आतां आपस्तंबांचें अग्नौकरण सांगतो -
अथापस्तंबानांसूत्रे उद्ध्रियतामग्नौचक्रियतामित्यामंत्रयते काममुद्ध्रियतांकाममग्नौचक्रियतामित्यतिसृष्टउद्धरेज्जुहुयाच्च नष्टाग्निविधुरादेर्विशेषोबृहन्नारदीये नष्टाग्निर्दूरभार्यश्चपार्वणेसमुपस्थिते संधायाग्निंततो होमंकृत्वातंविसृजेत्पुनः अयाश्चेतितत्कालेग्निंसंधायहुत्वात्यजेदित्यर्थः एतदापस्तंबानामेव पाणिहोमस्तुछंदोगादीनां विश्वप्रकाशेऽपि साग्निरौपासनेनग्निरग्नौकुर्वीतलौकिके पाणौहोमंप्रशंसंतिनत्वापस्तंबशाखिनां स्नातकाविधुरावास्युर्यदिवाब्रह्मचारिणः अग्नौकरणहोमंतुकुर्यस्तेलौकिकेऽनले अयाश्चाग्नेमनोज्योतिरुद्बुध्यव्याह्रतीर्हुनेत् ततोनुज्ञातोग्नींधनाद्याज्यभागांतेयन्मेमातेत्याद्यैर्जुहुयात् तत्रसप्तान्नाहुतयः षडाज्यस्येतित्रयोदश व्यत्ययोवा यथा यन्मेमाताप्रलुलोभ० तन्मेरेतः पितावृंक्तां० , यास्तिष्ठंतीतिद्वाभ्याममुष्मैस्वाहेतिपितुर्नाम्नाद्वौहोमौ यन्मेपितामहीप्रलुलोभ० तन्मेरेतः पितामहोवृंक्तां० , अंतर्दधेइतितन्नाम्नापितामहायद्वौ यन्मेप्रपितामहीप्रलुलोभ० तन्मेरेतः प्रपितामहोवृंक्तां० , अंतर्दधेऋतुभिरितितन्नाम्नाप्रपितामहायद्वौमातामहेषुतूहः यन्मेमातामही० तन्मेरेतोमातामहोवृंक्तां० , अन्यंमातामहाद्दधेइत्यादौ यन्मेमातुः पितामहीप्रलुलोभ० तन्मेरेतोमातुः पितामहोवृंक्तां० , अन्यंमातुः पितामहाद्दधे० यन्मेमातुः प्रपितामहीप्रलुलोभ० तन्मेरेतोमातुः प्रपितामहोवृंक्तां० , अन्यंमातुः प्रपितामहाद्दधे० , सर्वत्राप्यमुष्माइत्यत्रडेंतंतत्तन्नामयोज्यं तद्गृह्यसंग्रहे योज्यः पित्रादिशब्दानांस्थानेमातामहादिकः अन्नहोमेतथास्पर्शेजलपिंडादिदानके यन्मेमातामहीत्यादितत्रोदाहरणंभवेत् ततोयेचेत्येकान्नाहुतिः ततः स्वाहापित्रेइत्याद्यैराज्यंहुत्वास्विष्टकृतंहुत्वासर्वभक्ष्यंकिंचिदादायोदगुष्णंभस्मापोह्यतत्रतूष्णींस्वाहाकारेणजुहोति परिषेचनांतंस्थालीपाकवत् ।
आपस्तंबसूत्रांत - " उद्ध्रियतां , अग्नौ च क्रियतां " अशी अनुज्ञा मागावी . नंतर ब्राह्मणांनीं ‘ काममुद्ध्रियतां , काममग्नौच क्रियतां ’ अशी अनुज्ञा दिल्यावर अन्नाचा उद्धार करावा , आणि होमही करावा . " नष्टाग्नि , विधुर इत्यादिकांस विशेष सांगतो बृहन्नारदीयांत - " ज्याचा अग्नि नष्ट असेल त्यानें व भार्या दूर असेल त्यानें अग्नीचें संधान करुन होम करुन पुनः अग्नीचें विसर्जन करावें " म्हणजे ‘ अयाश्चा० ’ ह्या मंत्रानें त्या कालीं अग्निसंधान करुन होम करुन अग्नित्याग करावा . हें आपस्तंबांनाच समजावें . पाणिहोम तर छंदोगादिकांना आहे . विश्वप्रकाशांतही - साग्निकानें औपासनाग्नीवर अग्नौकरण करावें , निरग्निकानें लौकिकाग्नीवर करावें . आपस्तंबशाखींना पाणिहोम प्रशस्त , असें सांगत नाहींत . स्नातक ( समावर्तन केलेले ), विधुर अथवा ब्रह्मचारी यांनीं लौकिकाग्नीवर अग्नौकरणहोम करावा . ‘ अयाश्चाग्ने ’ , ‘ मनोज्योति० ’ , ‘ उद्बुध्य ’ या मंत्रांनीं व व्याह्रतींनीं होम करुन लौकिकाग्नि उत्पन्न करावा . " तदनंतर ब्राह्मणांची अनुज्ञा घेऊन अग्निप्रज्वलनादिक आज्यभागांत करुन ‘ यन्मे माता० ’ इत्यादि मंत्रांनीं होम करावा . तेथें सात अन्नाहुति आणि सहा आज्याहुति मिळून तेरा आहुति होतात . अथवा याच्या विपरीत म्हणजे सहा अन्नाहुति व सात आज्याहुति समजाव्या . त्या आहुति येणेप्रमाणें - ‘ यन्मे माता प्रलुलोभ चरत्यननुव्रता । तन्मे रेतः पिता वृंक्तां० , यास्तिष्ठंति ’ या दोन मंत्रांनीं ‘ अमुष्मैस्वाहा ’ असें म्हणून पित्याच्या नांवानें दोन होम ( आहुति ) द्यावे . ‘ यन्मेपितामही प्रलुलोभ० तन्मे रेतः पितामहो वृंक्तां० , अंतर्दधे पर्वतै० रंतरन्यं पितामहाद्दधे स्वधानमः ’ या मंत्रांनीं पितामहाच्या नांवानें दोन होम . ‘ यन्मे प्रपितामही प्रलुलोभ० तन्मे रेतः प्रपितामहो वृंक्तां० , अंतर्दधे ऋतुभि० रन्यं प्रपितामहाद्दधे० ’ या मंत्रांनीं प्रपितामहाच्या नांवानें दोन होम . याप्रमाणें पितृपार्वणाचा होम समजावा . मातामहांचा होम कर्तव्य असतां मंत्रांत ऊह करावा . तो असा - ‘ यन्मे मातामही प्रलुलोभ० तन्मे रेतो मातामहो वृंक्तां० , रन्यं मातामहाद्दधे० ’ इत्यादि . ‘ यन्मे मातुः पितामहीं प्रलुलोभ० तन्मे रेतो मातुः पितामहो वृंक्तां० , अन्यं मातुः पितामहाद्दधे० ’ ‘ यन्मे मातुः प्रपितामही प्रलुलोभ० तन्मे रेतो मातुः प्रपितामहो वृंक्तां० , अन्यं मातुः प्रपितामहाद्दधे० ’ ह्या सर्व मंत्राचे ठिकाणीं त्याचें त्याचें नांव चतुर्थीविभक्त्यंत योजावें . त्यांच्या ( आपस्तंबांच्या ) गृह्यसंग्रहांत - " अन्नाचा होम , स्पर्श करणें , उदकदान व पिंडादिदान इतक्या ठिकाणीं पिता इत्यादि शब्दांच्या स्थानीं मातामह इत्यादिक शब्द योजावे . त्याचे उदाहरण - ‘ यन्मेमातामही० ’ इत्यादिक आहे तदनंतर ‘ येच० ’ या मंत्रानें एक अन्नाहुति द्यावी . तदनंतर ‘ स्वाहा पित्रे ’ इत्यादि मंत्रांनीं घृताचें हवन करुन स्विष्टकृताचा होम करुन नंतर सर्व भक्ष्य पदार्थ किंचित् घेऊन उत्तरेकडे उष्ण भस्म अपवाहन करुन तेथें मंत्रावांचून स्वाहाकारानें होम करावा . नंतर परिषेकांत कर्म स्थालीपाकाप्रमाणें करावें .
अयमग्नौकरणहोमोमासिकश्राद्धएव तच्चस्मार्ताग्न्यभावेनंकार्यमितिकेचित् कार्यमेवेतिबहवः अतएव सर्वाधानिनोहोमवर्जंमासिकश्राद्धमुक्तंसुदर्शनभाष्ये महालयेतद्वदित्येके प्रकरणांतरत्वात् कर्मांतरत्वेनस्मार्तपार्वणवत्कार्यमितित्वस्मद्गुरवः आब्दिकादिषुतुस्मार्तपार्वणविधिरेव एवंमातृवार्षिकादिषु मासिश्राद्धविकृतावष्टकायांमातृश्राद्धेवैकृतहोमेनप्राकृतहोमबाधः अन्वष्टकासुमातृश्राद्धंनेतिभाष्ये तत्रापिश्राद्धांतरवत् क्रियमाणेतुयन्मेमातेत्यादौगुणत्वेपिमातृप्राधान्यंविवक्षितं मासिश्राद्धेनकल्पोव्याख्यातइतिसूत्रात् आग्नेय्येवमनोताकार्यमितिवचनादग्निशब्दस्येववैकृतदेवताभिधायित्वम् तेनामुष्माइत्यत्रामुकशर्मभ्यांपितृभ्यामित्याद्यूहः कार्यः तच्चमासिश्राद्धंजीवत्पित्रादिनाव्युत्क्रममृतपित्रादिनाचकार्यमित्युक्तंसुदर्शनभाष्ये तत्प्रकारस्तुवक्ष्यते मातापित्रोर्द्वित्वादौतुनोहः तस्मादृचंनोहेदितिनिषेधात् प्रकृतावूहाभावाच्चपत्नींसन्नह्येतिवत् उपदेशिमतेतूहः यथायन्मेमातरौप्रलुलोभतुश्चरंत्यावननुव्रतेइत्याद्यस्मत्पितृकृतमासिश्राद्धनिर्णयेज्ञेयमितिदिक् अन्यत्प्राग्वत् ।
हा अग्नौकरणहोम मासिकश्राद्धांतच आहे . तें अग्नौकरण स्मार्ताग्नीच्या अभावीं करुं नये , असें केचित् म्हणतात . करावेंच असें बहुत सांगतात . म्हणूनच सर्वाधानीला स्मार्ताग्नि नसल्यामुळें होमरहित मासिकश्राद्ध सुदर्शनभाष्यांत सांगितले आहे . महालयांत मासिकश्राद्धाप्रमाणें करावें , असें कोणी म्हणतात . महालयाचें प्रकरण भिन्न असल्यामुळें तें कर्म भिन्न आहे म्हणून स्मार्तपार्वणश्राद्धाप्रमाणें करावें असें आमचे गुरु सांगतात . आब्दिकादिक श्राद्धांविषयीं तर स्मार्त पार्वणाचाच विधि समजावा . याप्रमाणें मातेच्या वार्षिकादिश्राद्धांत समजावें . मासिश्राद्धाची विकृती अष्टकाश्राद्ध आहे त्या ठिकाणीं मातृश्राद्धांत , विकृति जी अष्टका तिच्या होमानें प्रकृतिभूत जें मासिश्राद्ध त्याच्या होमाचा बाध होतो . अन्वष्टकाश्राद्धांत मातृश्राद्ध नाहीं , असें भाष्यांत सांगितलें आहे . त्या अन्वष्टकाश्राद्धांतही इतर श्राद्धाप्रमाणें करावयाचें असेल तर ‘ यन्मेमाता० ’ इत्यादिक मंत्रांमध्यें मातेला गुणत्व ( अप्रधानत्व ) आहे तरी त्या ठिकाणीं मातेला प्रधानत्व विवक्षित आहे . कारण , ‘ मासिश्राद्धानें कल्पश्राद्धाचें व्याख्यान झालें ’ असें सूत्र आहे . ‘ आग्नेय्येव मनोताकार्या (?) ह्या वचनानें अग्निशब्दाला जसें विकृतींतील देवतावाचकत्व आहे तसें - येथें मासिश्राद्धाची विकृति ज्या अष्टका त्यांतील जी देवता माता तिचा वाचक मंत्र होतो . त्या योगानें ‘ अमुष्मै ’ या ठिकाणीं ‘ अमुकशर्मभ्यां पितृभ्यां ’ इत्यादिक ऊह करावा . तें प्रकृतिभूत मासिश्राद्ध जीवत्पितृकादिकानें व ज्याचे पित्रादिक व्युत्क्रमानें ( पितामह जीवंत असतां पिता मरणें या क्रमानें ) मृत आहेत त्यानें करावें , असें सुदर्शनभाष्यांत सांगितलें आहे . त्याचा प्रकार पुढें सांगूं . दोन माता , दोन पिते इत्यादिक असतां मंत्रांचा ऊह नाहीं ; कारण , ‘ ऋचेचा ( मंत्राचा ) ऊह करुं नये ’ असा ऊहाचा निषेध आहे . आणि प्रकृति जी मासिश्राद्ध त्यांतही ऊह नाहीं . जसें - दर्शपूर्णमासप्रकरणीं ‘ पत्नीं सन्नह्य ’ असा मंत्र आहे . अर्थ - पत्नीचें संनहन ( बंधन ) करुन , असा आहे . एकपत्नीक यजमान असतां ठीकच आहे . पण द्विपत्नीक यजमान असला तरी पत्नीशब्दाविषयीं ऊह नाहीं , असें मीमांसेंत सांगितलें आहे त्याप्रमाणें एथें मंत्रांत ऊह केल्यावांचून दोन मातेंचा होम होतो . उपदेशीच्या मतीं तर ऊह आहे . तो असा - " यन्मे मातरौ प्रलुलोभतुश्चरंत्यावननुव्रते " इत्यादिक आमच्या ( कमलाकरभट्टाच्या ) वडिलांनीं केलेल्या मासिश्राद्धनिर्णयांत पाहावा . ही दिशा दाखविली आहे . बाकीचें सर्व पूर्वीं प्रमाणेंच समजावें .
अयमग्नौकरणहोमोमासिकश्राद्धएव तच्चस्मार्ताग्न्यभावेनंकार्यमितिकेचित् कार्यमेवेतिबहवः अतएव सर्वाधानिनोहोमवर्जंमासिकश्राद्धमुक्तंसुदर्शनभाष्ये महालयेतद्वदित्येके प्रकरणांतरत्वात् कर्मांतरत्वेनस्मार्तपार्वणवत्कार्यमितित्वस्मद्गुरवः आब्दिकादिषुतुस्मार्तपार्वणविधिरेव एवंमातृवार्षिकादिषु मासिश्राद्धविकृतावष्टकायांमातृश्राद्धेवैकृतहोमेनप्राकृतहोमबाधः अन्वष्टकासुमातृश्राद्धंनेतिभाष्ये तत्रापिश्राद्धांतरवत् क्रियमाणेतुयन्मेमातेत्यादौगुणत्वेपिमातृप्राधान्यंविवक्षितं मासिश्राद्धेनकल्पोव्याख्यातइतिसूत्रात् आग्नेय्येवमनोताकार्यमितिवचनादग्निशब्दस्येववैकृतदेवताभिधायित्वम् तेनामुष्माइत्यत्रामुकशर्मभ्यांपितृभ्यामित्याद्यूहः कार्यः तच्चमासिश्राद्धंजीवत्पित्रादिनाव्युत्क्रममृतपित्रादिनाचकार्यमित्युक्तंसुदर्शनभाष्ये तत्प्रकारस्तुवक्ष्यते मातापित्रोर्द्वित्वादौतुनोहः तस्मादृचंनोहेदितिनिषेधात् प्रकृतावूहाभावाच्चपत्नींसन्नह्येतिवत् उपदेशिमतेतूहः यथायन्मेमातरौप्रलुलोभतुश्चरंत्यावननुव्रतेइत्याद्यस्मत्पितृकृतमासिश्राद्धनिर्णयेज्ञेयमितिदिक् अन्यत्प्राग्वत् ।
हा अग्नौकरणहोम मासिकश्राद्धांतच आहे. तें अग्नौकरण स्मार्ताग्नीच्या अभावीं करुं नये, असें केचित् म्हणतात. करावेंच असें बहुत सांगतात. म्हणूनच सर्वाधानीला स्मार्ताग्नि नसल्यामुळें होमरहित मासिकश्राद्ध सुदर्शनभाष्यांत सांगितले आहे. महालयांत मासिकश्राद्धाप्रमाणें करावें, असें कोणी म्हणतात. महालयाचें प्रकरण भिन्न असल्यामुळें तें कर्म भिन्न आहे म्हणून स्मार्तपार्वणश्राद्धाप्रमाणें करावें असें आमचे गुरु सांगतात. आब्दिकादिक श्राद्धांविषयीं तर स्मार्त पार्वणाचाच विधि समजावा. याप्रमाणें मातेच्या वार्षिकादिश्राद्धांत समजावें. मासिश्राद्धाची विकृती अष्टकाश्राद्ध आहे त्या ठिकाणीं मातृश्राद्धांत, विकृति जी अष्टका तिच्या होमानें प्रकृतिभूत जें मासिश्राद्ध त्याच्या होमाचा बाध होतो. अन्वष्टकाश्राद्धांत मातृश्राद्ध नाहीं, असें भाष्यांत सांगितलें आहे. त्या अन्वष्टकाश्राद्धांतही इतर श्राद्धाप्रमाणें करावयाचें असेल तर ‘ यन्मेमाता० ’ इत्यादिक मंत्रांमध्यें मातेला गुणत्व ( अप्रधानत्व ) आहे तरी त्या ठिकाणीं मातेला प्रधानत्व विवक्षित आहे. कारण, ‘ मासिश्राद्धानें कल्पश्राद्धाचें व्याख्यान झालें ’ असें सूत्र आहे. ‘ आग्नेय्येव मनोताकार्या (?) ह्या वचनानें अग्निशब्दाला जसें विकृतींतील देवतावाचकत्व आहे तसें - येथें मासिश्राद्धाची विकृति ज्या अष्टका त्यांतील जी देवता माता तिचा वाचक मंत्र होतो. त्या योगानें ‘ अमुष्मै ’ या ठिकाणीं ‘ अमुकशर्मभ्यां पितृभ्यां ’ इत्यादिक ऊह करावा. तें प्रकृतिभूत मासिश्राद्ध जीवत्पितृकादिकानें व ज्याचे पित्रादिक व्युत्क्रमानें ( पितामह जीवंत असतां पिता मरणें या क्रमानें ) मृत आहेत त्यानें करावें, असें सुदर्शनभाष्यांत सांगितलें आहे. त्याचा प्रकार पुढें सांगूं. दोन माता, दोन पिते इत्यादिक असतां मंत्रांचा ऊह नाहीं; कारण, ‘ ऋचेचा ( मंत्राचा ) ऊह करुं नये ’ असा ऊहाचा निषेध आहे. आणि प्रकृति जी मासिश्राद्ध त्यांतही ऊह नाहीं. जसें - दर्शपूर्णमासप्रकरणीं ‘ पत्नीं सन्नह्य ’ असा मंत्र आहे. अर्थ - पत्नीचें संनहन ( बंधन ) करुन, असा आहे. एकपत्नीक यजमान असतां ठीकच आहे. पण द्विपत्नीक यजमान असला तरी पत्नीशब्दाविषयीं ऊह नाहीं, असें मीमांसेंत सांगितलें आहे त्याप्रमाणें एथें मंत्रांत ऊह केल्यावांचून दोन मातेंचा होम होतो. उपदेशीच्या मतीं तर ऊह आहे. तो असा - “ यन्मे मातरौ प्रलुलोभतुश्चरंत्यावननुव्रते ” इत्यादिक आमच्या ( कमलाकरभट्टाच्या ) वडिलांनीं केलेल्या मासिश्राद्धनिर्णयांत पाहावा. ही दिशा दाखविली आहे. बाकीचें सर्व पूर्वीं प्रमाणेंच समजावें.