मराठी मुख्य सूची|
मराठी साहित्य|
भारुडे|
जोहार - जोहार मायबाप जोहार । माझी...
भारुड - जोहार - जोहार मायबाप जोहार । माझी...
भारुड Bharude is a kind of satirical form of presenting the faults of lay human beings. It was started by Eknath who is revered as a saint.
जोहार मायबाप जोहार । माझी नकटी बायको गर्हवार । खावया मागती आंब्याचा खार । आणुनी द्यावा की जी मायबाप ॥ १ ॥
माझी बायको मोठी । तिची संगत पडली खोटी । तिनें माझी धरोनी हनुवटी । म्हणे ऐका की जी मायबाप ॥ २ ॥
माझें एक मूल लहान । त्याचें तुम्ही करा पाळण । हें सांगतों वर्तमान । सावधान ऐका की जी मायबाप ॥ ३ ॥
माझी बायको राधाई । तिचे पंचमूर्ति जावाई । म्हणोनी सर्वांसी सांगतों पाही । ऐका की जी मायबाप ॥ ४ ॥
एका जनार्दनाचा महार । सांगतों वर्तमान फार । माझा खोटा नव्हे समाचार । परब्रह्मीं वास कराल की जी मायबाप ॥ ५ ॥
N/A
N/A
Last Updated : November 10, 2013

TOP