मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|निर्णयसिंधु|तृतीयपरिच्छेद उत्तरार्ध|
नित्यश्राद्ध

तृतीय परिच्छेदः - नित्यश्राद्ध

निर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल , याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे .

आतां नित्यश्राद्ध सांगतो -

अथनित्यश्राद्धं हेमाद्रौव्यासः एकमप्याशयेद्विप्रंषण्णामप्यन्वहंगृही अपीत्यनुकल्पः प्रचेताः नामंत्रणंनहोमंचनाह्वानंनविसर्जनं नपिंडदानंविकिरंनदद्यादत्रदक्षिणां अत्र निर्दिश्यभोजयित्वातुकिंचिद्दत्वा विसर्जयेदितितेनैवोक्तेर्दक्षिणाविकल्पः यत्तु नित्यश्राद्धंदैवहीनंनियमादिविवर्जितं दक्षिणारहितंचैवदातृभोक्तृव्रतोज्झितमितिकाशीखंडे तद्विप्राभावपरमितिपृथ्वीचंद्रः भविष्ये आवाहनंस्वधाकारंपिंडाग्नौकरणादिकं ब्रह्मचर्यादिनियमाविश्वेदेवानचैवहि दातृणामथभोक्तृणांनियमोनचविद्यते एतद्दिवासंभवेरात्रावपिकार्यम् ‍ दिवोदितानिकर्माणिप्रमादादकृतानिवै यामिन्याः प्रहरंयावत्तावत्कर्माणिकारयेदितिबृहन्नारदीयोक्तेः रात्रौप्रहरपर्यतंदिवाकृत्यानिकारयेत् ‍ ब्रह्मयज्ञंचसौरंचवर्जयित्वाविशेषतइतिपृथ्वीचंद्रधृतसंग्रहोक्तेश्च नचदार्शिकाब्दिकाद्यपिरात्रौस्यादितिवाच्यं इष्टापत्तेः ( तस्यतिथिसंबंधित्वात् ‍ संध्यारात्रौनकर्तव्यंश्राद्धंखलुविचक्षणैरितिविष्ण्वाद्यैरात्रौनिषेधात् ‍ अतएवाल्पद्वादश्यां उषः कालेद्वयंकुर्यात् ‍ प्रातर्माध्याह्निकंतदेत्याद्यैर्वाक्यैस्त्रयोदशीश्राद्धंनापकृष्यते भिन्नविषयत्वादित्युक्तंमदनरत्ने नित्यंत्वपकृष्यते अन्वहमित्युक्तेस्तिथिसर्वार्धिकाभावात् ‍ यथाचसुदर्शनभाष्ये परपक्षेपित्र्याणीतिनियमेपिनित्यश्राद्धत्वेसंवत्सरमित्यत्यंतसंयोगेद्वितीयाबलाच्छुक्लपक्षेपीत्युक्तंतथारात्रावपि ) तथाचमाधवेनप्रतिपत्करणेस्पष्टमुक्तं वयंचाग्रेवक्ष्यामः अस्यदिनेकरणेलोपएव रात्रौश्राद्धंनकुर्वीतेतिनिषेधादितिपृथ्वीचंद्रोदयः पात्राभावेकौर्मे उद्धृत्यवायथाशक्तिकिंचिदन्नंप्रकल्पयेत् ‍ तत्प्रतिपत्तिमाहविष्णुः भिक्षुकाभावेअन्नंगोभ्योदद्यादग्नौवाप्रक्षिपेदिति हेमाद्रौ नागरखंडे नित्यश्राद्धंनकुर्वीतप्रसंगाद्यत्रसिध्यति श्राद्धांतरेकृतेन्यत्रनित्यत्वात्तन्नहापयेत् ‍ षड्दैवतेपृथड्नेत्यर्थः ।

हेमाद्रींत व्यास - " गृहस्थाश्रम्यानें पिता इत्यादि सहा देवतांच्या उद्देशानें दररोज एका तरी ब्राह्मणाला भोजन घालावें . " या वचनांत ‘ अपि ’ म्हणजे तरी असें म्हटल्यावरुन हा अनुकल्प ( कनिष्ठ पक्ष ) आहे असें होतें . प्रचेता - " ह्या नित्यश्राद्धांत आमंत्रण ( क्षण ), अग्नौकरण , आवाहन , विसर्जन , पिंडदान , विकिर , आणि दक्षिणा हीं नाहींत . " येथें " ब्राह्मणाला सांगून भोजन घालून कांहीं त्याला देऊन विसर्जन करावें " असें त्यानेंच ( प्रचेतानेंच ) सांगितलें यावरुन दक्षिणेचा विकल्प समजावा . आतां जें " नित्यश्राद्ध हें विश्वेदेवरहित , नियमादिवर्जित , दक्षिणारहित , आणि कर्ता व भोक्ता यांच्या नियमरहित असें आहे " असें काशीखंडांत सांगितलें तें ब्राह्मणाच्या अभावीं समजावें , असें पृथ्वीचंद्र सांगतो . भविष्यपुराणांत - " आवाहन , स्वधाशब्दोच्चार , पिंडदान , अग्नौकरण , ब्रह्मचर्यादि नियम , विश्वेदेव , आणि दात्याचे व भोक्त्या ब्राह्मणाचे नियम , हे सारे नित्यश्राद्धांत नाहींत . " हें नित्यश्राद्ध दिवसा असंभव असेल तर रात्रीं देखील करावें . कारण , " दिवसा करण्यास सांगितलेलीं कर्मै प्रमादानें ( अवधान नसल्यामुळें ) दिवसा केलीं नसतील तर रात्रीचा प्रथम प्रहर आहे तोंपर्यंत तीं कर्मै करावीं " असें बृहन्नारदीयवचन आहे . आणि " रात्रीं प्रहरपर्यंत दिवसाचीं कृत्यें करावीं . ब्रह्मयज्ञ आणि सौर हीं दोन मात्र रात्रौ विशेषतः वर्ज्य करावीं " असें पृथ्वीचंद्रानें धरलेलें संग्रहवचनही आहे . शंका - नित्यश्राद्ध दिवसा न झालें तर रात्रीं सांगितलें तसें दर्शश्राद्ध , सांवत्सरिक इत्यादिकही रात्रीं होईल व तें अनिष्ट आहे ? असें म्हणूं नये ; कारण , तें दर्श , सांवत्सरिक इत्यादि श्राद्ध दिवसा न झालें तर रात्रीं करणें इष्ट आहे . तेंच माधवानें प्रतिपत्करणग्रंथांत स्पष्ट सांगितलें आहे . व आह्मीं देखील पुढें ( क्षयाहतिथिनिर्णयप्रसंगीं ) सांगूं . हें नित्यश्राद्ध दिवसा न केलें तर त्याचा लोपच होतो . कारण , " रात्रीं श्राद्ध करुं नये " असा निषेध आहे , असें पृथ्वीचंद्रोदय सांगतो . नित्यश्राद्धास पात्रा ( ब्राह्मणा ) चा अभाव असतां सांगतो कौर्मांत - " यथाशक्ति कांहीं अन्न वाढून पितरांच्या उद्देशानें सोडावें . " त्या अन्नाची प्रतिपत्ति ( त्याग ) सांगतो विष्णु - " तें अन्न भिक्षुकाला द्यावें . त्याच्या अभावीं गाईंना द्यावें , किंवा अग्नींत टाकावें . " हेमाद्रींत नागरखंडांत - " सहा देवतांचें ( पित्रादित्रय व मातामहादित्रय यांचें ) इतर श्राद्ध केलें असतां त्याच्या प्रसंगानें नित्यश्राद्ध सिद्ध होतें म्हणून त्या दिवशीं नित्यश्राद्ध वेगळें करुं नये . इतर दिवशीं तें नित्य असल्यामुळें टाकूं नये . "

मात्स्ये ततस्तुवैश्वदेवांतेसभृत्यसुतबांधवः भुंजीतातिथिसंयुक्तः सर्वंपितृनिषेवितं सर्वंपर्वनिषिद्धंमांसमाषाद्यपीत्यर्थः एवंकृष्णैकादश्यादौगृहिणोपिभोजनम् ‍ अस्यवैधत्वेननिषेधाप्रवृत्तेः एवंग्रहणवेधेपि यत्त्वनाहिताग्नेरमाषममांसंव्रतयेदित्युक्तंतद्धेयमेव श्रौतत्वेनतस्यबलवत्त्वात् ‍ देवलः श्राद्धंकृत्वातुयोमर्त्योनभुंक्तेथकदाचन देवाहव्यंनगृह्णंतिकव्यानिपितरस्तथा शिवरात्र्येकादश्यादौत्ववघ्राणमेवेत्युक्तंप्राक् ‍ यत्रतूपवासोनावश्यकस्तत्रैकभक्तमयाचितंवाकार्यमितिहेमाद्रिः जातूकर्ण्यः अहन्येवतुभोक्तव्यंकृतेश्राद्धेद्विजन्मभिः अन्यथाह्यासुरंश्राद्धंपरपाकेचसेविते ।

मात्स्यांत - " श्राद्ध केल्यानंतर वैश्वदेवाच्या अंतीं भृत्य , पुत्र , बांधव , अतिथि यांसहवर्तमान पितरांनीं सेवित जें अन्न तें सारें ( पर्वदिवशीं निषिद्ध असें मांस - माष इत्यादि सुद्धां ) भोजन करावें . याप्रमाणें कृष्णएकादशीसही गृहस्थाश्रम्यास भोजन सांगितलें आहे . हें श्राद्धशेषान्नभोजन विहित असल्यामुळें भोजननिषेधाची प्रवृत्ति होत नाहीं . याप्रमाणें ग्रहणाच्या वेधांतही भोजन करावें . आतां जें " अग्नीचें आधान करणारानें माष - मांस वर्जनरुपव्रत करावें " असें सांगितलें आहे , तें ( माष - मांस ) त्यानें ( आहिताग्नीनें ) टाकावेंच . कारण , वर्जनरुपव्रत श्रौत ( श्रुतिविहित ) असल्यामुळें स्मार्त ( स्मृतिविहित ) अशा श्राद्धशेषभोजनापेक्षां प्रबळ आहे . देवल - " जो मनुष्य श्राद्ध करुन भोजन करीत नाहीं , त्याचें हव्य ( देवांना दिलेलें हवि ) देव ग्रहण करीत नाहींत . आणि त्याचीं कव्यें ( पितरांस दिलेलीं ) पितर ग्रहण करीत नाहींत . " शिवरात्रि , एकादशी इत्यादिकांचे ठायीं अवघ्राणच करावें , असें पूर्वीं सांगितलें आहे . जेथें उपवास आवश्यक नाहीं तेथें एकभक्त किंवा अयाचित करावें , असें हेमाद्रि सांगतो . जातूकर्ण्य - " द्विजातींनीं श्राद्ध केलें असतां दिवसाचे ठायींच भोजन करावें . भोजन केलें नाहीं तर , आणि परकीय अन्नाचें भोजन केलें तर आसुर ( असुरांना प्राप्त होणारें ) श्राद्ध होतें . "

श्राद्धशेषभोजनस्यक्कचिन्निषेधमाहहेमाद्रौप्रायश्चित्तकांडेमार्कंडेयः पित्रादीनामथाऽन्येषांश्राद्धशेषान्नभोजनम् ‍ व्रतिनांविधवानांचयतीनांचविगर्हितं अन्येभिन्नगोत्राः व्रतिनोब्रह्मचारिणः श्राद्धावशिष्टभोक्तारस्तेवैनिरयगामिनः सगोत्राणांसकुल्यानांज्ञातीनांचनदोषकृदितितत्रैवोक्तेः तत्रैवजाबालिः विप्रस्त्वन्यगृहेश्राद्धेशिष्टान्नंभोजनंचरेत् ‍ प्राजापत्यंविशुद्धिः स्याज्ज्ञातिगोत्रेनदोषकृत् ‍ यतीनांवपनंलक्षंप्रणवजपश्चेतितत्रैवोक्तं अस्यापवादमाहसएव श्वशुरस्यगुरोर्वापिमातुलस्यमहात्मनः ज्येष्ठभ्रातुश्चपुत्रस्यब्रह्मनिष्ठस्ययोगिनः एतेषांश्राद्धशिष्टान्नंभुक्त्वादोषोनविद्यते इतिकेचित्प्रशंसंतिमुनयस्तदसांप्रतं विशेषांतरंतत्रैवज्ञेयं हेमाद्रौजाबालिः तांबूलंदंतकाष्ठंचस्नेहस्नानमभोजनम् ‍ रत्यौषधपरान्नानिश्राद्धकर्ताविवर्जयेत् ‍ पृथ्वीचंद्रोदयेआचार्यः नशूद्रंभोजयेत्तस्मिन् ‍ गृहेयत्नेनतद्दिने श्राद्धशेषंनशूद्रेभ्यः प्रदद्यादखिलेष्वपि इतिजगद्गुरुनारायणभट्टसूनुरामकृष्णभट्टसुतकमलाकरभट्टकृतेनिर्णयसंधौपार्वणश्राद्धम् ‍ ।

श्राद्धशेषभोजनाचा क्कचित् ‍ ठिकाणीं निषेध सांगतो हेमाद्रींत प्रायश्चित्तकांडांत मार्कंडेय - " भिन्नगोत्री पिता इत्यादिकांचे श्राद्धशेषान्नाचें भोजन ब्रह्मचारी , विधवा आणि संन्याशी यांना निंद्य आहे . " वचनांत ‘ अन्येषां , याचा अर्थ भिन्नगोत्र्यांच्या ’ असा समजावा . कारण , " श्राद्धशेषभोजन करणारे ते नरकगामी होतात . सगोत्र , सकुल्य आणि ज्ञाति यांना श्राद्धशेषभोजन दोषकारक होत नाहीं " असें तेथेंच सांगितलें आहे . तेथेंच ( हेमाद्रींत ) जाबालि - " ब्राह्मण दुसर्‍याच्या घरीं श्राद्धांचें शेषान्न भोजन करील तर प्राजापत्य कृच्छ्रानें त्याची शुद्धि होईल . आपल्या ज्ञातींत , गोत्रांत श्राद्धशेषान्न दोषकारक नाहीं . " यतींनीं श्राद्धशेषान्नभोजन केलें असतां वपन आणि एक लक्ष प्रणवजप करावा . म्हणजे शुद्धि होते , असें तेथेंच सांगितलें आहे . याचा ( श्राद्धशेषान्ननिषेधाचा ) अपवाद तोच सांगतो . - " श्वशुर , गुरु , मातुल , ज्येष्ठभ्राता , पुत्र , आणि ब्रह्मनिष्ठ असा योगी यांचें श्राद्धशेषान्नभोजन केलें असतां दोष नाहीं . याप्रमाणें केचित् ‍ मुनि यांच्या श्राद्धशेषान्नाची प्रशंसा करितात , पण तें युक्त नाहीं . " यासंबंधी इतर विशेष निर्णय तेथेंच जाणावा . हेमाद्रींत जाबालि - " तांबूल , काष्ठानें दंतधावन , अभ्यंगस्नान , उपवास , मैथुन , औषध आणि परान्न हीं श्राद्धकर्त्यानें वर्ज्य करावीं . " पृथ्वीचंद्रोदयांत आचार्य - " श्राद्धदिवशीं त्या घरीं शूद्राला भोजन घालूं नये , सर्वांमध्येंही शूद्रांना श्राद्धशेष देऊं नये . "

इति श्रीनिर्णयसिंधूंतील पार्वणश्राद्धाची तरणिरुपा भाषाटीका समाप्त झाली .

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP