेव म्हणे स्वस्थ राही माता । विश्वदर्शनाचा घडला योग ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : December 09, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP