मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भारुडे|
कोल्हाटी - सोहं सोहं वाजे ढोल । आमचा...

भारुड - कोल्हाटी - सोहं सोहं वाजे ढोल । आमचा...

भारुड Bharude is a kind of satirical form of presenting the faults of lay human beings. It was started by Eknath who is revered as a saint.

 


सोहं सोहं वाजे ढोल । आमचा युगायुगीचा खेळ ।

परब्रह्म भुलले अकळ । या खेळाचे गुरु जाणे मूळ ॥१॥

ब्रह्मा विष्णू शिवादी साचार । आधी होते निराकार ।

माझे कोल्हाटियाचा प्रकार ॥२॥

खेळे परात्पर ऊपरी । चैतन्याचे महाशिखरी ।

वेळु रोविला श्रीसोहंपुरी । खेळ खेळले नानापरी ॥३॥

आमुचा खेळ पाहुन । निर्गुण ते जाहले सगुण ।

शरण एका जनार्दन । गेला तनु मन विसरून ॥४॥

N/A

N/A
Last Updated : November 10, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP