मराठी मुख्य सूची|
मराठी साहित्य|
भारुडे|
जोहार - जोहार मायबाप जोहार । मी स...
भारुड - जोहार - जोहार मायबाप जोहार । मी स...
भारुड Bharude is a kind of satirical form of presenting the faults of lay human beings. It was started by Eknath who is revered as a saint.
जोहार मायबाप जोहार । मी सद्गुरू साहेबांचा लेकवळा महार । त्याचे दरबारचा झाडाफडीचा कारभार ।
मीच करितोंकी जी मायबाप ॥ १ ॥
सकाळींच उठतों । सारे रयतेची खबर घेतों । येउनी धन्यास सांगतों । तें ऐका की जी मायबाप ॥ २ ॥
रतयेंत कुलबाव जाहला । धन्याचे नांवाचा बोलबाला । गांव आबादींत राहिला । धन्याचे सत्तेनें की० ॥ ३ ॥
त्यांत जिवजीचें आलें ठाणे । गांव बिघडला सर्व तेणें । विसरलें धन्याचें ठाणें । केलें पेणें चौर्यांयशीचें की० ॥ ४ ॥
म्हणोनी मारितो हाकां । जिवाजीपंतास हा धक्का । एका जनार्दनाचरणी देखा । करीं विनवणीं की जी मायबाप ॥ ५ ॥
N/A
N/A
Last Updated : November 10, 2013

TOP