मराठी मुख्य सूची|
मराठी साहित्य|
भारुडे|
वासुदेव - सुखे सेऊं ब्रह्मानंदा । ग...
भारुड - वासुदेव - सुखे सेऊं ब्रह्मानंदा । ग...
भारुड Bharude is a kind of satirical form of presenting the faults of lay human beings. It was started by Eknath who is revered as a saint.
सुखे सेऊं ब्रह्मानंदा । गाऊ रामनाम सदा ।
नोहे मग बाधा । काळदूत यमाची ॥१॥
करू वासुदेव स्मरण । तेणे तुटे रे बंधन ।
खंडेल कर्माचे वदन । वासुदेव जपतांची ॥२॥
तीर्थायात्रे सुखे जाऊ । वाचे विठ्ठलनाम घेऊं ।
संतासंगे सेऊ । वासुदेव धणीवरी ॥३॥
लोभ ममता सोडू आशा । उदारव्यथेचा बोळसा ।
न करूं आणिक सायासा । वासुदेवावाचुनी ॥४॥
मुख्य वर्माचे हे वर्म । येणे साधे सकळ धर्म ।
एका जनार्दनी नाम । वासुदेव आवडी ॥५॥
N/A
N/A
Last Updated : November 10, 2013

TOP