मराठी मुख्य सूची|
मराठी साहित्य|
भारुडे|
कुंटीण - सद्गुरुमाय कुंटीण झाली म...
भारुड - कुंटीण - सद्गुरुमाय कुंटीण झाली म...
भारुड
Bharude is a kind of satirical form of presenting the faults of lay human beings. It was started by Eknath who is revered as a saint.
सद्गुरुमाय कुंटीण झाली माझी । व्यभिचारा ठेविलें साये आजी ॥ध्रु०॥
अद्वैताचा मज पांघरविला शेला । एकान्तासी तिणें चालविलें मला ॥ १ ॥
परपुरुषाचे शेजेवरी नेउनी घातली । मागल्याची सोय सोडविती झाली ॥ २ ॥
भ्रांति पदर काढुनी ओढिती झाली । आलिंगन घ्यावया सरसावली ॥ ३ ॥
वासनेचे कंचुक सोडियेले । मायामय कुच हे मर्दियेले ॥ ४ ॥
जीवशिव मिठी घाली धरी आवळून । करून ऐक्यता माझें चुंबिलें वदन ॥ ५ ॥
अलक्ष पदातींत घातलें आसन । देहातीत भोगिला भोग त्याणें ॥ ६ ॥
एका जनार्दनीं भोळी नारी । परपुरुष भोगी निरंतरीं ॥ ७ ॥
N/A
N/A
Last Updated : November 10, 2013

TOP