आतां आशौचप्रकरणाला प्रारंभ करितो -
नारायणभट्टांचा पुत्र जो श्रीमान् रामकृष्णभट्ट त्याचा पुत्र कमलाकरभट्ट आतां आशौचाचा निर्णय करितो ॥१॥
मरीचि - " गरोदर स्त्रियेचा चार महिन्यांच्या आंत कोणत्याही कारणानीं गर्भरुप शुकशोणितांचा स्त्राव होतो त्याला स्त्राव असें म्हणतात . पांचव्या व साहाव्या महिन्यांत कोणत्याही कारणांनीं कठिण झालेला शुकशोणितरुपी गर्भ पडतो म्हणून त्याला पात असें म्हणतात . सातव्या महिन्यापासून पुढें कधींही गर्भ स्वस्थानापासून बाहेर आला असतां त्याला प्रसूति असें म्हणतात . प्रसूति झाली असतां सूतक ( प्रसूतिनिमित्तक आशौच ) दहा दिवस असतें . " बृहत्पराशर - " गर्भस्त्राव असतां गर्भाला जितके महिने झाले असतील तितके दिवस त्या स्त्रियेला आशौच . कितीएक विद्वान् चार महिन्यांच्या आंत गर्भाचा स्त्राव असें म्हणतात . चार महिन्यांच्या पुढें पात असें म्हणतात . तो पात असतां आशौच अधिक आहे . गर्भाचा स्त्राव असतां त्या गर्भाच्या मातेला त्रिरात्र ( तीन दिवस ) आशौच आहे व सपिंडांला आशौच नाहीं . गर्भाचा पात असतां जितक्या महिन्यांचा गर्भ असेल तितके दिवस मातेला आशौच व सपिंडांना तीन दिवस आशौच . " या सर्वांविषयींचें मूळ मिताक्षरेंत पाहावें . या वरील वचनांत स्त्राव असतां मातेला त्रिरात्र असें सांगितलें तें अनुवाद ( सिद्धाचें कथन ) आहे , अपूर्व सांगितलेलें नाहीं ; कारण , ती स्त्री रजस्वला असल्यामुळें तीन दिवस आशौच सिद्धच आहे . जरी ‘ स्त्रावे मातुस्त्रिरात्रं ’ ह्या वचनानें चवथ्या मासीं देखील त्रिरात्र आशौच प्राप्त होतें तरी " सहा महिने पूर्ण होईपर्यंत जर गर्भस्त्राव होईल तर त्या वेळीं माससमान दिवसांनीं त्या स्त्रियांची शुद्धि होते " ह्या आदिपुराणवचनावरुन आणि " गर्भस्त्राव असतां मासतुल्य रात्रींनीं ( दिवसांनीं ) स्त्री शुद्ध होते " ह्या मनुवचनावरुन आणि " ब्राह्मणाचे ठायीं गर्भस्त्राव असतां जितक्या मासांचा गर्भ असेल तितके दिवस स्त्रियेला आशौच . तीन महिन्यांचा गर्भ असेल तर तीन दिवस आशौच आहे " ह्या मरीचिवचनावरुनही चवथ्या मासीं चार दिवस आशौच समजावें . एथें सपिंडांना स्नान समजावें . कारण , " गर्भाचें पतन असतां सपिंडांना सद्यः शौच ( सद्यः शुद्धि ) आहे " असें तेथेंच ( मिताक्षरेंत ) सांगितलें आहे . हें सद्यः शौच चतुर्थमासपर्यंत होय ; कारण , वरील बृहत्पराशरवचनांत चतुर्थमासानंतर पात असतां तीन दिवस सांगितलें आहे . कारणावांचून शुद्धीचा असंभव असल्यामुळें वरील वचनांतील ‘ सद्यः ’ या पदानें स्नान समजावें . याप्रमाणें पुढेंही जेथें ‘ सद्यः ’ पद असेल तेथें स्नान समजावें . ‘ सद्यः ’ या पदानें स्नान समजावें , असें वर सांगितलें याचें कारण , " गर्भस्त्राव असतां पुरुषाला स्नान मात्र आहे " असें वृद्धवसिष्ठवचन आहे . पूर्वीं सांगितलेल्या ‘ सद्यः शौचं सपिंडानां ’ ह्या वचनारुन ह्या वृद्धवसिष्ठवचनांतील ‘ पुरुषस्य ’ हें पद सपिंडांचें उपलक्षण ( बोधक ) आहे . चतुर्थमासपर्यंत गर्भस्त्राव असतां सपिंडांना स्नान नाहीं ; तर पुरुषालाच ( गर्भजननकालाचें ) स्नान आहे . वरील बृहत्पराशरवचनानें पाताविषयीं त्रिदिन आशौच सांगितलें तें निर्गुणाला आहे . गुणवंताला तर " दंत उत्पन्न होण्याच्या पूर्वीं पुत्र मृत असतां , तसेंच गर्भपात असतां , सर्व सपिंडांना एक रात्र आशौच आहे " ह्या यमवचनावरुन एकाह आशौच , असें मदनपारिजात सांगतो .
सप्तममासादिदशाहं एतत्सर्ववर्णविषयं तुल्यंवयसिसर्वेषामतिक्रांतेतथैवचेति व्यासोक्तेः पराशरः जातेविप्रोदशाहेनद्वादशाहेनभूमिपः वैश्यः पंचदशाहेनशूद्रोमासेनशुध्यति संवर्तः जातेपुत्रेपितुः स्नानंसचैलंतुविधीयते माताशुध्येद्दशाहेनस्नानात्तुस्पर्शनंपितुः पुत्रपदात्कन्योत्पत्तौनपितुः स्नानमितिहारलतायां तन्न पुत्रपदस्य पौत्रीमातामहस्तेनेतिकन्यायामपिप्रयोगात् यच्चतत्रैवोक्तम् सूतकेतुमुखंदृष्ट्वाजातस्यजनकस्ततः कृत्वासचैलंस्नानंतुशुद्धोभवतितत्क्षणात् इत्यादित्यपुराणान्मुखदर्शनोत्तरमेवपितुः स्नानमिति तन्न विदेशेमुखदर्शनावध्यस्पृश्यतापत्तेः मुखदर्शनोत्तरंपुनः स्नानार्थमिदमिति स्मार्तगौडाः तन्न मूलैक्येनज्ञानमात्रपरत्वात् इदंसर्ववर्णसमं सूतिकासर्ववर्णेषुदशरात्रेणशुध्यति ऋतौचनपृथक् शौचंसर्ववर्णेष्वयंविधिरिति हारलतायांप्रचेतसोक्तेः यत्तुब्राह्मे ब्राह्मणीक्षत्रियावैश्याप्रसूतादशभिर्दिनैः गतैः शूद्राचसंस्पृश्यात्रयोदशभिरेवचेतिप्रयोगपारिजातेपारस्करः द्विजातेः सूतिकायास्यात्सादशाहेनशुध्यति त्रयोदशेह्निसंप्राप्तेशूद्राशुध्यत्यसंशयइति तदस्पृश्यत्वपरम् ।
सातव्या महिन्यापासून पुढें दहा दिवस आशौच . हें सर्व वर्णांला समजावें . कारण , " सर्ववर्णाला तुल्य आशौच आहे . अतिक्रांत असतांही तसेंच आहे " असें व्यासवचन आहे . पराशर - " उत्पत्ति झाली असतां ब्राह्मण दहा दिवसांनीं , क्षत्रिय बारा दिवसांनीं , वैश्य पंधरा दिवसांनीं , आणि शूद्र एका महिन्यानें शुद्ध होतो . " संवर्त - " पुत्र झाला असतां पित्याला सचैल ( वस्त्रसहित ) स्नान सांगितलें आहे . माता दहा दिवसांनीं शुद्ध होते . स्नान केल्यावर पिता इतरांना स्पर्श करण्याविषयीं शुद्ध होतो . " ह्या वचनांत ‘ पुत्र ’ असें पद असल्यामुळें कन्येची उत्पत्ति असतां पित्याला स्नान नाहीं , असें हारलतेंत सांगितलें आहे . तें बरोबर नाहीं . कारण , पुत्राच्या ( कन्येच्या ) पुत्रानें मातामह पौत्री होतो , अशा अर्थाच्या ‘ पौत्री मातामहस्तेन ’ ह्या मनुवचनावरुन पुत्रपदाचा प्रयोग कन्येचेठायीं देखील आहे . आतां जें तेथेंच सांगितलें कीं , " जननाशौच असतां जनक ( पिता ) उत्पन्न झालेल्या अपत्याचें मुख पाहून नंतर सचैल स्नान करुन तत्क्षणीं शुद्ध होतो " ह्या आदित्यपुराणावरुन मुखदर्शनोत्तरच पित्याला स्नान , असें तें बरोबर नाहीं . कारण , परदेशीं पिता असेल तर त्याला मुखदर्शनापर्यंत अस्पृश्यत्व प्राप्त होईल . हें वचन मुखदर्शनोत्तर पुनः स्नानासाठीं आहे , असें स्मार्तगौड सांगतात . तें बरोबर नाहीं . कारण , अशुचित्वाचें मूळ दोन्ही ठिकाणीं एक ( अपत्योत्पत्ति ) असल्यामुळें उत्पत्तीचें सामान्य ज्ञान घ्यावयाचें आहे . हें दशाह आशौच सर्व वर्णाला ( ब्राह्मणादिकांला ) समान आहे . कारण , सर्ववर्णांमध्यें सूतिका ( बाळंतीण ) दहा दिवसांनीं शुद्ध होते . तिची रजस्वलासंबंधानें वेगळी शुद्धि नाहीं सार्या वर्णामध्यें हा विधि समजावा " असें हारलतेंत प्रचेतसाचें वचन आहे . आतां जें ब्राह्मांत - " ब्राह्मणी , क्षत्रिया , आणि वैश्या ह्या स्त्रिया प्रसूत झाल्या असतां दहा दिवस गेल्यानें शुद्ध होतात . आणि शूद्रा तेरा दिवस गेल्यावर स्पर्श करण्यास योग्य होते . " असें सांगितलें तें , आणि प्रयोगपारिजातांत पारस्कर - " द्विजातीची ( ब्राह्मण , क्षत्रिय , वैश्य , यांची ) जी सूतिका ती दहा दिवसांनीं शुद्ध होते . तेरावा दिवस प्राप्त झाला असतां शूद्रा शुद्ध होते यांत संशय नाहीं " असें सांगतो तें शूद्रेला अस्पृश्यत्वाविषयीं समजावें .
अंगिराः सूतकेसूतिकावर्जंसंस्पर्शोननिषिध्यते संस्पर्शेसूतिकायास्तुस्नानमेवविधीयते नाशौचंसूतकंपुंसः संसर्गंचेन्नगच्छति रजस्तत्राशुचिज्ञेयंतच्चपुंसिनविद्यते संसर्गोमैथुनं स्पर्शइत्यन्ये मातुरेवसूतकं तांस्पृशतश्चेतिहारलतायांसुमंतूक्तेरिति तन्न संस्पर्शेसूतिकायास्तुस्नानमेवविधीयतइतिस्नानमात्रोक्तेः सौमंतवचनस्यस्नानपर्यंतमस्पृश्यत्वमात्रबोधकत्वात् एवकारोबालस्पृश्यत्वार्थः माधवस्तु यस्तैः सहसपिंडोपिप्रकुर्याच्छयनासनं बांधवोवापरोवापिसदशाहेनशुध्यतीतिबृहस्पतिस्मृतेः शयनासनादिरुपंसंसर्गमाह पराशरः यदिपत्न्यांप्रसूतायांद्विजः संपर्कमृच्छति सूतकंतुभवेत्तस्ययदिविप्रः षडंगवित् पितृवत्सापत्नमातुः प्राक् स्नानादस्पृश्यत्वम् सूतिकास्पर्शेतुयावदाशौचं अन्यास्तुमातरस्तद्वत्तद्गृहंनव्रजंतिचेदितिब्राह्मोक्तेरितिशुद्धितत्त्वादयः तन्न तद्गेहंगत्वासूतिकांयदिनस्पृशंतितदास्पृश्याः अन्यथानेतितस्यार्थः ।
अंगिरा - " जननाशौचांत सूतिका वर्ज्य करुन इतर सपिंडांला स्पर्शाचा निषेध नाहीं . सूतिकेला स्पर्श केला असतां स्नानच सांगितलें आहे , सूतिकेशीं पुरुषानें संसर्ग जर केला नसेल तर पुरुषाला प्रसूतिनिमित्तक आशौच ( अस्पृश्यत्व ) नाहीं . कारण , त्या ठिकाणीं अशुचि रज आहे , तें पुरुषाचे ठायीं नाहीं . " या वचनांत ‘ संसर्ग या शब्दानें मैथुन समजावें . इतर ग्रंथकार संसर्ग म्हणजे स्पर्श असें म्हणतात . कारण , " मातेलाच सूतक आहे आणि तिला स्पर्श करणारालाही आहे " असें हारलतेंत सुमंतुवचन आहे . हें इतर ग्रंथकारांचें म्हणणें बरोबर नाहीं . कारण " सूतिकेचा स्पर्श झाला असतां स्नानच सांगितलें आहे " ह्या अंगिरावचनानें स्पर्श असतां स्नानच सांगितलें , आशौच सांगितलें नाहीं . सुमंतूचें वचन स्पर्श असतां स्नानापर्यंत स्पर्शाला योग्य नाहीं , इतक्याचेंच बोधक आहे , आशौचबोधक नाहीं . सुमंतुवचनांतील ‘ एव ’ कारानें बाल स्पृश्य आहे . असें सुचविलें आहे . माधव तर - " सपिंड असो किंवा बांधव असो अथवा दुसरा कोणी असो त्या आशौचवंतांसह निजणें , बसणें इत्यादि जो करील तो दहा दिवसांनीं शुद्ध होतो " ह्या बृहस्पतिस्मृतीवरुन शयन - आसनरुप संसर्ग , असें सांगतो . पराशर - " पत्नी प्रसूत असतां षडंग वेदवेत्ता ब्राह्मण जर तिच्याशीं संपर्क करील तर त्याला सूतक ( प्रसूतिनिमित्तक आशौच ) प्राप्त होईल . " उत्पन्न झालेल्या अपत्यनिमित्तानें स्नानाच्या पूर्वीं पित्याला जसें अस्पृश्यत्व ( स्पर्शाला अयोग्यत्व ) तसें सापत्नमातेलाही स्नानाच्या पूर्वीं अस्पृश्यत्वरुप आशौच आहे . सापत्नमाता सूतिकेला स्पर्श करील तर आशौचपर्यंत तिला अस्पृश्यत्व आहे . कारण , " इतर माता जर सूतिकाघरांत न जातील तर त्यांना पित्याप्रमाणें अस्पृश्यत्वरुप आशौच आहे " असें ब्राह्मवचन आहे , असें शुद्धितत्त्वादि ग्रंथकार सांगतात . सापत्नमातेला स्नानाच्या पूर्वीं अस्पृश्यत्व हें त्याचें सांगणें बरोबर नाहीं . कारण , त्या ब्राह्मवचनाचा अर्थ - सापत्नमाता सूतिकेच्या घरांत जाऊन त्या सूतिकेला जर स्पर्श न करतील तर त्या स्पर्श योग्य आहेत . आणि स्पर्श करतील तर त्या स्पर्शाला योग्य नाहींत - असा आहे .
कर्मानधिकारमाहपैठीनसिः सूतिकांपुत्रवतींविंशतिरात्रेणकर्माणिकारयेन्मासेनस्त्रीजननीं इदमाशौचोत्तरं अन्यथाशूद्याः सपिंडानामाशौचेतदभावः स्यात् विध्यनुवादविरोधश्च एतच्चसोमयागादिश्रौतभिन्नपरं प्रजातायाश्चदशरात्रादूर्ध्वंस्नानादितिकात्यायनोक्तेः व्यासः प्रथमेदिवसेषष्ठेदशमेचैवसर्वदा त्रिष्वेतेषुनकुर्वीतसूतकंपुत्रजन्मनि पुत्रशब्दोपत्यमात्रपरः ब्राह्मे देवाश्चपितरश्चैवपुत्रेजातेद्विजन्मनां आयांतितस्मात्तदहः पुण्यंषष्ठंचसर्वदा जननेविशेषः प्रागुक्तः ।
कर्माविषयीं अनधिकार सांगतो पैठीनसि - " पुत्र झालेली सूतिका असेल तर तिच्याकडून वीस दिवस झाल्यानंतर कर्मैं करवावीं . आणि कन्या झालेली सूतिका असेल तर तिच्याकडून एक महिन्यानंतर कर्मै करवावीं . " हा वीस दिवस व एक महिना जो सूतिकेला अनधिकार सांगितला तो , आशौचोत्तर समजावा . अन्यथा म्हणजे आशौचाचे दहा दिवस धरुन जर वीस दिवस व तीस दिवस अनधिकार म्हटला तर शुद्रस्त्री सूतिका असेल तर तिच्या सपिंडांनीं एक महिना आशौच असतां त्या सूतिकेला अनधिकाराचा अभाव ( अधिकार ) प्राप्त होईल . आणि ‘ शूद्रो मासेन शुध्यति ’ या पूर्वोक्त पराशरवचनानें शूद्रेला एक मासपर्यंत जननाशौचाचें विधान असल्यामुळें अनधिकार सिद्ध असतां ह्या पैठीनसिवचनान्नें अनुवाद ( सिद्धार्थकथन ) केला असें म्हटलें म्हणजे विधायक वचनानें एक मास अनधिकार आणि अनुवादक वचनानें वीस दिवस अनधिकार असें झाल्यामुळें त्या दोघांचा विरोधही प्राप्त झाला . हा पैठीनसिवचनानें सांगितलेला अनधिकार सोमयागादिश्रौतकर्मव्यतिरिक्तविषयक आहे . कारण , " सूतिकेला दशरात्रानंतर स्नानानें अधिकार आहे " असें कात्यायनवचन आहे . व्यास - " अपत्याचें जन्म झालें असतां प्रथमदिवस , सहावा दिवस आणि दहावा दिवसा ह्या तीन दिवसांचेठायीं सर्वदा आशौच धरुं नये . " ब्राह्मांत - " द्विजातींना पुत्र झाला असतां देव आणि पितर येतात म्हणून तो दिवस आणि सहावा दिवस सर्वदा पुण्यकारक आहे . " जननाविषयीं विशेष ( जातकर्मादि ) पूर्वीं सांगितला आहे .
अत्रप्रयोगपारिजातः पुंप्रसवेदशाहः स्त्र्यपत्येतुत्र्यहः पुंजन्मनिसपिंडानांदशाहाच्छुद्धिरिष्यते त्र्यहादेकोदकानांचएकाहंसूतकंक्कचित् स्त्रीजन्मनिसपिंडानांसोदकानांत्र्यहाच्छुचिः स्त्रीषुत्रिपुरुषंज्ञेयंसपिंडत्वंद्विजोत्तमा इत्यग्निस्मृतेरित्याह मेधातिथिरपि अप्रत्तानांतुस्त्रीणांत्रिपुरुषीविज्ञायते इतिवासिष्ठमुक्त्वाशौचेएवैतद्विवाहेतुविधिर्दर्शितएवेत्याह अन्येतुत्रिपुरुषसापिंड्यस्यकानीनकन्यापरत्वमाहुः अप्रत्तानांतथास्त्रीणांसापिंड्यंसाप्तपौरुषं प्रत्तानांभर्तृसापिंड्यंप्राहदेवः प्रजापतिरितिकौर्मविरोधाच्च अत्रेदंतत्त्वम् पंचमात्सप्तमाद्धीमान्यः कन्यामुद्वहेद्दिजः गुरुतल्पीसविज्ञेयइत्यादिविरोधात्रिपुरुषंप्रकरणान्मरणाशौचपरम् वासिष्ठे तदग्रेउदकदानोक्तेः तेनकन्याप्रसवेपिसाप्तपौरुषंदशरात्रमेव नचकन्यापुत्रकृतंप्रसवेबलाबलंक्काप्युक्तं अग्निस्मृतिस्त्वनुकल्पोविगीतावेतिसर्वसिद्धांतः अन्यथात्रिपुरुषसपिंडानामष्टमादिसोदकानांचत्र्यहसाम्यायोगात् चतुर्थादिसप्तमांतानांचकिमपिनस्यात् तेनकन्याप्रसवेदशाहएव किंच स्त्रीजन्मोद्देशेनत्रिपुरुषंसापिंड्यंतेषांचत्रिरात्रमित्यनेकार्थविधिः कथंस्यात् वाक्यभेदापत्तेः नचचतुर्थादीनांसोदकत्वं क्कापिसिद्धं तेनत्रिपुरुषंचतुर्थादीनांचस्त्रीजन्मनिसोदकत्वंविधायपुनस्तेषांत्रिरात्राशौचविधौविध्यनुवादविरोधोवाक्यभेदद्वयंचेत्यसंवादार्थास्मृतिर्हेया ।
ह्या जननाशौचाविषयीं प्रयोगपारिजात - पुत्र झाला असतां दहा दिवस आणि कन्या झाली असतां तीन दिवस आशौच . कारण , " पुरुष जन्म असतां दहा दिवसांनीं सपिंडांची शुद्धि होते . समानोदकांची तीन दिवसांनीं शुद्धि होते . आणि कोणाला एकाह आशौच आहे . कन्याजन्म असतां सपिंड व समानोदक यांची तीन दिवसांनीं शुद्धि होते . स्त्रियांविषयीं सापिंड्य त्रिपुरुष जाणावें " अशी अग्निस्मृति आहे , असें सांगतो . मेधातिथि देखील - " अविवाहित स्त्रियांना त्रिपुरुष सापिंड्य सांगितलें आहे " हें वसिष्ठवचन सांगून आशौचाविषयीं हें वचन , विवाहाविषयीं तर विधि दाखविला आहेच , असें सांगतो . इतर ग्रंथकार तर - अविवाहित कन्येपासून उत्पन्न कन्येविषयीं त्रिपुरुष सापिंड्य आहे , असें सांगतात . यावरुन इतर कन्यांना त्रिपुरुष सापिंड्य नाहीं . आणि इतर कन्यांविषयीं त्रिपुरुष सापिंड्य मानलें तर ‘ अविवाहित स्त्रियांना सापिंड्य साप्तपौरुष आहे . आणि विवाहित स्त्रियांना पतीचें सापिंड्य आहे , असें देव प्रजापति सांगतो " ह्या कूर्मपुराणवचनाशीं विरोधही येतो . ह्या सापिंड्याविषयींचा खरा प्रकार असा आहे कीं , कन्याविषयीं त्रिपुरुष सापिंड्य मानलें असतां " जो विद्वान् पांचव्या किंवा सातव्यापासून कन्येशीं विवाह करील तो गुरुपत्नीगमन करणारा समजावा " इत्यादि वचनाशीं विरोध येत असल्यामुळें त्रिपुरुष सापिंड्य हें प्रकरणावरुन मरणाशौचाविषयीं समजावें . विवाहाविषयीं समजूं नये . कारण , मेधातिथीनें सांगितलेल्या वसिष्ठवचनांत पुढें उदकदान सांगितलें आहे . यावरुन कन्येची उत्पत्ति झाली असली तरी सात पुरुष सपिंडांना दहा दिवसच जननाशौच आहे . कन्याप्रसूति निर्बळ आणि पुत्रप्रसूति प्रबळ असें कोठेंही सांगितलें नाहीं . वर सांगितलेली अग्निस्मृति तर - अनुकल्प ( अधमपक्ष ) किंवा लोकनिंद्य आहे , हा सर्वांचा सिद्धांत आहे . अन्यथा म्हणजे अग्निस्मृति स्वीकारली तर त्रिपुरुष सपिंडांना आणि आठव्यापासून पुढील समानोदकांना सारखें तीन दिवस आशौच सांगितलें तें युक्त नाहीं . आणि त्याच स्मृतीवरुन चतुर्थ पुरुषापासून सप्तम पुरुषापर्यंत कांहींच आशौच येणार नाहीं . यावरुन कन्येची उत्पत्ति असतां दशाहच आशौच . आणखी ती स्मृति स्वीकारली असतां त्या स्मृतीनें स्त्रीजन्माच्या उद्देशेंकरुन त्रिपुरुष सापिंड्याचें विधान आणि त्या त्रिपुरुष सपिंडांना त्रिरात्र आशौचाचें विधान , असा अनेकार्थक विधि कसा होईल ? कारण , तसा विधि केला तर ‘ स्त्रीषु त्रिपुरुषं सापिंड्यं , तेषांच सपिंडानां त्रिरात्रं आशौचं ’ म्हणजे स्त्रियांचा जन्म असतां त्रिपुरुष सापिंड्य समजावें . सपिंडांना त्रिरात्र आशौच समजावें , अशीं भिन्न वाक्यें होतील . आणि चवथ्या पुरुषापासून पुढच्यांना समानोदकत्व कोठेंही सांगितलेलें नाहीं ; म्हणून ह्याच वचनानें स्त्रीजन्माविषयीं त्रिपुरुष सापिंड्याचें विधान आणि चतुर्थादिकाला समानोदकत्वाचें विधान करुन पुनः त्यांना त्रिरात्र आशौचाचें विधान केलें असतां विधिवाक्याचा व अनुवादवाक्याचा विरोध येतो आणि दोन वाक्यभेद होतात . म्हणून असंगत असलेली ती अग्निस्मृति त्याज्य आहे .