तर्पणाचा विधि सांगतो -
तद्विधिः संग्रहे स्नात्वातीरंसमागत्यउपविश्यकुशासने संतर्पयेत्पितृन् सर्वान् स्नात्वावस्त्रंचधारयेत् तर्पणोत्तरंनित्यस्नानंकृत्वेत्यर्थः अपसव्यंततः कृत्वासव्यंजान्वाच्यभूतले नामगोत्रस्वधाकारैर्द्वितीयांतेनतर्पयेत् अत्रवस्वादिरुपतोक्तास्मृत्यर्थसारे वसुरुद्रादितिसुतान् श्राद्धार्थेतर्पयेत् पितृन् तत्रबह्वृचानांदक्षिणेनैव अनादेशेदक्षिणंप्रतीयादितिसूत्रात् अत्रप्रत्यंजलिमंत्रावृत्तिः निर्वापवत्तत्संध्यार्घ्यदानवच्च द्रव्यभेदात् अवघातवेदिप्रोक्षणादौतुद्रव्यैकत्वान्नमंत्रावृत्तिः केचित्तुपरिव्याणमंत्रवत्क्रियमाणानुवादित्वेनकरणत्वाभावात्स कृदिच्छंति तन्न तत्रापूपद्रव्यैक्यात् परवीरसीतिकरणीभूतमंत्रांतरसत्त्वादन्यतरेणव्यवधानापत्त्योभयोः करणत्वायोगात् कर्त्रभेदेनविकल्पायोगाच्चक्रियमाणानुवादित्वंनत्वत्रतथेतिबौधायनादिवचनात् करणत्वमेवतेनावृत्तिरेवयुक्ता एवंनित्येपि यत्तुसंग्रहेनाम्नापठंति पित्रोः क्षयाहेसंप्राप्तेयः कुर्यान्नित्यतर्पणं आसुरंतद्भवेच्छ्राद्धंतत्तोयंरुधिरंभवेत् सर्वदातर्पणकुर्याद्ब्रह्मयज्ञपुरः सरं मृताहेनैवकर्तव्यंकृतंचेन्निष्फलंभवेत् तत्समूलत्वेसतितिलविषयं यच्चपठंति कपिलः मन्वादिषुयुगाद्यासुदर्शसंक्रमणेषुच पौर्णमास्यांव्यतीपातेदद्यात् पूर्वंतिलोदकं अर्धोदयेगजच्छायेषष्ठीषुचमहालये भरण्यांचमघाश्राद्धेतदंतेतर्पणंविदुः शौनकः मातापित्रोर्मृताहेचपरेहनितिलोदकं कारुण्यश्राद्धविषयेसद्योदद्यात्तिलोदकं एतन्निर्मूलं ।
संग्रहांत - " तीर्थाच्या उदकांत स्नान करुन तीरास जाऊन दर्भासनावर बसून सार्या पितरांचें तर्पण करावें . नंतर नित्यस्नान करुन दुसरें वस्त्र परिधान करावें . " तर्पणाचा प्रकार - " अपसव्य करुन डावा गुडघा भूमीवर टेंकून पितरांचें नांव गोत्र यांचा द्वितीयाविभक्तीनें उच्चार करुन त्याच्या पुढें स्वधा शब्द उच्चारुन तर्पण करावें . " या तर्पणाच्या ठिकाणीं वसु इत्यादिरुपांचा उच्चार स्मृत्यर्थसारांत सांगितला आहे तो असा - " वसु , रुद्र , आदित्य अशा पितरांचें श्राद्धाचे ठायीं तर्पण करावें " बह्वृचांना दक्षिण हस्तानेंच तर्पण . कारण , " ज्या ठिकाणीं कोणता हस्त घ्यावा हें सांगितलें नाहीं त्या ठिकाणीं दक्षिणहस्त समजावा " असें सूत्र आहे . ह्या तर्पणाच्या ठिकाणीं प्रत्येक अंजलीला मंत्राची ( स्वधानमस्तर्पयामि , इत्यादिकांची ) आवृत्ति करावी . कारण , जशी चरुद्रव्याच्या निर्वापाचे ठिकाणीं प्रत्येक निर्वापाला द्रव्य भिन्न असल्यामुळें मंत्राची आवृत्ति आहे . तसेंच संध्येंतील प्रत्येक अर्घ्याला उदकरुप द्रव्य भिन्न असल्यामुळें मंत्राची आवृत्ति आहे तशी येथें प्रतिवेळीं द्यावयाचें उदक भिन्न असल्यामुळें मंत्राची आवृत्ति आहे . व्रीहींचा अवघात ( कंडन ), अग्निहोत्र्याच्या वेदीचें प्रोक्षण इत्यादि ठिकाणीं द्रव्य एक असल्यामुळें प्रतिवेळीं मंत्राची आवृत्ति नाहीं . केचित् विद्वान् तर - जसा परिव्याणमंत्र ( गुंडाळण्याचा मंत्र ) करावयाचें जें कर्म ( गुंडाळणें ) त्याचा अनुवादक असल्यामुळें करण होत नाहीं , तसा हा तर्पणाचा मंत्र करावयाचें जें अंजलिदानरुप कर्म त्याचा अनुवादक असल्याकारणानें करण होत नाहीं म्हणून तर्पणाचा मंत्र एकवार उच्चारावा , असें इच्छितात . तें बरोबर नाहीं . कारण , परिव्याणमंत्राचे ठिकाणीं अपूपरुप द्रव्य एक असल्यामुळें व त्या ठिकाणीं ‘ परिवीरसि० ’ असा दुसरा मंत्रही आहे म्हणून एका क्रियेला दोन करणें संभवत नाहींत . कारण , करण म्हणजे क्रियेला साक्षात् अत्यंत उपकारक होय ; तें दोघांना आणावयास लागलें असतां क्रियेच्या व करणाच्या मध्यें दुसरें करण पडल्यामुळें त्याचें व्यवधान येतें . मग अशा ठिकाणीं एकाला कोणाला तरी करणत्व मानावयाचें खरें , पण अमुकालाच मानावें , असें प्रमाण नसल्यामुळें एकाला मानिलें तर दुसर्याला कां न मानावें , असा विरोध येत असल्यामुळें दोघांनाही मानूं नये , असें होतें . आतां एकवार एकाला करणत्व आणि एकवार दुसर्याला करणत्व असा विकल्प म्हणूं ? तर तसेंही म्हणतां येत नाहीं . कारण , दोघांचा कर्ता एक आहे . अर्थात् त्या परिव्याण मंत्राला करणत्व नाहीं . तर तो क्रियमाणाचा अनुवादक आहे . या ठिकाणीं ( तर्पणाच्या ठिकाणीं ) जो मंत्र तो , द्रव्य भिन्न असल्यामुळें क्रियमाण जें अंजलिदानरुप कर्म त्याचा अनुवादक नाहीं ; अशा बौधायनादिकांच्या वचनावरुन करणत्वच आहे . तेणेंकरुन प्रत्येक अंजलीला मंत्राची आवृत्ति करणें युक्त आहे . याप्रमाणें नित्यतर्पणाविषयीं देखील समजावें . आतां जें संग्रहांत श्राद्धाचें नांव घेऊन सांगतात - " मातापितरांचा मृतदिवस प्राप्त असतां जो मनुष्य नित्यतर्पण करील त्याचें तें श्राद्ध आसुर ( असुरांना प्राप्त ) होतें , आणि त्यानें दिलेलें उदक रुधिर होतें . ब्रह्मयज्ञांतील तर्पण सर्वदा करावें , मातापितरांच्या मृतदिवशीं करुं नये . केलें तर निष्फल होईल . " हें मूल वचन असेल तर तिलसहित तर्पणविषयक समजावें . आतां जें वचन सांगतात कीं , कपिल - " मन्वादिक , युगादिक , दर्श , संक्रान्ति , पौर्णमासी , आणि व्यतीपात यांचे ठिकाणीं श्राद्धाच्या पूर्वीं तिलोदक द्यावें . अर्धोदयपर्व , गजच्छाया , षष्ठी , महालय , भरणी आणि मघाश्राद्ध यांचे ठायीं श्राद्धाच्या अंतीं तर्पण सांगतात . " शौनक - " मातापितरांचा मृत दिवस असतां दुसर्या दिवशीं तिलोदक द्यावें . कारुण्यानें केलेल्या श्राद्धाविषयीं तत्कालीं तिलोदक द्यावें . " हीं वचनें निर्मूल आहेत .