आतां दुर्मरणाविषयीं सांगतो -
अथदुर्मरणेदिवोदासीये चंडालादिमृतेविप्रेत्वंतरिक्षमृतेपिवा कृच्छ्रातिकृच्छ्रचांद्रैस्तुशुद्धिस्तत्रप्रकीर्तिता दवेजानीयेजाबालिः शूद्रेणदग्धोयोविप्रोनलभेच्छाश्वतींयतिं प्रायश्चित्तंप्रकुर्वीतब्राह्मणः पापशुद्धये चांद्रायणंपराकंचप्राजापत्यंविशोधनं गृह्यकारिकायां उदक्यासूतिकावापियदिप्रेतंस्पृशंतिहि तस्यैषविधिरादिष्टोवात्स्येनैवमहात्मना एषः सूतिकोक्तः मदनरत्नेस्मृत्यंतरे उर्ध्वोच्छिष्टाधरोच्छिष्टोभयोच्छिष्टेतथैवच अस्पृश्यस्पर्शनेचैवखट्वादिमरणेपिच श्वानक्रव्यादसंस्पर्शेक्रिमिकीटोद्भवेपिच एतद्दोषानुसारेणप्रायश्चित्तंसमाचरेत् कृच्छ्रांस्त्रिषटपंचदशांश्चांद्रत्रयमथापिवा शुद्ध्यैतदानींसंपाद्यशवधर्मेणदाहयेत् गृह्यकारिकायां खट्वायांमरणेचैवत्रींस्त्रीन्कृच्छ्रान्प्रकल्पयेत् सप्तांत्यजैस्तुसंस्पृष्टोमृतोदैवात्कथंचन एकत्रिंशताकृच्छ्रैस्तुशुद्धिरुक्तामनीषिभिः कुणपेत्वर्धदग्धेतुचितास्पृष्टांत्यजादिभिः तत्स्पर्शनेदूषणंचत्रिभिः कृच्छ्रैर्विशुध्यति धर्मप्रदीपे चांडालसूतिकोदक्यास्पृष्टेप्रेतेतथैवच तस्यपापविशुद्ध्यर्थंकृच्छ्रान्पंचदशाचरेदित्युक्तं मनुः अस्वर्ग्याह्याहुतिः सास्याच्छूद्रसंपर्कदूषिता अत्रापिकृच्छ्रत्रयं अस्पृश्यस्पर्शनेचैवेत्युक्तेः ।
दिवोदासीयांत - " ब्राह्मण चंडालादिकांनीं मारला असतां अथवा अंतरिक्षांत मृत असतां त्याची शुद्धि कृच्छ्र , अतिकृच्छ्र व चांद्रायण यांनीं सांगितली आहे . " देवजानीयांत जाबालि - " शूद्रानें दग्ध केलेला जो ब्राह्मण त्याला शाश्वत गति प्राप्त होत नाहीं , म्हणून त्याच्या पापाची शुद्धि होण्याकरितां चांद्रायण , पराककृच्छ्र , व प्राजापत्य हें प्रायश्चित्त करावें . " गृह्यकारिकेंत - " उदक्या ( रजस्वला ) अथवा सूतिका जर प्रेताला स्पर्श करितील तर त्याला वात्स्य ऋषीनें हा विधि ( सूतिकेला सांगितलेला ) सांगितला आहे . " मदनरत्नांत स्मृत्यंतरांत - " ऊर्ध्वोच्छिष्ट , अधरोच्छिष्ट , उभयोच्छिष्ट यांजविषयीं ; अस्पृश्यांचा स्पर्श झाला असतां ; खट्वा , मंचक इत्यादिकांवर मरण असतां ; कुत्रा व इतर आममांसभक्षकप्राणी यांचा स्पर्श झाला असतां ; कृमि , कीट यांच्या योगानें मरण झालें असतां ; ह्या दोषानुरोधानें प्रायश्चित्त करावें . तें असें - तीन कृच्छ्र , सहा कृच्छ्र , पंधरा कृच्छ्र , अथवा तीन चांद्रायणें , त्या वेळीं शुद्धीकरितां संपादन करुन नंतर प्रेताचा शवधर्मानें दाह करावा . " गृह्यकारिकेंत - " खट्वेचे ठायीं मरण असतां तीन तीन ( नऊ ) कृच्छ्र करावे . रजकादि सात प्रकारच्या अंत्यजांनीं स्पर्श केलेला असून दैववशानें मृत झाला तर त्याची शुद्धि विद्वानांनीं एकतीस कृच्छ्रांनीं सांगितली आहे . प्रेत अर्धै दग्ध असतां त्या चितेला अंत्यजांनीं स्पर्श केला तर त्यांच्या स्पर्शाचा दोष तीन कृच्छ्रांनीं जातो . " धर्मप्रदीपांत - " चांडाल , सूतिका , रजस्वला , यांनीं प्रेताला स्पर्श केला असतां त्याच्या पापशुद्ध्यर्थ पंधरा कृच्छ्र करावे " असें सांगितलें आहे . मनु - " शुद्रसंपर्कानें दूषित झालेल्या प्रेताची आहुति स्वर्गप्राप्तीला अयोग्य होते . " येथेंही ( शूद्रस्पर्श असतां ) तीन कृच्छ्र करावे . कारण , वरील स्मृत्यंतरांत ‘ अस्पृश्य स्पर्श असतां ’ असें सांगितलें आहे .
तत्रैवकर्मप्रदीपे रात्रौवारात्रिशेषेवाम्रियंतेचेद्दिजातयः दाहंकृत्वायथान्यायंद्वौपिंडौनिर्वपेत्सुतः रजस्वलागर्भिण्यादिमृतौतुवक्ष्यामः निर्णयामृतेपारिजातेयमः संध्यायांवातथारात्रौदाहः पाथेयकर्मच नवश्राद्धंचनोकुर्यात्कृतंनिः फलतांव्रजेत् एतद्दिनमृतस्यरात्रिनिषेधार्थं यत्तुस्कांदे यदिरात्रौदहेत्तस्यसमाप्तिर्दहनस्यतु परेहन्युदितेसूर्येकार्यातस्योदकक्रिया दग्धस्यतुनैवकार्यारात्रौजातूदकक्रियेति तन्निर्मूलं रात्रिमृतस्यतुतत्रैवसंग्रहे रात्रौदग्ध्वातुपिंडांतंकृत्वावपनवर्जितं वपनंनेष्यतेरात्रौश्वस्तनीवपनक्रियेति वपनंतुप्रातः तच्चसर्वैः पुत्रैः कार्यं गंगायांभास्करक्षेत्रेमातापित्रोर्गुरोर्मृतौ आधानेसोमयागेचवपनंसप्तसुस्मृतमितिमिताक्षरायांस्मृतेः मरणस्यानंगित्वान्नैमित्तिकमिदम् तदेवसंग्रहवचनेनपरेद्युरुत्कृष्यतेतीर्थवत् तेनकस्यचिद्दाहांगत्वोक्तिश्चिंत्या मदनरत्नेगालवः प्रथमेहनिकर्तव्यंवपनंचानुभाविनां प्रेतस्यकेशश्मश्वादिवापयित्वाथदाहयेत् आशौचांतेतुपुनः कार्यं विधिबलात् मदनपारिजातेप्येवं तेनसर्वस्यास्यनिर्मूलत्वोक्तिरज्ञोक्तिरेव स्मृतिरत्नावल्ल्याम् शवंरात्र्युषितंचेतत्रीन्कृच्छ्रान्कृत्वादहेत्सुतः मदनरत्नेंगिराः ऊर्ध्वोच्छिष्टाधरोच्छिष्टेह्यंतरिक्षमृतेपिवा कृच्छ्रत्रयंप्रकुर्वीतआशौचेमरणेपिच ।
तेथेंच कर्मप्रदीपांत - " रात्रीं किंवा रात्रिशेष असतां पहांटेस जर द्विजाति ( ब्राह्मणादिक ) मृत होतील तर यथाविधि त्यांचा दाह करुन पुत्रानें दोन पिंड द्यावे . " रजस्वला , गर्भिणी इत्यादिकांच्या मरणाविषयीं तर पुढें सांगूं . निर्णयामृतांत पारिजातांत यम - " संध्याकाळीं व रात्रीं दाह , पाथेयकर्म , आणि नवश्राद्ध करुं नये , तें केलें असतां निष्फल होतें . " हें वचन दिवसा मृताचे रात्रीं दाहादि निषेधार्थ आहे . आतां जें स्कांदांत - ‘‘ जर रात्रीं दाह केला तर त्या दाहाची समाप्ति दुसर्या दिवशीं सूर्योदय झाल्यावर करावी . व त्याची उदकदानक्रिया सूर्योदयोत्तर करावी . दग्धाची रात्रीं उदकदानक्रिया कधींही करुं नये " असें वचन तें निर्मूल आहे . आतां रात्रीं मृताचें सांगतो तेथेंच संग्रहांत - " रात्रीं मृताचा रात्रीं दाह करुन वपनवर्जित पिंडदानांत कर्म करावें . वपन रात्रीं इष्ट नाहीं . वपनक्रिया दुसर्या दिवशीं प्रातः कालीं करावी . " वपन प्रातः कालीं तें सर्व पुत्रांनीं करावें . कारण , " गंगा , भास्करक्षेत्र , माता , पिता , व गुरु यांचा मरणसमय , आधान आणि सोमयाग ह्या सातांच्या ठिकाणीं वपन ( क्षौर ) सांगितलें आहे . " असें मिताक्षरेंत स्मृतिवचन आहे . वपनाचें मरण अंगि होत नाहीं , म्हणून मरणाचें वपन अंग नव्हे , तर हें वपन मरणनिमित्तक असल्यामुळें नैमित्तिक आहे . तेंच वरील संग्रहाच्या वचनानें दुसर्या दिवशीं करावें म्हणून सांगितलें ; तीर्थांत जसें सांगितलें तद्वत् . यावरुन कोणी एकानें दाहाचें वपन हें अंग असें सांगितलें , तें चिंत्य ( अयुक्त ) आहे . मदनरत्नांत गालव - " पुत्रादिकांनीं प्रथमदिवशीं वपन करावें . प्रेताचे केश श्मश्रु इत्यादिकांचें वपन करवून दाह करावा . " आशौचांतीं तर पुनः वपन करावें . कारण , विधीनें सांगितलें आहे . मदनपारिजातांतही असेंच आहे . यावरुन हें सर्व निर्मूल म्हणणारे अज्ञच आहेत . स्मृतिरत्नावलींत - " शव रात्रीं राहिलें असेल तर पुत्रानें तीन कृच्छ्र करुन दाह करावा . " मदनरत्नांत अंगिरा - " ऊर्धोच्छिष्ट व अधरोच्छिष्टाविषयीं अथवा अंतरिक्षमरण असतां त्याविषयीं आणि आशौचांत मरण असेल तर त्याविषयींही तीन कृच्छ्र करावे . "