मराठी मुख्य सूची|
मराठी साहित्य|
भारुडे|
जोहार - कां रे महारा बदमस्ता । का...
भारुड - जोहार - कां रे महारा बदमस्ता । का...
भारुड Bharude is a kind of satirical form of presenting the faults of lay human beings. It was started by Eknath who is revered as a saint.
कां रे महारा बदमस्ता । कां हो ब्राह्मणबावा भलतेंच बोलतां । तुझे बापाचें भय काय । मायबाप तुमचें आमचें एकच हाय । ऐक ऐसें बोलूं नको ।
निर्गुणापासून अवघें झालों । निर्गुण तुला काय ठावें । आत्मस्वरुपीं शोधून पहावें । आत्मस्वरूप आम्हां कळेना । नाहीं तरी संतांशीं शरण जा ना । संतांशीं गेल्यानें काय होतें । चौर्यांयशीचा फेरा चुकतो । हें ज्ञान तुला कोणापासून प्राप्त झालें । एका जनार्दन प्रसादें कळूं आलें ॥ १ ॥
N/A
N/A
Last Updated : November 10, 2013

TOP