मायराणी प्रकाशिता दिवा । यालीया जीवा लागतसे ॥१॥
एका पिसाळला पिसाळला ।
माय राणीचा अभिलाष गेला ॥ध्रु॥ ॥२॥
नावरूप नाही याचे पिसेपणी । धावोनि संतांचे पितो पायवणी ॥३॥
पिसे जाले सांगू मी काये । झोंबोनी संतांचे उच्छिष्टे खाये ॥४॥
उरफाटे जाले डोळे । एका जनार्दनी देखे ते न कळे ॥५॥