आतां प्रथम वर्षीं निषिद्ध सांगतो -
अथप्रथमाब्देनिषिद्धानि हेमाद्रौ स्नानंचैवमहादानंस्वाध्यायंचाग्नितर्पणम् प्रथमेब्देनकुर्वीतमहागुरुनिपातने अग्नितर्पणंलक्षहोमादि नत्वाधानम् तत्तु प्रथमाब्देभवत्येव तदाहहेमाद्रावुशनाः पितुः सपिंडीकरणंवार्षिकेमृतिवासरे आधानाद्युपसंप्राप्तावेतत्प्रागपिवत्सरात् अन्यतर्पणमितिशुद्धितत्त्वेपाठः आदिपदंवृद्धिनिमित्तनित्यकर्मपरं दिवोदासीये महातीर्थस्यगमनमुपवासव्रतानिच संवत्सरंनकुर्वीतमहागुरुनिपातने इदंश्राद्धकौमुद्यांदेवीपुराणस्थमुक्तं गौडनिबंधेमात्स्ये सपिंडीकरणादूर्ध्वंप्रेतः पार्वणभुग्भवेत् वृद्धीष्टापूर्तयोग्यश्चगृहस्थश्चसदाभवेत् वर्षांतसपिंडनाभावेनाधिकारीत्यर्थः गृहस्थः सपिंडोपीत्यर्थः अतएव प्रेतकर्माण्यनिर्वर्त्यचरेन्नाभ्युदयक्रियां आचतुर्थंततः पुंसिपंचमेशुभदंभवेदितिज्योतिषेउक्तं माधवीये देवलः प्रमीतौपितरौयस्यदेहस्तस्याशुचिर्भवेत् नदैवंनापिवापित्र्यंयावत्पूर्णोनवत्सरः इदंवर्षांतसपिंडनपरं तथैवकाम्यंयत्कर्मवत्सरात्प्रथमादृतइतिलघुहारीताद्येकवाक्यत्वात् वृद्धिनिमित्तापकर्षेतुकाम्यादिभवेत्यवेतिगौडाः पित्र्यंसपिंडनम् अतएवलौगाक्षिः अन्येषांप्रेतकार्याणिमहागुरुनिपातने कुर्यात्संवत्सरादर्वाक् श्राद्धमेकंतुवर्जयेत् दाहाद्येकादशाहांतंकार्यं तत्राशौचांतरस्याप्रतिबंधकत्वात् आद्यंश्राद्धमशुद्धोपिकुर्यादेकादशेहनीत्युक्तेश्च एकंसपिंडनं ।
हेमाद्रींत - " महागुरु ( पिता ) मृत असतां स्नान ( समावर्तन ), महादान , वेदाध्ययन , आणि अग्नितर्पण हीं प्रथमवर्षीं करुं नयेत . " या वचनांत अग्नितर्पण म्हणजे लक्षहोमादिक समजावें . आधान समजूं नये . तें आधान तर प्रथमवर्षीं होतच आहे . तें सांगतो हेमाद्रींत उशना - " पित्याचें सपिंडीकरण वर्षाच्या मृतदिवशीं करावें . आधानादिक प्राप्त असतां वर्षाच्या आंत देखील हें सपिंडीकरण होतें . " वरील वचनांत ‘ अग्नितर्पण ’ या ठिकाणीं ‘ अन्यतर्पणं ’ असा शुद्धितत्त्वांत पाठ आहे . त्याच्या अर्थ - इतरांचें तर्पण , असा आहे . वरील उशनाचे वचनांत ‘ आधानादि ’ या ‘ आदि ’ पदानें वृद्धिश्राद्धाला निमित्त जें नित्य कर्म तें घ्यावें . दिवोदासीयांत - " महागुरु ( पिता ) मृत असतां महातीर्थाची यात्रा , उपवासव्रतें हीं संवत्सरपर्यंत करुं नयेत . " हें वचन श्राद्धकौमुदींत देवीपुराणांतील म्हणून सांगितलें आहे . गौडनिबंधांत मात्स्यांत - " सपिंडीकरणानंतर प्रेत पार्वणभागी होतो . नंतर गृहस्थ वृद्धिकर्म , यज्ञादिकर्म , वापीकूपादिकर्म यांविषयीं योग्य होतो . " वर्षांतीं सपिंडन केलें नसेल तर ह्या वृद्ध्यादि कर्मांविषयीं अधिकारी नाहीं , असा अर्थ समजावा . गृहस्थ म्हणजे सपिंडही समजावा . पुत्रच समजूं नये . म्हणूनच " प्रेतकर्मै केल्यावांचून चार पुरुषांचे आंत आभ्युदयिक ( वृद्धिनिमित्तक ) क्रिया करुं नये . पांचव्या पुरुषाला कल्याणकारक होईल . म्हणजे हा निषेध नाहीं . " असें ज्योतिषग्रंथांत सांगितलें आहे . माधवीयांत देवल - " ज्याचे माता पिता मृत असतील त्याचा देह अशुचि होतो , म्हणून जोंपर्यंत संवत्सर पूर्ण झाला नाहीं तोंपर्यंत दैवकर्म किंवा पित्र्यकर्म त्यानें करुं नये . " हें वचन वर्षांतीं सपिंडनपक्षाविषयीं आहे . वर्षाचे आंत सपिंडन केलें असेल तर हा निषेध नाहीं . कारण , " वृद्धिश्राद्धानंतर प्रथम वर्षामध्येंही काम्य करावें , वृद्धि नसेल तर काम्य कर्म प्रथम वर्षानंतरच करावें " ह्या पूर्वीं सांगितलेल्या लघुहारीतादिवचनांशीं एकवाक्यता ( एकसंबंध ) होत आहे . वृद्धिनिमित्तानें सपिंडनाचा अपकर्ष असेल तर काम्यादिक कर्मै प्रथम वर्षांत होतच आहेत , असें गौड सांगतात . वरील देवलवचनांत ‘ पित्र्यकर्म ’ म्हणजे सपिंडन समजावें . म्हणूनच लौगाक्षि - " पिता मृत असतां संवत्सराचे आंत इतरांचीं प्रेतकार्यै ( दाहादि एकादशाहांत कर्मै ) करावीं , एक सपिंडनश्राद्ध मात्र वर्ज्य करावें . " दाहादिक एकादशाहांत करावीं . कारण , त्यांविषयीं इतर आशौचाचा प्रतिबंध नाहीं . आणि ‘ आद्यश्राद्ध अशुद्ध असला तरी अकराव्या दिवशीं करावें " असेंही पूर्वीं सांगितलें आहे .
पत्न्यादौत्वपवादमाहमाधवीयेऋष्यश्रृंगः पत्न्याः पुत्रस्यतत्पुत्रभ्रात्रोस्तत्तनयेषुच स्नुषास्वस्रोश्च पित्रोश्चसंघातमरणंयदि अर्वागब्दान्मातृपितृपूर्वंसापिंड्यमाचरेत् लौगाक्षिः पत्नीपुत्रस्तथापौत्रोभ्रातातत्पुत्रकाअपि पितरौचयदैकस्मिन् म्रियेरन्वासरेतदा आद्यमेकादशेकुर्यात्र्त्रिपक्षेतुसपिंडनं धवलनिबंधे महागुरुनिपातेतुप्रेतकार्यंयथाविधि कुर्यात्संवत्सरादर्वागेकोद्दिष्टंनपार्वणं भृगुः माताचैवतथाभ्राताभार्यापुत्रस्तथास्नुषा एषांमृतौचरेच्छ्राद्धमन्यस्यनपुनः पितुः एतदपिसपिंडनपरम् पितुर्मृतावन्यस्यश्राद्धंनाचरेदित्यर्थः शुद्धितत्त्वेदेवलः अन्यश्राद्धंपरान्नंचगंधमाल्यंचमैथुनं वर्जयेद्गुरुपातेतुयावत्पूर्णोनवत्सरः पारस्करभाष्येबृहस्पतिः पितर्युपरतेपुत्रोमातुः श्राद्धान्निवर्तते मातर्यपिचवृत्तायांपितृश्राद्धादृतेसमं समं पितरंविनान्यश्राद्धंनेत्यर्थः शुद्धितत्त्वेदेवलः महागुरुनिपातेतुकाम्यंकिंचिन्नचाचरेत् आर्त्विज्यंब्रह्मचर्यंचश्राद्धंदेवक्रियांतथा एतत्सपिंडनात्प्रागितिकेचित् तदुत्तरमपीत्यन्ये श्राद्धकौमुद्यांकालिकापुराणेपूर्वार्धे विशेषतः शिवपूजांप्रमीतपितृकोनरः यावद्वत्सरपर्यंतंमनसापिनचाचरेत् केचित्तु पित्रोरब्दमशौचंस्यात्षण्मासंमातुरेवच त्रैमासिकंतुभार्यायास्तदर्धंभ्रातृपुत्रयोरितिस्मृतेः सापत्नमातुरब्दार्धमाहुः श्राद्धकौमुदीकारस्तु द्वयोरेवमहागुर्वोरब्दमेकमशौचकं नान्येषामधिकाशौचंस्वजातिविहितात्किलेतिसमूलजातूकर्ण्यविरोधान्निर्मूलमाह ।
पत्नी इत्यादिकांच्या सपिंडनाविषयीं अपवाद सांगतो माधवीयांत ऋष्यश्रृंग - " पत्नी , पुत्र , पौत्र , भ्राता , भ्रात्याचा पुत्र , स्नुषा , भगिनी आणि माता , पिता यांना एकदम मरण प्राप्त होईल तर वर्षाचे आंत मातापिता यांचें सपिंडन पूर्वीं करुन नंतर सर्वांचें करावें . " लौगाक्षि - " पत्नी , पुत्र , पौत्र , भ्राता , भ्रात्याचे पुत्र , आणि माता व पिता हे ज्या वेळीं एका दिवशीं मृत होतील त्या वेळीं त्यांचें आद्यश्राद्ध अकराव्या दिवशीं करावें आणि तिसर्या पक्षांत सपिंडन करावें . " धवलनिबंधांत - " महागुरु ( पिता ) मृत असेल तर एका वर्षाचे आंत इतरांचें प्रेतकार्य एकोद्दिष्ट यथाविधि करावें . पार्वण करुं नये . " भृगु - " पिता मृत असेल तर माता , भ्राता , भार्या , पुत्र , स्नुषा यांचें श्राद्ध प्राप्त असतां करावें . इतरांचें श्राद्ध करुं नये . " हें वचनही सपिंडनाविषयींच आहे . शुद्धितत्त्वांत देवल - " पिता मृत असेल तर जोंपर्यंत पूर्ण वर्ष झालें नाहीं तोंपर्यंत इतरांचें श्राद्ध , परान्न , गंधमाल्यांचा उपभोग व मैथुन वर्ज्य करावें . " पारस्करभाष्यांत बृहस्पति - " पूर्वीं माता मृत असून नंतर पिता मृत असेल तर पुत्रानें मातेचें श्राद्ध करुं नये . पित्याच्या नंतर माता मृत असेल तर पित्याच्या श्राद्धावांचून इतरांचें श्राद्ध करुं नये . " शुद्धितत्त्वांत देवल - " महागुरु ( पिता ) मृत असेल तर कोणतेंही काम्यकर्म करुं नये . तसेंच दुसर्याचा ऋत्विक् पणा , ब्रह्मचर्य ( वेदाध्ययनव्रत ), श्राद्ध , आणि दैविक कर्म हें करुं नये . " हें सपिंडनाच्या पूर्वीं करुं नये असें केचित् म्हणतात . सपिंडनानंतरही करुं नये , असें अन्य विद्वान् सांगतात . श्राद्धकौमुदींत कालिकापुराणांत पूर्वार्धीं - " ज्याचा पिता मृत असेल त्यानें विशेषेंकरुन शिवपूजा संवत्सरपर्यंत मनानेंही आचरण करुं नये . ’’ केचित् विद्वान् तर - " पित्याचें आशौच वर्षपर्यंत , मातेचें सहा महिने , भार्येचें तीन महिने , भ्राता व पुत्र यांचें दीड महिना आशौच . ’’ ह्या स्मृतीवरुन सापत्न मातेचें सहामहिने आशौच सांगतात . श्राद्धकौमुदीकार तर - " दोन जे महागुरु ( माता व पिता ) यांचेंच एक वर्ष आशौच , इतरांचें आपल्या जातीच्या आशौचाहून अधिक आशौच नाहीं . " ह्या समूल अशा जातूकर्ण्यवचनाशीं विरोध येत असल्यामुळें वरील स्मृतिवचन मूलरहित आहे , असें सांगतो .
हेमाद्रौभविष्ये गयाश्राद्धंमृतानांतुपूर्णेत्वब्देप्रशस्यते त्रिस्थलीसेतौगारुडे तीर्थश्राद्धंगयाश्राद्धंश्राद्धमन्यच्चपैतृकं अब्दमध्येनकुर्वीतमहागुरुविपत्तिषु इदंवृद्ध्यर्थसपिंडनाभावे वृद्धौसपिंडनापकर्षेब्दमध्येपिदर्शादिकार्यमेव पितुः सपिंडनंकृत्वाकुर्यान्मासानुमासिकमिति छंदोगपरिशिष्टात् सपिंडीकरणादूर्ध्वंप्रेतः पार्वणभुग्भवेदितिमात्स्यात् ततः प्रभृतिवैप्रेतः पितृसामान्यमश्नुते विंदतेपितृलोकंचततः श्राद्धंप्रवर्ततेइतिहारीताच्चेतिशूलपाणिः यत्तुकातीयं सपिंडीकरणादूर्ध्वंनदद्यात् प्रतिमासिकं एकोद्दिष्टविधानेनदद्यादित्याहशौनकइति तत्रैकोद्दिष्टविधिनानदद्यादित्यन्वयः तुर्यपादेनपार्वणेविकल्पउक्तः ब्रह्मवैवर्ते उद्वाहश्चोपनयनंप्रथमेब्देमहीपते कृतेसपिंडनेप्यूर्ध्वमस्थांचोद्धरणंत्यजेत् तथापिकर्तुमिच्छंतित्रीणिचैतानिवैसुताः मासिकान्यवशिष्टानिचापकृष्यचरेत्पुनः ।
हेमाद्रींत भविष्यांत - " मृत झालेल्यांचें गयाश्राद्ध वर्ष पूर्ण झाल्यावर प्रशस्त आहे . " त्रिस्थलीसेतूंत गारुडांत - " महागुरु मृत असतील तर तीर्थश्राद्ध , गयाश्राद्ध व इतर पैतृकश्राद्ध एक वर्षामध्यें करुं नये . " हा निषेध वृद्धीकरितां सपिंडन केलें नसेल तर समजावा . वृद्धिश्राद्धाविषयीं सपिंडनाचा अपकर्ष असेल तर वर्षामध्येंही दर्शादि श्राद्ध करावेंच . कारण , " पित्याचें सपिंडन करुन प्रतिमासीं होणारें श्राद्ध करावें " असें छंदोगपरिशिष्टवचन आहे . " सपिंडीकरणानंतर प्रेत पावर्णभोगी होतो " असें मात्स्यवचन आहे आणि " सपिंडीकरण झाल्यापासून पुढें प्रेताला पितृत्वधर्म प्राप्त होतो आणि पितृलोकही प्राप्त होतो म्हणून त्याचें श्राद्ध प्रवृत्त होतें . " असें हारीतवचनही आहे , असें शूलपाणि सांगतो . आतां जें कातीय - " सपिंडीकरणानंतर प्रतिमासिक देऊं नये . एकोद्दिष्टविधीनें द्यावें , असें शौनक सांगतो " असें वचन त्यांत ‘ प्रतिमासिक एकोद्दिष्टविधीनें देऊं नये ’ असा अन्वय करावा . या वचनांतील चवथ्या पादानें ‘ द्यावें असें शौनक सांगतो ’ असें सांगितल्यावरुन अर्थात् इतर सांगत नाहींत असें झाल्यानें पार्वणाविषयीं विकल्प उक्त झाला . ब्रह्मवैवर्तांत - " प्रथम वर्षांत सपिंडन केल्यानंतरही विवाह , मौंजीबंधन आणि अस्थींचा उद्धार ( तीर्थांत प्रक्षेप ) हीं वर्ज्य करावीं , असें आहे तरी हीं तीन कृत्यें करण्याविषयीं पुत्र इच्छितात . त्यांनीं अवशिष्ट राहिलेलीं मासिकें पुनः अपकर्षानें करुन तीं विवाहादि कृत्यें करावीं . "
अत्रेदंतत्त्वं वृद्धिंविनार्वागपिसपिंडनापकर्षेपितृत्वप्राप्तिर्वर्षांतएव कृतेसपिंडीकरणेनरः संवत्सरात्परं प्रेतदेहंपरित्यज्यभोगदेहंप्रपद्यतइतिविष्णुधर्मोक्तेः अर्वाक् संवत्सराद्यस्यसपिंडीकरणंभवेत् प्रेतत्वमपितस्यापिविज्ञेयंवत्सरंनृपेत्यग्निपुराणाच्च तेनतत्सत्त्वेपिवृद्धिदैवपित्र्येष्वनधिकारः वृद्धिनिमित्तेत्वनंतरमेव अर्वाक् संवत्सराद्वृद्धौपूर्णेसंवत्सरेपिवा येसपिंडीकृताः प्रेतानतेषांतुपृथक् क्रियेति शातातपोक्तेः तथैवकाम्यमितिहेमाद्रिधृतहारीतादिवशाच्चैवमिति तथा अस्थिक्षेपंगयाश्राद्धंश्राद्धंचापरपक्षिकम् प्रथमेब्देनकुर्वीतकृतेपितुः सपिंडने । अस्यापवादः । अस्थिक्षेपंगयाश्राद्धंश्राद्धंचापरपक्षिकं प्रथमेब्देपिकुर्वीत यदिस्याद्भक्तिमान्सुतः भक्त्याख्यंश्राद्धंतद्वानितिमदनपारिजातादयः अन्येयथाश्रुतमाहुः तत्त्वंतु यदीदंसमूलंतदावृद्धिंविनापकर्षेपूर्वं वृद्ध्यर्थेतुपरमितियोज्यं पतितानांगयायांविशेषोब्राह्मे क्रियतेपतितानांचगतेसंवत्सरेक्वचित् देशधर्मप्रमाणत्वाद्गयाश्राद्धंस्वबंधुभिः ।
याविषयींचा खरा प्रकार म्हणजे असा आहे कीं , वृद्धिकर्मावांचून वर्षाच्या आंत जरी सपिंडनाचा अपकर्ष केला तरी प्रेताला पितृत्वाची प्राप्ति वर्षांतींच होते . कारण , " सपिंडीकरण केलें असतां मनुष्य वर्षाच्या पुढें प्रेतदेह टाकून भोगदेह पावतो " असें विष्णुधर्मांत वचन आहे . आणि " ज्याचें सपिंडीकरण संवत्सराचे आंतही झालें असेल त्याला देखील प्रेतत्व संवत्सरपर्यंत जाणावें " असें अग्निपुराणवचनही आहे . तेणेंकरुन ( प्रेतत्व असल्यामुळें ) सपिंडीकरण झालें तरी वृद्धि दैव - पित्र्यकर्मांविषयीं अधिकार नाहीं . वृद्धिनिमित्तक अपकर्ष असेल तर सपिंडीकरणानंतर अधिकार आहेच . कारण , " प्रथम वर्षाच्या आंत वृद्धि कर्तव्य असतां अथवा संवत्सर पूर्ण झालें असतां ज्या प्रेतांचें सपिंडीकरण केलें असेल त्याची पृथक् क्रिया ( प्रेतत्वयुक्त एकोद्दिष्ट ) नाहीं . " असें शातातपवचन आहे . आणि " प्रथमवर्षावांचून इतर आभ्युदयिक व काम्यकर्म अधिक मासांत करुं नये . " ह्या वर सांगितलेल्या हेमाद्रीनें धरलेल्या हारीतवचनावरुनही असें समजावें . तसेंच " पित्याचें सपिंडन केलें असलें तरी तीर्थांत अस्थिप्रक्षेप , गयाश्राद्ध्ह आणि अपरपक्षश्राद्ध ( महालय ) हीं प्रथमवर्षीं करुं नयेत . " याचा अपवाद - " अस्थिक्षेप , गयाश्राद्ध आणि महालय हीं जर पुत्र भक्तिमान् असेल तर त्यानें प्रथमवर्षींही करावीं . " ‘ भक्तिमान् ’ याचा अर्थ - भक्ति नांवाचें श्राद्ध ज्यानें केलें असेल त्यानें करावीं , असें मदनपारिजातादिक सांगतात . इतर ग्रंथकार वर सांगितल्याप्रमाणें अर्थ सांगतात . खरें म्हटलें तर - जर हीं वचनें समूल असतील तर वृद्धीवांचून सपिंडनाचा अपकर्ष असतां पहिलें वचन , आणि वृद्धीकरितां अपकर्ष असतां दुसरें वचन , असें योजावें . पतितांचा गयेंत विशेष सांगतो . ब्राह्मांत - " पतितांना मरुन वर्ष होऊन गेल्यावर कधींतरी त्यांच्या बंधूंनीं देशधर्मप्रमाणावरुन गयाश्राद्ध करावें . "