मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य|स्कंध १० वा|पूर्वार्ध|
अध्याय १८ वा

स्कंध १० वा - अध्याय १८ वा

सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य


२२८
निवेदिती शुक राया, अन्यदिनीं । आनंदित मनीं होती गोप ॥१॥
वर्णिती कृष्णाचें अद्‍भुत तें कृत्य । येती स्वगृहास गोप-गोपी ॥२॥
राम-कृष्णसंगें ग्रीष्मही वसंत । आल्हादकारक भासे गोपां ॥३॥
निर्झरप्रवाहें झिल्लरीचा शब्द । कर्कश तो लुप्त वृंदावनीं ॥४॥
उदकतुषारें उल्हसित वृक्ष । शीतल सुगंधयुक्त वाय ॥५॥
सरोवरें तेंवी सरिता-निर्झर - । संयुक्त, शीतल अनिल रम्य ॥६॥
कल्हार, कुमुद, उत्पलादि पद्में । त्रिकाल सुगंधें युक्त वायु ॥७॥
वासुदेव म्हणे तृणेंही हरित । अत्यंत सौख्यद गोपजनां ॥८॥

२२९
वृंदावनीं जल विपुल नद्यांसी । पुलिनें व्यापिती उर्मि त्यांच्या ॥१॥
तेजें घट त्यांचे हरित तृणांनीं । आच्छत्र न ग्रीष्मीं तप्त होती ॥२॥
तया रम्य वनीं हरिणांची क्रीडा । प्रेक्षकांच्या चित्ता मोद देई ॥३॥
मयूर, कोकिळा, सारसही गाती । भ्रमर गुंजती मधुपानें ॥४॥
ऐशा तयावनीं सवंगड्यांसवें । वाजविती पांवे राम-कृष्ण ॥५॥
क्रीडा, वनमाला, वृक्षांचे पल्लव । म्हणे वासुदेव प्रिय गोपां ॥६॥

२३०
गेरु-पिवडीनें अंग । रंगवूनि क्रीडादंग ॥१॥
नृत्य, गायन करिती । राम कृष्णां तोष देती ॥२॥
नाचूं लागतां श्रीकृष्ण । करिती गोपाल गायन ॥३॥
मुरल्या शृंगें वाजविती । कृष्णा, वाहव्वारे बोलती ॥४॥
हर्षे वाजवूनि टाळ्या । प्रशंसिती ते गोपाळा ॥५॥
रंगभूमीवरी नट । एकमेकां एकमेक ॥६॥
गोप तेंवी राम-कृष्णां । प्रशंसिती तयास्थाना ॥७॥
वासुदेव म्हणे गोप । होते देवचि प्रत्यक्ष ॥८॥

२३१
भ्रामण, लंघन, क्षेप, आस्फोटन । तेंवी विकर्षण क्रीडायुद्ध ॥१॥
राम-कृष्ण ऐसे काकपक्षधारी । कालिंदीच्या तीरीं करिती क्रीडा ॥२॥
नाचतां गोप हे करिती गायन । देती प्रोत्साहन तेंवी गोपां ॥३॥
बिल्व-कुंभफळें तेंवी आमलक । घेऊनि क्रीडेंत दंग होती ॥४॥
कदा नेत्रबंध, मृग-खगचेष्टा । रुजु वक्र उडया मारिताती ॥५॥
दर्दुरप्लाव तैं कदा उपहास । कदा होती नृप राम-कृष्ण ॥६॥
वासुदेव म्हणे ऐशा स्वैरक्रीडा । करुनि बालकां तोष देती ॥७॥

२३२
एकदां प्रलंब येई वनीं गोपवेषें ॥
पळवूनि न्यावें कृष्णा ऐसें मनीं होतें ॥१॥
जाणूनियां तें श्रीकृष्णें वांटूनियां गडी ॥
खेळ आरंभिले बहु तदा वनामाजी ॥२॥
पक्षप्रमुख ते दोघे होऊनि खेळती ॥
बाह्यवाहकलक्षण क्रीडा आरंभिती ॥३॥
‘भांडारीक’ नामें वटासन्निध पातले ॥
रामपक्षानें कृष्णाच्या पक्षातें जिंकिलें ॥४॥
वासुदेव म्हणे ऐसा संपला तो खेळ ॥
पाठीवरी घेती आतां एकेकासी बाळ ॥५॥

२३३
जाणूनियां बळ कृष्णाचें प्रलंब । तयाच्या पक्षांत शिरला होता ॥१॥
दामा नामें गोपा उचली श्रीकृष्ण । तेंवी भद्रसेन ‘वृषभ’ गोपा ॥२॥
प्रलंभ उचली बळिरामाप्रति । घेऊनियां जाती दूर दूर ॥३॥
चुकवूनि कृष्णा, प्रलंब रामासी । साधूनियां संधि दूर नेई ॥४॥
भूमिभारवाह शेषाचा त्या भार । जाहला असह्य प्रलंबासी ॥५॥
वासुदेव म्हणे तदा प्रलंबानें । मूळ रुप केलें प्रकट वनीं ॥६॥

२३४
सुवर्णालंकार किरीट कुंडलें । रुप तें भासलें मेघासम ॥१॥
स्कंधीं बलराम भासला तो चंद्र । रुप ते प्रचंड राक्षसाचें ॥२॥
लंबायमान त्या दाढा भयंकर । इंगळचि नेत्र भासती ते ॥३॥
अग्निज्वालेसम केश स्कंधावरी । रामही अंतरीं भय मानी ॥४॥
आकाशासम तें वाढूं लागे रुप । जाणिलें कपट तदा रामें ॥५॥
वज्रमुष्टि तया हाणिली मस्तकीं । धार रुधिराची तदा वाहे ॥६॥
वासुदेव म्हणे कोसळावा गिरिं । तेंवी दैत्य खालीं मरुनि पडे ॥७॥

२३५
कळतां तें वृत्त आनंदले गोप । प्रेमें बलरामास आलिंगिती ॥१॥
संकटचि मोठें म्हणती टळलें । नवल वाटलें सकलांप्रति ॥२॥
चिरंजीव होईं रामा, रक्षीं आम्हां । बोलूनि स्तवना करिती त्याच्या ॥३॥
पुष्पवृष्टि तदा केली विबुधांनीं । वध तो पाहूनि दुर्जनांचा ॥४॥
वासुदेव म्हणे रामाची प्रशंसा । अत्यानंदें तदा करिती गोप ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : December 18, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP