मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|निर्णयसिंधु|तृतीयपरिच्छेद उत्तरार्ध|
दत्तकादिकांविषयीं

तृतीयपरिच्छेद - दत्तकादिकांविषयीं

निर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल , याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे .


आतां दत्तकादिकांविषयीं सांगतो -

दत्तकस्तुजनकस्यपुत्राद्यभावेदद्यान्नतत्सत्त्वे गोत्ररिक्थेजनयितुर्नभजेद्दत्रिमः सुतः गोत्ररिक्थानुगः पिंडोव्यपैतिददतः स्वधेतिमनूक्तेः इदंजनकस्यपुत्रसत्त्वविषयम् ‍ एतच्चप्रवरमंजर्यां कात्यायनलौगाक्षिभ्यांस्पष्टमुक्तं अथयेदत्तकक्रीतकृत्रिमपुत्रिकापुत्राः परपरिग्रहेणानार्षेयाजातास्तेव्द्यामुष्यायणाभवंति यथाशौंगशैशिरीणांयानिचान्यान्येवंसमुत्पत्तीनिकुलानिभवंतीत्यादिनाद्वयोः पित्रोः प्रवरानुक्त्वोक्तम् ‍ अथयद्येषांस्वासु भार्यास्वपत्यंनस्याद्रिक्थंहरेयुः पिंडंचैभ्यस्त्रिपुरुषंदद्युर्यद्युभयोर्नस्यादुभाभ्यामेवदद्युरेकस्मिन् ‍ श्राद्धेपृथगुद्दिश्यैक पिंडेद्वावनुकीर्तयेत्परिगृहीतारंचोत्पादयितारंचातृतीयात्पुरुषादिति हेमाद्रौकार्ष्णाजिनिः यावंतः पितृवर्ग्याः स्युस्तावद्भिर्दत्तकादयः प्रेतानांयोजनंकुर्युः स्वकीयैः पितृभिः सह द्वाभ्यांसहाथतत्पुत्राः पौत्रास्त्वेकेनतत्समं चतुर्थपुरुषेछंदस्तस्मादेषात्रिपूरुषी साधारणेषुकालेषुविशेषोनास्तिवर्गिणाम् ‍ मृताहेत्वेकमुद्दिश्यकुर्युः श्राद्धंयथाविधीति अस्यार्थमाहहेमाद्रिः दत्तकादयः जनकपालकयोः कुलेप्रेतानांस्ववर्गीर्यैः सपिंडनंकुर्युः दत्तकानांपुत्रास्तुपितुर्दत्तकस्यपितृभ्यांजनकपालकाभ्यांस्वपितामहाभ्यांसपिंडनंकुर्युः तेषांपौत्राः स्वपितरंदत्तकेनपितामहेनतज्जनकेनचसपिंडयेयुः चतुर्थोपितत्कुलस्थएव तेषांप्रपौत्रस्तुदत्तकस्यप्रपितामहस्यपालककुलस्थं चतुर्थंयोजयेन्नवा छंदइच्छा दर्शमहालयादौतुद्वयोः पित्रोः पितामहयोः प्रपितामहयोर्वाश्राद्धंदेयं तत्रद्वयोः पित्राद्यौः पृथक् ‍ पिंडदानंद्वयोरुद्देशेनैकोवेति अत्रकेचित् ‍ आवयोरयमितिपरिभाष्ययोदत्तस्तस्येदंद्वयोः पित्रोः श्राद्धं यस्त्वपरिभाष्यदत्तः सग्रहीतुरेव सपालकायैवदद्यादित्याहुः अत्रमूलंतएवप्रष्टव्याः ।

दत्तकपुत्रानें तर जनक पित्याला पुत्रादिक नसतां त्याचें श्राद्धादिक करावें , पुत्रादि असतील तर त्याचें श्राद्धादि करुं नये . कारण , " दत्तक पुत्राला जनकपित्याचें गोत्र व द्रव्य प्राप्त होत नाहीं ; गोत्र व धन यांना अनुसरुन असणारा पिंड व स्वधाशब्द ( श्राद्ध ) तो पुत्र देणारास ( जनक पित्यास ) प्राप्त होत नाहीं " असें मनूचें वचन आहे . हें मनुवचन जनकाला पुत्र असतां समजावें . हा प्रकार प्रवरमंजरींत कात्यायन लौगाक्षि यांनीं स्पष्ट सांगितला आहे ; तो असा - " आतां जे दत्तक , क्रीत , कृत्रिम , व पुत्रिकापुत्र हे दुसर्‍यानें घेतल्यामुळें अनार्षेय ( प्रवररहित ) झाले ते व्द्यामुष्यायण ( द्विगोत्री ) होतात ; जशीं - शौंगशैशिरींचीं कुलें झालीं आहेत ; त्याचप्रमाणें दुसरीं देखील अशींच उत्पन्न झालेलीं कुलें द्विगोत्र होतात . " इत्यादि ग्रंथानें दोन्ही पित्यांचे प्रवर सांगून पुढें सांगितलें कीं , " आतां जर ह्यांना ( पित्यांना ) स्वकीय भार्यांचे ठायीं अपत्य नसेल तर ज्यांना नसेल त्यांचें द्रव्य ह्या दत्तकादिकांनीं घ्यावें , आणि त्यांना पिंड त्रिपुरुषपर्यंत द्यावा ; जर दोन्ही पित्यांना ( जनक व पालक यांना ) अपत्य नसेल तर दोघांनाही पिंड द्यावा ; एका श्राद्धांत दोघांचा वेगवेगळा उच्चार करुन एकपिंडाचे ठायीं ग्रहीता व उत्पादयिता ह्या दोन्ही पित्यांचें अनुकीर्तन करावें . याप्रमाणें त्रिपुरुषपर्यंत करावें . " हेमाद्रींत कार्ष्णाजिनि - " दत्तकादिकांनीं जितके पितृवर्गांतील असतील तितक्या स्वकीय पितरांसहवर्तमान प्रेतांचें संयोजन ( सपिंडन ) करावें . दत्तकादिकांच्या पुत्रांनीं आपल्या पित्यांचें ( दत्तकादिकांचें ) दोघां ( जनकपालकां ) सहवर्तमान सपिंडन करावें . दत्तकादिकांच्या पौत्रांनीं तर आपल्या पित्याचें ( दत्तकादिकांच्या पुत्राचें ) एकासह ( दत्तकादिसह ) सपिंडन करावें . चवथ्या पुरुषाचे ठायीं जशी इच्छा असेल त्याप्रमाणें ( दत्तकादि प्रपौत्रानें ) करावें ; चवथ्या पुरुषास नियम नाहीं म्हणून ही त्रिपुरुषी आहे . साधारण जे काल ( अमावास्यादिक ) त्यांचे ठायीं जनकवर्गाचें किंवा पालकवर्गांचें करावें , याविषयीं विशेष सांगितला नाहीं . मृतदिवशीं मात्र जो मृत असेल त्या एकाच्या उद्देशानें यथाविधि श्राद्ध करावें . " ह्या ( वर लिहिलेल्या अर्थाच्या ) कार्ष्णाजिनिवचनांचा अर्थ सांगतो हेमाद्रि - " दत्तकादिकांनीं जनक व पालक ह्या दोघांच्या कुलांत जे मृत असतील त्यांचें आप आपल्या वर्गांतील पितरांशीं सपिंडन करावें . दत्तकांच्या पुत्रांनीं तर आपला पिता जो दत्तक त्याचें , जनकपिता आणि पालकपिता म्हणजे आपले पितामह त्यांसहवर्तमान सपिंडन करावें . त्यांच्या ( दत्तकांच्या ) पौत्रांनीं आपल्या पित्याचें , दत्तक जो पितामह त्यासह आणि त्याच्या जनकासह सपिंडन करावें . चवथा देखील त्याच कुलांतला समजावा . दत्तकांच्या प्रपौत्रानें तर दत्तक जो प्रपितामह त्याला पालककुलस्थ चतुर्थ मिळवावा किंवा न मिळवावा . यांविषयीं त्याची इच्छा नियामक आहे . दर्श महालय इत्यादिकांचे ठायें तर दोन पिते , दोन पितामह व दोन प्रपितामह यांना श्राद्ध द्यावें . ह्या वाक्यांत ‘ वा ’ आहे त्यानें विकल्प बोधित होतो . त्या श्राद्धांत दोन जे पित्रादिक त्यांच्या उद्देशानें वेगवेगळे पिंड द्यावे , अथवा दोघांच्या उद्देशानें एक पिंड द्यावा . असा हेमाद्रीनें केलेला अर्थ समजावा . या ठिकाणीं कोणी असें म्हणतात कीं , ‘ ह्या दोघांचा हा ’ अशी बोली करुन जो पुत्र दिला आहे त्याला , हें दोन पितरांना ( जनक पालकांना ) श्राद्ध द्यावें , म्हणून सांगितलें . जो पुत्र बोली केल्यावांचून दिलेला आहे , तो ग्राहकाचाच पुत्र होय म्हणून त्यानें पालकालाच ( ग्राहकालाच ) श्राद्ध द्यावें , असें कोणी सांगतात . तें असें सांगण्याविषयीं मूलवचन कोणतें आहे तें त्यांनाच विचारावें .

वस्तुतस्तुजनकस्यपुत्रपत्न्याद्यभावेदत्तकोद्वयोर्दद्यादन्यथापालकायैव प्रागुक्तकात्यायनवचनात् ‍ मानवीयमप्येतद्विषयमेव गोत्रंतुश्राद्धेपालकस्यैव विवाहादौतूभयोरित्यादिमत्कृतप्रवरदर्पणेज्ञेयम् ‍ यस्तुमूल्यक्रीतायांपरभार्यायांदास्यांचोत्पन्नः सबीजिनएवदद्यात् ‍ मूल्यंविनास्वयमुपनतायांतुक्षेत्रिणएव तदुक्तंपृथ्वीचंद्रोदयेकौर्मे अनियोगात्सुतोयस्तुशुल्कतोजायतेत्विह प्रदद्याद्बीजिनेपिंडंक्षेत्रिणेतुततोन्यथेति क्षेत्रजादेर्विशेषस्तुकलौतदभावान्नोच्यतइतिदिक् ‍ जारजानांविशेषमाहापरार्केनारदः जायंतेत्वनियुक्तायामेकेनबहुभिस्तथा अरिक्थभाजस्तेसर्वेबीजिनामेवतेसुताः दद्युस्तेबीजिनेपिंडंमाताचेच्छुल्कतोह्रता अशुल्कोपह्रतायांतुपिंडदावोढुरेवते ॥

वास्तविक म्हटलें तर जनकपित्याला पुत्र , पत्नी इत्यादिकांचा अभाव असतां दत्तकानें दोघांना ( जनकपालकांना ) श्राद्ध द्यावें , जनकाला पुत्रादिक असेल तर पालकालाच द्यावें . कारण , अशाविषयीं पूर्वीं सांगितलेलें कात्यायनवचन आहे . आणि मनुवचन ( गोत्ररिक्थे० ) हेंही अशाविषयींच समजावें . श्राद्धामध्यें गोत्र तर पालकाचें घ्यावें . विवाहादिकांचे ठायीं तर दोघांचें घ्यावें , इत्यादिक विचार मीं केलेल्या प्रवरदर्पणांत आहे तो जाणावा . जो पुत्र द्रव्य घेऊन विकत घेतलेल्या परस्त्रियेचे ठायीं आणि दासीचे ठायीं उत्पन्न झाला त्यानें , ज्याच्यापासून झाला असेल त्यालाच पिंड द्यावा . द्रव्य दिल्यावांचून आपण होऊन आलेल्या परस्त्रियेचेठायीं उत्पन्न झाला असेल त्यानें , ज्याची ती स्त्री असेल त्यालाच पिंड द्यावा . तो प्रकार सांगतो पृथ्वीचंद्रोदयांत कौर्मांत - " नियोगावांचून ( माझ्याठिकाणीं पुत्र उत्पन्न कर , असें सांगितल्यावांचून ) संभोगाचें मूल्य देऊन परस्त्रियेचेठायीं जो पुत्र उत्पन्न केला असेल त्यानें , ज्याच्या वीर्यापासून झाला असेल त्याला पिंड द्यावा . असें नसेल तर ज्याची ती स्त्री असेल त्याला त्या पुत्रानें पिंड द्यावा . " क्षेत्रजादिकांचा विशेष प्रकार , कलियुगांत त्यांचा अभाव असल्यामुळें सांगत नाहीं . याप्रमाणें ही दिशा दाखविली आहे . जारापासून उत्पन्न झालेल्या पुत्रांचा विशेषप्रकार अपरार्कांत नारद सांगतो - " नियोग न केलेल्या स्त्रियेचे ठायीं एकापासून किंवा बहुतांपासून पुत्र उत्पन्न होतात त्या सर्व पुत्रांना बापाचें ( ज्याची स्त्री त्याचें ) द्रव्य मिळणार नाहीं , तर ज्यांच्या बीजापासून झाले असतील त्यांचेच ते पुत्र होत . जर माता बापानें मूल्य देऊन ग्रहण केली आहे , तर तिच्या त्या पुत्रांनीं त्या बापाला ( ज्याचें बीज त्याला ) पिंड द्यावा . मूल्य दिल्यावांचून आपण होऊन आली असेल तर तिच्या त्या पुत्रांनीं ज्याची ती स्त्री त्यालाच पिंड द्यावा .

धर्मार्थंश्राद्धकरणेफलमाहचंद्रिकायांशातातपः प्रीत्याश्राद्धंतुकर्तव्यंसर्वेषांवर्णलिंगिनाम् ‍ एवंकुर्वन्नरः सम्यड्महतींश्रियमाप्नुयात् ‍ गयायामपितत्रैवब्रह्मवैवर्ते आत्मजोवाथवान्योपिगयाशीर्षेयदातदा यन्नान्नापातयेत्पिंडंतंनयेद्ब्रह्मशाश्वतम् ‍ एतच्चयदाफलभूमार्थिनाद्विस्त्रिर्वाक्रियतेतदाप्रेतशिलाश्राद्धवर्ज्यंकुर्यात्तस्यप्रेतत्वविमोक्षार्थत्वात्तस्यचजातत्वादितिकेचित् ‍ वस्तुतस्तुसंन्यासिश्राद्धवदत्रापिसर्वंकार्यम् ‍ सांगेधिकारादितियुक्तंप्रतीमः संन्यस्तपित्रादिस्तुपितुः पित्रादिभ्यः सर्वश्राद्धेषुदद्यादित्युक्तंप्राक् ‍ वक्ष्यतेचजीवत्पितृकश्राद्धे ।

धर्मार्थ श्राद्ध केलें असतां त्याचें फळ चंद्रिकेंत शातातप सांगतो - " सर्व ब्राह्मणादिवर्णाचें श्राद्ध प्रीतीनें करावें . असें प्रीतीनें उत्तम प्रकारें श्राद्ध करणार्‍या मनुष्याला मोठी संपत्ति प्राप्त होते . " गयेंत देखील श्राद्ध केल्याचें फळ त्याच ग्रंथांत ब्रह्मवैवर्तांत सांगतो - " पुत्र अथवा दुसरा कोणीही गयाशीर्षाचे ठायीं ज्या वेळीं ज्याच्या नांवानें पिंडदान करील , त्या वेळीं त्याला तो शाश्वत अशा ब्रह्मपदाप्रत नेईल . " हें गयाश्राद्ध जेव्हां फळ मोठें मिळावें अशा हेतूनें द्विवार किंवा त्रिवार करावयाचें असतें , तेव्हां प्रेतशिलाश्राद्ध वर्ज्य करुन बाकीचें करावें . कारण , तें प्रेतशिलाश्राद्ध प्रेतत्वमोक्षासाठीं आहे , व तें पूर्वीं एकवार झालेलें आहे , असें कोणी म्हणतात . वास्तविक म्हटलें तर संन्याशाच्या श्राद्धाप्रमाणें या ठिकाणीं देखील सर्व करावें . कारण , सांगकर्माविषयीं अधिकार आहे , असें हें योग्य आम्हीं समजतों . ज्याचा पिता संन्याशी आहे त्यानें तर सर्व श्राद्धांमध्यें आपल्या बापाच्या पितरांना पिंडादिक द्यावें ; असें पूर्वीं सांगितलें आहे . आणि जीवत्पितृकाच्या श्राद्धप्रकरणीं पुढेंही सांगूं .

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP