मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|निर्णयसिंधु|तृतीयपरिच्छेद उत्तरार्ध|
पिंडदान

तृतीय परिच्छेदः - पिंडदान

निर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल , याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे .

अथपिंडदानं तच्चार्यनोत्तरमग्नौकरणोत्तरभोजनोत्तरंविकिरोत्तरंस्वधावाचनोत्तरंविप्रविसर्जनोत्तरंचेतिहेमाद्रौस्मृतिषुपक्षाउक्ताः तेषांशाखाभेदेनव्यवस्था प्रेतश्राद्धेषुपूर्वमन्येषुभोजनोत्तरमितिचंद्रिकामाधवौ सर्वत्रभोजनोत्तरमितिबहवः आश्वलायनः भुक्तवत्स्वनाचांतेषुपिंडान्निदध्यादाचांतेष्वेके भुक्तवत्स्वितिपूर्वनिषेधार्थं साग्निरतिप्रणीतसमीपेऽनग्निर्द्विजसमीपे हेमाद्रौजातूकर्ण्यः व्याममात्रंसमुत्सृज्यपिंडांस्तत्रप्रदापयेत् ‍ प्रसारितभुजांतरंव्यामः संकटेतुव्यासः अरत्निमात्रमुत्सृज्येति यत्तुतत्रैव सिकताभिर्मृदावापिवेदीदक्षिणनिम्नगेतितदन्यशाखिपरं देवलः ततस्तैरभ्यनुज्ञातोदक्षिणांदिशमेत्यच चंद्रिकायां पिंडनिर्वपणंकार्यंकुशाभावेविचक्षणैः काशेषुराजदूर्वासुपवित्रेपरमेहिते आश्वलायनः स्फ्येनरेखामुल्लिखेत् ‍ अपहताअसुरारक्षांसिवेदिषदइति तामभ्युक्ष्यसकृदाच्छिन्नैर्दर्भैरवस्तीर्यप्राचीनावीतीरेखांत्रिरुदकेनोपनयेच्छुंधंतांपितरः शुंधंतांपितामहाः शुंधंतांप्रपितामहाइतितस्यांपिंडान्निपृणीयात् ‍ पराचीनपाणिः पित्रेपितामहाय प्रपितामहायैतत्तेसौयेचत्वामत्रान्विति हेमाद्रौपारस्करः कराभ्यामुल्लिखेत्स्फ्येनकुशैर्वापिमहींद्विजः बह्वृचानांकरेणैव लेखाचाग्नेय्यभिमुखेतिवृत्तिः दक्षिणाप्राचींवेदिमुद्धत्येत्यापस्तंबोक्तेश्च ।

तें पिंडदान ब्राह्मणपूजनोत्तर , अग्नौकरणानंतर , ब्राह्मणभोजनानंतर , विकिरदानानंतर , स्वधाशब्दोच्चारानंतर किंवा विप्रविसर्जनानंतर करावें , असे सहा पक्ष स्मृतींत सांगितले आहेत , त्यांची शाखाभेदानें व्यवस्था समजावी . प्रेतश्राद्धांत पूर्वीं आणि इतर श्राद्धांत ब्राह्मणभोजनोत्तर पिंडदान करावें , असें चंद्रिका आणि माधव सांगतात . सर्वत्र ठिकाणीं भोजनोत्तर पिंडदान , असें बहुत सांगतात . आश्वलायन - " ब्राह्मण जेवल्यानंतर आचमनाच्या पूर्वीं म्हणजे उठण्याच्या पूर्वीं पिंड द्यावें . हस्तप्रक्षालन करुन आचमन केल्यावर पिंड द्यावे , असें कितीएक आचार्य सांगतात . " ह्या सूत्रांत ‘ भुक्तवत्सु ’ या पदानें भोजनाच्या पूर्वीं देऊं नयेत , असें सुचविलें आहे . साग्निकानें अतिप्रणीत अग्नीच्या समीप पिंड द्यावे . अनग्निकानें ब्राह्मणांच्या समीप पिंड द्यावे . हेमाद्रींत जातूकर्ण्य - " ब्राह्मणांच्याजवळ एक वांवपर्यंत जागा सोडून पिंड द्यावे . " इतकी जागा सोडणें अशक्य असेल तर व्यास सांगतो - " अरत्नि ( म्हणजे कनिष्ठांगुलिपासून हात ) परिमिति जागा सोडून द्यावे . " आतां जें तेथें सांगतो कीं , " वाळूनें किंवा मृत्तिकेनें दक्षिणेकडे उतरती अशी वेदी करावी , " तें अन्यशाखीयविषयक आहे . देवल - " तदनंतर ब्राह्मणांनीं अनुज्ञा दिल्यावर दक्षिणेकडे जाऊन चंद्रिकेंत - " कुशांच्या अभावीं काश , राजदूर्वा यांच्या ठिकाणीं पिंडदान करावें ; कारण , ते काश ( कसाड ), राजदूर्वा परम पवित्र आहेत . " आश्वलायन - " स्फ्य म्हणजे यज्ञांतील शस्त्रविशेष त्यानें रेखा काढावी आणि ‘ अपहता असुरा रक्षांसि वेदिषदः ’ या मंत्रानें तिचें उदकानें अभ्युक्षण करुन तिच्यावर एकदां कापलेले दर्भ पसरुन प्राचीनावीती करुन ‘ शुंधंतां पितरः ’ ‘ शुंधंतां पितामहाः ’ ‘ शुंधंतां प्रपितामहाः ’ या तीन मंत्रांनीं तीन वेळां त्या रेखेवर उदक द्यावें . तदनंतर पितृतीर्थ खालीं केलेल्या हातानें ‘ पित्रे ’ ‘ पितामहाय ’ ‘ प्रपितामहाय ’ या तीन मंत्रांनीं व ‘ एतत्ते असौ ये चत्वामत्रानु ’ असें म्हणून त्या रेखेवर पिंड द्यावे . " हेमाद्रींत पारस्कर - " भूमीवर हातांनीं , किंवा स्फ्यानें अथवा कुशांनीं रेखा काढावी . " बह्वृचांनीं हातानेंच आग्नेयीदिशाभिमुख रेखा काढावी , असें वृत्तिकार सांगतो . " दक्षिणा व प्राची यांच्या मध्यदिशेनुरुप वेदी उद्धरुन " असें आपस्तंबानेंही सांगितलें आहे .

देवलः आवाहयित्वादर्भाग्रैस्तेषांस्थानानिकल्पयेत् ‍ तेष्वासीनेषुपात्रेणप्रयच्छेत्सतिलोदकं पराचीनेन निम्नपितृतीर्थेन वायवीये मधुसर्पिस्तिलयुतांस्त्रीन् ‍ पिंडान्निर्वपेद्बुधः त्रिस्थलीसेतौ तिलमन्नंचपानीयं धूपंदीपंपयस्तथा मधुसर्पिः खंडयुक्तंपिंडमष्टांगमुच्यते याज्ञवल्क्यः सर्वमन्नमुपादायसतिलंदक्षिणामुखः उच्छिष्टसन्निधौपिंडान् ‍ दद्याद्वैपितृयज्ञवत् ‍ केचित् ‍ पिंडेषुमाषान् ‍ वर्जयंति माषाः श्राद्धेषुवैग्राह्यावर्ज्याश्चैवाग्निपिंडयोः ब्राह्मणेषुयथामद्यंतथामाषोग्निपिंडयोरितिस्मृतिसारात् ‍ माषान् ‍ सर्वत्रवैदद्यात्पिंडेग्नौचविवर्जयेदितिस्मृतेश्च अत्रमूलंचिंत्यं हेमाद्रावपिसर्वशब्दस्यप्रकृतार्थत्वात्सर्वान्नग्रहणमुक्तं अत्रशेषमन्नमनुज्ञाप्यसर्वमेकत्रोद्धृत्योच्छिष्टसमीपेदर्भेषुत्रींस्त्रीन् ‍ पिंडान् ‍ दद्यादितिगोभिलसूत्रेसर्वस्मात् ‍ प्रकृतादन्नात् ‍ पिंडान्मधुतिलान्वितानितिचशेषनियमात्तदभावेपिंडनिवृत्तिः प्राप्नोतीतिमैथिलवाचस्पती तन्न तुषोपवापवत् ‍ परप्रयुक्तद्रव्यवत्त्वेप्यर्थकर्मत्वाद्गुणानुरोधेनप्रधानत्यागाच्चशेषलोपेपिद्रव्यांतरेणकार्यं अतोनेयंप्रतिपत्तिः किंतुप्रधानमित्यक्तंप्राक् ‍ अन्यथासपिंडीकरणादौसंयोजनादेः प्रधानस्यलोपापत्तेरितिदिक् ‍ ।

देवल - " पितरांचें आवाहन करुन कुशाग्रांनीं त्यांचीं स्थानें कल्पावीं ; नंतर ते पितर बसले आहेत असें समजून पात्रानें तिलसहित उदक द्यावें . " वायवीयांत - " मधु , सर्पि , तिल यांनीं युक्त असे तीन पिंड द्यावे . " त्रिस्थलीसेतूंत - " तिल , अन्न , पाणी , धूप , दीप , दूध , मध , तूप , यांनीं युक्त पिंड अष्टांग सांगितला आहे . " याज्ञवल्क्य - " दक्षिणेकडे मुख करुन तिलसहित सर्व प्रकारचें अन्न घेऊन पिंडपितृयज्ञाप्रमाणें उच्छिष्टांच्या संनिध पिंड द्यावे . " कोणी पिंडांचेठायीं माष ( उडीद ) वर्ज्य करितात . कारण , " श्राद्धांचे ठायीं माष द्यावे ; अग्नि व पिंड यांविषयीं वर्ज्य करावे , ब्राह्मणाला जसें मद्य तसा अग्नि व पिंड यांना माष समजावा " असें स्मृतिसारवचन आहे . आणि ‘‘ सर्वत्र ठिकाणीं माष द्यावे पिंडाविषयीं व अग्नीविषयीं वर्ज्य करावे " अशी स्मृतिही आहे . या माषनिषेधकवचनाविषयीं मूल चिंत्य ( अनुपलब्ध ) आहे . हेमाद्रींतही वरील याज्ञवल्क्य वचनांतील ‘ सर्व ’ हा शब्द प्रकृत अन्नाचा बोधक असल्यामुळें पिंडाविषयीं सर्व अन्न ग्रहण करावें , असें सांगितलें आहे . या ठिकाणीं " शेष अन्नाविषयीं ब्राह्मणांची अनुज्ञा घेऊन सर्व प्रकारचें अन्न एकत्र करुन उच्छिष्टांच्या समीप दर्भांवर तीन तीन पिंड द्यावे " या गोभिलसूत्रांत " सर्व प्रकारच्या प्रकृत ( शेष ) अन्नापासून मध व तिल यांनीं युक्त पिंड करावे " या वचनानेंही पिंडाविषयीं शेष अन्नाचा नियम असल्यामुळें , शेषान्नाच्या अभावीं पिंडांची निवृत्ति ( अभाव ) प्राप्त आहे , असें मैथिल आणि वाचस्पति सांगतात , तें बरोबर नाहीं . कारण , जसा - श्रौतांत तुषांचा उपवाप ( कपालावर धारण ) हा पराविषयीं म्हणजे पुरोडाशश्रपणाविषयीं योजलेल्या कपालावरच होतो , त्या तुषोपवापाकरितां स्वतंत्र कपाल सांगितलें नाहीं , असें जरी आहे तरी तें अर्थकर्म ( अर्थ म्हणजे याग त्याला साधनरुप कर्म ) आहे . त्याप्रमाणें येथेंही भोजनाविषयीं उपयुक्त जें द्रव्य ( अन्न ) त्याच द्रव्यानें पिंडदान सांगितलें तरी तें पिंडदान अर्थकर्म अर्थ म्हणजे श्राद्ध त्याला साधनरुपकर्म आहे , म्हणून ; व गुणाच्या अनुरोधानें ( शेषान्नानुरोधानें ) प्रधान अशा पिंडदानाचा त्यागही होत नाहीं , याकरितां शेष अन्न नसलें तरी इतर द्रव्यानें पिंडदान करावें . म्हणून हें पिंडदान प्रतिपत्तिकर्म नव्हे , तर प्रधानकर्मं आहे , असें पूर्वीं सांगितलें आहे . असें न मानलें तर सपिंडीकरणादिक श्राद्धांत प्रधान अशा संयोजनादिकाचा लोप प्राप्त होईल . अशी ही दिशा दाखविली आहे .

आतां पिंडांचें प्रमाण सांगतो -

अथपिंडप्रमाणं हेमाद्रावंगिराः कपित्थबिल्वमात्रान्वापिंडान्दद्याद्विधानतः कुक्कुटांडप्रमाणान्वामलकैर्बदरैः समानिति तत्रैवधूम्रः कपित्थस्यप्रमाणेनपिंडान्दद्यात्समाहितः तत्समंविकिरंदद्यात्पिंडांतेतुषडंगुले अंत्येष्टिपद्धतौभट्टास्तु एकोद्दिष्टेसपिंडेतुकपित्थंतुविधीयते नारिकेलप्रमाणंतुप्रत्यब्देमासिकेतथा तीर्थेदर्शेचसंप्राप्तेकुक्कुटांडप्रमाणतः महालयेगयाश्राद्धेकुर्यादामलकोपममित्याहुः कलिकायामाचार्यः यत्रस्युर्बहवः पिंडास्तत्रबिल्वफलोपमाः यत्रचैकोभवेत्पिंडस्तत्रखर्जूरसन्निभः प्रेतपिंडस्तुदैर्घ्येणद्वादशांगुलउच्यतइति वायवीये पत्नीपिंडास्तुमृद्गीयात्र्त्रिवर्गस्यसहायिनी हेमाद्रौलौगाक्षिः महालयेगयायांचप्रेत श्राद्धेदशाहिके पिंडशब्दप्रयोगः स्यादन्नमन्यत्रकीर्तयेत् ‍ शाठ्यायनिः असावेतत्त इत्युक्त्वातदंतेचस्वधानमः असावित्यत्रसंबंधरुपगोत्रादिविशिष्टंपित्रादिनामसंबुद्ध्यंतमुक्त्वापुनश्चतुर्थ्यंतंतदंतेयंपिंडइदमन्नंवास्वधानमोनममेतिवदेदितिहेमाद्रिः पित्रादीनामज्ञानेत्वापस्तंबः यदिनामानिनविद्यात्स्वधापितृभ्यः पृथिवीषभ्द्यइतिप्रथमंपिंडंदद्यात् ‍ स्वधापितृभ्योंतरिक्षसभ्द्यइतिद्वितीयं स्वधापितृभ्योदिविषभ्द्यइतितृतीयं एवंमातामहेषुमातृषुच बह्वृचानांतूक्तंप्राक् ‍ कलिकायांस्मृतिः यावदेवोच्चरेन्मंत्रंतावत्प्राणंनिरोधयेत् ‍ येषांतुगृह्योक्तेदर्शेमातुः श्राद्धंपृथगुक्तंतेषांपितृभ्यः पश्चिमेमातृभ्यस्तत्पश्चिमेमातामहीभ्यः पिंडादिदेयमितिसांख्यायनः अस्मिन्पक्षेतत्पश्चिमेमातामहीभ्योपिदद्यादितिहेमाद्रिः पूर्वासुपितृभ्योदद्यादपरासुस्त्रीभ्यइतिसूत्राच्च एवं यत्रतीर्थमहालयादौ केचिदिच्छंतिनारीणांपृथक् ‍ श्राद्धंमहर्षयइतिचतुर्विंशतिमतात् ‍ पित्रादिनवदैवत्यंतथाद्वादशदैवतमित्यग्निपुराणाच्चमातृणांपृथगुक्तं यत्रवा आचार्यगुरुशिष्येभ्यः सखिज्ञातिभ्यएवच तत्पत्नीभ्यश्चसर्वाभ्यस्तथैवचजलांजलीन् ‍ पिंडांस्तेभ्यः सदादद्यात्पृथग्भाद्रपदेनरः तीर्थेषुचैवसर्वेषुमाघमासेमघासुचेतिचतुर्विंशतिमते दौहित्रपुत्रदाराश्चयेकनिष्ठाः सहोदराः निः संतानामृतायेचतेभ्योप्यत्रप्रदीयतइतिभविष्ये एकोद्दिष्टान्युक्तानितत्रापितत्पश्चिमेपिंडदानंज्ञेयं येषांनपृथक् ‍ तैः सपत्नीकाः पित्रादयोवाच्याः अन्वष्टकागयामातृश्राद्धंचैवमृतेहनि एकोद्दिष्टंतथामुक्त्वास्त्रीषुनान्यत्पृथग्भवेदितिशंखोक्तेश्च ।

हेमाद्रींत अंगिरा - " कपित्थफळाएवढे किंवा बेलफळाएवढे पिंड करुन यथाविधि द्यावे . अथवा कोंबड्याच्या आंड्याएवढे किंवा आंवळा , बोर यांच्यासारखे पिंड द्यावे . " तेथेंच धूम्र - " कपित्थफलाप्रमाणाचे पिंड द्यावे . आणि पिंडाच्या शेवटीं सहा आंगळांवर पिंडासारखा विकिर द्यावा . " अंत्येष्टिपद्धतींत नारायणभट्ट तर - " सपिंडींत व एकोद्दिष्टांत कपित्थाएवढा पिंड सांगितला आहे . सांवत्सरिकांत व मासिकांत नारळाएवढे पिंड द्यावे . तीर्थश्राद्धांत व दर्शश्राद्धांत कोंबड्याच्या अंड्याएवढे पिंड द्यावे . महालयांत व गयाश्राद्धांत आंवळ्यांसारखे पिंड द्यावे . " असें सांगतात . कलिकेंत आचार्य - " जेथें बहुत पिंड आहेत तेथें बेलफळासारखे पिंड करावे . जेथें एक पिंड तेथें खारकेएवढा करावा . प्रेतपिंडाची लांबी बारा अंगुळें सांगितली आहे . " वायवीयांत - " धर्म , अर्थ , काम या त्रिवर्गाला सहायभूत अशा पत्नीनें पिंड करावे . " हेमाद्रींत लौगाक्षि - " महालय , गया , दशाहांतील प्रेतश्राद्ध , इतक्या ठिकाणीं ‘ पिंड ’ या शब्दाचा प्रयोग आहे ; इतर ठिकाणीं ‘ अन्न ’ असें म्हणावें . " शाठ्यायनि - " असौ ’ किंवा ‘ एतत् ‍ ते ’ असें उच्चारुन त्याच्या ( चतुर्थ्यांत नांवाच्या ) अंतीं ‘ स्वधानमः ’ असें उच्चारावें . " ‘ असौ ’ या ठिकाणीं संबंध - रुप - गोत्र इत्यादिकयुक्त असें पिता इत्यादिकांचें नांव संबुद्धिविभक्तीनें उच्चारुन पुनः तसेंच पिता इत्यादिकांचें नांव चतुर्थीं विभक्तीनें उच्चारुन त्याच्या अंतीं ‘ अयं पिंडः , किंवा इदमन्नं स्वधानमोनमम ’ असें उच्चारावें , असें हेमाद्रि सांगतो . पिता इत्यादिकांचें नांव अज्ञात असेल तर सांगतो आपस्तंब - " जर कर्ता नांवें जाणत नाहीं तर ‘ स्वधापितृभ्यः पृथिवीषभ्द्यः ’ असें म्हणून प्रथमपिंड द्यावा . ‘ स्वधापितृभ्योंतरिक्षसभ्द्यः ’ असा दुसरा . आणि ‘ स्वधापितृभ्यो दिविषभ्द्यः ’ असा तिसरा पिंड द्यावा . " याप्रमाणें मातामहपार्वणांत व मातृपार्वणांत समजावें . बह्वृचांना तर पिता , पितामह इत्यादि नांवानेंच द्यावे , असें पूर्वीं सांगितलें आहे . कलिकेंत स्मृति - " जोंपर्यंत मंत्राचा उच्चार करीत आहे तोंपर्यंत प्राणरोध करावा . " ‘ ज्यांच्या गृह्यसूत्रांत दर्शाचे ठायीं मातेचें श्राद्ध पृथक् ‍ सांगितलें आहे त्यांनीं पित्रादिकांच्या पश्चिमेस मात्रादिकांस पिंडादि द्यावें , त्याच्या पश्चिमेस मातामहांना द्यावें ’ असें सांख्यायन सांगतो . ह्या पक्षीं मातामहांच्या पश्चिमेस मातामहींनाही द्यावें , ’ असें हेमाद्रि सांगतो . आणि " पूर्वरेखांवर पितरांना द्यावे , आणि अपर ( पश्चिम ) रेखांवर स्त्रियांना द्यावे " असें सूत्रही आहे . याप्रमाणें जेथें तीर्थश्राद्ध , महालय इत्यादिकांत ‘ केचित् ‍ महर्षि स्त्रियांचें पृथक् ‍ श्राद्ध इच्छितात ’ ह्या चतुर्विंशतिमतावरुन ; आणि " पित्रादित्रय , मात्रादित्रय आणि मातामहादिसपत्नीकत्रय ह्या नऊ देवतांचें ; तसेंच पित्रादित्रय , मात्रादित्रय मातामहादित्रय आणि मातामह्यादित्रय ह्या द्वादश दैवतांचें श्राद्ध करावें . " ह्या अग्निपुराणवचनावरुनही मातांचें श्राद्ध पृथक् ‍ सांगितलें तेथें ; अथवा ज्या ठिकाणीं " आचार्य , गुरु , शिष्य , सखा , ज्ञाति , व त्यांच्या सर्व पत्नी यांना भाद्रपदमासीं , सर्व तीर्थांमध्यें , माघमासीं मघानक्षत्रावर वेगवेगळे जलांजलि व पिंडदान करावें " ह्या चतुर्विंशतिमतांत ; तसेंच " कन्यापुत्र , पुत्र , स्त्रिया , कनिष्ठ सहोदर भ्राते आणि संतानरहित मृत झालेले त्यांनाही येथें पिंडादि देतात . " ह्या भविष्यपुराणांत एकोद्दिष्टें सांगितलीं आहेत त्या ठिकाणींही त्यांच्या ( पित्रादिकांच्या ) पश्चिमेस पिंडदान जाणावें . ज्यांच्या सूत्रांत स्त्रियांना पृथक् ‍ पिंडदान सांगितलें नाहीं त्यांनीं पित्रादिक सपत्नीक उच्चारावे . " अन्वष्टका , गया , मृतदिवस या ठिकाणचें मातृश्राद्ध व एकोद्दिष्टश्राद्ध हीं वेगळून इतर ठिकाणीं स्त्रियांचें श्राद्ध पृथक् ‍ होत नाहीं " असें शंखवचनही आहे .

मनुः तेषुदर्भेषुतंहस्तंनिमृजेल्लेपभागिनां हस्तलेपाभावेपिहस्तंनिमृज्यादेवेतिमेधातिथिः विष्णुः अत्रपितरोमादयध्वमितिदर्भमूलेकरावघर्षणं कलिकायांसुमंतुः एकोद्दिष्टेषुवर्षासुदर्भलेपोनविद्यते सपिंडीकरणादौतुलेपः सर्वत्रशस्यते मनुः आचम्योदक् ‍ परावृत्यत्रिरायम्यशनैरसून् ‍ षड् ‍ ऋतूंश्चनमस्कुर्यात्पितृनेवचमंत्रवत् ‍ उदकंनिनयेच्छेषंशनैः पिंडांतिकेपुनः त्रिः प्राणायामंकृत्वेतिमेधातिथिः अमंत्रंप्राणान्निरुध्येतिकर्काद्याः मंत्रवत् ‍ वसंतायनमः नमोवः पितरइत्याद्यैः शेषंपूर्वावनयनशेषं आश्वलायनः निपृताननुमंत्रये तात्रपितरोमादयध्वंयथाभागमावृषायध्वमिति सव्यावृदुदड्डावृत्ययथाशक्तिप्राणन्नासित्वाऽभिपर्यावृत्यामीमदं तपितरोयथाभागमावृषायीषतेतिचरोः प्राणभक्षंभक्षयेन्नित्यंनिनयनमिति नित्यग्रहणंशेषाभावेपिकुर्यादित्यर्थः शौनकः अथैषामत्रपितरइत्याद्येनानुमंत्रणं अमीमदंतेत्याद्येनमंत्रेणाप्यनुमंत्र्यतान् ‍ पिंडशिष्टचरोरन्नंकिंचिदाघ्रायतत्त्यजेत् ‍ प्रक्षाल्याचम्यशुंधंतामित्याद्यैरेवपूर्ववत् ‍ मंत्रैः पिंडेषुपानीयंनिषिंचेत्पितृतीर्थतः व्याघ्रः अद्भिः प्रक्षाल्यतत्पात्रंप्रतिपिंडंतुपूर्ववत् ‍ कृत्वावनेजनंकुर्यात्पिंडपात्रमधोमुखं एतत्कातीयादीनां ।

मनु - " पिंड दिल्यावर लेपभागी पितरांसाठीं पिंडांच्या दर्भांचे ठिकाणीं हात चोळावा . " हाताला लेप नसला तरी हात चोळावाच , असें मेधातिथि सांगतो . विष्णु - " - ‘ अत्र पितरो मादयध्वं ’ असें म्हणून दर्भांच्या मुळांचे ठिकाणीं हस्त चोळावा . " कलिकेंत सुमंतु - " एकोद्दिष्टांत व वर्षाऋतूंतील त्रयोदशीश्राद्धांत दर्भांना लेप सांगितला नाहीं . सपिंडीकरणादिक सर्व श्राद्धांत दर्भांना लेप लावणें प्रशस्त आहे . " मनु - " उत्तरेकडे फिरुन आचमन करुन हळूहळू त्रिवार प्राणायाम करुन वसतायनमः ’ इत्यादिमंत्रांनीं सहा ऋतूंना आणि ‘ नमोवः पितर० ’ ह्या मंत्रानें पितरांना नमस्कार करावे . आणि पूर्वीं पितृअर्घ्यपात्रांतील समवनयनशेष उदक पुनः पिंडांच्या समीप द्यावें . " ‘ त्रिरायम्य ’ याचा अर्थ - त्रिवार प्राणायाम करुन , असें मेधातिथि सांगतो . अमंत्रक प्राणांचा रोध करुन असें कर्कादिक सांगतात . आश्वलायन - " दिलेल्या पिंडांचें ‘ अत्र पितरो मादयध्वं यथाभागमावृषायध्वं ’ या मंत्रानें अनुमंत्रण करावें . डावीकडून उत्तरेकडे वळून यथाशक्ति प्राणांचा , रोध करुन पिंडांच्या अभिमुख फिरुन ‘ अमीमदंत पितरो यथाभागमावृषायीषत ’ असें म्हणून पिंडांतील शेष अन्न अवघ्राण करुन टाकावें , नंतर पिंडांवर नित्य उदक द्यावें . " येथें ह्या आश्वलायनसूत्रांत ‘ नित्य ’ असें सांगितलें आहे , यावरुन समवनयन शेष उदक नसलें तरी उदक द्यावें , असा इत्यर्थ समजावा . शौनक - " पिंड दिल्यावर ‘ अत्र पितर० ’ या मंत्रानें त्या पिंडांचें अनुमंत्रण करावें . ‘ अमीमदंत० ’ ह्या मंत्रानेंही त्या पिंडांचें अनुमंत्रण करुन पिंड केलेल्या चरुंतील शेष किंचित् ‍ अन्न अवघ्राण करुन तें टाकावें . नंतर हस्त प्रक्षालन करुन आचमन करुन ‘ शुधंतां पितरः ’ इत्यादि मंत्रांनीं पिंड देण्याच्या पूर्वी उदक देण्यास सांगितल्याप्रमाणें पिंडांवर पितृतीर्थानें पाणी द्यावें . " व्याघ्र - " पिंडांचें पात्र उदकानें प्रक्षालन करुन त्या उदकानें पूर्वींप्रमाणें ( ब्राह्मणपादक्षालनाप्रमाणें ) प्रतिपिंडाचें क्षालन करुन नंतर पिंडपात्र उपडें करावें . " हें कात्यायनादिशाखीयांना समजावें .

आचार्यः ततः सम्यग् ‍ द्विराचम्यनीवींविस्रस्यवाग्यतः आश्वलायनः असावभ्यंक्ष्वासावंक्ष्वेतिपिंडे ष्वभ्यंजनांजनेवासोदद्याद्दशामूर्णास्तुकांवापंचाशद्वर्षतायाऊर्ध्वंस्वंल्लोमैतद्वः पितरोवासोमानोतोन्यत्पितरोयुड्ध्वमिति श्राद्धचिंतामणौब्राह्मे एतद्वः पितरोवासइतिजल्पन् ‍ पृथक् ‍ पृथक् ‍ अमुकामुकगोत्रैतत्तुभ्यंवासः पठेद्बुधः इदंकातीयानां एतद्वइतिसूत्राणिप्रतिपिंडमितितत्सूत्रात् ‍ हेमाद्रौब्राह्मे श्रेष्ठमाहुस्त्रैककुदमंजनंनित्यमेवहि तैलंकृष्णतिलेभ्यश्चदद्यादभ्यंजनंहितं त्रैककुदंसुरमाइतिप्रसिद्धं अंजनप्राथम्यमापस्तंबादिविषयं तत्रैवव्याघ्रः गंधपुष्पाणिधूपंचदीपंचविनिवेदयेत् ‍ देवलः दक्षिणांसर्वभोगांश्चप्रतिपिंडंप्रदापयेत् ‍ भक्ष्याण्यपूपानिक्षूंश्चव्यंजनान्यशनानिच तत्रैवशंखः यत्किंचित्पच्यतेगेहेभक्ष्यंभोज्यमगर्हितं अनिवेद्यनभोक्तव्यंपिंडमूलेकथंचन एतत्सव्येनेतिकेचित् ‍ युक्तंत्वपस्रव्येन मनुः अवजिघ्रेच्चतान्पिंडान्यथान्युप्तान्समाहितः ततोनमोवः पितरइषइत्यादिनोपस्थानं मात्स्ये अथाचांतेषुचाचम्यवारिदद्यात्सकृत्सकृत् ‍ तिलपुष्पाक्षतान्पश्चादक्षय्योदकमेवच अत्रदैवेसव्यंपित्र्येत्वपसव्यमितिकर्कः परिभाषोक्तवचनात्सव्यमितियुक्तं अत्रशिवाआपः संतुसौमनस्यमस्त्वित्यादिप्रयोगोज्ञेयः मात्स्ये नत्वाशीः प्रतिगृह्णीयाद्दिजेभ्यः प्राड्मुखोबुधः अघोराः पितरः संतुसंत्वित्युक्तेपुनर्द्विजैः गोत्रंतथावर्धतांनस्तथेत्युक्तः सतैः पुनः दातारोनोभिवर्धंतामन्नंचैवेत्युदीरयेत् ‍ स्वस्तिवाचनकंकुर्यात्पिंडानुद्धृत्यभक्तितः ।

आचार्य - " उदक दिल्यावर चांगलें दोन वेळ आचमन करुन कमरेस बांधलेलें वस्त्र शिथिल करुन वाणीचें नियमन करुन असावें . " आश्वलायन - " असौ अभ्यंक्ष्व ’ असें म्हणून पिंडांस तेल लावावें . ‘ असौ अंक्ष्व ’ असें म्हणून अंजन ( काजळ ) लावावें . ‘ एतद्वः पितरो वासो मानोतोन्यत्पितरो युड्ध्वं ’ असें म्हणून ऊर्णावस्त्राची दशा किंवा पन्नास वर्षांहून अधिक वयाच्या श्राद्धकर्त्यानें आपल्या अंगावरचें लोम हें वस्त्र म्हणून पिंडांस द्यावें . " श्राद्धचिंतामणींत ब्राह्मांत - " एतद्वः पितरो वासः ’ असें म्हणून वेगवेगळें ‘ अमुक नाम अमुक गोत्र एतत्तुभ्यं वासः ’ असें बोलावें . " हें कातीयांना असें समजावें ; कारण , " - ‘ एतद्व० ’ या मंत्रानें प्रतिपिंडाला सूत्रें द्यावीं " असें त्यांचें सूत्र आहे . हेमाद्रींत ब्राह्मांत - " त्रैककुद ( सुरमा ) हें अंजन सर्वदा श्रेष्ठ आहे , असें सांगतात . आणि काळ्या तिळांचे तेलाचा अभ्यंग करावा , तो हितकारक आहे . " या वचनांत अंजन प्रथम सांगितलें हें आपस्तंबादिविषयक समजावें . तेथेंच व्याघ्र - " गंध , पुष्पें , धूप , दीप हीं निवेदन करावीं . " देवल - " दक्षिणा आणि सारे भोग हे प्रत्येक पिंडाला द्यावे . लाडू वगैरे भक्ष्य पदार्थ , अपूप , उंसाचे पदार्थ , चटण्या , कोशिंबिरी , व इतर खाण्याचे पदार्थ हे सारे पिंडांस द्यावे . " तेथेंच शंख - " घरामध्यें जें कांहीं अनिंद्य असें भक्ष्य ( लाडू वगैरे ) व भोज्य ( अन्नादिक ) शिजविलेलें असेल तें पिंडांना निवेदन केल्यावांचून भक्षण करुं नये . " हें सव्यानें करावें , असें केचित् ‍ म्हणतात . अपसव्यानें करणें योग्य आहे . मनु - " जसे पिंड दिले असतील त्या क्रमानें पिंडांचें अवघ्राण करावें . " तदनंतर ‘ नमोवः पितर इषे० ’ इत्यादिमंत्रानें उपस्थान करावें . मात्स्यांत - " ब्राह्मणांनीं आचमन केल्यावर स्वतः आचमन करुन त्यांच्या हातावर एक एक वेळां उदक द्यावें . नंतर तिळ , पुष्पें , अक्षता द्याव्या . तदनंतर अक्षय्योदक द्यावें . " देवांकडच्या ब्राह्मणांस सव्यानें , व पितरांकडच्या ब्राह्मणांस अपसव्यानें द्यावें , असें कर्क सांगतो . श्राद्धपरिभाषेंत सांगितलेल्या वचनावरुन सव्यानें द्यावें , हें योग्य आहे . येथें ‘ शिवा आपः संतु सौमनस्यमस्तु ’ इत्यादिप्रयोग जाणावा . मात्स्यांत - " पूर्वेकडे तोंड करुन ब्राह्मणांपासून आशीर्वचन घेऊं नये . ‘ अघोराः पितरः संतु ’ असें कर्त्यानें म्हणावें . ब्राह्मणांनीं ‘ संत्वघोराः पितरः ’ असें म्हणावें . ‘ गोत्रं वर्धतां नः ’ असें कर्त्यानें म्हणावें . ब्राह्मणांनीं ‘ तथा ’ असें म्हणावें . कर्त्यानें ‘ दातारो नोभिवर्धंतां , अन्नं च नो बहु भवेत् ‍ ’ इत्यादि म्हणावें . ब्राह्मणांनीं ‘ दातारो वोभिवर्धतां , अन्नं च वो बहुभवेत् ‍ ’ इत्यादि म्हणावें . नंतर भक्तीनें पिंडांचा उद्धार करुन स्वस्तिशब्दोच्चार ब्राह्मणाकडून करवावा . "

स्वस्तिवाचनात्प्राक् ‍ पात्रचालनंकार्यं हेमाद्रौबृहस्पतिः भाजनेषुचतिष्ठत्सुस्वस्तिकुर्वंतियेद्विजाः तदन्नमसुरैर्भुक्तंनिराशैः पितृभिर्गतैः जातूकर्ण्यः पात्राणिचालयेच्छ्राद्धेस्वयंशिष्योथवासुतः नस्त्रीभिर्नचबालेननासजात्याकथंचन याज्ञवल्क्यः स्वस्तिवाच्यंततः कुर्यादक्षय्योदकमेवच तत्रैववृद्धशातातपः पितृणांनामगोत्रेणकरेदेयंतिलोदकं प्रत्येकंपितृतीर्थेनअक्षय्यमिदमस्त्विति अत्रषष्ठीप्रागुक्ता तत्रैवनागरखंडे उत्तानमर्घ्यपात्रंतुकृत्वादत्वाचक्षिणां हिरण्यंदेवतानांचपितृणांरजतंतथा बृहस्पतिः तस्मात्पणंकाकिणींवाफलंपुष्पमथापिवा प्रदद्याद्दक्षिणांयज्ञेतयाससफलोभवेत् ‍ अत्रपित्रुद्देशेनदक्षिणादानेअपसव्यं विप्रोद्देशेनसव्यमितिमाधवः कलिकायामाचार्यः दद्याद्यज्ञोपवीत्येवतांबूलंदक्षिणंतथा अत्रिः वदेच्चतांस्ततोविप्रान्पित्रादिभ्यः स्वधोच्यतां गोभिलः अघोराः पितरः संत्वित्युक्तेस्वधांवाचयिष्यइतिपृच्छतिपितृभ्यः स्वधोच्यतामित्युक्तेस्तुस्वधेत्युच्यमानेधारांदद्यादूर्जंवहंतीति आपस्तंबेनतुपुत्रान्पौत्रानभितर्पयंतीरित्यपिपरिषेचनेमंत्रउक्तः ।

ब्राह्मणांनीं स्वस्तिवाचन करण्याच्या पूर्वीं उच्छिष्टपात्रांचें चालन करावें . कारण , हेमाद्रींत बृहस्पति सांगतो - " भोजनपात्रें तशींच असतां जे ब्राह्मण स्वस्तिवाचन करितात त्यांनीं भुक्त तें अन्न असुरांनीं भुक्त झाल्यामुळें पितर निराश होऊन जातात , असें समजावें . " जातूकर्ण्य - " श्राद्धांतील ब्राह्मणांनीं उच्छिष्टपात्रें श्राद्धकर्त्यानें किंवा शिष्यानें अथवा पुत्रानें चाळवावीं . स्त्रियांनीं , बालकांनीं किंवा असजाति मनुष्यानें कधींही चाळवूं नयेत . " याज्ञवल्क्य - " स्वस्तिवाचन केल्यावर अक्षय्योदक द्यावें . " तेथेंच वृद्धशातातप - " पितरांच्या नांवांचा व गोत्रांचा उच्चार करुन प्रत्येक ब्राह्मणाच्या हातावर ‘ इदमक्षय्यमस्तु ’ असें म्हणून तिलोदक द्यावें . " ह्या अक्षय्योदकदानाविषयीं पितरांच्या नांवादिकांची षष्ठीविभक्ती करावी , असें पूर्वीं सांगितलें आहे . तेथेंच नागरखंडांत - " अर्घ्यपात्र उताणें करुन देवांना सुवर्ण आणि पितरांना रजत दक्षिणा द्यावी . " बृहस्पति - " ब्राह्मणांना पण ( तांब्याचा पैसा ) किंवा कवडी अथवा फल , पुष्प इत्यादि कांहींतरी श्राद्धयज्ञाचे ठिकाणीं दक्षिणा द्यावी ; कारण , त्या दक्षिणेनें तो यज्ञ सफल होतो . " येथें पितरांच्या उद्देशानें दक्षिणादान असतां अपसव्य आणि ब्राह्मणाच्या उद्देशानें दक्षिणादान असतां सव्य , असें माधव सांगतो . कलिकेंत आचार्य - " यज्ञोपवीतीनेंच तांबूल आणि दक्षिणा द्यावी . " अत्रि - " तदनंतर त्या ब्राह्मणांना ‘ पित्रादिभ्यः स्वधोच्यताम् ‍ ’ असें सांगावें . " गोभिल - " - ‘ अघोरः पितरः संतु ’ असें म्हटल्यावर ‘ स्वधां वाचयिष्ये ’ असा ब्राह्मणांस प्रश्न करावा . अर्थात् ‍ ‘ वाच्यतां ’ असें उत्तर दिल्यावर कर्त्यानें ‘ पितृभ्यः स्वधोच्यतां ’ असें म्हटल्यावर ब्राह्मणांनीं ‘ अस्तु स्वधा ’ असें म्हटलें असतां ‘ ऊर्जं वहंती० ’ या मंत्रानें उदकधारा द्यावी . " आपस्तंबानें तर ‘ पुत्रान् ‍ पौत्रानभितर्पयंतीः० ’ हाही मंत्र परिषेचनाविषयीं सांगितला आहे .

आश्वलायनः अथैतान्प्रवाहयेत् ‍ परेतनपितरः सोम्यासोगंभीरेभिः पथिभिः पूर्विणेभिः दत्वायास्मभ्यंद्रविणेहभद्रंरयिंचनः सर्ववीरंनियच्छतेति मात्स्ये वाजेवाजेइतिजपन्कुशाग्रेणविसर्जयेत् ‍ प्रचेताः स्वस्तिवाच्यंततः कृत्वापितृपूर्वंविसर्जयेत् ‍ आश्वलायनः अन्नंप्रकीर्योपवीत्योंस्वधेतिविसृजेदस्तुस्वधेतिवा ब्रह्मवैवर्ते आमावाजेतिमंत्रंतुपठित्वाचप्रदक्षिणां द्वारोपांतेततः कृत्वासंयतः प्रविशेद्गृहं प्रांजलिश्चततः प्राहतान् ‍ विप्रान् ‍ सत्यवादिनः दातारोनोभिवर्धंतामन्नंचनइतिबह्विति एवमस्त्वितितेतंचकथयंतिसमाहिताः एतन्मंडलदेशेकार्यमितिहेमाद्रिः मनुः दातारोनोभिवर्धंतांवेदाः संततिरेवच श्रद्धाचनोमाव्यगमद्बहुदेयंचनोस्त्विति बौधायनः अन्नंचनोबहुभवेदतिथींश्चलभेमहि याचितारश्चनः संतुमाचयाचिष्मकंचनेति अत्रदातारोवोभिवर्धेतांलभध्वंयाचिष्वमित्याद्यूहेनपठित्वाविप्रैः प्रतिवचनंकार्यमितिसुदर्शनभाष्ये स्वादुषंसदइति ब्राह्मणासः पितरइतिचमंत्रद्वयंपठंति शौनकः ब्राह्मणानथनिर्यातान् ‍ परीत्यत्रिः प्रदक्षिणं सस्त्रीख स्वजनैः सार्धंप्रणमेद्रचितांजलिः कनिष्ठप्रथमाज्येष्ठचरमाः स्युः प्रदक्षिणे हेमाद्रौबृहस्पतिः अद्यमेसफलंजन्मभवत्पादाब्जवंदनात् ‍ अद्यमेवंशजाः सर्वेयातावोनुग्रहाद्दिवं पत्रशाकादिदानेनक्लेशितायूयमीदृशाः तत्क्लेशजातंचित्तात्तुविस्मृत्यक्षंतुमर्हथ प्रचेताः विसृजेद्भक्तिसंयुक्तः सीमांतंचाप्यनुव्रजेत् ‍ ।

आश्वलायन - " परेतन पितरः सोम्यासो० " या मंत्रानें त्या पिंडांचें प्रवाहण करावें . " मात्स्यांत - " वाजे वाजे० या मंत्राचा जप करीत कुशाग्रानें पितरांचें विसर्जन करावें . " प्रचेता - " स्वस्तिवाचन करुन पितरांचें पूर्वीं व देवांचें मागाहून विसर्जन करावें . " आश्वलायन - " अन्नाचा प्रकिर देऊन उपवतीनें ‘ ॐ स्वधा ’ किंवा ‘ अस्तुस्वधा ’ असें म्हणून विसर्जन करावें . " ब्रह्मवैवर्तांत - " आमावाज० ’ हा मंत्र म्हणून घराच्या द्वारांत प्रदक्षिणा करुन नंतर नियमित होऊन घरांत जावें . तदनंतर सत्यवादी अशा त्या ब्राह्मणांस हात जोडून आशीर्वाद मागावे , ते असे - ‘ दातारो नोभिवर्धंतां , अन्नंच नो बहुभवेत् ‍ ’ इत्यादि . तदनंतर ब्राह्मणांनीं समाधानपूर्वक ‘ एवमस्तु ’ असें त्याजप्रत बोलावें . " ही आशीर्वादप्रार्थना ब्राह्मणाचे पाद धुण्यासाठीं मंडल केलें असेल त्या ठिकाणीं करावी , असें हेमाद्रि सांगतो . मनु - " दातारो नोभिवर्धतां वेदाः संतति रेवच । श्रद्धा च नो माव्यगतम् ‍ बहुदेयं च नोस्तु " असें कर्त्यानें बोलावें . बौधायन - " अन्नं च नोबहुभवेदतिथींश्च लभेमहि । याचितारश्च नः संतु माच याचिष्म कंचन " असें कर्त्यानें बोलावें . येथें ब्राह्मणांनीं ‘ दातारोवोभिवर्धंतां ’ अशाप्रमाणें ‘ न ’ च्या ठिकाणीं ‘ व ’ शब्दाचा ऊह करुन तसाच ‘ लभेमहि ’ या ठिकाणीं ‘ लभध्वं ’ ‘ याचिष्म ’ या ठिकाणीं ‘ याचिढ्वं ’ असा ऊह करुन तींच वाक्यें म्हणून प्रतिवचन द्यावें , असें सुदर्शनभाष्यांत सांगितलेलें आहे . आणि ‘ स्वादुषंसदः० ’ ‘ ब्राह्मणासः पितरः० ’ हे दोन मंत्रही येथें पठण करितात . शौनक - " तदनंतर निघालेल्या ब्राह्मणांस स्त्री स्वजन यांसहवर्तमान त्रिवार प्रदक्षिणा करुन हात जोडून नमस्कार करावा . प्रदक्षिणा करणें ती कनिष्ठानें प्रथम व ज्येष्ठानें शेवटीं करावी . " हेमाद्रींत बृहस्पति - " - ‘ अद्य मे सफलं जन्म० ’ हे दोन श्लोक म्हणावे . " प्रचेता - " भक्तियुक्त होऊन ब्राह्मणाचें विसर्जन करावें आणि सीमेपर्यंत त्यांस पोंचवावयालाही जावें . "

आतां पिंडांची प्रतिपत्ति ( त्याग ) सांगतो -

अथपिंडप्रतिपत्तिः हेमाद्रौब्रह्मांडे पिंडमग्नौसदादद्याद्भोगार्थीप्रथमंनरः पत्न्यैप्रजार्थीदद्याद्वैमध्यमंमंत्रपूर्वकं उत्तमांगतिमन्विच्छन्गोषुनित्यंप्रयच्छति आज्ञांप्रज्ञांयशः कीर्तिमप्सुपिंडंप्रवेशयेत् ‍ प्रार्थयन्दीर्घमायुष्यंवायसेभ्यः प्रयच्छति आकाशंगमयेदप्सुस्थितोवादक्षिणामुखः आश्वलायनः वीरंमेदत्तपितरइतिपिंडानांमध्यमंपत्नींप्राशयेदाधत्तपितरोगर्भंकुमारंपुष्करस्रजं यथायमरपाअसदिति भर्त्रादत्तस्यआद्येनादायद्वितीयेनप्राशनं आपस्तंबस्तुदानेमंत्रमाह अपांत्वोषधीनांरसंप्राशयामिभूतकृतंगर्भंधत्स्वेतिमध्यमंपत्न्यैप्रयच्छतीति प्राशनेपि यथेहपुरुषोअसदितितद्दितीयः पाठः अन्येषांतत्तच्छाखायांज्ञेयः तत्रैवशंखः पत्नीवामध्यमंपिंडमश्नीयादार्तवान्विता कलिकायांछागलेयः प्राचीनावीतिनामंत्र्यपत्नीः पिंडोविभज्यते प्रतिपत्न्यस्यमंत्रस्यकर्तव्यावृत्तिरत्रतु माधवीयेविष्णुधर्मे तीर्थश्राद्धेसदापिंडान्क्षिपेत्तीर्थसमाहितः याज्ञवल्क्यः पिंडांस्तुगोजविप्रेभ्योदद्यादग्नौजलेपिवा बृहस्पतिः अन्यदेशगतापत्नीरोगिणीगर्भिणीतथा तदातंजीर्णवृषभश्छागोवाभोक्तुमर्हति ।

हेमाद्रींत ब्रह्मांडपुराणांत - " भोगाची इच्छा करणारानें पहिला पिंड अग्नीच्या ठिकाणीं सदा द्यावा . प्रजेची इच्छा करणारानें मध्यम पिंड मंत्रपूर्वक पत्नीला खाण्यासाठीं द्यावा . उत्तम गतीची इच्छा करणारानें गाईला खाण्यासाठीं पिंड द्यावा . आज्ञा चालावी , प्रज्ञा ( बुद्धि ) वाढावी , यश व कीर्ति व्हावी अशी इच्छा असेल त्यानें उदकांत पिंड सोडावा . दीर्घ आयुष्याची इच्छा करणारानें वायसांना पिंड द्यावा . अथवा उदकांत दक्षिणेकडे मुख करुन उभा राहून पिंड आकाशांत टाकावा . " आश्वलायन - " वीरं मे दत्त पितरः ’ या मंत्रानें तीन पिंडांतील मध्यम पिंड पत्नीला भक्षणासाठीं द्यावा . भर्त्यानें दिलेला पिंड पत्नीनें ग्रहण करुन ‘ आधत्त पितरो गर्भं कुमारं पुष्करस्त्रजं । यथायमरपा असत् ‍ ’ या मंत्रानें प्राशन करावा . " आपस्तंब तर पिंडदानाविषयीं मंत्र सांगतो , तो असा - " - ‘ अपांत्वोषधीनां रसं प्राशयामि भूतकृतं गर्भं धत्स्व ’ या मंत्रानें मध्यमपिंड पत्नीला द्यावा . प्राशनाविषयीं मंत्र सांगतो , तो पूर्वोक्तच ‘ आधत्त पितरो० ’ हा समजावा . त्या मंत्रांत ‘ यथायमरपा असत् ‍ ’ या ठिकाणीं ‘ यथेह पुरुषो असत् ‍ ’ असा आपस्तंबाचा पाठ आहे . इतरांस त्यांच्या त्यांच्या शाखेंत मंत्र जाणावा . तेथेंच शंख - " ऋतुमती स्त्रियेनें मध्यम पिंड भक्षण करावा . " कलिकेंत छागलेय - " अनेक पत्नी असतील त्यानें प्राचीनावीती करुन पत्नींना बोलावून पिंडाचा विभाग करुन प्रत्येक पत्नीला पिंडविभाग द्यावा . आणि ह्या पूर्वोक्त मंत्राची प्रत्येक पत्नीविषयीं वेगवेगळी आवृत्ति करावी . " माधवीयांत विष्णुधर्मांत - " तीर्थश्राद्धाचे ठायीं सर्वदा तीर्थांत पिंड टाकावे . " याज्ञवल्क्य - " गाई , बकरे , ब्राह्मण यांस पिंड द्यावे , अथवा अग्नींत किंवा उदकांत टाकावे . " बृहस्पति - " पत्नी अन्यदेशीं असेल किंवा रोगिणी अथवा गर्भिणी असेल तेव्हां तो पत्नीचा पिंड म्हातारा वृषभ किंवा बोकड यानें भक्षण करावा . "

आतां पिंडाच्या उपघाता ( नाशा ) विषयीं सांगतो -

अथपिंडोपघातेहेमाद्रौप्रायश्चित्तकांडेदेवलः श्वसृगालखरैः पिंडः स्पृष्टोभिन्नः प्रमादतः कर्तुरायुष्यनाशः स्यात्प्रेतस्तंनोपसर्पति जातूकर्ण्यः पूर्वश्लोकांते तद्दोषपरिहारार्थंप्राजापत्यंप्रकल्पयेत् ‍ पुनः स्नात्वातदाकर्तापिंडंकुर्याद्यथाविधि काकस्पर्शेतुनदोषः पिंडोपघातंप्रक्रम्य धनस्यचविनाशः स्यात्काकस्पर्शादिकंविनेति तत्रैवश्लोकेगौतमोक्तेः स्मृतिदर्पणेऽत्रिः मार्जारमूषकस्पर्शेपिंडेचद्विदलीकृते पुनः पिंडाः प्रदातव्यास्तेनपाकेनतत्क्षणात् ‍ बौधायनः श्वचांडालादिभिः स्पृष्टः पिंडोयद्युपहन्यते प्राजापत्यंचरित्वाथपुनः पिंडंसमाचरेत् ‍ बोपदेवोप्येवमाह अथदिनांतरेतुप्राजापत्यमात्रं शेषप्रतिपत्तित्वेनपिंडावृत्तोमानाभावादितिमैथिलाः तन्न सपिंडीकरणादौशेषनाशेसंयोजनादिलोपापत्तेः तेनवचनाद्वमनेइवात्रापितन्मात्रपिंडदानावृत्तिः अतएव नचनक्तंश्राद्धंकुर्वीतारब्धेवाभोजनसमापनादित्यापस्तंबसूत्रम् ‍ रात्रौभोजनमात्रंपूर्वेद्युः कार्यं श्राद्धसमाप्तिस्तुपरदिनेएव समाप्तिपर्यंतंकर्तुरुपवासश्चेतिहरदत्तेनव्याख्यातं तस्मात् ‍ पाकांतरेणपिंडदानमात्रंकार्यं ।

हेमाद्रींत प्रायश्चित्तकांडांत देवल - " कुत्रा , कोल्हा , गर्दभ यांनीं पिंडाला स्पर्श केला ; किंवा प्रमादानें पिंड फुटला तर कर्त्याच्या आयुष्याचा नाश होतो , आणि प्रेत त्या पिंडाजवळ ग्रहण करण्यास जात नाहीं . " जातूकर्ण्य - पूर्व श्लोकाच्या पुढें सांगतो - " त्या दोषाच्या परिहारासाठीं कर्त्यानें प्राजापत्य कृच्छ्र करावें . पिंडोपघात होईल त्या वेळीं कर्त्यानें स्नान करुन पुनः यथाविधि पिंड करावे . " काकस्पर्श झाला असेल तर दोष नाहीं . कारण पिंडोपघाताचा उपक्रम करुन " काकस्पर्शादिकावांचून पिंडोपघात झाला असेल तर द्रव्याचा विनाश होईल " असें त्याच श्लोकावर गौतमवचन आहे . स्मृतिदर्पणांत अत्रि - " मार्जार , उंदीर यांचा पिंडास स्पर्श झाला किंवा पिंड फुटला तर तत्क्षणीं त्या पाकानें पुनः पिंड करुन द्यावे . " बौधायन - " कुत्रा , चांडाल यांचा पिंडाला स्पर्श झाला किंवा पिंडाचा उपघात झाला तर प्राजापत्य कृच्छ्र आचरण करुन पुनः पिंड करावे . " बोपदेवही असेंच सांगतो . आतां दुसर्‍या दिवशीं प्राजापत्य कृच्छ्र मात्र करावें , पुनः पिंड करुं नये ; कारण , पिंडत्याग हा शेषाचें प्रतिपत्तिरुप कर्म असल्यामुळें त्याचा उपघात झाला तरी पुनः पिंडांची आवृत्ति करण्याविषयीं प्रमाण नाहीं , असें मैथिल सांगतात . तें बरोबर नाहीं . कारण , सपिंडीकरणादिकांचे ठायीं शेषनाश झाला असतां संयोजनादिकांचा लोप प्राप्त होईल . त्या कारणानें पुनः पिंड करण्याविषयीं वचन असल्यामुळें , वमन झालें असतां जशी भोजनाची आवृत्ति , तशी येथेंही तितक्याच पिंडदानधर्माची आवृत्ति समजावी . म्हणूनच " रात्रीं श्राद्ध करुं नये , रात्रीं श्राद्धाला आरंभ केला तर ब्राह्मणभोजनसमाप्तीपर्यंत करावें " असें आपस्तंबसूत्र आहे , त्याची व्याख्या - ‘ रात्रौ ब्राह्मणभोजन मात्र पूर्वदिवशीं करावें , श्राद्धसमाप्ति तर दुसर्‍या दिवशींच करावी , समाप्तीपर्यंत कर्त्यानें उपवास करावा , ’ अशी हरदत्तानें केली आहे . तस्मात् ‍ दुसर्‍या पाकानें पिंडदान मात्र करावें .

आतां पिंडांना निषिद्धकाल सांगतो -

अथपिंडनिषिद्धकालः सचप्रायेणमहालयादिनिर्णयेपूर्वमुक्तः हेमाद्रौबृहत्पराशरः युगादिषुमघायांचविषुवत्ययनेतथा भरणीषुचकुर्वीतपिंडनिर्वपणंनहि स्मृतिरत्नावल्यां पुत्रेजातेव्यतीपातेग्रहणेचंद्रसूर्ययोः श्राद्धंकुर्यात्प्रयत्नेनपिंडनिर्वपणादृते तत्रैवकात्यायनः वृद्धेरनंतरंचैवयावन्मासः समाप्यते तावत् ‍ पिंडान्नैवदद्यान्नकुर्यात्तिलतर्पणं बौधायनः संस्कारेषुतथान्येषुमासंमासार्धमेवच तथा भानौभौमेत्रयोदश्यांनंदाभृगुमघासुच पिंडदानंमृदास्नानंनकुर्यात्तिलतर्पणं त्रिस्थलीसेतौकार्ष्णाजिनिः विवाहव्रतचूडासुवर्षमर्धंतदर्धकं उत्तरार्धंप्राग्वत् ‍ वृद्धिमात्रेतथान्यत्रपिंडदाननिराक्रिया कृतागर्गादिभिर्मुख्यैर्मासमेकंतुकर्मणां हेमाद्रौज्योतिः पराशरः विवाहेविहितेमासांस्त्यजेयुर्द्वादशैवहि सपिंडाः पिंडनिर्वापंमौंजीबंधेषडेवहि तत्रैव महालयेगयाश्राद्धेमातापित्रोः क्षयेहनि यस्यकस्यापिमर्त्यस्यसपिंडीकरणेतथा कृतोद्वाहोपिकुर्वीतपिंडनिर्वपणंसदेति मातापित्रोरितिक्षयाहविशेषणं हविरुभयत्ववदविवक्षितं तेनभ्रातृपितृव्यादिवार्षिकेपिपिंडदानंकार्यमितिकेचित् ‍ सपिंडीकरणंनवश्राद्धषोडशश्राद्धोपलक्षणार्थमितिनिर्णयामृतेउक्तं ।

तो निषिद्धकाल पूर्वीं महालयादिनिर्णयप्रसंगीं बहुतेक सांगितला आहे . हेमाद्रींत बृहत्पराशर - " युगादिश्राद्धें , मघाश्राद्ध , विषुवायनश्राद्ध , अयनश्राद्ध , आणि भरणीश्राद्ध ( हीं श्राद्धें द्वितीयपरिच्छेदांत उक्त आहेत ) यांचे ठायीं पिंडदान करुं नये . " स्मृतिरत्नावलींत - " पुत्र झाला असतां , व्यतीपात आणि चंद्र व सूर्यग्रहण इतक्या ठिकाणीं पिंडदानावांचून श्राद्ध करावें . " तेथेंच कात्यायन - " वृद्धिकर्म झाल्यानंतर , जोंपर्यंत महिना समाप्त होई तोंपर्यंत पिंड देऊं नये , व तिलतर्पण करुं नये . " बौधायन - " संस्कारांचे ठायीं वृद्धिश्राद्ध असतां एकमहिना व इतर ठिकाणीं अर्धामहिनापर्यंत पिंडदान व तिलतर्पण करुं नये . तसेंच " रविवार , मंगळवार , त्रयोदशी , नंदातिथि ( १।६।११ ), भृगुवार , मघानक्षत्र , यांचे ठायीं पिंडदान मृत्तिकास्नान आणि तिलतर्पण हीं करुं नयेत . " त्रिस्थलीसेतूंत कार्ष्णाजिनि - " विवाह , उपनयन , चूडाकर्म , यांचे ठायीं अनुक्रमें एक वर्ष , सहा महिने , तीन महिनेपर्यंत पिंडदान , मृत्तिकास्नान आणि तिलतर्पण करुं नयेत . इतर ठिकाणीं कर्मसंबंधी वृद्धिश्राद्ध असतां एक महिनापर्यंत पिंडदानाचा निषेध गर्गादिक ऋषींनीं केला आहे . " हेमाद्रींत ज्योतिः पराशर - " विवाह झाला असतां सपिंड पुरुषांनीं बारा महिने पिंडदान वर्ज्य करावें आणि मौंजीबंधन झालें असतां सहा महिने पिंडदान वर्ज्य करावें . " तेथेंच - विवाह केला असला तरी महालय , गयाश्राद्ध , मातापितरांचा क्षयदिवस ( सांवत्सरिकश्राद्ध ) आणि कोणत्याही मनुष्याचें सपिंडीकरण इतक्या ठिकाणीं पिंडदान सर्वदा करावें . " वरील अर्थांत ‘ क्षयदिवस ’ या पदाला ‘ मातापितरांचा ’ असें विशेषन दिलेलें आहे तें अविवक्षित ( अनावश्यक ) आहे , जसें - ‘ हवीला ’ ‘ उभय ’ हें विशेषण अविवक्षित आहे तद्वत् ‍. तेणेंकरुन ( क्षयदिवसाला ‘ मातापितरांचा ’ असें विशेषण नसल्यामुळें ) भ्राता , पितृव्य इत्यादिकांच्या वार्षिकांतही पिंडदान करावें , असें केचित् ‍ म्हणतात . वरील वचनांतील ‘ सपिंडीकरण ’ या पदानें उपलक्षणेंकरुन दशाहांतील नवश्राद्धें आणि षोडशश्राद्धें घ्यावीं , असें निर्णयामृतांत सांगितलें आहे .

क्षयाहेविशेषः संग्रहे मातापित्रोराब्दिकेतुविवाहादिषुसर्वदा तिलैः पिंडाः प्रदातव्याअन्यश्राद्धेविवर्जयेत् ‍ अत्रमूलंचिंत्यम् ‍ रामकौतुके नंदाश्वकामरव्यारभृग्वग्निपितृकालभे गंडेवैधृतिपातेचपिंडास्त्याज्याः सुतेप्सुभिः विश्वरुपनिबंधे तिथिवारप्रयुक्तोयोदोषोवैसमुदाह्रतः सश्राद्धेतन्निमित्तेस्यान्नान्यश्राद्धेकदाचन अन्यत्तूक्तंप्राक् ‍ उच्छिष्टोद्वासनमाहहेमाद्रौवसिष्ठः श्राद्धेनोद्वासनीयानिउच्छिष्टान्यादिनक्षयात् ‍ श्च्योतंतैवैसुधाधारास्ताः पिबंत्यकृतोदकाः व्यासः उच्छिष्टंनप्रमृज्यात्तुयावन्नास्तमितोरविः इदंगृहांतरसत्त्वे एकगृहेतु मनुः उच्छेषणंतुतत्तिष्ठेद्यावद्विप्राविसर्जिताः ततोगृहबलिंकुर्यादितिधर्मोव्यवस्थितः बलिंवैश्वदेवादिनित्यकर्मेति मेधातिथिः ब्रह्मांडे शूद्रायचानुपेतायश्राद्धोच्छिष्टंनदापयेत् ‍ तथा कामंदद्याच्चसर्वंतुशिष्यायचसुतायच भोक्तुरितिशेषः जातूकर्ण्यः द्विजभुक्तावशिष्टंतुशुचिभूमौनिखानयेत् ‍ ।

क्षयाहाविषयीं विशेष सांगतो संग्रहांत - " विवाहादिक मंगलांमध्यें मातापित्यांचें आब्दिक प्राप्त असतां सर्वदा तिलांनीं पिंड द्यावे , इतरांच्या श्राद्धांत वर्ज्य करावे . " या वचनाविषयीं मूल चिंत्य ( अनुपलब्ध ) आहे . रामकौतुकांत - " नंदा ( १।६।११ ), सप्तमी , त्रयोदशी , रविवार , भौमवार , भृगुवार , कृत्तिका , मघा , भरणी , गंडयोग , वैधृति , व्यतीपात इतक्या ठिकाणीं पुत्रेच्छु पुरुषांनीं पिंड वर्ज्य करावे . " विश्वरुपनिबंधांत - " तिथिवार प्रयुक्त जो पिंडदानाविषयीं दोष ( निषेध ) सांगितला तो दोष तिथि - वारनिमित्तक श्राद्धाचे ठायीं समजावा . इतर श्राद्धाचे ठायीं तो दोष नाहीं . " इतर जें कांहीं सांगावयाचें तें पूर्वीं सांगितलें आहे . उच्छिष्टांचें उद्वासन ( काढणें ) सांगतो हेमाद्रींत वसिष्ठ - दिवस आहे तोंपर्यंत श्राद्धाचीं उच्छिष्टें ( उष्टीं ) काढूं नयेत ; कारण , त्या उच्छिष्टांपासून अमृतधारा गळत असतात , ज्या प्रेतांना उदक दिलेलें नसतें ते प्रेत त्या अमृतधारा प्राशन करितात . " व्यास - " जोंपर्यंत सूर्याचें अस्त झालें नाहीं तोंपर्यंत उच्छिष्ट काढूं नये . " सूर्यास्तपर्यंत उच्छिष्ट न काढणें हें इतर गृह असतां समजावें . एकगृह असेल तर मनु सांगतो - " जोंपर्यंत ब्राह्मणांचें विसर्जन करीत आहे तोंपर्यंत उच्छिष्ट राहतें ; ब्राह्मणांचें विसर्जन केल्यावर उच्छिष्ट काढून गृहसंबंधी बलि ( वैश्वदेवादि ) करावा , असा धर्म व्यवस्थित आहे . " वचनांत ‘ बलिं ’ याचा अर्थ - वैश्वदेवादि नित्यकर्म , असा मेधातिथि सांगतो . ब्रह्मांडपुराणांत - " श्राद्धसंबंधी उच्छिष्ट शूद्राला व मुंज न झालेल्याला कोणाला - देतील तर - देऊं नये . तसेंच - श्राद्धभोक्त्यांच्या मुंज न झालेल्या शिष्याला व पुत्राला सर्व यथेच्छ द्यावें . " जातूकर्ण्य - " ब्राह्मणांनीं भोजन करुन अवशिष्ट राहिलेलें उच्छिष्ट शुद्ध भूमींत पुरुन टाकावें . "

आतां वैश्वदेवादि सांगतो -

अथवैश्वदेवादि अत्रमामकः श्लोकः श्राद्धेनग्निककर्तृकेग्निकरणात्पश्चाज्जुहोतिर्बलिस्त्वंतेस्यादथ वाभवेद्विकिरतः पश्चात्पृथक्त्वेपचेः श्राद्धांतेत्वथवामहालयविधावूर्ध्वंभुजेः स्यात्क्षयेत्वंतेमासुचमध्यतः शुभविधावादौतथासाग्निके अस्यार्थः साग्नेः पृथक् ‍ पाकेनसर्वत्रादौवैश्वदेवः पक्षांतंकर्मनिर्वर्त्यवैश्वदेवंचसाग्निकः पिंडयज्ञंततः कुर्यात्ततोन्वाहार्यकंबुधः पित्रर्थंनिर्वपेत्पाकंवैश्वदेवार्थमेवच वैश्वदेवंनपित्रर्थंनदार्शंवैश्वदेविकमिति लौगाक्षिस्मृतेः अत्रसाग्निकआहिताग्निरितिहेमाद्रिः श्राद्धात्प्रागेवकुर्वीतवैश्वदेवंतुसाग्निकः एकादशाहिकंमुक्त्वातत्रह्यंतेविधीयतेइतिहेमाद्रौशालंकायनोक्तेश्च तत्रैवपरिशिष्टे संप्राप्तेपार्वणश्राद्धेएकोद्दिष्टेतथैवच अग्रतोवैश्वदेवः स्यात्पश्चादेकादशेहनि स्मार्ताग्निमतांतद्रहितानांवाग्नौकरणोत्तरंविकिरोत्तरंवाहो ममात्रंपृथक् ‍ पाकेन भूतयज्ञादितुश्राद्धांतएव अत्रमूलंहेमाद्रिचंद्रिकादौस्पष्टं सर्वेषांश्राद्धांतेवातत्पाकेनवैश्वदेवनित्यश्राद्धादीतितृतीयः श्राद्धंनिर्वर्त्यविधिवद्वैश्वदेवादिकंततः कुर्याद्भिक्षांततोदद्याद्धंतकारादिकंतथेति पैठीनसिस्मृतेः ततः श्राद्धशेषात् ‍ श्राद्धाह्निश्राद्धशेषेणवैश्वदेवंसमाचरेदितिचतुर्विंशतिमताच्च एवं वैश्वदेवकालत्रयस्यआशार्केशांखायनपरिशिष्टमुदाह्रत्यैवंव्यवस्थोक्ता आदौवृद्धौक्षयेचांतेदर्शेमध्येमहालये एकोद्दिष्टेनिवृत्तेतुवैश्वदेवोविधीयतइति बहुस्मृत्युक्तत्वात्सर्वेषांश्राद्धांतेएवेतिमेधातिथिस्मृतिरत्नावल्यादयोबहवः ।

येथें मी ( कमलाकरभट्टानें ) केलेला श्लोक - " श्राद्धाचे दिवशीं अनग्निकानें ( स्मार्ताग्निमान् ‍ व अग्निरहित यानें ) अग्नौकरणोत्तर पृथक् ‍ पाकानें वैश्वदेवाचा होम मात्र करावा , अथवा विकिरदानोत्तर वैश्वदेवहोममात्र करावा आणि भूतयज्ञादिक श्राद्धांतीं करावें . किंवा सर्वांनीं श्राद्धांतीं श्राद्धपाकानें वैश्वदेव , नित्यश्राद्ध इत्यादि करावें . महालयांत ब्राह्मणभोजनोत्तर करावा , वार्षिकश्राद्धांत अंतीं , दर्शश्राद्धांत मध्यें , वृद्धिश्राद्धांत आधीं व साग्निकानें आधीं वैश्वदेव करावा . " याचा स्पष्ट अर्थ - साग्निकानें वेगळ्या पाकानें सर्वत्र ठिकाणीं श्राद्धाचे आधीं वैश्वदेव करावा . कारण " साग्निकानें अन्वाधान व वैश्वदेव करुन नंतर पिंडपितृयज्ञ करुन नंतर दर्शश्राद्ध करावें . पितरांसाठीं निराळा पाक करावा व वैश्वदेवासाठीं निराळा करावा . वैश्वदेवाच्या पाकानें पितरांचें श्राद्ध करुं नये व पितरांच्या पाकानें वैश्वदेव करुं नये " अशी लौगाक्षिस्मृति आहे . येथें साग्निक म्हणजे अग्नीचें आधान केलेला होय , असें हेमाद्रि सांगतो . आणि " साग्निकानें श्राद्धाच्या पूर्वींच वैश्वदेव करावा . अकराव्या दिवशीं करावयाचें जें एकोद्दिष्ट तें सोडून हा नियम समजावा ; कारण , त्या एकोद्दिष्टांत अंतीं वैश्वदेव सांगितला आहे " अशी हेमाद्रींत शालंकायनाची उक्तिही आहे . तेथेंच परिशिष्टांत - " पार्वणश्राद्ध , तसेंच एकोद्दिष्ट प्राप्त असतां पूर्वीं वैश्वदेव करावा आणि अकराव्या दिवशीं करावयाच्या श्राद्धांत अंतीं वैश्वदेव करावा . " स्मार्ताग्निमानांनीं व तद्रहितांनीं अग्नौकरणोत्तर किंवा विकिरोत्तर वैश्वदेवहोममात्र वेगळ्या पाकानें करावा . भूतयज्ञादिक तर श्राद्धांतींच करावे . याचें मूळ हेमाद्रि , चंद्रिका इत्यादि ग्रंथांत स्पष्ट आहे . अथवा सर्वांनीं श्राद्धांतीं श्राद्धपाकानें वैश्वदेव , नित्यश्राद्ध इत्यादि करावें . हा तिसरा पक्ष होय . कारण , " यथाविधि श्राद्ध करुन त्या श्राद्धशेष अन्नानें वैश्वदेव करावा , तदनंतर माधुकरी यांना भिक्षा द्यावी आणि हंतकारादिक करावा . " असें पैठनसिस्मृतिवचन आहे . आणि " श्राद्धदिवशीं श्राद्धशेषानें वैश्वदेव करावा " असें चतुर्विंशतिस्मृतिवचनही आहे . याप्रमाणें वैश्वदेवाचे तीन काल सांगितले त्यांची व्यवस्था आशार्क ग्रंथांत शांखायनपरिषिष्ट घेऊन केली आहे , ती अशी - " वृद्धिश्राद्धांत आधीं , सांवत्सरिकांत अंतीं , दर्शांत व महालयांत मध्यें आणि एकोद्दिष्टांत अंतीं वैश्वदेव सांगितला आहे . " बहुत स्मृतींनीं अंतीं सांगितल्यामुळें सर्वांनीं श्राद्धांतींच वैश्वदेव करावा , असें मेधातिथि , स्मृतिरत्नावली इत्यादिक बहुत ग्रंथकार सांगतात .

बोपदेवस्तुवृत्तिकारेणविसर्जनांतंश्राद्धमुक्त्वाउच्छेषणंत्वितिपूर्वोक्तमनुवाक्योदाहरणाद्बह्वृचानांश्राद्धांतएव मध्यपक्षस्त्वन्यशाखापरइत्याह हेमाद्रिस्तुवृद्धावप्यंतेएववैश्वदेवमाह कातीयानांतुश्रौतस्मार्ताग्निमतामादावेकेनैवपाकेनेतिकर्कः अन्येषामंते तैत्तिरीयाणांतुसाग्निकानांसर्वत्रादौवैश्वदेवः पंचयज्ञाश्चअंतेवेतिसुदर्शनभाष्येउक्तं अस्यपक्षद्वयस्यपूर्ववव्द्यवस्था हेमाद्रौमार्कंडेयः ततोनित्यक्रियांकुर्याद्भोजयेच्चततोतिथीन् ‍ ततस्तदन्नंभुंजीतसहभृत्यादिभिर्नरः ततः श्राद्धशेषात् ‍ नित्यक्रियांनित्यश्राद्धं तत्रपृथक् ‍ पाकेननैत्यकमिति तेनैवोक्तेः पाकैक्येविकल्पः ।

बोपदेव तर वृत्तिकारानें विसर्जनांत श्राद्ध सांगून ‘ उच्छेषणं तु तत्तिष्ठेत् ‍ ० ’ हें पूर्वीं उच्छिष्टप्रकरणीं सांगितलेलें मनुवचन सांगितल्यावरुन बह्वृचांना श्राद्धांतींच वैश्वदेव उक्त आहे , असें होतें . श्राद्धामध्यें वैश्वदेव करावा हा पक्ष इतरशाखाविषयक आहे , असें ( बोपदेव ) सांगतो . हेमाद्रि तर वृद्धिश्राद्धांत देखील अंतींच वैश्वदेव सांगतो . श्रौताग्निमान् ‍ व स्मार्ताग्निमान् ‍ अशा कातीयांनीं तर श्राद्धाच्या पूर्वीं एकाच पाकानें वैश्वदेव करावा , असें कर्क सांगतो . इतरांनीं ( निरग्निकांनीं ) अंतीं करावा . तैत्तिरियांनीं तर साग्निकांनीं सर्वत्र ठिकाणीं श्राद्धाच्या आधीं वैश्वदेव आणि पंचमहायज्ञ करावे , अथवा अंतीं करावे असें सुदर्शनभाष्यांत सांगितलें आहे . ह्या दोन पक्षांची पूर्वींप्रमाणें व्यवस्था समजावी . हेमाद्रींत मार्केंडेय - " त्या श्राद्धशेषानें नित्यश्राद्ध करावें , आणि अतिथींना भोजन घालावें . तदनंतर त्या श्राद्धशेषान्नाचें भृत्यादिकांसहवर्तमान भोजन करावें . " येथें ‘ पृथक् ‍ पाकानें नित्यश्राद्ध करावें ’ असें त्यानेंच ( मार्कंडेयानेंच ) सांगितलें आहे म्हणून एकपाकाविषयीं विकल्प सिद्ध होतो .

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP