मराठी मुख्य सूची|
मराठी साहित्य|
भारुडे|
जोहार - जोहार मायबाप जोहार । मी त...
भारुड - जोहार - जोहार मायबाप जोहार । मी त...
भारुड Bharude is a kind of satirical form of presenting the faults of lay human beings. It was started by Eknath who is revered as a saint.
जोहार मायबाप जोहार । मी तो सूर्यवंशीं रामाजी बाजीचा महार । माझें नांव आत्मनाक महार ।
सारा कारभार धन्याचे रजेनें करितों की जी मायबाप ॥ १ ॥
खोपटामाजीं काय काय राहाय । हाडाचे खोड्यांत पडतील पाय । तोंड चुकवितां विज्जत जाय । मग वांचू करावें काय की० ॥ २ ॥
तल्लफ वाढवी फार । लक्ष चौर्यांयशी वरातदार । यमाजी हुजूरचा महालदार । त्याचा मार पुरे पुरे की जी मायबाप ॥ ३ ॥
जोहार पाटील बाजी । तुम्ही दरबारासी काय राजी । बाकी शेकली आजी । सांगूं आलें की जी मायबाप ॥ ४ ॥
मुदत जवळ आली । ताकीद पाहिजे केली । कित्येक मारीत झोडीत नेली । माझी साच बोली नोहे की जी मायबाप ॥ ५ ॥
टाकून देहेगांव । डोई बोडून पालटाल नांव । घर सोडून देवळीं राहाव । हातीं काठी असूं द्यावी की जी मायबाप ॥ ६ ॥
एका जनार्दनीं महार । संतसभेसी केला जोहार । तेणें जन्ममरणाची वेरझार । चुकेल की जी मायबाप ॥ ७ ॥
N/A
N/A
Last Updated : November 10, 2013

TOP