आतां नांदीश्राद्धाची इतिकर्तव्यता ( करण्याचा प्रकार ) सांगतो -
अथेतिकर्तव्यता पृथ्वीचंद्रोदयेवृद्धपराशरः मालत्याः शतपत्र्यावामल्लिकाकुब्जयोरपि केतक्याः पाटलायावादेयामालानलोहिताः श्राद्धेमालानिषेधस्यायमपवादः तथा सुवेषभूषणैस्तत्रसालंकारैस्तथानरैः कुंकुमाद्यनुलिप्तांगैर्भाव्यंतुब्राह्मणैः सह स्त्रियोपिस्युस्तथाभूतागीतनृत्यादिहर्षिताः हेमाद्रौब्रह्मांडे कुशस्थानेचदूर्वाः स्युर्मंगलस्याभिवृद्धये कुशाअपिवक्ष्यंते छंदोगपरिशिष्टे प्रातरामंत्रितान्विप्रान्युग्मानुभयतस्तथा उभयतः दैवेपित्र्येच वैश्वदेवेद्वौविप्रौपित्रादीनामेकैकस्यद्वौद्वावितिविंशतिः त्रिकेवाद्वावित्यष्टौविप्राः अत्रविप्रालाभेस्त्रियोपिभोज्याइत्याहाशार्केवृद्धवसिष्ठः मातृश्राद्धेतुविप्राणामलाभेपूजयेदपि पतिपुत्रान्विताभव्यायोषितोष्टौकुलोद्भवाः मातृत्रिकेचतस्त्रः मातामहीत्रिकेचेत्यष्टावितिहेमाद्रिः अत्रपित्र्येप्राड्मुखाविप्राः पाद्येपित्र्येचतुरस्त्रंमंडलमितिजयंतः हेमाद्रौबाह्मे विप्रान्प्रदक्षिणावर्तंप्राड्मुखानुपवेशयेत् छंदोगपरिशिष्टे गोत्रनामभिरामंत्र्यपितृभ्योर्घ्यंप्रदापयेत् नात्रापसव्यकरणंनपित्र्यंतीर्थमिष्यते ज्येष्ठोत्तरकरान्युग्मान्कराग्राग्रपवित्रकान् कृत्वार्घ्यंसंप्रदातव्यंनैकैकस्यात्रदीयते पित्रादेर्द्वौद्वौविप्रौतयोर्दक्षिणहस्तौ संयोज्यप्रथमोपवेशितविप्रकरोपरितंत्रेणद्वयोरर्घ्यंदद्यादित्यर्थः बह्वृचकारिकायांतु दत्तार्घ्यस्यैकदेशात्स्यादर्घ्यदानंप्रतिद्विजं आवृत्तिरपिमंत्रस्यप्रतिब्राह्मणमिष्यते प्रतिद्विजंपृथक्कुर्यान्निवीत्यर्घ्यानुमंत्रणमित्युक्तं मधुमध्वितियस्तत्रत्रिर्जपोशितुमिच्छतां गायत्र्यानंतरंस्तोत्रंमधुमंत्रविवर्जितं नचाश्नंस्तुजपेदत्रकदाचित्पितृसूक्तकं तथा संपन्नमितितृप्ताः स्थप्रश्नस्थानेविधीयते सुसंपन्नमितिप्रोक्तेशेषमन्नंनिवेदयेत् अक्षय्योदकदानंचअर्घ्यदानवदिष्यते षष्ठयैवनियतंकुर्यान्नचतुर्थ्याकदाचन ।
पृथ्वीचंद्रोदयांत वृद्धपराशर - " जाई , कमल , मोगरी , कुब्ज , केवडा , आणि पाटला यांच्या फुलांच्या माला द्याव्या . तांबड्या फुलांच्या देऊं नयेत . " श्राद्धांत मालेचा निषेध आहे त्याचा हा अपवाद होय . तसेंच त्या नांदीश्राद्धांत ब्राह्मणासहित पुरुषांनीं चांगले वेष , भूषणें व अलंकार धारण करावे ; केशर , चंदन इत्यादिक अंगास लावावीं . स्त्रियांनीं देखील अलंकार , भूषणें वगैरे धारण करुन गायन , नृत्य इत्यादिकांनीं आनंदित असावें . " हेमाद्रींत ब्रह्मांडपुराणांत - " मंगलाच्या अभिवृद्धीसाठीं कुशांच्या स्थानीं दूर्वा घ्याव्या . " कुश देखील पुढें आम्हीं सांगूं . छंदोगपरिशिष्टांत - " प्रातःकालीं देवांकडे व पितरांकडे दोन दोन ब्राह्मण सांगावे " विश्वेदेवस्थानीं दोन ब्राह्मण आणि पिता इत्यादि एकेकास दोन दोन ब्राह्मण , असे वीस ब्राह्मण सांगावे . अथवा एकेका त्रयीला दोन दोन असे आठ ब्राह्मण सांगावे . या श्राद्धांत ब्राह्मणांच्या अभावीं स्त्रियांसही भोजन घालावें , असें सांगतो आशार्कांत वृद्धवसिष्ठ - " मातेच्या श्राद्धांत ब्राह्मणांच्या अभावीं पतिपुत्रवती भव्य ( चांगल्या ) अशा आठ कुलीन स्त्रियांची पूजा करावी . " येथें आठ सांगितल्या त्या अशा - मातृत्रयीला चार आणि मातामहीत्रयीला चार मिळून आठ असें हेमाद्रि सांगतो . या श्राद्धांत पितरांकडे प्राड्मुख ब्राह्मण बसवावे . पाद्याचे ठायीं पितरांकडे मंडल चतुरस्त्र करावें , असें जयंत सांगतो . हेमाद्रींत ब्राह्मांत - " प्राड्मुख ब्राह्मणांना दक्षिणसंस्थ बसवावें . " छंदोगपरिशिष्टांत - " गोत्र नांव यांचा उच्चार करुन पितरांना अर्घ्य द्यावें . येथें अपसव्य करणें नाहीं व पितृतीर्थही इष्ट नाहीं . हातांत पवित्रक घातलेल्या पित्रादिस्थानीं बसलेल्या दोन दोन ब्राह्मणांचे दक्षिण हस्त पहिल्या ब्राह्मणाचा वर व दुसर्याचा खालीं अशा रीतीनें जोडून पहिल्या ब्राह्मणाच्या हातावर तंत्रानें दोघांना अर्घ्य द्यावें . प्रत्येकाला निरनिराळें अर्घ्य देऊं नये . " बह्वृचकारिकेंत तर - " दिलेल्या अर्घ्याच्या एकदेशांतून प्रत्येक ब्राह्मणाला अर्घ्यदान करावें . प्रत्येक ब्राह्मणाला मंत्राची आवृत्तीही करावी . निवीतीनें अर्घ्यानुमंत्रण प्रत्येक ब्राह्मणाला निरनिराळें करावें " असें सांगितलें आहे . " श्राद्धांत ब्राह्मणभोजनाच्या वेळीं ‘ मधु मधु ’ या मंत्राचा त्रिवार जो जप सांगितला त्याच्या स्थानीं गायत्रीजप आणि मधुमंत्रवर्जित स्तोत्रजप करावा . या वृद्धिश्राद्धांत ब्राह्मण जेवीत असतां कधींही पितृसूक्ताचा जप करुं नये . " तसेंच - " - ‘ तृप्ताःस्थ ’ या प्रश्नस्थानीं ‘ संपन्नं ’ असा प्रश्न करावा . ब्राह्मणांनीं ‘ सुसंपन्नं ’ असें सांगितल्यानंतर शेष ( उरलेल्या ) अन्नाचें त्यांस निवेदन करावें . अक्षय्योदकदान अर्घ्यदानाप्रमाणें करावें . तें अक्षय्योदकदान षष्ठीविभक्तीनेंच करावें . चतुर्थीविभक्तीनें कधींही करुं नये . " क्
चंद्रोदयेब्राह्मे पठेच्छकुनिसूक्तंतुस्वस्तिसूक्तंशुभंतथा नांदीमुखान्पितृन्भक्त्यासांजलिश्चसमाह्वयेत् तथा शाल्यन्नंदधिमध्वक्तंबदराणियवांस्तथा मिश्रीकृत्वातुचतुरः पिंडान्श्रीफलसन्निभान् दद्यान्नांदीमुखेभ्यश्च पितृभ्योविधिपूर्वकं द्राक्षामलकमूलानियवांश्चविनियोजयेत् तान्येवदक्षिणार्थंतुदद्याद्विप्रेषुसर्वदा तत्रैवचतुर्विंशतिमते द्वौद्वौचाभ्युदयेपिंडावेकैकस्मैविनिक्षिपेत् एकंनाम्नापरंतूष्णींदद्यात्पिंडान्पृथक् पृथक् वसिष्ठः प्राड्मुखोदेवतीर्थेनप्राक्कूलेषुकुशेषुच दत्वापिंडान्नकुर्वीतपिंडपात्रमधोमुखं नांदीमुखेभ्यः पितृभ्यः स्वाहेतिवा पिंडदानमंत्रइति वृत्तिः अत्रपिंडाः कृताकृताइत्युक्तंतत्रैवभविष्ये पिंडनिर्वपणंकुर्यान्नवाकुर्याद्विचक्षणः वृद्धिश्राद्धेमहाबाहोकुलधर्मानवेक्ष्यतु छागलेयः अग्नौकरणमर्घ्यंचावाहनंचावनेजनं पिंडश्राद्धेप्रकुर्वीत पिंडहीनेनिवर्तते तेनात्रभोजनस्यैवप्रधानत्वाद्यदिविप्रस्यवमनंतदातस्यैवपार्वणस्यपुनरावृत्तिरितिसिद्धं अत्रसांकल्पेविशेषः योगपारिजातेसंग्रहे शुभार्थीप्रथमांतेनवृद्धौसांकल्पमाचरेत् नषष्ठ्यायदिवाकुर्यान्महादोषोभिजायते नामगोत्रादिनिषेधोप्यत्रैव नतुसपिंडकश्राद्धेइतिसएव ।
चंद्रोदयांत ब्राह्मांत - " शुभकारक अशा शकुनिसूक्ताचा व स्वस्तिसूक्ताचा जप करावा . नांदीमुखपितरांना भक्तीनें हात जोडून आव्हान करावें " तसेंच " दहीं , मध यांनीं युक्त भात , बोरें , यव हे सारे पदार्थ मिश्र करुन त्यांचे नारळासारखे चार पिंड करुन ते नांदीमुख पितरांना विधिपूर्वक द्यावे . त्यांत द्राक्षें , आंवळे , मुळें , आणि यव यांचा विनियोग करावा . ब्राह्मणांना दक्षिणेसाठीं सर्वदा तींच ( द्राक्षादिक ) द्यावीं . " तेथेंच चतुर्विंशतिमतांत - " नांदीश्राद्धांत एक एक पितराला दोन दोन पिंड द्यावे . एक पिंड नांवाचें व दुसरा उच्चारावांचून द्यावा , असे वेगवेगळे पिंड द्यावे . " वसिष्ठ - " पूर्वेकडे अग्र करुन ठेवलेल्या कुशांवर पूर्वेकडे तोंड करुन पिंड द्यावे . पिंडाचें पात्र उपडें करुं नये . " अथवा ‘ नांदीमुख्येभ्यः पितृभ्यः स्वाहा ’ हा पिंडदानाचा मंत्र असें वृत्तिकार सांगतो . या श्राद्धांत पिंड कृताकृत ( करावे किंवा न करावे ) असें सांगितलें आहे . तेथेंच भविष्यांत - " वृद्धिश्राद्धचे ठायीं कुलधर्मांचें अवलोकन करुन पिंडदान करावें किंवा न करावें . " छागलेय - " अग्नौकरण , अर्घ्यदान , आवाहन , पाद्य , हीं सपिंडक श्राद्धांत करावीं . पिंडरहित श्राद्धांत वर्ज्य करावीं . " तेणेंकरुन ह्या श्राद्धांत भोजनालाच प्राधान्य असल्यामुळें जर ब्राह्मणाला वमन झालें असेल तर त्याच पार्वणाची पुनः आवृत्ति करावी , असें सिद्ध झालें . येथें सांकल्पश्राद्धांत विशेष सांगतो - प्रयोगपरिजातांत संग्रहांत - " कल्याणार्थी यानें वृद्धिकर्मामध्यें प्रथमाविभक्तीनें सांकल्पिक श्राद्ध करावें . षष्ठीविभक्तीनें करुं नये . जर षष्ठीविभक्तीनें करील तर मोठा दोष उत्पन्न होईल . " नाम , गोत्र , इत्यादिकांचा निषेधही सांकल्पश्राद्धांतच आहे , सपिंडकांत नाहीं , असें तोच सांगतो .