मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भारुडे|
धांवा - द्रौणी अस्त्राहातीं । उत्...

भारुड - धांवा - द्रौणी अस्त्राहातीं । उत्...

भारुड Bharude is a kind of satirical form of presenting the faults of lay human beings. It was started by Eknath who is revered as a saint.

द्रौणी अस्त्राहातीं । उत्तरा पीडितां सती ॥ गर्भी राखिला परीक्षिती । तैसा पावे श्रीपती ॥ १ ॥

वेगीं ऐका श्रीहरी । धांव पाव मुरारी । चक्र घेऊनियां करीं । भवभय निवारी ॥ २ ॥

इंद्र वरुषें शिळा धारी । गोकुळ पीडितां भारी । राखिले गोवर्धनधारी । तैसा पावे झडकरी ॥ ३ ॥

दुर्वास द्वादशी । छळूं आला अंबऋषी । चक्रें पळवोनी त्यासी । दहा गर्भवास सोसिलें ॥ ४ ॥

सभेंत वस्त्रहरण । पतिव्रता मरण । द्रौपती लज्जारक्षण । अंबर जाला श्रीकृष्ण ॥ ५ ॥

पांडव लाक्ष्याजोहरीं । धडाग्नी पोळत भारी । साहीं जणीं चिंतितां हरी । काढिलें विवरद्वारीं ॥ ६ ॥

देखोनी गुरु तो गत । रणागणीं भ्याला पार्थ । त्यासी सांगुनी गीतार्थ । संग्रामीं केला तुवां मुक्त ॥ ७ ॥

एका जनार्दनी द्त्त । साह्य जाला सतत । मोहे भवभय जेथ । तेथ केला नित्य मुक्त ॥ ८ ॥

N/A

N/A
Last Updated : November 10, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP