मराठी मुख्य सूची|
मराठी साहित्य|
भारुडे|
गोंधळ - माझें कुळींची कुळस्वामिनी...
भारुड - गोंधळ - माझें कुळींची कुळस्वामिनी...
भारुड Bharude is a kind of satirical form of presenting the faults of lay human beings. It was started by Eknath who is revered as a saint.
माझें कुळींची कुळस्वामिनी । विठाई जगत्रय जननी । येई वो पंढरपूरवासिनी । ठेविले दोनी कर जघनीं । उभी सखीसजनी ॥ १ ॥
येई पुंडलीक वरदायिनी । विश्वजननी । रंगा येई वो ॥ध्रु०॥
मध्यें सिंहासन घातलें । प्रमाण चौक हे साधिले । ज्ञान कळस वर ठेविले । पूर्ण भरियले । धूप दाविले । सुवासें करुनी ॥ २ ॥
सभामंडप शोभला । भक्ति चांदवा दिधला । उदो उदो शब्द गाजला । रंग माजला । वेद बोलिला । मूळचा ध्वनी ॥ ३ ॥
शुक सनकादिक गोंधळी । जीव शीव घेउनी संबळी । गाती हरीची नामावळी । मातले बळी । प्रेमकल्लोळीं । सुखाचे सदनीं ॥ ४ ॥
ऐसा गोंधळ घातीला । भला परमार्थ लुटिला । एका जनार्दनीं भला । ऐक्य साधिला । ठाव आपुला । लाभ त्रिभुवनीं ॥ ५ ॥
N/A
N/A
Last Updated : November 10, 2013

TOP