आतां संन्यास सांगतो -
अथसंन्यासः याज्ञवल्क्यः वनाद्गृहाद्वाकृत्वेष्टिंसार्ववेदसदक्षिणां प्राजापत्यांतदंतेतानग्नीनारोप्यचात्मनि अधीतवेदोजपकृत्पुत्रवानन्नदोग्निमान् शक्त्याचयज्ञकृन्मोक्षेमनः कुर्यात्तुनान्यथा एतदाश्रमसमुच्चयपक्षे जाबालश्रुतौत्वन्येपिपक्षाउक्ताः यदिचेतरथाब्रह्मचर्यादेवप्रव्रजेद्गृहाद्वनाद्वाअथपुनरव्रतीवास्नातकोवाऽस्नातकोवोत्सन्नाग्निकोवायदहरेवविरजेत्तदहरेवप्रव्रजेदिति अंगिराः प्रव्रजेद्ब्रह्मचर्याद्वाप्रव्रजेच्चगृहादपि वनाद्वाप्रव्रजेद्विद्वानातुरोवाथदुः खितः आतुरोमुमूर्षुः दुःखितश्चौरव्याघ्रादिभीतः भारते आतुराणांचसंन्यासेनविधिर्नैवचक्रिया प्रेषमात्रंसमुच्चार्यसंन्यासंतत्रपूरयेत् जाबालश्रुतावपि यद्यातुरः स्यान्मनसावाचावासंन्यसेदिति अत्रविप्रस्यैवाधिकारः ब्राह्मणाः प्रव्रजंतीतिजाबालश्रुतेः आत्मन्यग्नीन्समारोप्यब्राह्मणः प्रव्रजेद्गृहादितिमनूक्तेश्चेतिविज्ञानेश्वरादयः वृद्धयाज्ञवल्क्योपि चत्वारोब्राह्मणस्योक्ताआश्रमाः श्रुतिचोदिताः क्षत्रियस्यत्रयः प्रोक्ताद्वावेकोवैश्यशूद्रयोरिति माधवस्तु ब्राह्मणः क्षत्रियोवाथवैश्योवाप्रव्रजेदुहादितिकौर्माद्युक्तेर्वर्णत्रयस्याप्यधिकारः पूर्ववाक्यंतुकाषायदंडादिनिषेधार्थं मुखजानामयंधर्मोयद्विष्णोर्लिंगधारणम् राजन्यवैश्ययोर्नेतिदत्तात्रेयमुनेर्वच इतिबौधायनोक्तेरिति पक्षांतरमाह तत्त्वंतुकुटीचकादिपरमेतदिति योपिसन्यासंपलपैतृकमितिकलौनिषेधः सोपित्रिदंडादिपरइत्युक्तंप्राक् ।
याज्ञवल्क्य - ‘‘ वेदाध्ययन केलेला , जप करणारा , पुत्रवान् , लोकांना अन्न देणारा , अग्नि धारण करणारा , आपल्या शक्तीप्रमाणें यज्ञ करणारा अशा मनुष्यानें वानप्रस्थाश्रमांत किंवा गृहस्थाश्रमांत प्राजापत्य इष्टी करुन त्या इष्टींत सर्वस्व दक्षिणा देऊन नंतर त्या अग्नीचा आपल्या ठिकाणीं समारोप करुन मोक्षाविषयीं मन करावें . अन्यथा करुं नये . " हें वचन सारे आश्रम करावे ह्यापक्षीं आहे . जाबालश्रुतींत तर दुसरेही पक्ष सांगितले आहेत , ते असे - " जर सर्व आश्रम शक्य नसतील तर ब्रह्मचर्याश्रमांतच संन्यास घ्यावा . अथवा गृहस्थाश्रमांत किंवा वानप्रस्थाश्रमांत , मग तो व्रतधारण करणारा असो किंवा नसो , स्नातक असो किंवा अस्नातक असो , ज्यादिवशीं विरक्ती होईल त्याचदिवशीं संन्यस्त व्हावें . " अंगिरा - " विद्वानानें ब्रह्मचर्याश्रमांतही संन्यास घ्यावा . अथवा गृहस्थाश्रमांतही घ्यावा . किंवा वानप्रस्थाश्रमांत घ्यावा . अथवा मरणावस्थेंत घ्यावा . किंवा दुःखित म्हणजे चौर , व्याघ्र इत्यादिकांनीं भीत झालेला त्यानें घ्यावा . " भारतांत - " आतुरांच्या ( मरणारांच्या ) संन्यासाविषयीं विधि नाहीं आणि क्रिया ( कर्म ) ही नाहीं . त्या ठिकाणीं प्रेषाचा मात्र उच्चार करुन संन्यासविधि पुरा करावा . " जाबालश्रुतींतही - " जर आतुर असेल तर मनानें किंवा वाणीनें संन्यास घ्यावा , " संन्यासाविषयीं ब्राह्मणालाच अधिकार आहे . कारण , " ब्राह्मण संन्यस्त होतात . " अशी जाबालश्रुति आहे . आणि " ब्राह्मणानें आपल्या ठिकाणीं अग्नीचा समारोप करुन गृहस्थाश्रमांतून निघून जावें म्हणजे संन्यास घ्यावा . " असें मनुवचनही आहे , असें विज्ञानेश्वर इत्यादि ग्रंथकार सांगतात . वृद्धयाज्ञवल्क्यही - " ब्राह्मणाला चार आश्रम श्रुतीनें सांगितले आहेत . क्षत्रियाला तीन आश्रम सांगितले आहेत . वैश्याला दोन आणि शूद्राला एक आश्रम सांगितला आहे . " माधव तर - ब्राह्मण , क्षत्रिय अथवा वैश्य यानें गृहस्थाश्रमांतून संन्यास घ्यावा . " ह्या कौर्मादिवचनावरुन तीन वर्णांनाही अधिकार आहे . वरील वृद्धयाज्ञवल्क्याचें वचन तर काषायवस्त्र , दंड इत्यादिकांच्या निषेधासाठीं आहे . कारण , " विष्णूचीं चिन्हें धारण करणें हा धर्म ब्राह्मणांचा आहे . क्षत्रिय वैश्यांचा नाहीं , असें दत्तात्रेयमुनीचें वचन आहे . असें बौधायन सांगतो , म्हणून हा दुसरा पक्ष असें ( माधव ) सांगतो . खरा प्रकार म्हटला तर हें वचन कुटीचक इत्यादि संन्यासांचें क्षत्रिय - वैश्यांला निषेधक आहे . आणि जो ‘ संन्यासंपलपैतृकं ’ या वचनानें कलियुगांत संन्यासाचा निषेध सांगितला आहे तो देखील त्रिदंडादिविषयक आहे , असें पूर्वीं ( कलिवर्ज्यप्रकरणीं ) सांगितलें आहे .
सचसंन्यासश्चतुर्घेत्याहहारीतः कुटीचकोबहूदकोहंसश्चैवतृतीयकः चतुर्थः परमोहंसोयोयः पश्चात्सउत्तमः आद्यः पुत्रादिनाकुटींकारयित्वा तत्रगृहेवावसन् काषायवासाः शिखोपवीतत्रिदंडवान् बंधुषुस्वगृहेवाभुंजानआत्मज्ञोभवेत् एतदत्यंताशक्तपरम् द्वितीयस्तुबंधून् हित्वासप्तागाराणिभैक्षंचरन् पूर्वोक्तवेषः स्यात् हंसस्तुपूर्वोक्तवेषोप्येकदंडः एकंतुवैणवंदंडंधारयेन्नित्यमादरादितिस्कांदात् विष्णुरपि यज्ञोपवीतंदंडंचवस्त्रंजंतुनिवारणम् तावान्परिग्रहः प्रोक्तोनान्योहंसपरिग्रहः चतुर्थोपि स्कांदे परमहंसस्त्रिदंडंचरज्जुंगोवालनिर्मिताम् शिखांयज्ञोपवीतंचनित्यंकर्मपरित्यजेत् अयमप्येकदंडएव येतुशिखोपवीतादित्यागनिषेधास्तेकुटीचकादिपराः यत्तुमेधातिथिः यावन्नस्युस्त्रयोदंडास्तावदेकेनवर्तयेदिति तदपितत्परमेव यच्चात्रिः चतुर्धाभिक्षवः प्रोक्ताः सर्वेचैवत्रिदंडिनइति तद्वाग्दंडादिपरंनयष्टिपरम् वाग्दंडोथमनोदंडः कर्मदंडस्तथैवच यस्यैतेनियतादंडाः सत्रिदंडीतिचोच्यते इतिमनूक्तेः तस्मात्परमहंसस्यैकदंडएव सोप्यविदुषः विदुषस्तुसोपिनास्ति नदंडंनशिखांनाच्छादनंचरतिपरमहंसइतिमहोपनिषदुक्तेः ज्ञानमेवास्यदंडइतिवाक्यशेषाच्च यत्तु यमः काष्ठदंडोधृतोयेनसर्वाशीज्ञानवर्जितः सयातिनरकान्घोरान्महारौरवसंज्ञितानिति तद्वैराग्यंविनाजीवनार्थसंन्यासपरं एकदंडंसमाश्रित्यजीवंतिबहवोनराः नरकेरौरवेघोरेकर्मत्यागात्पतंतितइतिस्मृतेः यच्चाश्वमेधिके एकदंडीत्रिदंडीवाशिखामुंडितएववा काषायमात्रसारोपियतिः पूज्योयुधिष्ठिरेति तस्यापिपूर्वोक्तव्यवस्थाज्ञेया ।
तो संन्यास चार प्रकारचा आहे , असें सांगतो हारीत - " कुटीचक , बहूदक , हंस आणि परमहंस असे चार प्रकारचे संन्यास आहेत . जो पुढचा पुढचा तो तो पूर्वीच्यापेक्षां उत्तम उत्तम समजावा . " पहिला प्रकार - पुत्रादिकांकडून पर्णकुटी करवून तींत राहणारा किंवा घरांत राहणारा , काषायवस्त्र धारण करणारा , शिखा यज्ञोपवीत व तीन दंड धारण करणारा , आपल्या बांधवांकडे किंवा घरीं भोजन करुन राहणारा असें असून आत्मज्ञान संपादन करावें , हा कुटीचक होय . हा प्रकार अत्यंत अशक्ताविषयीं आहे . दुसरा प्रकार - आपल्या बांधवांना टाकून सात घरें भिक्षा मागून निर्वाह करणारा , वर सांगितलेल्या कुटीचकाचा वेष धारण करणारा असा असून आत्मज्ञान संपादावें , हा बहूदक होय . तिसरा प्रकार - हंस , याचा वेष बहूदकाप्रमाणेंच असतो . पण दंड एक असतो . कारण , " वेळूचा एक दंड आदरानें नित्य धारण करावा . " असें स्कांदवचन आहे . विष्णुही - " यज्ञोपवीत , दंड , जंतु निवारण करणारें वस्त्र , इतका परिग्रह सांगितला आहे . दुसरा परिग्रह हंसाला नाहीं . " चवथा प्रकारही सांगतो स्कांदांत - " परमहंसानें तीन दंड , गाईच्या केशांची दोरी , शिखा , यज्ञोपवीत आणि नित्यकर्म हीं टाकावीं . " यालाही एक दंडच आहे . आतां जे शिखा , यज्ञोपवीत इत्यादि त्यागांचे निषेध आहेत ते निषेध कुटीचक , बहूदक , हंस यांच्याविषयीं आहेत . आतां जें मेधातिथि - " जोंपर्यंत तीन दंड झाले नाहींत तोंपर्यंत एकदंडानें वर्तन करावें " असें सांगतो ; तें देखील कुटीचकादिविषयक आहे . आतां जें अत्रि - " चार प्रकारचे संन्याशी सांगितले आहेत , ते सारे त्रिदंडी आहेत " असें सांगतो ; तें वागदंडादिविषयक आहे . वेणुदंडाविषयीं नाहीं . कारण , " वागदंड , मनोदंड , कर्मदंड हे तीन दंड ज्याला निश्चित आहेत तो त्रिदंडी असा म्हटला आहे . " असें मनुवचन आहे तस्मात् परमहंसाला एक दंडच आहे . तोही ब्रह्मज्ञानरहितालाच आहे . ब्रह्मज्ञान्याला तर तोही नाहीं . कारण , " परमहंसाला दंड नाहीं , शिखा नाहीं , आच्छादन नाहीं , असा परमहंस संचार करितो . " असें महोपनिषदांत सांगितलें आहे . आणि ज्ञानच याला दंड , असें शेवटींही सांगितलें आहे . आतां जें यम - " काष्ठाचा दंड धारण करणारा , सर्व भक्षण करणारा , ज्ञानवर्जित तो महाभयंकर अशा महारौरव नरकांप्रत जातो " असें सांगतो , तें वैराग्य असल्याशिवाय जीवनासाठीं जो संन्यास त्याविषयीं आहे . कारण , " एका दंडाचा आश्रय करुन जीवन करणारे बहुत मनुष्य आहेत यांनीं आपल्या कर्माचा त्याग केल्यामुळें ते भयंकर अशा रौरव नरकांत पडतात . " अशी स्मृति आहे . आतां जें अश्वमेधपर्वांत - " एकदंडी असो किंवा त्रिदंडी असो , शेंडी काढलेला असो किंवा नसो मुख्यत्वेंकरुन काषाय वस्त्र मात्र ग्रहण करणारा असा जो यति ( संन्याशी ) तो पूज्य आहे . " असें सांगितलें आहे त्याची देखील वर सांगितलेली व्यवस्था म्हणजे हें वचन ज्ञान्याविषयीं आहे , असें समजावें .