मराठी मुख्य सूची|
मराठी साहित्य|
भारुडे|
जोहार - घ्या जोहार घ्या जोहार । म...
भारुड - जोहार - घ्या जोहार घ्या जोहार । म...
भारुड Bharude is a kind of satirical form of presenting the faults of lay human beings. It was started by Eknath who is revered as a saint.
घ्या जोहार घ्या जोहार । मी निराकारीचा महार । संत सभेचा कारभार । मीच करितों की जी मायबाप ॥ १ ॥
मी धन्याचा आवडतां फार । धन्याचा विश्वास मजवर । धन्याचे चाकरीअर रुजू मी की० ॥ २ ॥
चार वेदां झाडितों । सहा शास्त्रांचा केर भरितों । पुराणें सर्व जमा करितों । संत सभेची सांपडेल वाट ।
तेणें मार्ग नीट सांपडेल की० ॥ ४ ॥
मार्ग धरा पंढरीचा । एका विनवी जनार्दनाचा । रामनाम बोला वाचा । सावध होऊन की जी मायबाप ॥ ५ ॥
N/A
N/A
Last Updated : November 10, 2013

TOP