मराठी मुख्य सूची|
मराठी साहित्य|
भारुडे|
पोर - ऎक रे ब्राह्मणाच्या कार्ट...
भारुड - पोर - ऎक रे ब्राह्मणाच्या कार्ट...
भारुड Bharude is a kind of satirical form of presenting the faults of lay human beings. It was started by Eknath who is revered as a saint.
ऎक रे ब्राह्मणाच्या कार्ट्या । वलवल करू नको पोरट्या ।
बोलणे अवघे वोखट्या । हित नाही ॥१॥
आपुले हित तू पाही । वेदशास्त्री काही नाही ।
पुराणे पढोनि केले काही । हित नाही ॥२॥
कामक्रोधे शरीर भरले । ज्ञान वैराग्य हारपले ।
बोलसी विषयाच्या बोले । हित नाही ॥३॥
आपुले हित करी काही । सद्गुरुसी शरण जाई ।
'मी-तू' पणा नुरे काही । हित पाही ॥४॥
एका जनार्दनी पोर । केला सारासार विचार ।
पावला सद्गुरद्वार । हित जाले ॥५॥
N/A
N/A
Last Updated : November 10, 2013

TOP