मराठी मुख्य सूची|
मराठी साहित्य|
भारुडे|
मानभाव - जाहलो आम्ही मानभाव । आम...
भारुड - मानभाव - जाहलो आम्ही मानभाव । आम...
भारुड Bharude is a kind of satirical form of presenting the faults of lay human beings. It was started by Eknath who is revered as a saint.
जाहलो आम्ही मानभाव ।
आमच्या देही भॊळा भाव ॥१॥
आम्हा दुजेपणा नाही ।
हासू खेळू भलते ठायीं ॥२॥
जपू सदा कृष्णनाम ।
नाही आणिकांचे काम ॥३॥
करु गडबडगुंडा ।
मारू यमाचिया तोंडा ॥४॥
शेंदरे हेंदरे देव ।
तया कोण पूजी वाव ॥५॥
एका जनार्दनी ठाव ।
आम्ही जालो मानभाव ॥६॥
N/A
N/A
Last Updated : November 10, 2013

TOP