मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|निर्णयसिंधु|तृतीयपरिच्छेद उत्तरार्ध|
श्राद्ध विशेष

तृतीयपरिच्छेद - श्राद्ध विशेष

निर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल , याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे .


अत्रविशेषोहेमाद्रौविष्णुधर्मे श्राद्धाह्नितुसमभ्यर्च्यनृवराहंजनार्दनं शिवपुराणे पूजयित्वाशिवंभक्त्यापितृश्राद्धंप्रकल्पयेत् ‍ पूर्वनिषेधस्तुविहितभिन्नपरः तथाहेमाद्रौ देवार्चादक्षिणांगादिः पादजान्वंस मूर्धसु शिरोंसजानुपादेषुवामांगादिचपैतृकं कलिकायांस्मृत्यंतरे श्राद्धारंभेतुयेदर्भाः पादशौचेविसर्जयेत् ‍ अर्चनादौतुयेदर्भाउच्छिष्टांतेविसर्जयेत् ‍ मार्जनादौतुयेदर्भाः पिंडोत्थानेविसर्जयेत् ‍ उत्तानादौतुयेदर्भादक्षिणांतेविसर्जयेत् ‍ प्रार्थनादौतुयेदर्भानमस्कारेविसर्जयेत् ‍ ऊहमाहविष्णुः मातामहानामप्येवंश्राद्धंकुर्याद्विच क्षणः मंत्रोहेनयथान्यायंशेषाणांमंत्रवर्जितं यथान्यायमिति यत्रबहुवचनांतः पितृशब्दस्तत्रसर्वपितृवाचित्वान्नोहः तत्रापिशुंधंतांपितरइत्यत्रोहएव सर्वपितृवाचित्वेउत्तरमंत्रद्वयवैयर्थ्यात् ‍ बहुवचनंतुनोह्यते प्रकृतावसमर्थत्वात्पाशानितिवत् ‍ ऋगंतेचनोहः तस्मादृचंनोहेदितिनिषेधात् ‍ एकोद्दिष्टेप्येवम् ‍ प्रेतैकोद्दिष्टेत्वेकवन्मंत्रानूहे तैकोद्दिष्टेइतिविष्णूक्तेरुहः अत्रबहुवचनस्याप्यूहोवचनात् ‍ वृद्ध्यादौतुविशेषंवक्ष्यामः शेषाणामितिपितृ व्याद्येकोद्दिष्टेआवाहनादिमंत्रवर्ज्यंकार्यमितिकल्पतरुः ऊहयोग्यपितृपदवान् ‍ मंत्रएवतत्रनप्रयोज्यः नतूहः नापिपितृपदरहितः प्रयोज्यइतिशूलपाणिः अर्थांतरंचोक्तंप्राक् ‍ बह्वृचकारिकापि अर्घ्यप्रदानमंत्रेतुमात्रादिपदमावपेत् ‍ शुंधंतामितिपित्रादौमात्रादिपदमावपेत् ‍ मातृश्राद्धेपिंडदानेयेचत्वामत्रान्वित्यत्रनोहइतिवृत्तिकृत् ‍ तथा मातुः श्राद्धेप्यनूहेनकुर्यात्पिंडानुमंत्रणम् ‍ दशादानमुपस्थानंतद्वत्कार्यमितिस्थितिः प्रवाहणमनूहेन तद्वत्प्राशनमिष्यते तथा आयंतुनस्तिलोसीतिउशंतस्त्वेतियानितु अनूह्यः पितृशब्दोत्रपितृसामान्यवाचकः आपस्तंबानांतुवक्ष्यते ।

येथें विशेष सांगतो हेमाद्रींत विष्णुधर्मांत - " श्राद्धदिवशीं पुरुषश्रेष्ठ जनार्दनाची पूजा करुन श्राद्ध करावें . " शिवपुराणांत - " शिवाची पूजा भक्तीनें करुन नंतर पितृश्राद्ध करावें . " पूर्वींचा ( आश्वलायनवचनानें केलेला ) निषेध विहित जी विष्णुशिवपूजा तद्भिन्नविषयक आहे . हेमाद्रींत - " देवब्राह्मणांची पूजा उजव्या अंगाकडून पाय , जानु , अंस ( स्कंध ), मस्तक या क्रमानें करावी . पितृब्राह्मणांची पूजा वामांगाकडून मस्तक , स्कंध , जानु आणि पाय या क्रमानें करावी . " कलिकेंत स्मृत्यंतरांत - " श्राद्धारंभींचे जे दर्भ ते पादक्षालनांतीं टाकावे . पूजादिकांविषयीं जे दर्भ ते उच्छिष्टांतीं टाकावे . मार्जनादिकांविषयीं जे दर्भ ते पिंडोत्थान झाल्यावर टाकावे . पात्राचे उत्तानादिकर्माविषयीं जे दर्भ ते दक्षिणादानांतीं टाकावे . प्रार्थनादिकांविषयीं जे दर्भ ग्रहण केले असतील ते नमस्कारांतीं टाकावे . " ऊह सांगतो विष्णु - " याप्रमाणें मातामहांचें देखील यथायोग्य मंत्रांचा ऊह करुन श्राद्ध करावें . शेषांचें ( इतर पितृव्यादिकांचें ) ऊहयोग्य मंत्रवर्जित श्राद्ध करावें . " वचनांत ‘ यथान्याय ’ असें पद आहे त्याचा अर्थ - ज्या मंत्रांत बहुवचनांत पितृशब्द आहे तेथें तो सर्व पितरांचा वाचक असल्यामुळें त्याचा ऊह करुं नये . तशा प्रकारच्या मंत्रांमध्येंही ‘ शुंधंतां पितरः ’ या मंत्रांत ऊह करावाच ; कारण , हा पितृशब्द सर्वपितृवाचक नाहीं . सर्वपितृवाचक मानला तर पुढचे जे मंत्र ‘ शुंधंतां पितामहाः ’ ‘ शुंधंतां प्रपितामहाः ’ हे व्यर्थ होतील . बहुवचनाचा तर ऊह करावयाचा नाहीं . कारण , प्रत्येकाच्या ठिकाणीं ‘ शुंधंतां पितरः ’ या मंत्रांत बहुवचन असमर्थ ( एकाचें अबोधक ) असल्यामुळें पूजार्थ बहुवचन सिद्ध आहे . तें तसेंच इतरत्रही ठेवावें . जसें - प्रकृतीच्या ठिकाणीं असमर्थ जो बहुवचनांत पाशमंत्र त्याचा विकृतीच्या ठिकाणीं ऊह नाहीं , तद्वत् ‍. याप्रमाणें ‘ मातरः शुंधंतां इत्यादि ’ प्रयोगही जाणावा . ऋचेच्या मंत्रांत ऊह नाहीं ; कारण , ‘ ऋचेचा ऊह करुं नये ’ असा निषेध आहे . एकोद्दिष्ट श्राद्धांतही असेंच समजावें . प्रेताच्या एकोद्दिष्टश्राद्धांत तर " एकोद्दिष्टांत मंत्रांचा एकवचनांत ऊह करावा " असें विष्णुवचन आहे , म्हणून ऊह आहे . ह्या वचनावरुन एकोद्दिष्टांत बहुवचनाचाही ऊह आहे . वृद्धिश्राद्धादिकाविषयीं तर विशेष पुढें सांगूं . ऊहविधायक पूर्वींच्या विष्णुवचनांत ‘ शेषाणां मंत्रवर्जितं ’ असें आहे त्याचा अर्थ - पितृव्य इत्यादिकांचें एकोद्दिष्ट कर्तव्य असतां आवाहनादि मंत्ररहित करावें , असें कल्पतरु सांगतो . ऊह करण्यास योग्य असें पितृपद ज्या मंत्रांत आहे त्या मंत्राचाच प्रयोग त्या ठिकाणीं करुं नये . म्हणजे ऊह करावयाचा नाहींच , आणि ‘ पितृ ’ या पदानें रहित असा मंत्रही म्हणावयाचा नाहीं . तर तसला मंत्रच येथें घ्यावयाचा नाहीं , असें शूलपाणि सांगतो . ‘ शेषाणां ’ याचा दुसरा अर्थ पूर्वीं सांगितला आहे . बह्वृचकारिकाही - " मातेच्या श्राद्धांत अर्घ्यदानाच्या मंत्रांत ‘ पितः ’ इत्यादिस्थानीं ‘ मातः ’ इत्यादि योजावें . ‘ शुंधंतां ’ याच्या पुढें ‘ पितरः ’ इत्यादि स्थानीं ‘ मातरः ’ इत्यादि पद योजावें . " मातृश्राद्धांत पिंडदानाचे ठिकाणीं ‘ येचत्वामत्रानु ’ या मंत्रांत ऊह करावयाचा नाहीं , असें वृत्तिकार सांगतो . तसेंच " मातेच्या श्राद्धांत पिंडानुमंत्रण , दशादान , उपस्थान , प्रवाहण , आणि प्राशन इतक्या ठिकाणीं ऊह करणें इष्ट नाहीं . तसेंच ‘ आयंतुनः पितरः० ’ ‘ तिलोसि० ’ ‘ उशंतस्त्वा० ’ या मंत्रांचा जो ‘ पितृ ’ शब्द आहे तो सर्व पित्रांचा वाचक असल्यामुळें त्याचा ऊह करावयाचा नाहीं . " आपस्तंबांना तर पुढें सांगावयाचें आहे .

हेमाद्रौमार्कंडेयः स्नातः स्नातान् ‍ समाहूतान् ‍ स्वागतेनार्चयेत् ‍ पृथक् ‍ कलिकायांनारदीये प्रायश्चित्तविशुद्धात्मातेभ्योनुज्ञांप्रगृह्यच दद्याद्वैब्रह्मदंडार्थंहिरण्यंकुशमेवच तत्रैवसंग्रहे तिथिवारादिकंज्ञात्वासंकल्प्यचयथाविधि प्राचीनावीतिनाकार्यंसर्वंसंकल्पनादिकं संबंधंप्रथमंब्रूयान्नामगोत्रेतथैवच वस्वादिरुपतांचा पिस्वपितृणामनुक्रमात् ‍ चंद्रोदयेनारदीये श्राद्धार्थंसमनुप्राप्तान् ‍ विप्रान् ‍ भूयोनिमंत्रयेत् ‍ आपस्तंबस्तुपूर्वे द्युर्निमंत्रणंपरेद्युर्द्वितीयंतृतीयमामंत्रणमित्याह यूयंमयानिमंत्रणीयाइतिनिवेदनरुपंआद्यं तद्विधिमाहशौनकः गृहीत्वामुकसंज्ञस्यामुकगोत्रस्यचामुके श्राद्धेतुवैश्वदेवार्थंकरणीयः क्षणस्त्वया इत्येवंश्राद्धकृद्ब्रूयादोंतथेतिवदेत्तुसः श्राद्धस्यकर्तासंब्रूयात्तंप्राप्नोतुभवानिति सवदेत् ‍ प्राप्नवानीतिइतरस्तंप्रतिद्विजः देवौपार्वणेपुरुरवार्द्रवौवाच्यौ पित्रादेरप्यनेनैववृणीतविधिनाद्विजान् ‍ ततः कर्ताबह्वृचोऽनाहिताग्निः पिंडपितृयज्ञंपरिस्तरणादीध्माधानांतंकुर्यात् ‍ अर्धाधानिनोप्येवमितिप्रयोगपारिजातेपरिशिष्टेच भाष्यकारमतेआब्दिकेप्येवम् ‍ वृत्तिकारमतेनेदम् ‍ ।

हेमाद्रींत मार्कंडेय - " कर्त्यानें स्वतः स्नान करुन , आलेल्या ब्राह्मणांचें वेगवेगळें स्वागतशब्दानें पूजन करावें . " कलिकेंत नारदीयांत - " स्वतः प्रायश्चित्तानें शुद्ध होऊन ब्राह्मणांपासून अनुज्ञा घेऊन त्यांना ब्रह्मदंडार्थ हिरण्य व कुश द्यावे . " तेथेंच संग्रहांत - " तिथि , वार , नक्षत्र इत्यादिक जाणून यथाविधि संकल्प करुन पितरांचें सर्व संकल्पादिक प्राचीनावीतीनें करावें , तें असें - पूर्वीं संबंध उच्चारावा , नंतर नांव आणि गोत्र पुढें वसुरुप , रुद्ररुप इत्यादि , याप्रमाणें स्वपितरांचा अनुक्रमानें उच्चार करावा . " चंद्रोदयांत नारदीयांत - " श्राद्धासाठीं प्राप्त झालेल्या ब्राह्मणांना पुनः निमंत्रण करावें . " आपस्तंब तर - " पूर्वदिवशीं निमंत्रण , दुसर्‍यादिवशीं दुसरें निमंत्रण आणि तिसरें आमंत्रण " असें सांगतो . ‘ तुह्माला निमंत्रण द्यावयाचें आहे ’ असें निवेदन करणें हें पहिलें निमंत्रण समजावें . निमंत्रणाचा विधि सांगतो शौनक - " दर्भ घेऊन ‘ अमुकशर्मणः अमुकगोत्रस्य अमुकश्राद्धे वैश्वदेवार्थं त्वया क्षणः करणीयः ’ असें श्राद्धकर्त्यानें म्हणावें . ब्राह्मणानें ‘ ओंतथा ’ असें म्हणावें . श्राद्धकर्त्यानें ‘ प्राप्नोतु भवान् ‍ ’ असें ब्राह्मणास बोलावें , ब्राह्मणानें ‘ प्राप्नवानि ’ असें बोलावें . पार्वणश्राद्धांत देव ‘ पुरुरवार्द्रव ’ बोलावे . पित्रादिकब्राह्मणांनाही ह्याच विधीनें क्षण द्यावे . " तदनंतर श्रौताग्निरहितबह्वृक् ‍ शाखी श्राद्धकर्ता असेल त्यानें पिंडपितृयज्ञ परिस्तरणापासून इध्माधानांत करावा . अर्धै आधान करणारालाही असेंच प्रयोगपारिजातांत परिशिष्टांत सांगितलें आहे . भाष्यकाराच्या मतीं आब्दिक श्राद्धांतही असेंच आहे . वृत्तिकारमतानें हें समजावें .

हेमाद्रौशंभुः संमार्जितोपलिप्तेतुद्वारिकुर्वीतमंडले उदक् ‍ प्लवमुदीच्यंस्याद्दक्षिणंदक्षिणाप्लवम् ‍ व्याघ्रः उत्तरेक्षतसंयुक्तान् ‍ पूर्वाग्रान् ‍ विन्यसेत् ‍ कुशान् ‍ दक्षिणेदक्षिणाग्रांस्तुसतिलान् ‍ विन्यसेत् ‍ कुशान् ‍ तत्रैवबौधायनः चतुरस्त्रंत्रिकोणंचवर्तुलंचार्धचंद्रकं कर्तव्यमानुपूर्व्येणब्राह्मणादिषुमंडलम् ‍ तत्रैवलौगाक्षिः हस्तद्वयमितं कार्यंवैश्वदेविकमंडलम् ‍ दक्षिणेचचतुर्हस्तंपितृणामंघ्रिशोधने कलिकायांसंग्रहेतु प्रादेशमात्रंदेवानांचतुरस्त्रंतुमंडलं त्यक्त्वाषडंगुलंतस्माद्दक्षिणेवर्तुलंतथेत्युक्तम् ‍ यत्तुस्मृत्यंतरे गर्तः पंचागुलोविप्रेजानुमात्रोमहीभुजि प्रादेशमात्रोवैश्येचसाधिकः सतुशूद्रके तिर्यगूर्ध्वप्रमाणेनव्याख्यातोदैवपित्र्ययोः चतुरस्त्रंवर्तुलंचकथितंगर्तलक्षणम् ‍ पादप्रक्षालनंप्रोक्तमुपवेश्यासनेद्विजान् ‍ तिष्ठंश्चेत् ‍ क्षालनंकुर्यान्निराशाः पितरोगताइति तत्समूलत्वेमंडलाग्रेपृथक् ‍ ज्ञेयम् ‍ तत्रगोमयेहेमाद्रौभृगुः अत्यंतजीर्णदेहायावंध्यायाश्चविशेषतः आर्तायानवसूतायानगोर्गोमयमाहरेत् ‍ मात्स्ये अक्षताभिः सपुष्पाभिस्तदभ्यर्च्यापसव्यवत् ‍ विप्राणांक्षालयेत्पादावभिवंद्यपुनः पुनः प्रत्यड्मुखस्थितः कुर्याद्विप्रपादाभिषेचनं तत्रैवभविष्ये प्रक्षालयेद्विप्रपादान् ‍ शंनोदेवीरभीत्यृचा पृथ्वीचंद्रोदयेवृद्धवसिष्ठः नकुशग्रंथिहस्तस्तुपाद्यंदद्याद्विचक्षणः कलिकायांसंग्रहे ततः प्रक्षालयेत्पादौभार्यास्रावितवारिणा तथा श्राद्धकालेयदापत्नीवामेनीरप्रदाभवेत् ‍ आसुरंतद्भवेच्छ्राद्धंपितृणांनोपतिष्ठते तत्रैव नाधः प्रक्षालयेत्पादौकर्तापित्रादिकर्मसु पाद्यानंतरमर्घ्यमपिदद्यादितिहेमाद्रिः तत्रैवलौगाक्षिः मंडलादुत्तरेदेशेदद्यादाचमनीयकं तत्रैव विधायक्षालनंतेषांद्विराचमनमिष्यते स्वयंचापिद्विराचामेद्विधिज्ञः श्रद्धयान्वितः हेमाद्रौनारदीये यत्राचमनवारीणिपादप्रक्षालनोदकैः संगच्छंतेबुधाः श्राद्धमासुरंतत्प्रचक्षते ।

हेमाद्रींत शंभु - " संमार्जन करुन गोमयानें उपलेपन केलेल्या गृहाच्या द्वारदेशीं दोन मंडलें करावीं , तीं अशीं - एक उत्तरेकडे करावें तें उदक् ‍ प्लव ( उदक् ‍ संस्थ ). दुसरें दक्षिणेकडे करावें तें दक्षिणाप्लव . " व्याघ्र - " उत्तरेकडच्या मंडलावर अक्षतायुक्त पूर्वाग्र कुश टाकावे . दक्षिणेकडच्या मंडलावर तिलसहित दक्षिणाग्र दर्भ टाकावे . " तेथेंच बौधायन - " ब्राह्मणादिकाच्या ठिकाणीं जें मंडल करावयाचें तें चतुरस्त्र , त्रिकोण , वर्तुल आणि अर्धचंद्राकार असें अनुक्रमानें करावें . " तेथेंच लौगाक्षि - " वैश्वदेवब्राह्मणाचे पाद धुण्यासाठीं जें मंडल तें दोनहस्तपरिमित करावें . आणि पितृब्राह्मणाचे पाद धुण्यासाठीं जें मंडल तें दक्षिणेस चतुर्हस्तपरिमित करावें . " कलिकेंत संग्रहांत तर - " देवांचें मंडल प्रादेशमात्र चतुरस्त्र करावें . त्यापासून सहा अंगुळें टाकून त्याच्या दक्षिणेस वर्तुल मंडल तसेंच करावें . " असें सांगितलें आहे . आतां जें इतर स्मृतींत सांगतो कीं - ब्राह्मणश्राद्धांत पंचांगुलप्रमाण गर्त ( खळगा ) करावा , क्षत्रियश्राद्धांत जानुप्रमाण , वैश्यश्राद्धांत प्रादेशमात्र आणि शुद्रश्राधांत त्याच्याहून किंचित् ‍ अधिक करावा . हें गर्ताचें प्रमाण उंचीचें व रुंदीचें समजावें . देवांचा गर्त चतुरस्त्र आणि पितरांचा गर्त वर्तुल , याप्रमाणें गर्तलक्षण सांगितलें आहे . आसनावर ब्राह्मणांना बसवून त्यांचें पादप्रक्षालन सांगितलें आहे . ब्राह्मण उभे करुन त्यांचें पादप्रक्षालन करील तर पितर निराश होऊन जातात . " हें स्मृत्यंतरवचन समूल असेल तर प्रत्येक मंडलाच्या अग्रभागीं वेगवेगळें गर्त समजावें . येथें गोमयाविषयीं हेमाद्रींत भृगु सांगतो - " अत्यंत वृद्ध झालेल्या वंध्या रोगपीडित व नवीन प्रसूत झालेल्या अशा गाईचें गोमय घेऊं नये . " मात्स्यांत - " अपसव्य करुन अक्षता व पुष्पें यांनीं त्या मंडलांची पूजा करुन ब्राह्मणाचे पाद पुनः पुनः नमस्कार करुन धुवावे . पश्चिमेकडे मुख करुन ब्राह्मणांचे पाद धुवावे . " तेथेंच भविष्यांत - " शंनोदेवी० ’ ह्या मंत्रानें ब्राह्मणाचें पादक्षालन करावें . " पृथ्वीचंद्रोदयांत वृद्धवसिष्ठ - " कुशपवित्रयुक्त हस्तानें पादप्रक्षालन करुं नये . " कलिकेंत संग्रहांत - " भार्येनें उदक पायांवर घालून श्राद्धकर्त्यानें पादक्षालन करावें . तसेंच - ज्या श्राद्धांत पत्नी वामभागीं राहून उदक देते तें श्राद्ध आसुर होतें , पितरांना प्राप्त होत नाहीं . " तेथेंच सांगतो - " पित्रादिकांच्या श्राद्धांत अधोभागीं पादप्रक्षालन करुं नये . " पाद्यानंतर अर्घ्यही द्यावें , असें हेमाद्रि सांगतो . तेथेंच लौगाक्षि - " मंडलाच्या उत्तरप्रदेशीं आचमन द्यावें . " तेथेंच - " ब्राह्मणांचें पादक्षालन झाल्यावर त्यांना दोन वेळां आचमन सांगितलें आहे . विधिज्ञ श्राद्धकर्त्यानेंही श्रद्धायुक्त होऊन दोन वेळां आचमन करावें . " हेमाद्रींत नारदीयांत - " ज्या श्राद्धांत पादक्षालनोदक व आचमनोदक यांचा संसर्ग होतो , तें श्राद्ध आसुर होतें असें विद्वान् ‍ सांगतात . "

हेमाद्रौव्यासः सव्येनैवासनंधृत्वादक्षिणेदक्षिणंकरं व्याह्रतिभिः समस्ताभिरासनेषूपवेशयेत् ‍ समाध्वमितिचैवोक्त्वादक्षिणंजानुसंस्पृशन् ‍ आस्यतामितितान् ‍ ब्रूयादासनंसंस्पृशन्नपि हेमाद्रौशातातपः द्वौदैवेथर्वणौविप्रौप्राड्मुखावुपवेशयेत् ‍ पित्र्येतूदड्मुखांस्त्रींश्चबह्वृचाध्वर्युसामगान् ‍ याज्ञवल्क्यः द्वौदैवेप्राक् ‍ त्रयः पित्र्येउदगेकैकमेववा यत्तुहेमाद्रौहारीतः दक्षिणाग्रदर्भेषुप्राड्मुखान् ‍ ब्राह्मणान् ‍ भोजयेदुदड्मुखानित्येकेइतितन्मैत्रायणीयविषयम् ‍ प्राड्मुखान् ‍ भोजयेदुदड्मुखानित्येकेइतितत्परिशिष्टात् ‍ विकल्पइति हेमाद्रिः माधवीयेयमः भिक्षुकोब्रह्मचारीवाभोजनार्थमुपस्थितः उपविष्टेष्वनुप्राप्तः कामंतमपिभोजयेत् ‍ कौर्मे अतिथिर्यस्यनाश्नातिनतच्छ्राद्धंप्रचक्षते विप्रनियमोमाधवीये पवित्रपाणयः सर्वेतेचमौनव्रतान्विताः उच्छिष्टोच्छिष्टसंस्पर्शंवर्जयंतः परस्परं तत्रासनानिपृथ्वीचंद्रोदयेयमः आसनंकुतपंदद्यादितरद्वापवित्रकं हेमाद्रौचमत्कारखंडे पितृणांघटितंहैमंराजतंवापिचासनम् ‍ येनताम्रमयंदत्तमासनंपितृकर्मणि सवैदिव्यासनारुढोनहिप्रच्यवतेदिवः हेमाद्रौनागरखंडे अयः शंकुमयंपीठंप्रदेयंनोपवेशने कलिकायांसंग्रहे क्षौमंदुकूलंनैपालमाविकंदारुजंतथा तार्णंपार्णंबृसींचैवविष्टरादिचविन्यसेत् ‍ अग्निदग्धान्यायसानिभग्नानिचविवर्जयेत् ‍ हेमाद्रौछागलेयः पश्चाद्भागादुपक्रम्यप्राच्यांपंक्तिर्यथाभवेत् ‍ दक्षिणासंस्थिताह्येषापितृणांश्राद्धकर्मणि पुलस्त्यः श्रीपर्णीवारुणीक्षीरीजंबुकाम्रकदंबकं सप्तमंबाकुलंपीठंपितृणांदत्तमक्षयं संग्रहे शमीचकाश्मरीशेलुः कदंबोवारुणस्तथा पंचासनानिशस्तानिश्राद्धेदेवार्चनेतथा कारिका द्वौदैवेप्राड्मुखौपित्र्येत्रीन्विप्रानुदगाननान् ‍ पैठीनसिः कुतपः श्राद्धवेलायांश्रोत्रियोयदिदृश्यते आश्वलायनः नीवीवासोदशांतेनस्वरक्षार्थंप्रबंधयेत् ‍ वृद्धयाज्ञवल्क्यस्तु दक्षिणेकटिदेशेतुतिलैः सहकुशत्रयं यत्तुकातीयम् ‍ नीवीकार्यादशागुप्तिर्वामकुक्षौकुशैः सहेति तद्वृद्धिश्राद्धे पितृणांदक्षिणेपार्श्वेविपरीतातुदैविकइति स्मृत्यंतरात् ‍ वामेदक्षिणेवेत्याचाराव्द्यवस्थेतिमदनपारिजाते ।

हेमाद्रींत व्यास - " वामहस्तानें आसन धरुन उजव्या हस्तानें ब्राह्मणाचा उजवा हात धरुन समस्तव्याह्रति उच्चारुन ‘ समाध्वं ’ असें म्हणून दक्षिणजानूला व आसनाला स्पर्श करुन ‘ आस्यतां ’ असें बोलून ब्राह्मणांना आसनावर बसवावें . " हेमाद्रींत शातातप - " अथर्वणवेदी दोन ब्राह्मण देवांकडे प्राड्मुख बसवावे . पितरांकडे बह्वृच , अध्वर्यु , सामवेदी असे तीन ब्राह्मण उदड्मुख बसवावे . " याज्ञवल्क्य - " देवांकडे दोन प्राड्मुख , पित्रांकडे तीन उदड्मुख किंवा दोहींकडे एकएक असे बसवावे . " आतां जें हेमाद्रींत हारीत सांगतो कीं , " दक्षिणाग्रदर्भांचे ठायीं प्राड्मुख ब्राह्मणांना भोजन घालावें , उदड्मुखांना घालावें , असें कोणीएक म्हणतात " तें मैत्रायणीयविषयक आहे . कारण , ‘ प्राड्मुखांना भोजन द्यावें , उदड्मुखांना द्यावें असें कोणीएक म्हणतात ’ असें मैत्रायणीयपरिशिष्ट आहे . प्राड्मुख किंवा उदड्मुख हा विकल्प आहे , असें हेमाद्रि सांगतो . माधवीयांत यम - " ब्राह्मण बसल्यावर संन्याशी किंवा ब्रह्मचारी भोजनासाठीं प्राप्त असेल तर त्याला यथेच्छ भोजन द्यावें . " कौर्मांत - " ज्या श्राद्धांत अतिथि भोजन करीत नाहीं तें श्राद्ध म्हणत नाहींत . " ब्राह्मणांचे नियम सांगतो माधवीयांत - " सारे ब्राह्मण हातांत पवित्रक घालून व मौनव्रत धारण केलेले असावे . त्यांनीं उच्छिष्टोच्छिष्टाचा संस्पर्श करुं नये . " श्राद्धांत आसनें सांगतो पृथ्वीचंद्रोदयांत यम - " आसनास कुतप ( नेपालकंबल ) किंवा इतर पवित्र द्यावें . " हेमाद्रींत चमत्कारखंडांत - " पितरांना सुवर्णानें किंवा रुप्यानें मढविलेलें आसन द्यावें . पितृकर्माविषयीं ज्यानें ताम्रमय आसन दिलें तो मृत झाल्यावर दिव्यासनावर आरुढ होऊन स्वर्गापासून च्युत होत नाहीं . " हेमाद्रींत नागरखंडांत - " लोखंडाचे खिळे मारलेलें आसन ब्राह्मणास बसावयास देऊं नये . " कलिकेंत संग्रहांत - " जवसाचें केलेलें पाटाव , शालजोडी , कंबलासन , वृक्षाचा पाट , तृणासन , पर्णासन , बृसी ( व्रतींचें आसन ), विष्टर यांपैकीं कोणतेंही आसन बसावयास द्यावें . अग्नीनें दग्ध , लोखंडाचीं व फुटकीं अशीं आसनें वर्ज्य करावीं . " हेमाद्रींत छागलेय - " श्राद्धकर्मांत दक्षिणेकडे बसवावयाची पितृब्राह्मणपंक्ति पश्चिमेस आरंभ करुन पूर्वेस जाईल अशी बसवावी " पुलस्त्य - " शिवण , वारुण ( वायवर्णा ), क्षीरिवृक्ष ( वट , उंबर वगैरे ), जांभूळ , आंबा , कळंब , सातवा बकुलवृक्ष यांचें आसन पितरांस दिलें असतां अक्षय होतें . " संग्रहांत - " श्राद्धांत व देवपूजेंत शमी , शिवण , भोंकर , कळंब , वायवर्णा , ह्या पांच वृक्षांचीं आसनें प्रशस्त आहेत . " कारिका - " प्राड्मुख दोन ब्राह्मण देवांकडे , आणि उदड्मुख तीन ब्राह्मण पितरांकडे बसवावे . " पैठीनसि - " श्राद्धकालीं श्रोत्रिय जर आलेला दिसेल तर तो कुतप ( पापनाशक ) आहे . अर्थात तो बसवावा . " आश्वलायन - " आपल्या रक्षणाकरितां नेसलेलें वस्त्र त्याच्या शेवटांनीं घट्ट बांधावें . " वृद्ध याज्ञवल्क्य तर - " दक्षिणकटिप्रदेशीं तिलांसहित तीन कुश ठेवावे . " आतां जें कातीयांचें सांगणें - " डाव्या कुशींत नेसलेल्या वस्त्राच्या दशा कुशांसह गुप्त कराव्या " तें वृद्धिश्राद्धांत समजावें . कारण , " पित्र्यकर्मामध्यें दक्षिणपार्श्वभागीं आणि दैविककर्मामध्यें वामपार्श्वभागीं " अशी अन्यस्मृति आहे . डाव्या किंवा उजव्या कटीस जसा आचार असेल तशी व्यवस्था करावी , असें मदनपारिजातांत आहे .

आचार्यः प्राणायामत्रयंकृत्वागायत्रीस्मरणंतथा श्राद्धंकर्तास्मीतिवदेद्विप्रैर्वाच्यंकुरुष्वच ब्राह्मे ततस्तिलान् ‍ गृहेतस्मिन् ‍ विकिरेच्चाप्रदक्षिणम् ‍ श्रद्धयापरयायुक्तोजपेदपहताइति स्मृत्यर्थसारे अपहताइति तिलान्विकीर्यउदीरतामित्यृचाप्रोक्षेत् ‍ पराशरः तद्विष्णोरितिमंत्रेणगायत्र्याचप्रयत्नतः प्रोक्षयेदन्नजातंतशुद्र दृष्ट्यादिशुद्धये हेमाद्रौब्रह्मांडे श्राद्धभूमौगयांध्यात्वाध्यात्वादेवंगदाधरम् ‍ वस्वादींश्चपितृन् ‍ ध्यात्वाततः श्राद्धंप्रवर्तते देवताभ्यः पितृभ्यश्चमहायोगिभ्यएवच नमः स्वाहायैस्वधायैनित्यमेवनमोनमः आदिमध्यावसा नेषुत्रिरावृत्तंजपेद्बुधः पितरः क्षिप्रमायांतिराक्षसाः प्रद्रवंतिच तत्रैवस्कांदे तिलारक्षंत्वसुरान् ‍ दर्भारक्षंतुराक्षसान् ‍ पंक्तिंवैश्रोत्रियोरक्षेदतिथिः सर्वरक्षकः वसिष्ठः शुद्धवतीभिः कूष्मांडीभिः पावमानीभिश्चपाकादि प्रोक्षयेत् ‍ ।

आचार्य - " तीन प्राणायाम करुन तसेंच गायत्री स्मरण करुन ‘ श्राद्धं करिष्ये ’ असें बोलावें , ब्राह्मणांनीं ‘ कुरुष्व ’ असें बोलावें . " ब्राह्मांत - " तदनंतर परमश्रद्धायुक्त होऊन ‘ अपहता० ’ या मंत्रानें त्या घरांत अप्रदक्षिण तिल टाकावे . " स्मृत्यर्थसारांत - " ‘ अपहता० ’ या मंत्रानें तिल टाकून ‘ उदीरता० ’ या ऋचेनें प्रोक्षण करावें . " पराशर - " शूद्रादिकांनीं पाहिलेला वगैरे दोष जाण्याकरितां ‘ तद्विष्णो० ’ या मंत्रानें व गायत्रीनें मोठ्या यत्नानें सर्व अन्नाचें प्रोक्षण करावें . " हेमाद्रींत ब्रह्मांडपुराणांत - " ‘ श्राद्धभूमौ गयां ध्यात्वा० ’ हा मंत्र म्हणावा . ‘ देवताभ्यः पितृभ्यश्च० ’ ह्या मंत्राचा आदीं , मध्यें व अंतीं त्रिवार जप करावा . असें केल्यानें पितर लवकर येतात व राक्षस पळतात . " तेथेंच स्कादांत - " ‘ तिला रक्षंत्वसुरान् ० ’ हा मंत्र म्हणावा . " वसिष्ठ - " शुद्धवती , कूष्मांडी व पावमानी ऋचांनीं पाकादिप्रोक्षण करावें . "

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP