मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|निर्णयसिंधु|तृतीयपरिच्छेद उत्तरार्ध|
स्त्रीशूद्रांविषयीं

तृतीयपरिच्छेद - स्त्रीशूद्रांविषयीं

निर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल , याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे .


आतां स्त्रीशूद्रांविषयीं सांगतो -

अत्रस्त्रीशूद्राणांश्राद्धंमंत्रवर्ज्यंतूष्णींभवति स्त्रीणाममंत्रकंश्राद्धंतथाशूद्रासुतस्यच प्राग्द्विजाश्चव्रतादेशात्तेचकुर्युस्तथैवतदिति हेमाद्रौमरीचिवचनात् ‍ अयमेवविधिः प्रोक्तः शूद्राणांमंत्रवर्जितः अमंत्रस्यतुशूद्रस्यमंत्रोविप्रेणगृह्यतेइतिब्राह्मोक्तेश्च गृह्यतेसंबध्यते अस्यश्राद्धप्रकरणेपाठेपिपरिभाषात्वान्नप्रकरणेनसंकोचोयुक्तः तेनशूद्रस्यस्नानदानादावपिविप्रेणमंत्रपाठः कार्यः अमंत्रस्येतिविशेषणात् ‍ स्त्रियाअपीतिशूलपाणिः यत्तुतेनोक्तम् ‍ मंत्रजन्यनियमादृष्टसिद्धिस्तुनमस्कारेण अनुमतोस्यनमस्कारोमंत्रइतिगौतमोक्तेरिति तन्न दृष्टद्वारैवहितत् ‍ प्राप्तिर्नस्वातंत्र्येण अन्यथानखविपूतेप्यवघातजन्यादृष्टार्थंसोपिक्रियेतेतियत् ‍ किंचिदेतत् ‍ तेनपितृणांनामगोत्रत इत्यादौयत्रद्विजानामपिनाममंत्रउक्तस्तत्रप्रतिप्रसवमात्रार्थंयुक्तम् ‍ नतिलावपनादावपि अत्रकेचित् ‍ वैदिकमंत्रोविप्रस्य पौराणस्तुशूद्रैः पठनीयः नहिवेदेष्वधिकारः क्कचिच्छूद्रस्यविद्यते पुराणेष्वधिकारोमेदर्शितोब्राह्मणैरिहेतितत्रैवपाद्मोक्तेरित्याहुः गौडाअप्येवम् ‍ तन्न नाध्येतव्यमिदंशास्त्रंवृषलस्यतुसन्निधाविति कौर्मेपुराणनिषेधेनवेदस्यदूरापास्तत्वात् ‍ अध्येतव्यंब्राह्मणेनवैश्येनक्षत्रियेणच श्रोतव्यमेवशूद्रेणनाध्येतव्यंकदाचन श्रौतंस्मार्तंचवैधर्मंप्रोक्तमस्मिन्नृपोत्तम तस्माच्छूद्रैर्विनाविप्रंनश्रोतव्यंकदाचनेतितत्रैवपुराणाधिकारे भविष्योक्तेश्च एतेननाध्येतव्यमितिनिषेधोमंत्रेतरपुराणपरइतिश्रीदत्तादिमतमपास्तम् ‍ तेनपौराणमंत्राणामेवविप्रेणपाठोनवैदिकानामितिसिद्धम् ‍ द्विजस्त्रियस्तुसंकल्पमात्रंस्वयंकृत्वावैदिकमंत्रयुक्तंसर्वंब्राह्मणद्वाराकारयेयुरितिप्रयोगपारिजातः अतएवस्त्रीणामित्यकृतविवाहस्त्रीपरमितिहेमाद्रिराह अनुपनीतस्तुवैदिकमंत्रयुक्तंसर्वंस्वयमेवकुर्यादित्युक्तंप्राक् ‍ यत्तुप्राग्द्विजाश्चव्रतादेशादितितदशक्तविषयमचूडविषयंवेतिदिक् ‍ ।

स्त्रिया व शूद्र यांनीं करावयाचें श्राद्ध मंत्ररहित मुकाट्यानें ( केवळ तंत्रानें ) होतें . कारण , " स्त्रियांना श्राद्ध अमंत्रक आहे , तसेंच शूद्रापुत्रालाही अमंत्रक आहे . आणि उपनयन होण्याच्या पूर्वींचे जे द्विज ( ब्राह्मणादिक ) त्यांनींही तें श्राद्ध तसेंच ( मंत्ररहित ) करावें " असें हेमाद्रींत मरीचिवचन आहे . आणि " हाच ( ब्राह्मणांना सांगितलेला ) विधि शूद्रांना मंत्रवर्जित सांगितला आहे . अमंत्रक जो शूद्र त्याचा मंत्र ब्राह्मणानें म्हणावा . " असें ब्राह्मवचनही आहे . ह्या वचनांत ‘ गृह्यते ’ याचा अर्थ संबद्ध होतो , असा आहे . हें वचन श्राद्धप्रकरणांत पठित असलें तरी परिभाषारुप असल्यामुळें श्राद्धप्रकरणांतच लागू होतें , असें म्हणणें योग्य नाहीं . तर इतर ठिकाणींही लागू होतें , म्हणून शूद्राच्या स्नान - दान इत्यादि कर्माचे ठायीं देखील ब्राह्मणानें मंत्रपाठ करावा , असें आहे . वरील वचनांत ‘ अमंत्रस्य ’ असें विशेषण आहे , म्हणून मंत्ररहित ज्या स्त्रिया त्यांचाही मंत्र ब्राह्मणानें म्हणावा , असें शूलपाणि सांगतो . आतां जें त्या शूलपाण्यानें सांगितलें कीं , मंत्रापासून उत्पन्न होणारें जें नियमानें अदृष्ट ( अदृश्यफल ) त्याची सिद्धि तर त्या शूद्रादिकांना , नमस्कारानें होते . कारण , " ह्या शूद्राला नमस्कारमंत्र हा सर्वांस अनुमत आहे " अशी गौतमाची उक्ति आहे . असें जें शूलपाण्याचें म्हणणें तें बरोबर नाहीं . कारण , दृष्टफलाच्या द्वारानेंच अदृष्टफलाची प्राप्ति होते , स्वातंत्र्यानें होत नाहीं . अर्थात् ‍ मंत्रोक्त कर्म स्मरुन कर्म केलें असतां अदृष्टफलाची प्राप्ति होते , ती केवळ नमस्कारानें कशी होईल ? जर दृष्टफलावांचून स्वातंत्र्येंकरुन अदृष्टाची प्राप्ति होत असेल , तर ‘ व्रीहीनवहंति ’ ह्या वाक्यानें भात कांडून तांदूळ करुन होमास घ्यावे असें सांगितलें आहे त्या ठिकाणीं नखांनीं सोलून तांदूळ झाले तरी , मुसळाच्या अवघातापासून उत्पन्न होणार्‍या अदृष्टफलासाठीं , तोही मुसळाचा अवघात करावा , असें होईल ? म्हणून हें सांगणें काहीं तरी आहे . हें सांगणें योग्य नसल्यामुळें ‘ पितरांच्या नामगोत्रांचा उच्चार करुन द्यावें ’ इत्यादि ज्या स्थळीं द्विजांना देखील नाममंत्र सांगितला आहे , त्या स्थळीं शूद्रादिकांना नाममंत्राचा निषेध येत होता , त्याचा प्रतिप्रसव ( बाध ) च करण्यासाठीं हें वचन युक्त आहे . तिलावाप करणें इत्यादि स्थळीं जो मंत्रनिषेध त्याचा बाध करण्यासाठीं हें वचन समजूं नये . या ठिकाणीं कोणी म्हणतात - वैदिकमंत्र ब्राह्मणाला आहे , पौराणमंत्र शूद्रांनीं म्हणावा . कारण , " वेदाविषयीं कोठेंही शूद्राला अधिकार नाहीं . पुराणाविषयीं मला ( शूद्रापुत्राला ) अधिकार ब्राह्मणांनीं येथें दाखविला आहे . " अशी त्या ठिकाणींच ( हेमाद्रींत ) पाद्मोक्ति आहे , असें कोणी म्हणतात . गौड देखील असेंच म्हणतात . तें त्यांचें म्हणणें बरोबर नाहीं . कारण , " हें शास्त्र शूद्राच्या संनिध म्हणूं नये " असा कौर्मांत पुराणाचा निषेध केल्यामुळें वेद तर दूरच राहिला . " हें शास्त्र ब्राह्मणानें म्हणावें ; वैश्यानें व क्षत्रियानेंही म्हणावें ; शूद्रानें केवळ ऐकावें , कधींही म्हणूं नये . हे राजा ! या ठिकाणीं श्रौत ( वैदिक ) आणि स्मार्त धर्म सांगितले आहेत ; त्याकरितां कधींही ब्राह्मणावांचून शूद्रांनीं ऐकूं नये " असें त्याच ठिकाणीं पुराणाधिकारांत भविष्यवचनही आहे . असें सांगितल्यानें ‘ अध्ययन करुं नये , असा जो निषेध तो मंत्रावांचून इतर पुराणांविषयीं समजावा ’ असें श्रीदत्तादिकांचें मत अपास्त ( खंडित ) झालें . ह्या वरील सांगण्यानें शूद्रादिकर्मांत पौराणमंत्रांचा ब्राह्मणानें पाठ करावा , वैदिकमंत्रांचा करुं नये , असें सिद्ध झालें . द्विजस्त्रियांनीं तर स्वतः केवल संकल्प करुन वैदिकमंत्रयुक्त सर्व कर्म ब्राह्मणांकडून करवावें , असें प्रयोगपारिजातकार सांगतो . स्त्रियांचें समंत्रक कर्म ब्राह्मणांकडून होतें , म्हणूनच ‘ स्त्रीणाममंत्रकं० ’ ह्या वचनांतील ‘ स्त्रीणां ’ हें पद अविवाहित स्त्रियांचें बोधक आहे , असें हेमाद्रि सांगतो . अनुपनीत ( मुंज न झालेल्या ) पुत्रानें तर वैदिक मंत्रयुक्त सर्व कर्म स्वतःच करावें , असें पूर्वीं सांगितलें . आतां जें ‘ प्राग् ‍ द्विजाश्च० ’ मुंजीच्या पूर्वीं द्विजांनीं अमंत्र करावें , असें जें वरील मरीचिवचन तें शक्ति नसेल त्याविषयीं अथवा चूडाकर्म झालें नसेल त्याविषयीं समजावें , अशी ही दिशा दाखविली आहे .

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP