मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भारुडे|
गोंधळ - रंगीं नाचे क्षेत्रपाळ । आ...

भारुड - गोंधळ - रंगीं नाचे क्षेत्रपाळ । आ...

भारुड Bharude is a kind of satirical form of presenting the faults of lay human beings. It was started by Eknath who is revered as a saint.

रंगीं नाचे क्षेत्रपाळ । आग्या चैतन्य वेताळ । ब्रह्मानंदाचा गोंधळ । सुख सुकाळ माजविला ॥ १ ॥

सिद्धा जाग रे जगजोगी । सिद्धा जाग रे जगजोगी ॥ध्रु०॥

अनुहाताची डंबरी । बोध त्रिशूळ घेउनी करीं । नाचें चैतन्य चाचरीं । मुख साहाकारी बहिरव ॥ २ ॥

चित्त चैतन्य योगिनी । मोह महिषासुर मर्दिनी । एका जनार्दनाचे चरणीं भवभवानी नाचती ॥ ३ ॥

N/A

N/A
Last Updated : November 10, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP