मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|निर्णयसिंधु|तृतीयपरिच्छेद उत्तरार्ध|
संन्यास घेण्याचा क्रम

तृतीय परिच्छेद - संन्यास घेण्याचा क्रम

निर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल , याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे .


आतां संन्यास घेण्याचा क्रम सांगतो -

अथक्रमः तत्रसंन्यासेधिकारसिद्ध्यर्थंस्वस्यनवश्राद्धषोडशश्राद्धसपिंडनानि साग्निः पार्वणान्यनग्निस्त्वेकोद्दिष्टविधिनाकृत्वानाश्रमीचेत्कृच्छ्रचतुष्टयमन्यस्तुतप्तकृच्छ्रंकृत्वोदगयनेएकादश्यांद्वादश्यांवा साग्निरमावास्यायांपौर्णमास्यांचतुर्दश्यांवायथापर्वणिप्राजापत्यास्यात् तत्रदेशकालौस्मृत्वापरमहंसादिसंन्यासग्रहणंकरिष्यइतिसंकल्प्य गणेशंसंपूज्यपुण्याहंवाचयित्वामातृकापूजांवृद्धिश्राद्धंचकृत्वास्तमयात्प्रागौपासनसमिध्याहिताग्निस्तुगार्हपत्यं विधुरोग्निहोत्रीतुत्रिकांडमंडनोक्तदिशाकुशपत्न्यासहपवमानेष्ट्यंतंपूर्णाहुत्यंतंवाधानंकुर्यात् ब्रह्मचारीचेल्लौकिकेविधुरश्चेद्व्याह्रतिभिः प्रणवेनचाग्निमादायान्वग्निरुषसामित्यानीयपृष्टोदिवीतिनिधायतेनैवसमिध्य तत्सवितुस्तांसवितुर्विश्वानिदेवइतितिस्रः समिधोभ्यादध्यात् एवमग्नौसिद्धेकक्षोपस्थवर्ज्यंवपनंकृत्वा पयोदधियुतमाज्यमपोवा ॐ भूः सावित्रींप्रविशामितत्सवितुर्वरेण्यमितिप्राश्याचम्य पुनरादाय ॐभुवः सावित्रींप्रविशामिभर्गोदेवस्यधीमहीतिद्वितीयं ॐस्वः सावित्रींप्रविशामिधियोयोनः प्रचोदयादितितृतीयंसमस्तयाचतुर्थं ॐभूर्भुवः स्वः सावित्रींप्रविशामि० तत्सवि० यात् इति संन्यासपद्धतौतुत्रिवृदसीतिप्रथमं प्रवृदसीतिद्वितीयं विवृदसीतितृतीयंप्राश्यापः पुनंत्वितिजलंप्राश्यसावित्रीप्रवेशउक्तः ततः आहवनीयंविह्रत्यब्रह्माणमुपवेश्याज्यंसंस्कृत्य चतुर्द्वादशवागृहीत्वा समित्पूर्वमोंस्वाहापरमात्मनइदमितिहुत्वोपवसेत् ततः सायंहोमंवैश्वदेवंचकृत्वा अग्नेरुदक्कुशानास्तीर्यदंडादीनिदशपंचवासाद्यब्रह्मासनेकृष्णाजिनोपविष्टोरात्रौजागरंकृत्वाप्रातर्होमानंतरंप्राजापत्यांवैश्वानरींवाकृत्वाऋत्विग्भ्यः सर्वस्वंब्रह्मणेचमधुपूर्णंतैजसपात्रंदत्वा दारुपात्राण्याहवनीयेश्ममृन्मयानिचजलेक्षिपेत् कृष्णाजिनंत्वाददीत अनाहिताग्निस्तुवैश्वानरमाग्नेयंवाचरुंहुत्वापात्राण्यग्नौक्षिप्त्वा भूर्भुवः स्वरित्यपः स्पृष्ट्वातरत्समंदीतिजप्त्वाविप्रान्संभोज्यपुण्याहंवाचयित्वात्रवावपनंकृत्वाहैमरुप्यकुशजलैः स्नात्वापुरुषायचरुंकृत्वाप्राणायस्वाहेतिपंचाज्याहुतीर्हुत्वापुरुषसूक्तेनप्रत्यृचमाज्यंचरुंचजुहुयात् ।

प्रथमतः संन्यासाविषयीं अधिकार सिद्ध होण्यासाठीं आपलीं नव श्राद्धें , षोडश श्राद्धें ( मासिकें ) व सपिंडन हीं साग्निकानें पार्वणविधीनें व निरग्निकानें एकोद्दिष्टविधीनें करुन अनाश्रमी असेल तर त्यानें चार कृच्छ्र व इतरानें तप्तकृच्छ्र प्रायश्चित्त करुन उत्तरायणांत एकादशीस किंवा द्वादशीस संन्यास ग्रहण करावा . साग्निकानें अमावास्येस किंवा पौर्णमासीस किंवा चतुर्दशीस ज्या रीतीनें पर्वाचे ठायीं प्राजापत्या इष्टि होईल त्या रीतीनें संन्यासग्रहणाचा आरंभ करावा . तो असा - त्या दिवशीं देशकालांचें संकीर्तन करुन ‘ परमहंसादिसंन्यासग्रहणंकरिष्ये ’ असा संकल्प करुन गणपतीची पूजा करुन पुण्याहवाचन करुन मातृकापूजा आणि वृद्धिश्राद्ध करुन सूर्यास्ताच्या पूर्वीं औपासनाग्नीला प्रज्वलित करुन ; आहिताग्नीनें गार्हपत्याग्नीचें प्रज्वलन करुन ; विधुर अग्निहोत्र्यानें तर त्रिकांडमंडनानें सांगितलेल्या रीतीनें दर्भांचे पत्नीसह पवमान इष्टीपर्यंत व पूर्णाहुतीपर्यंत आधान करावें ; ब्रह्मचारी असेल तर त्यानें लौकिक अग्नीवर सर्व करावें ; विधुरानें तर व्याह्रतींनीं किंवा प्रणवानें अग्नि घेऊन ‘ अन्वग्निरुषसां० ’ या मंत्रानें आणून ‘ पृष्टोदिवि० ’ या मंत्रानें ठेवून त्याच मंत्रानें प्रज्वलित करुन ‘ तत्सवितु० , ताँसवितु० , विश्वानिदेव० ’ ह्या तीन मंत्रांनीं तीन समिधा द्याव्या . याप्रमाणें अग्नि सिद्ध झाला असतां काखेंतील व उपस्था वरील केश वर्ज्य करुन इतर केशांचें वपन करुन दूध दहीं मिश्रित घृत किंवा उदक घेऊन ‘ ॐभूः सावित्रीं प्रविशामि तत्सवितुर्वरेण्यं ’ या मंत्रानें प्राशन करुन आचमन करुन पुनः घेऊन ‘ ॐभुवः सावित्रीं प्रविशामि भर्गोदेवस्य धीमहि ’ असें म्हणून दुसरें प्राशन करावें . ‘ ॐस्वः सावित्रीं प्रविशामि धियोयोनः प्रचोदयात् ’ असें म्हणून तिसरें प्राशन करावें . ‘ ॐभूर्भुवः स्वः सावित्रीं प्रविशामि तत्सवितु० यात् ’ अशी सारी गायत्री म्हणून चवथें प्राशन करावें . हा सावित्रीप्रवेश होय . संन्यासपद्धतींत तर ‘ त्रिवृदसि ’ असें म्हणून प्रथम प्राशन , ‘ प्रवृदसि ’ यानें दुसरें , ‘ विवृदसि ’ यानें तिसरें प्राशन करुन ‘ आपः पुनंतु० ’ यानें उदक प्राशन करुन नंतर सावित्रीप्रवेश सांगितला आहे . तदनंतर आहवनीय अग्नीला प्रज्वलित करुन ब्रहयाला बसवून आज्यसंस्कार करुन चार वेळ किंवा बारा वेळ आज्य स्रुचींत घेऊन पूर्वीं समिध देऊन ‘ ॐ स्वाहा परमात्मने इदं ’ ह्या मंत्रानें हवन करुन उपवास करावा . तदनंतर सायंकालचा होम व वैश्वदेव करुन अग्नीच्या उत्तरेकडे कुश पसरुन त्यांजवर दंड , कमंडलु , कौपीन , आच्छादन , कंथा , पादुका हीं पांच किंवा शिक्यादि मिळून दहा हीं ठेवून ब्रह्मासनाचे ठायीं कृष्णाजिनावर बसून रात्रीं जागरण करुन प्रातः कालचा होम केल्यानंतर प्राजापत्या किंवा वैश्वानरी इष्टि करुन ऋत्विजांस सर्वस्व देऊन ब्रहयाला मधानें पूर्ण भरलेलें रुप्यादि धातुपात्र देऊन काष्ठाचीं पात्रें असतील तीं आहवनीय अग्नींत टाकून पाषाणाचीं व मातीचीं असतील तीं उदकांत टाकावीं . कृष्णाजिन आपण घ्यावें . ज्यानें अग्नीचें आधान केलें नसेल त्यानें वैश्वानर किंवा आग्नेय चरुचा होम ( स्थालीपाक ) करुन पात्रें अग्नींत टाकून ‘ भूर्भुवः स्वः ’ यानें उदक स्पर्श करुन ‘ तरत्समंदी० ’ याचा जप करुन विप्रांना भोजन घालून अथवा एथें पुण्याहवाचन करुन वपन करुन हेम , रुपें , कुश यांनीं युक्त उदकानें स्नान करुन पुरुषदेवताक चरु करुन ‘ प्राणायस्वाहा ’ ह्या पांच मंत्रांनीं पांच आज्याहुती देऊन पुरुषसूक्ताचे प्रत्येक ऋचेनें आज्याचा व चरुचा होम करावा .

अत्रविरजाहोमंकेचिदाहुः यथोक्तंशिवगीतासु जुहुयाद्विरजामंत्रैः प्राणापानादिभिस्ततः अनुवाकांतमेकाग्रः समिदाज्यचरुन्पृथक् आत्मन्यग्नीन्समारोप्ययातेअग्नेतिमंत्रतः भस्मादायाग्निरित्याद्यैर्विमृज्यांगानिसंस्पृशेत् पापैर्विमुच्यतेसत्यंमुच्यतेनात्रसंशयः यथा प्राणापानव्यानोदानसमानामेशुध्यंतांज्योतिरहंविरजाविपाप्माभूयास स्वाहा सर्वत्रलिंगोक्तदेवताभ्यइदमितित्यागः वाड्मनश्चक्षुः श्रोत्रजिह्वाघ्राणरेतोबुद्ध्याकूतिसंकल्पामेशुध्यंतांज्योतिरहं० । त्वक्चर्ममांसरुधिरमेदोमज्जास्नायवोस्थीनिमेशुध्यंतांज्योतिरहं० । शिरः पाणिपादपार्श्वपृष्ठोरुदरजंघाशिश्नोपस्थपायवोमेशुध्यंतांज्योतिरहं० । उत्तिष्ठपुरुषहरितपिंगललोहितदेहिदेहिदापयितामेशुध्यं० । पृथिव्यापस्तेजोवायुराकाशोमेशुध्यंतांज्योति० । शब्दस्पर्शरुपरसगंधामेशुध्यंतांज्योति० । मनोवाक्कायकर्माणिमेशुध्यंतां० । अव्यक्तभावैरहंकारैर्ज्योति० । आत्मामेशुध्यंतां० । अंतरात्मामेशुध्यंतां० । परमात्मामेशुध्यंतां० । क्षुधेस्वाहा क्षुत्पिपासायस्वाहा विविध्यैस्वाहा ऋग्विधानायस्वाहा कषोत्कायस्वाहा क्षुत्पिपासामलांज्येष्ठामलक्ष्मींनाशयाम्यहं अभूतिमसमृद्धिंचसर्वांनिर्णुदमेपाप्मान स्वाहा अन्नमयप्राणमयमनोमयविज्ञानमयानंदमयात्मामेशुध्यंतांज्योति० । ततः स्विष्टकृदादिहुत्वाब्रह्मणेहिरण्यमाज्यपात्रंधेनुंचदत्वासंमासिंचंत्वित्युपतिष्ठेत अत्रकेचिदनग्नेः सावित्रीप्रवेशंपूर्णाहुतिंचाहुः ।

एथें विरजाहोम केचित् सांगतात . जसें शिवगीतेंत सांगतो - " एकाग्र चित्तानें सार्‍या अनुवाकाच्या प्राणापानादिक विरजामंत्रांनीं समिधा , आज्य , चरु यांचा वेगवेगळा होम करावा . तदनंतर ‘ याते अग्ने यज्ञियातनू० ’ या मंत्रानें आपल्या ठिकाणीं अग्नींचा समारोप ( ज्वालाप्राशन ) करुन ‘ अग्नि० ’ इत्यादि मंत्रांनीं भस्म घेऊन भस्म अंगाला लावून स्पर्श करावा . असें केल्यानें पापापासून खरोखर मुक्त होऊन मोक्ष पावतो यांत संशय नाहीं . " ते विरजामंत्र असे - ‘ प्राणापानव्यानोदानसमानामेशुध्यंतां ज्योतिरहं विरजा विपाप्माभूयासँस्वाहा । प्राणादिभ्यइदं . ’ असा मंत्रांतील देवतांना सर्वत्र त्याग करावा . ‘ वाड्मनश्चक्षु० । वागादिभ्यइदं . ’ त्वक् चर्ममासं० । त्वगादिभ्यइदं ’ ‘ शिरः पाणिपाद० । शिर आदिभ्यइदं , ’ ‘ उत्तिष्ठपुरुष हरित० । पुरुषादिभ्य इदं , ’ ‘ पृथिव्यापस्तेजो० । पृथिव्यादिभ्य इदं , ’ ‘ शब्दस्पर्श० । शब्दादिभ्य इदं , ’ ‘ मनोवाक्कायकर्माणि० । मनआदिकर्मभ्य इदं , ’ ‘ अव्यक्तभावैरहंकारैर्ज्योति० । अव्यक्तादिभ्य इदं , ’ ‘ आत्मामेशुध्यंतां० । आत्मने इदं , ’ अंतरात्मामेशुघ्यंतां० । अंतरात्मने इदं , ’ ‘ परमात्मामेशुध्यंतां० । परमात्मने इदं , ’ ‘ क्षुधेस्वाहा क्षुधे इदं , ’ ‘ क्षुत्पिपासायस्वाहा क्षुत्पिपासाय इदं , ’ विविध्येस्वाहा । विविध्यै इदं , ’ ‘ ऋग्विधानाय स्वाहा ऋग्विधानाय इदं , ’ ‘ कषोत्काय स्वाहा कषोत्काय इदं , ’ ‘ क्षुत्पिपासामलांज्येष्ठा० स्वाहा । अग्नय इदं , ’ ‘ अन्नमयप्राणमय० स्वाहा , अन्नमयादिभ्य इदं . ’ याप्रमाणें समित् , चरु , आज्यज यांनीं प्रत्येक द्रव्याच्या आहुती देऊन नंतर स्विष्टकृत् इत्यादि होम करुन ब्रहयाला हिरण्य , आज्यपात्र व धेनु देऊन ‘ संभासिंचंतु० ’ या मंत्रानें उपस्थान करावें . केचित् विद्वान् अनग्निकाला या ठिकाणीं सावित्रीप्रवेश व पूर्णाहुति सांगतात .

ततोयातेअग्नेयज्ञियातनूरितित्रिस्त्रिरेकैकंजिघ्रन्नात्मन्यग्नीन्समारोप्यगुरवेसर्वस्वंदत्वायोब्रह्माणंविदधाति पूर्वंयोवैवेदांश्चप्रहिणोतितस्मै तंहदेवमात्मबुद्धिप्रकाशंमुमुक्षुर्वैशरणमहंप्रपद्यइत्युपस्थाय दक्षिणंजान्वाच्यपादावुपसंगृह्याधीहिभगवोब्रह्मेतिवदेत् ततोगुरुरात्मानंब्रह्मरुपंध्यात्वाशंखंद्वादशप्रणवैरभिमंत्र्यतेनशिष्यमभिषिच्यशंनोमित्रइतिशांतिंपठित्वातच्छिरसिहस्तंदत्वापुरुषसूक्तंजप्त्वाममव्रतेह्रदयंतेदधामीतिचजप्त्वोदड्मुखः प्रणवार्थमनुसंदधद्दक्षिणेकर्णेप्रणवमुपदिश्यतदर्थंचपंचीकरणाद्यवबोध्यअयमात्माब्रह्मतत्त्वमसिप्रज्ञानंब्रह्मेत्याद्युपदिशेत् तदर्थंचवदेत् ततोनामदद्यात् ततः शिष्यस्तेनोपदिष्टोहरिंस्मरन्नूर्ध्वबाहुस्तिष्ठन्देवान्साक्षिणः कृत्वा ॐ भूर्भुवः स्वः संन्यस्तंमयेतित्रिरुपांशुत्रिरुच्चैस्त्रिरत्युच्चैश्चोक्त्वाजलसमीपंगत्वास्नात्वाअभयंसर्वभूतेभ्योमत्तः स्वाहेतित्रिरंजलिंक्षिप्त्वायुवासुवासाइतिकाषायंकौपीनंवासश्चपरिधायसखेमांगोपायेतिमुख्यंवैणवंपालाशंबैल्वमौदुंबरंवादंडंगृह्णीयात् ‍ अत्रपुत्रकामोगृहस्थः शंखेनपुरुषसूक्तेनदंडमभिषिच्यदद्यादित्याचारः ततः शिखामुत्पाट्य ॐ भूः स्वाहेत्यग्नौजलेवाहुत्वातथैवोपवीतंहुत्वायेनदेवाः पवित्रेणेतिजलपवित्रंयदस्यपारइतिशिक्यंसावित्र्याकमंडलुंसप्तव्याह्रतिभिः भोजनपात्रमिदंविष्णुरित्यासनंबृसींवागृहीत्वा ॐभूस्तर्पयामीतिव्यस्तसमस्ताभिर्महर्नमइतितर्पयित्वाभूः स्वधोंभुवः स्वधोंस्वः स्वधोंभूर्भुवः स्वर्महर्नमः स्वधेतिपितृंस्तर्पयित्वोदुत्यंचित्रंतच्चक्षुर्हंसः शुचिषन्नमोमित्रस्येतिस्नात्वासुरभिमतीभिरापोहिष्ठेतिहिरण्यवर्णाभिः पावमानीभिर्व्याह्रतिभिश्चमार्जयित्वाष्टोत्तरशतवारमघमर्षणंप्राणायामांश्चकृत्वाॐभूर्भुवः सुवरितिचपठित्वा नमः सवित्रइतिसूर्यंचोपस्थायपुनः स्नात्वाजंघेक्षालयित्वा ॐमितिब्रह्मोमितीदंसर्वमोमितिब्रह्मवाएषज्योतिर्यएषवेदोयएषतपतिवेद्यमेवैतद्यएषवेदोयदवनमस्तीतिजपित्वाष्टसहस्रंगायत्रींजपेदिति ।

तदनंतर ‘ याते अग्नेयज्ञियातनू० ’ ह्या मंत्रानें प्रत्येक अग्नीची ज्वाला त्रिवार त्रिवार प्राशन करुन आपल्या ठिकाणीं अग्नींचा समारोप करुन गुरुला सर्वस्व देऊन ‘ यो ब्रह्माणं विदधाति पूर्वं० प्रपद्ये ’ असें उपस्थान करुन दक्षिणजानु भूईवर टेकून गुरुचे पाय धरुन ‘ अधीहिभगवोब्रह्म ’ असें बोलावें . तदनंतर गुरुनें आपलें ब्रह्मरुपाचें ध्यान करुन बारा प्रणवांनीं शंखोदकाचें अभिमंत्रण करुन तें उदक शिष्यावर शिंपून ‘ शंनोमित्र० ’ ही शांति पठण करुन शिष्याचे मस्तकावर हस्त ठेऊन पुरुषसूक्ताचा जप करुन ‘ ममव्रतेह्रदयंतेदधामि ’ याचाही जप करुन उत्तरेकडे मुख करुन प्रणवाच्या अर्थाचें अनुसंधान करुन उजव्या कानांत प्रणवाचा उपदेश करुन त्याचा अर्थ पंचीकरणादिविचार त्याला जाणवून ‘ अयमात्माब्रह्म , तत्त्वमसि , प्रज्ञानं ब्रह्म ’ इत्यादि उपदेश करावा . आणि त्या उपनिषदवाक्यांचा अर्थही सांगावा . तदनंतर शिष्याला नांव ठेवावें . तदनंतर शिष्यानें गुरुनें सांगितल्याप्रमाणें हरीचें स्मरण करुन वर भुजा करुन उभा राहून देवांना साक्षी करुन ‘ ॐ भूर्भुवः स्वः संन्यस्तं मया ’ असें त्रिवार हळू , त्रिवार उच्च व त्रिवार अतिउच्च स्वरानें बोलून उदकाचे समीप जाऊन ‘ अभयं सर्वभूतेभ्यो मत्तः स्वाहा ’ असें म्हणून तीन अंजलि देऊन ‘ युवासुवासा० ’ या मंत्रानें काषाय वस्त्र व कौपीन परिधान करुन ‘ सखेमागोपाय ’ असें म्हणून मुख्य वेळूचा त्याच्या अभावीं पळसाचा , बेलाचा किंवा उंबराचा दंड घ्यावा . याठिकाणीं पुत्रेच्छु गृहस्थानें शंखानें पुरुषसूक्त मंत्रानें दंडावर अभिषेक करुन तो द्यावा , असा आचार आहे . तदनंतर शिखा उपटून ‘ ॐ भूः स्वाहा ’ असें म्हणून अग्नींत किंवा उदकांत टाकून तसेंच यज्ञोपवीताचें हवन करुन ‘ येनदेवाः पवित्रेण० ’ या मंत्रानें जल पवित्र , ‘ यदस्यपारे० ’ या मंत्रानें शिक्य , गायत्री मंत्रानें कमंडलु , सप्तव्याह्रतींनीं भोजनपात्र , ‘ इदंविष्णु० ’ या मंत्रानें आसन किंवा बृसी घेऊन ‘ ॐभूस्तर्पयामि ’ अशा व्यस्त व समस्त व्याह्रतींनीं ‘ महर्नमः ’ असें म्हणून तर्पण करुन ॐ भूःस्वधा , ॐभुवः स्वधा , ॐस्वः स्वधा , ॐ भूर्भुवः स्वर्महर्नमः स्वधा ’ असें पितरांचें तर्पण करुन ‘ उदुत्यं० , चित्रं० , तच्चक्षु० , हंसः शुचिशत् ० , नमोमित्रस्य० ’ ह्या मंत्रांनीं स्नान करुन सुरभिमती , आपोहिष्ठा , हिरण्यवर्णा , पावमानी व्याह्रति ’ या मंत्रांनीं मार्जन करुन एकशें आठ वेळ अघमर्षण आणि तितकेच प्राणायाम करुन ‘ ॐभूर्भुवः सुवः ’ याचें पठण करुन ‘ नमः सवित्रे० ’ या मंत्रानें सूर्याचें उपस्थान करुन पुनः स्नान करुन जंघा धुवून ‘ ॐम् ’ ‘ ब्रह्मोम् ’ ‘ इदं सर्वभोम् ’ ‘ ब्रह्म वा एष ज्योतिर्य एष वेदो य एष तपति वेद्यमेवैतद्य एष वेदो यदवनमस्ति ’ याचा जप करुन अष्टसहस्त्र गायत्रीजप करावा .

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP