मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|निर्णयसिंधु|तृतीयपरिच्छेद उत्तरार्ध|
ब्राह्मणादि जातीचें आशौच

तृतीय परिच्छेद - ब्राह्मणादि जातीचें आशौच

निर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल , याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे .


आतां ब्राह्मणादि जातीचें आशौच सांगतो -

अथजात्याशौचं तच्च द्विजपुंसामुपनयनोर्ध्वंप्रवर्तते त्रिरात्रमाव्रतादेशाद्दशरात्रमतः परं क्षत्रस्यद्वादशाहानिविशः पंचदशैवतु त्रिंशद्दिनानिशूद्रस्यतदर्धंन्यायवर्तिनइतियाज्ञवल्क्योक्तेः यत्तुसएवत्रिरात्रंदशरात्रंवाशावमाशौचमिष्यतइत्याह तत्रदशाहेत्रिरात्रमस्पृश्यत्वं एकदिनोत्पन्नेआशौचद्वयेदशाहमस्पृश्यत्वं मरणंयदितुल्यंस्यान्मरणेनकथंचन अस्पृश्यंतुभवेद्गोत्रंसर्वमेवसाबंधवमित्यंगिरसोक्तेः दशाहाशौचपरत्वेदशरात्रमतः परमित्यनेनपौनरुक्त्यापत्तेरितिशुद्धिविवेकादयः स्मृतिभेदात्र्त्रिरात्रंदशरात्रंवेतिविकल्पायोगाच्च यस्तुपुत्राणांवेदानध्याप्यवृत्तिंविदधातितत्राहाश्वलायनः द्वादशरात्रंमहागुरुषुदानाध्ययनेवर्जयेरन्निति अत्रयावदुक्तनिषेधोवास्पृश्यत्वमात्रंवा नतुकर्मानधिकारः एकादशाहांतेवैश्वदेवोक्तेः एकादशाहिकेमुक्त्वातत्रह्यंतेविधीयतइति शुद्धितत्त्वेतु त्रयः पुरुषस्यातिगुरवोभवंति मातापिताचार्यश्चेति विष्णूक्तेः पित्रादयोमहागुरवः भर्ताप्युक्तोरामायणे पतिर्बंधुर्गतिर्भर्तादैवतंगुरुरेवच शातातपः पतिरेकोगुरुः स्त्रीणांसर्वस्याभ्यागतोगुरुः एकपदमूढानांपितृमातृनिषेधार्थं सोदकानांत्रिरात्रं त्र्यहात्तूदकदायिनइतिमनूक्तेः अग्निपुराणे सपिंडतातुपुरुषेसप्तमेविनिवर्तते समानोदकभावस्तुनिवर्तेतचतुर्दशे जन्मनामस्मृतेर्वैकेतत्परंगोत्रमुच्यते बृहस्पतिः दशाहेनसपिंडास्तुशुध्यंतिप्रेतसूतके त्रिरात्रेणसकुल्यास्तुस्नात्वाशुध्यंतिगोत्रजाः ।

तें जातिनिमित्तक आशौच ब्राह्मण , क्षत्रिय , वैश्य यांच्या पुरुषांना मौंजीबंधनानंतर प्रवृत्त होतें . कारण , " उपनयनापर्यंत तीन दिवस , उपनयनोत्तर ब्राह्मणाला दहा दिवस , क्षत्रियाला बारा दिवस , वैश्याला पंधरा दिवस , शूद्राला तीस दिवस आशौच आणि न्यायानें वागणार्‍या शूद्राला ( वर सांगितलेल्याच्या ) अर्धै आशौच समजावें " असें याज्ञवल्क्यवचन आहे . आतां जें तोच ( याज्ञवल्क्य ) - " तीन दिवस किंवा दहा दिवस मृताशौच करावें " असें सांगतो , त्यांत दहा दिवसांच्या आशौचांत तीन दिवस अस्पृश्यत्व , आणि एका दिवशीं दहा दिवसांचीं दोन आशौचें उत्पन्न असतां दहा दिवस अस्पृश्यत्व समजावें . कारण , " जर एक मरण दुसर्‍या मरणानें समान होईल ( दोन एका दिवशीं मृत होतील ) तर त्या ठिकाणीं बांधवांसहित सारे गोत्रज अस्पृश्य होतील . " असें अंगिरसाचें वचन आहे . ह्या याज्ञवल्क्यवचनाचा असा अर्थ न करितां हें वचन दशाहाशौचविषयक मानलें तर ‘ दशरात्रमतः परं ’ ह्या वरील याज्ञवल्क्यवचनानें पुनरुक्तिः ( पुनः सांगितलें ) हा दोष प्राप्त होईल , असें शुद्धिविवेकादिक ग्रंथकार सांगतात . स्मृतिभेदानें त्रिरात्र किंवा दशरात्र करावें , असा विकल्पही करितां येत नाहीं . कारण , स्मृति एक आहे . जो पिता पुत्रांना वेद पढवून त्यांची उपजीविका करितो , त्याविषयीं सांगतो आश्वलायन - " महागुरु मृत झाले असतां बारा दिवसपर्यंत दान व अध्ययन वर्ज्य करावें . " याठिकाणीं जितकें सांगितलें तितक्याचाच ( दानाध्ययनाचाच ) बारा दिवस निषेध किंवा स्पृश्यत्वाचा निषेध समजावा . कर्माचा अनधिकार नाहीं . कारण , अकराव्या दिवशीं वैश्वदेव सांगितला आहे . ‘ अकराव्या दिवशीं श्राद्धांतीं वैश्वदेव सांगितला आहे ’ असें पूर्वीं शालंकायनवचन सांगितलें आहे . शुद्धितत्त्वांत तर - " पुरुषाचे तीन अति गुरु होतात - माता , पिता आणि आचार्य " या विष्णुवचनावरुन पिता इत्यादिक महागुरु आहेत . स्त्रियेला भर्ताही गुरु रामायणांत सांगितला आहे - " पति हा बंधु , गति ( शरण ), भर्ता ( पोषणकर्ता ), दैवत आणि गुरु आहे . " शातातप - " स्त्रियांचा पति एकच गुरु आहे . सर्वांचा गुरु अतिथि आहे . " या वचनांत ‘ एक ’ पद आहे तें विवाहित स्त्रियांचा पिता व माता गुरु नाहीं , असा समज करण्याकरितां आहे . समानोदकांना ( सातपुरुषांच्या पलीकडच्यांना ) त्रिरात्र आशौच . कारण , " समानोदक तीन दिवसांनीं शुद्ध होतात " असें मनुवचन आहे . अग्निपुराणांत - " सातव्या पुरुषाला सपिंडता ( सापिंड्य ) निवृत्त होतें . समानोदकपणा तर चवदाव्या पुरुषाला निवृत्त होतो , म्हणजे आपण धरुन सात पुरुषांपर्यंत सपिंड . आठव्यापासून तेरापर्यंत समानोदक . कित्येक विद्वान् ‍ म्हणतात त्या पुरुषांचें जन्म व नांव यांचें स्मरण आहे तोंपर्यंत समानोदक समजावे , त्याच्या पुढचे गोत्रज म्हटले आहेत . " बृहस्पति - " मृतसूतक असतां दहा दिवसांनीं सपिंड शुद्ध होतात . सकुल्य ( समानोदक ) तीन दिवसांनीं शुद्ध होतात . आणि गोत्रज स्नानानें शुद्ध होतात . "

स्त्रीशूद्रयोस्तुविवाहोर्ध्वंजात्याशौचं वैवाहिकोविधिः स्त्रीणामौपनायनिकः स्मृतइत्युक्तेः दत्तानांभर्तुरेवहि स्वजात्युक्तमशौचंस्यान्मृतकेजातकेतथेति माधवीयेब्राह्माच्च शूद्रस्यविवाहाभावेपिषोडशवर्षोर्ध्वंमासः अनूढभार्यः शूद्रस्तुषोडशाद्वत्सरात्परं मृत्युंसमधिगच्छेच्चेन्मासात्तस्यापिबांधवाः शुद्धिंसमधिगच्छंतिनात्रकार्याविचारणेत्यपरार्केशंखोक्तेः निर्णयामृतमदनपारिजातादौत्वन्यथोक्तम् हारीतः आमौंजीबंधनाद्विप्रः क्षत्रियश्चधनुर्ग्रहात् आप्रतोदग्रहाद्वैश्यः शूद्रोवस्त्रद्वयग्रहात् धनुः प्रतोदावष्टमेब्दे द्वादशेवस्त्रद्वयमिति मेधातिथिस्तु त्रिरात्रमाव्रतादेशादित्यत्रव्रतंकालोपलक्षणार्थं सचकालः स्वकीयः सर्वेषांचाष्टमवर्षरुपः तेनचतुर्णामपिवर्णानामुपनयनाभावेप्यष्टमादूर्ध्वंपूर्णमेवाशौचं तत्रापिप्रागष्टमाच्छिशवः प्रोक्ताइति स्मृत्यंतरादूर्ध्वंसंपूर्णमर्वाक् ‍ त्रिरात्रं येप्याषोडशाद्भवेद्बालइत्याहुः तेषामप्यष्टमादूर्ध्वंशूद्रेमासएव ऊर्ध्वमष्टभ्योवर्षेभ्यः शुद्धिंशूद्रस्यमासिकीतिवचनादित्याह हारलताशुद्धितत्त्वादिगौडग्रंथेष्वयुक्तं अनुपनीतोविप्र इत्युक्त्वा म्रियतेयत्रतत्रस्यादाशौचंत्र्यहमेवहीति द्विजन्मनामयंकालस्त्रयाणांतुषडाब्दिकइत्यादिपुराणोक्तेरुपनयनंकालोपलक्षणं षडब्दपदंमासत्रयाधिकपरं गर्भाष्टमेष्टमेवाब्दइत्युक्तेः यत्तुजाबालः व्रतचूडाद्विजानांचप्रतीतिषुयथाक्रमं दशाहत्र्यहएकाहैः शुध्यंत्यपिहिनिर्गुणाइति द्विजादंताः इदंप्रतीतिष्वित्युक्तेः पंचाब्दोपनीतपरमिति तदेतन्नाद्रियंतेवृद्धाः ।

स्त्रिया व शूद्र यांना तर विवाहोत्तर हें जातीचें आशौच आहे . कारण , स्त्रियांना उपनयनस्थानीं विवाहविधि सांगितला आहे . " असें वचन आहे . आणि " विवाहित स्त्रियांना भर्त्याचेच जातीला सांगितलेलें आशौच मृतकाविषयीं व उत्पत्तीविषयीं समजावें . " असें माधवीयांत ब्राह्मवचनही आहे . शूद्राचा विवाह झाला नसला तरी सोळा वर्षानंतर एक महिना आशौच . कारण , अविवाहित शूद्र जर सोळा वर्षानंतर मरेल तर त्याचेही बांधव एका महिन्यानें शुद्ध होतात , याविषयीं संशय नाहीं . " असें अपरार्कांत शंखवचन आहे . निर्णयामृत , मदनरत्न , पारिजात इत्यादिकांत तर निराळें सांगितलें आहे . तें असें - हारीत - " मौंजीबंधनानें ब्राह्मण , धनुष्यग्रहणानें क्षत्रिय , चाबूकग्रहणानें वैश्य , दोन वस्त्रें ग्रहणानें शूद्र हे संस्कृत होतात . धनुष्यग्रहण व चाबूकग्रहण आठव्या वर्षीं होतें . आणि शूद्रानें दोन वस्त्रें ग्रहण करणें तीं बाराव्या वर्षीं करावीं . " यावरुन तें तें ग्रहण केल्यावर पूर्ण आशौच . मेधातिथि तर - ‘ त्रिरात्रमाव्रतादेशात् ’ ह्यावरील याज्ञवल्क्यवचनांतील ‘ व्रत ’ शब्दानें व्रताचा ( उपनयनाचा ) काला घ्यावा . तो काल सर्वांचा ( ब्राह्मण , क्षत्रिय , वैश्य , शूद्र यांचा ) आठवें वर्ष होय . तेणेंकरुन चारही वर्णांचें उपनयन झालें नसलें तरी आठव्या वर्षांनंतर मृत असतां संपूर्णच आशौच आहे . त्यांतही " आठव्या वर्षाच्या पूर्वीं शिशु म्हटले आहेत " ह्या इतर स्मृतीवरुन आठव्या वर्षानंतर संपूर्ण आशौच व त्याच्या पूर्वीं मृत असतां त्रिरात्र आशौच . जे कोणी सोळा वर्षैपर्यंत बाल असें म्हणतात त्यांच्या मतीं देखील आठव्या वर्षानंतर शूद्राचें एक महिनाच आशौच . कारण , " आठ वर्षानंतर मृत शूद्राची एकामहिन्यानें शुद्धि होते " असें वचन आहे , असें सांगतो . हारलताशुद्धितत्त्व इत्यादि गौड ग्रंथांतही सांगितलें आहे कीं उपनयन न झालेला ब्राह्मण असें सांगून " जेथें ( ज्या कुलांत ) मरेल तेथें तीन दिवस आशौच . ब्राह्मण , क्षत्रिय , वैश्य या तिघांचा हा सहा वर्षांपर्यंत तीन दिवस आशौचाचा काल आहे . " ह्या आदिपुराणवचनावरुन उपनयन म्हणजे उपनयनाचा काल समजावयाचा आहे . सहा वर्षै म्हणजे सहा वर्षै अधिक तीन महिने समजावें . कारण , " उपनयन गर्भापासून आठव्या वर्षीं किंवा जन्मापासून आठव्या वर्षीं असें सांगितलें आहे . आतां जें जाबालि - " उपनयनाची प्रतीति ( ज्ञान ) असता मृत असेल तर दहा दिवसांनीं , चौलाची प्रतीति असतां मृत असेल तर तीन दिवसांनीं आणि दंतांची प्रतीति असतां मृत असेल तर एका दिवसानें निर्गुण असेल तरी शुद्ध होतात . " प्रतीति ( ज्ञान ) असतां असें म्हटलें आहे म्हणून हें वचन पांच वर्षांचा उपनयन झालेला असेल तद्विषयक आहे , असें सांगितलें आहे , तें वृद्ध स्वीकारीत नाहींत .

यानितु पराशरः एकाहाद्ब्राह्मणः शुध्येद्योग्निवेदंसमन्वितः त्र्यहात्केवलवेदस्तुद्विहीनोदशभिर्दिनैः केवलवेदः केवलश्रौताग्नेरप्युपलक्षणं अयंसंकोचोहोमाध्ययनपरएव नतुसंध्यादावितिहारलतायांअंगिराः सर्वेषामेववर्णानांसूतकेमृतकेतथा दशाहाच्छुद्धिरेतेषामितिशातातपोब्रवीत् देवलः आशुच्यंदशरात्रंतुसर्वेषामपरेविदुः निधनेप्रसवेचैवपश्यंतः कर्मणः क्षयं अत्यंतोत्कृष्टस्यकर्महानौपीडावतोविप्रपरिचर्यापरशूद्रस्यदशरात्रमितिहारलतायां दक्षः सद्यः शौचंतथैकाहस्त्रयहश्चतुरहस्तथा षट्दशद्वादशाहश्चपक्षोमासस्तथैवच मरणांतंतथाचान्यद्दशपक्षास्तुसूतके मिताक्षरायांस्मृत्यंतरे चतुर्थेदशरात्रंस्यातषण्निशाः पुंसिपंचमे षष्ठेचतुरहाच्छुद्धिः सप्तमेत्वहरेवतु इत्यादीनितान्यापदनापद्गुणवदगुणवद्विषयाणि देशांतरभेदाद्वाज्ञेयानि सद्यः शौचादिषडहांताः पक्षायायावरादिपराः अत्रमरणांतंजननादिनिमित्ताद्भिन्नम् शिष्टविगानान्नादर्तव्यानीतिविज्ञानेश्वरः अस्नात्वाचाप्यहुत्वाचअदत्त्वाश्नंस्तथाद्विजः एवंविधस्यविप्रस्यसर्वदासूतकंभवेदितिदक्षोक्त्या अन्यपूर्वायस्यगेहेभार्यास्यात्तस्यनित्यशः आशौचंसर्वकार्येषुदेहेभवतिसर्वदेति ब्राह्मादिवशाव्द्यवस्थेत्यपरार्कमदनपारिजातादयः ।

आतां जीं वचनें पराशर - " जो ब्राह्मण अग्नि ( श्रौताग्नि व स्मार्ताग्नि ) आणि वेद यांनीं युक्त असेल तो एका दिवसानें शुद्ध होईल . केवळ वेदानें युक्त असेल तो तीन दिवसांनीं शुद्ध होईल . आणि जो अग्नि व वेद यांनीं रहित तो दहा दिवसांनीं शुद्ध होईल . " या वचनांत ‘ केवल वेद ’ या शब्दानें उपलक्षणेंकरुन केवळ श्रौताग्निही घ्यावा . हा आशौचाचा संकोच होम व अध्ययन यांविषयींच आहे . संध्यादिकर्माविषयीं नाहीं , असें हारलतेंत सांगितलें आहे . अंगिरा - " ब्राह्मणादि चारही वर्णांचें सूतक ( जननाशौच ) व मृताशौच असतां त्यांची दहा दिवसांनीं शुद्धि होते , असें शातातप सांगतो . " देवल - " जनन तसेंच मरण असतां अवश्य कर्माचा क्षय होत आहे असें पाहणारे इतर विद्वान् ‍ ब्राह्मणादि चारही वर्णांना दहा दिवस आशौच सांगतात . " शूद्राला दहा दिवस आशौच सांगितलें हें अत्यंत उत्कृष्ट असून कर्माची हानि झाली असतां दुःख पावणारा असा ब्राह्मणाची सेवा करणारा जो शूद्र त्याविषयीं समजावें , असें हारलतेंत सांगितलें आहे . दक्ष - " सद्यः शौच , एक दिवस , तीन दिवस , चार दिवस , सहा दिवस , दहा दिवस , बारा दिवस , पंधरा दिवस , एक महिना आणि मरणपर्यंत असे आशौचाचे दहा पक्ष आहेत . " मिताक्षरेंत इतर स्मृतींत - " चवथ्या पुरुषाला दहा दिवस , पांचव्या पुरुषाला सहा दिवस , सहाव्या पुरुषाला चार दिवस , आणि सातव्या पुरुषाला एकच दिवस आशौच . " इत्यादिक वचनें आहेत , तीं आपत्ति , आपत्ति नसणें , गुणवंत , निर्गुणी , यांच्याविषयीं समजावीं . अथवा देशांतरभेदानें जाणावीं . सद्यः शौच आरंभ करुन सहा दिवस आशौच यापर्यंत जे पांच पक्ष आशौचाचे सांगितले तें यायावर इत्यादिकांविषयीं आहेत . एथें मरणांत आशौच सांगितलें हें जननादि आशौचव्यतिरिक्त आहे . अशीं वरील वचनें तीं शिष्टांनीं निंदित असल्यामुळें स्वीकारुं नयेत , असें विज्ञानेश्वर सांगतो . " स्नान केल्यावांचून , होम केल्यावांचून व दान दिल्यावांचून भोजन करणारा असा जो ब्राह्मण त्याला सर्वदा सूतक असतें " ह्या दक्षवचनानें ; आणि " पुनर्विवाह झालेली पत्नी ज्याच्या घरांत असेल त्याला सर्व कार्यांमध्यें नित्य आशौच व त्याच्या देहाला सर्वदा आशौच " ह्या ब्राह्मादि वचनावरुन मरणांत आशौचाची व्यवस्था समजावी , असें अपरार्क , मदनपारिजात इत्यादिक सांगतात .

माधवस्तु वृत्तस्वाधायसापेक्षमघसंकोचनंतथेतिकलिवर्ज्येषूक्तेः दशाहएवविप्रस्यसपिंडमरणेसति कल्पांतराणिकुर्वाणः कलौभवतिकिल्बिषीतिहारीतोक्तेश्च न्यूनाशौचपक्षायुगांतरविषयाः मरणांतादिपक्षास्तुनिंदार्थवादः अन्यथा नामधारकविप्रस्तुदशाहंसूतकीभवेदितिविरोधः स्यादित्याह यत्तुदेवलः दशाहादित्रिभागेनकृतेसंचयनेक्रमात् अंगस्पर्शनमिच्छंतिवर्णानांतत्त्वदर्शिनइति पूर्णाशौचेस्पृश्यतामाह यच्चानुपनीतातिक्रांताशौचेत्रिरात्रादौतेनैवोक्तं स्वाशौचकालाद्विज्ञेयंस्पर्शनंतुत्रिभागतइति तदपियुगांतरेषु अस्थिसंचयनादूर्ध्वमंगस्पर्शनमेवचेतिमाधवीयेकलौतन्निषेधात् यत्तुहारलतायां चतुर्थेहनिकर्तव्यः संस्पर्शो ब्राह्मणस्यत्वितिप्रचेतसोक्तेस्त्र्यहैकाहाशौचेपिचतुर्थाहएवांगस्पर्शइति तन्न देवलादिवशेनास्यदशाहगोचरत्वात् येतुवर्णसंकरजामूर्धावसिक्ताद्यास्तेषामाशौचविशेषः कलौनोपयुक्तइतिनोच्यते प्रतिलोमजानांनाशौचं मलापकर्षणार्थंतुस्नानमात्रमितिविज्ञानेश्वरः माधवस्तु शौचाशौचेप्रकुर्वीरन् ‍ शूद्रवर्णस्यसंकराइति ब्राह्मोक्तेः शूद्रवदाह हारलतायामप्येवम् ।

माधव तर - " विहित कर्मानुष्ठान व वेदाध्ययन यांच्या योगानें आशौचाचा संकोच करणें हें कलींत निषिद्ध आहे " असें कलिवर्ज्यांत सांगितल्यामुळें ; आणि " सपिंड मृत असतां ब्राह्मणाला दहा दिवसच आशौच आहे . इतर पक्ष करणारा कलियुगांत दोषी होतो " ह्या हारीतवचनावरुनही दहा दिवसांपेक्षां न्यून आशौचाचे जे पक्ष सांगितले ते इतर युगांविषयीं आहेत . कलियुगांत नाहींत . मरणांतादि पक्ष सांगितला तो निंदारुप अर्थवाद आहे . असें न म्हटलें तर " नामधारक ( अर्थात् ब्रह्मकर्मरहित ) ब्राह्मणानें दहा दिवस सूतक धरावें " ह्या वचनाचा विरोध येईल , असें सांगतो . आतां जें देवल - " दशाहादिक आशौचाचे तीन भाग करुन तिसरा भाग होऊन गेल्यावर अस्थिसंचयन झालें असतां तत्त्वद्रष्टे विद्वान् ‍ त्या आशौचवाल्यांचा अंगस्पर्श इच्छितात " असें पूर्ण आशौच असतां स्पृश्यत्व सांगतो आणि जें अनुपनीताचे व अतिक्रांताचे त्रिरात्रादिक आशौचाविषयीं त्यानेंच ( देवलानें ) सांगितलें कीं , " आपल्या आशौचकालाचे तीन भाग करुन तिसरा भाग गेल्यावर स्पर्श करावा " असें , तेंही कलीवांचून इतर युगांत समजावें . कारण , " अस्थिसंचयनानंतर अंगस्पर्श निषिद्ध आहे " या वचनानें माधवीयांत कलियुगांत त्याचा ( स्पर्शाचा ) निषेध केला आहे . आतां जें हारलतेंत - " चवथ्या दिवशीं ब्राह्मणाचा स्पर्श करावा " या प्रचेतसाचे वचनावरुन तीन दिवसांचें व एका दिवसाचें आशौच असलें तरी चवथ्या दिवशींच अंगस्पर्श करावा , असें सांगितलें आहे . तें बरोबर नाहीं . कारण , वरील देवलादि वचनानुरोधानें हें प्रचेतसाचें वचन दशाहाशौचविषयक इतर युगांत आहे . जे वर्णसंकरापासून उत्पन्न झालेले मूर्धावसिक्त इत्यादिक त्यांना विशेष आशौच कलियुगांत उपयुक्त नसल्यामुळें येथें सांगत नाहीं . प्रतिलोमज जे ( उत्तम वर्णाची स्त्री व कनिष्ठ वर्णाचा पुरुष यांपासून उत्पन्न ) त्यांना आशौच नाहीं . मळ जाण्याकरितां स्नान मात्र आहे , असें विज्ञानेश्वर सांगतो . माधव तर - " संकर जातीचे मनुष्यांनीं शौच व आशौच हें शूद्रास सांगितलेलें करावें " ह्या ब्राह्मवचनावरुन शूद्राप्रमाणें सांगतो . हारलतेंतही असेंच आहे .

दत्तक्रीतकृत्रिमादिपुत्रेषु अहीनवर्णगासुस्त्रीषुचसपिंडत्वेपि प्रसवेमरणेचपूर्वापरपित्रोर्भर्तुश्चत्रिरात्रमेव नदशाहादि अनौरसेषुपुत्रेषुजातेषुचमृतेषुच परपूर्वासुभार्यासुप्रसूतासुमृतासुचेतित्रिरात्रानुवृत्तौविष्णूक्तेः सपिंडानांत्वेकाहः परपूर्वासुभार्यासुपुत्रेषुकृतकेषुच भर्तृपित्रोस्त्रिरात्रंस्यादेकाहस्तुसपिंडतइति माधवीयेहारीतोक्तेः सूतकेमृतकेचैवत्रिरात्रंपरपूर्वयोः एकाहस्तुसपिंडानांत्रिरात्रंयत्रवैपितुरिति मरीच्युक्तेश्च शंखः अनौरसेषुपुत्रेषुभार्यास्वन्यगतासुच परपूर्वासुचस्त्रीषुत्रिरात्राच्छुद्धिरिष्यते परपूर्वापुनर्भूः इदंसवर्णासु हीनवर्णासुतुशंखलिखितौ परपूर्वासुभार्यासुपुत्रेषुकृतकेषुच नानध्यायोभवेत्तस्यनाशौचंनोदकक्रिया ब्राह्मेपि आशौचंतुत्रिरात्रंस्यात्समवर्णेषुनिश्चितं यत्तुषडशीतौ अन्यपूर्वावरुद्धासुत्रिदिनाच्छुद्धिरिष्यते तास्वेवानन्यपूर्वासुपंचाहोभिर्विशुध्यतीति तत्रपंचाहेमूलंचिंत्यम् यत्तुयाज्ञवल्क्यः अनौरसेषुपुत्रेषुभार्यास्वन्यगतासुचेत्येकाहमाह तदसन्निधौज्ञेयम् यदापितुरेकाहस्तदासपिंडानांस्नानं अन्याश्रितेषुदारेषुपरपत्नीसुतेषुच गोत्रिणः स्नानशुद्धाः स्युस्त्रिरात्रेणैवतत्पितेति प्रजापत्युक्तेः पितेतिवोढुरुपलक्षणं तथोपक्रमात् यत्तुदत्तकेपालकप्रतियोगिकपुत्रत्वात् पूर्वपितुर्नत्रिरात्रं पूर्वसंबंधनिवृत्तेश्चनदशाहादीतिकश्चित् तन्न जनकेपि बैजिकादभिसंबंधादनुरुंध्यादघंत्र्यहमितिवाचनिकाशौचस्यानिवार्यत्वात् ।

दत्तक , क्रीत ( विकत घेतलेला ), कृत्रिम इत्यादिक पुत्र ; हीन वर्णाशीं न जाणार्‍या अशा स्त्रिया ; यांचें सापिंड्य असतांही यांच्या ठिकाणीं जनन व मरण झालें असतां पहिल्या व दुसर्‍या मातापितरांना आणि पतीला तीन दिवसच आशौच , दशाहादिक नाहीं . कारण , " औरसावांचून इतर पुत्रांचे ठायीं उत्पत्ति व मरण असतां , पूर्वीं एकाच्या असून नंतर दुसर्‍याच्या झालेल्या स्त्रिया त्या प्रसूत किंवा मृत झाल्या असतां त्रिरात्र आशौच . " असें विष्णुवचन आहे . सपिंडांना तर एक दिवस आशौच . कारण , " पूर्वीं एकाच्या असून नंतर दुसर्‍य़ाच्या झालेल्या स्त्रिया , कृतक ( केलेले ) पुत्र यांच्या ठिकाणीं जनन किंवा मरण असतां पती व आईबाप यांना तीन दिवस आणि सपिंडांना एकदिवस आशौच " असें माधवीयांत हारीतवचन आहे . आणि " जनन व मरण असतां पूर्वींच्यांना व पुढच्यांना तीन दिवस आशौच . जेथें पित्याला तीन दिवस तेथें सपिंडांना एक दिवस आशौच . " असें मरीचिवचनही आहे . शंख - " औरसभिन्न पुत्र , व्यभिचारिणी स्त्रिया , आणि परपूर्वा ( पुनर्विवाहित ) अशा स्त्रिया यांच्या ठिकाणीं जनन किंवा मरण असतां तीन दिवसांनीं शुद्धि होते . " हें वचन आपल्या समान वर्णाच्या स्त्रियांविषयीं आहे . हीन वर्णाच्या स्त्रियांविषयींतर सांगतात - शंख लिखित - " परपूर्वा भार्या ( कमी जातीच्या दुसर्‍याच्या स्त्रिया आपण ठेवलेल्या ), आणि पुत्र नसून पुत्रासारखे केलेले यांच्या ठिकाणीं जनन किंवा मरण असतां वेदाध्ययनाला अनध्याय होत नाहीं . त्याचें आशौच नाहीं व उदकदानक्रियाही नाहीं . " ब्राह्मांतही - " समान वर्णाचे ठायीं तीन दिवस आशौच निश्चित आहे . " आतां जें षडशीतींत - " ज्यांचा पूर्वीं अन्य पति होता त्या स्त्रिया आपण अवरोधून ठेवल्या असतां त्यांत जनन किंवा मरण असेल तर तीन दिवसांनीं शुद्धि होते . ज्यांचा पूर्वीं अन्यपति नाहीं अशा स्त्रिया आपण अवरोधून ठेवल्या असून त्यांत जनन व मरण असेल तर पांच दिवसांनीं शुद्धि होते . " या वचनांत पांच दिवसांविषयीं मूल चिंत्य ( अनुपलब्ध ) आहे . आतां जें याज्ञवल्क्य - " औरसभिन्न पुत्र , परगामिनी भार्या , यांचे ठिकाणीं जनन व मरण असतां एकदिवस आशौच " असें सांगतो तें संनिध नसतां समजावें . जेव्हां पित्याला व पतीला एक दिवस सांगितलें तेव्हां सपिंडांना स्नान समजावें . संनिध असतां पित्याला व पतीला तीन दिवस . कारण , " परगामिनी स्त्रिया , दुसर्‍यांच्या पत्नींचे पुत्र यांचे ठिकाणीं जनन व मरण असतां गोत्रज स्नानशुद्ध होतात , व पिता आणि पति हे तीन दिवसांनींच शुद्ध होतात " असें प्रजापतिवचन आहे . वचनांत ‘ पिता ’ या शब्दानें पतीही घ्यावा . कारण , दोघांचा उपक्रम ही . आतां जें ‘ दत्तक हा पालक पित्याचा पुत्र असल्यामुळें पहिल्या ( जनक ) पित्याला त्याचें तीन दिवस आशौच नाहीं . आणि पहिला संबंध निवृत्त ( सुटला ) असल्यामुळें दहा दिवस वगैरे नाहीं ’ असें कोणी म्हणतो , तें बरोबर नाहीं . कारण , जनक पित्याला देखील " बीजसंबंध असल्यामुळें तीन दिवस अघ ( आशौच ) होईल " या मनुवचनानें प्राप्त झालेल्या आशौचाचें निवारण होणार नाहीं .

पितृमरणेपिदत्तकादीनांत्रिरात्रं शुद्धितत्त्वेब्राह्मे दत्तकश्चस्वयंदत्तः कृत्रिमः क्रीतएवचेप्युपक्रम्य सूतकेमृतकेचैवत्र्यहाशौचस्यभागिनइत्युक्तेः स्मृतिकौमुद्यांहारलतायामप्येवं दत्तकस्यपुत्रपौत्राणां जननेमरणेवासपिंडानामेकाहः बीजिनश्चेतिगौतमेनसाप्तपौरुषसापिंड्योक्तेः सपिंडानांचैकाहस्योक्तत्वात् ‍ सपिंडेतुपुत्रीकृतेदशाहएव तत्राकांक्षाभावात् ‍ सपिंडत्वेनदशाहप्राबल्याच्च पूर्वापरभर्तुरुत्पन्नयोः पुत्रयोस्त्वाहमाधवीयेमरीचिः मातुरैक्याद्दिपितृकौभ्रातरावन्यगोत्रजौ एकाहंसूतकेतत्रत्रिरात्रंमृतकेतयोरितिदिक् ‍ ।

पिता मेला तरी दत्तक इत्यादि पुत्रांना तीन दिवस आशौच . कारण , शुद्धितत्त्वांत ब्राह्मांत " दत्तक , आपण होऊन दिलेला कृत्रिम पुत्र , विकत घेतलेला " असा उपक्रम करुन सांगतो - " जनन व मरण असतां हे पुत्र तीन दिवस आशौचाचे भागी आहेत " असें सांगितलें आहे . स्मृतिकौमुदींत हारलतेंतही असेंच आहे . दत्तकाच्या पुत्रापौत्रांचें जनन किंवा मरण असतां सपिंडांना एक दिवस आशौच . कारण , दत्तकाचे बीजी ( जनक ) कुलामध्येंही सात पुरुषपर्यंत सापिंड्य गौतमानें सांगितलें आहे व सपिंडांना एक दिवस आशौच वर सांगितलें आहे . सपिंडांतला दत्तक इत्यादि पुत्र असेल तर त्याचें दहा दिवसच आशौच . कारण , तो सपिंड असल्यामुळें त्याविषयीं किती आशौच अशी आकांक्षा होत नाहीं . आणि वरील वचनांनीं तीन दिवस इत्यादि आशौच प्राप्त झालें तरी सपिंड म्हणून दशाह आशौच जें सांगितलें तें ह्या त्र्यहादि आशौचापेक्षां प्रबलही आहे . पहिल्या व दुसर्‍या भर्त्यापासून उत्पन्न पुत्रांना सांगतो माधवीयांत मरीचि - " माता एक असतां तिच्या ठिकाणीं भिन्न गोत्री अशा दोन पुरुषांपासून उत्पन्न दोन पुत्र ते परस्पर भ्राते होतात . त्यांमध्यें जनन असतां एक दिवस आणि मरण असतां तीन दिवस परस्पर आशौच समजावें . " ही दिशा समजावी .

ऊढकन्यानांतुविष्णुराह संस्कृतासुस्त्रीषुनाशौचंपितृपक्षे तत्प्रसवमरणेचेत्पितृगृहेस्यातांतदैकरात्रंत्रिरात्रंचेति प्रसवेएकरात्रंमरणेत्रिरात्रमितिविज्ञानेश्वरापरार्कौ माधवस्तु प्रसवेपित्रिरात्रंपित्रोः एकरात्रंभ्रात्रादिबंधुवर्गस्य दत्तानारीपितुर्गेहेसूयेताथम्रियेतवा तद्बंधुवर्गस्त्वेकेनशुचिस्तज्जनकस्त्रिभिरितिब्राह्मोक्तेरित्याह यत्तुकश्चिदाह पक्षपदेनभ्रातरोगृह्यंते वाक्यांतरेणभगिनीमृतौत्रिरात्रोक्तेरिति तच्चिंत्यम् ‍ तदभावादेतद्विरोधाच्च भ्रातुः प्रसवेएकाहः मृतौत्रिरात्रमितिकेचित् ‍ युक्तातुपक्षिणी परस्परंमृतौभ्रातृभगिन्योः पक्षिणीभवेदितिब्राह्मात् ‍ भ्रातृभिन्नानामेकाहः वर्गोक्तेः इतरेषांतुयथाविधीतिवक्ष्यमाणवचनाच्च यत्तुप्रधानगृहेमृतौपित्रोः पूर्णं भ्रातुस्त्र्यहइतिकश्चित् ‍ सनिर्मूलत्वान्नाशौचंपितृपक्षेइत्येतद्विरोधाच्चभ्रांतः दत्तानारीपितुर्गेहेप्रधानेसूयतेयदा म्रियतेवातदातस्याः पिताशुध्येत्र्त्रिभिर्दिनैरितिकल्पतरौशुद्धितत्त्वेच पतिगृहेप्रसवेतुपित्रादीनामाशौचंनास्ति मृतौपित्रोस्त्रिरात्रमस्त्येव प्रत्ताप्रत्तासुयोषित्सुसंस्कृतासंस्कृतासुच मातापित्रोस्त्रिरात्रंस्यादितरेषांयथाविधि अजातदंतासुपित्रोरेकरात्रमितिमाधवीये शंखकार्ष्णाजिनिस्मृतेः बैजिकादभिसंबंधादित्युक्तेश्च स्मृत्यर्थसारेप्येवं ।

विवाहित कन्यांचें तर विष्णु सांगतो - " विवाहित स्त्रियांचें आशौच पितृपक्षांत ( पितृकुलांत ) नाहीं . त्या विवाहित कन्या बापाच्या घरीं प्रसूत किंवा मृत होतील तर एक दिवस आणि तीन दिवस आशौच होतें . " प्रसूत असतां एक दिवस आणि मृत असतां तीन दिवस , असें विज्ञानेश्वर अपरार्क सांगतात . माधव तर - प्रसूत असतांही आईबापांला तीन दिवस आणि भ्राता इत्यादि बंधुवर्गाला एक दिवस . कारण , " विवाहित कन्या पित्याच्या घरांत प्रसूत होईल किंवा मरेल तर तिचा बंधुवर्ग एका दिवसानें व तिचा बाप तीन दिवसांनीं शुद्ध होतो " असें ब्राह्मवचन आहे , असें सांगतो . आतां जें कोणी एक सांगतो कीं , ‘ विष्णुवचनांतील ‘ पितृपक्षे ’ या पदानें भ्राते घ्यावे , अर्थात् ‍ भ्रात्यांना त्रिरात्र समजावें . कारण , इतर वाक्यानें भगिनी मृत असतां त्रिरात्र सांगितलें आहे ’ तें चिंत्य ( अयुक्त ) आहे . कारण , इतर वाक्यानें त्रिरात्र म्हणतो तें इतर वाक्य नाहीं . आणि ह्या ब्राह्मवचनाशीं विरोधही येतो . पित्याच्या घरीं प्रसूत असेल तर भ्रात्याला एक दिवस , आणि मृत असेल तर तीन दिवस , असें केचित् ‍ म्हणतात . परंतु पक्षिणी युक्त आहे . कारण , " भ्राता व भगिनी मृत असतां परस्परांला पक्षिणी आशौच होतें " असें ब्राह्मवचन आहे . भ्रात्याहून इतरांना एक दिवस आशौच . कारण , वरील ब्राह्मवचनांत बंधुवर्ग एक दिवसानें शुद्ध होते , असें म्हटलें आहे . आणि माता व पिता यावांचून इतरांला यथाविधि म्हणजे जसें सांगितलें असेल तसें आशौच , असें पुढें सांगावयाचें वचनही आहे . आतां जें - बापाच्या मुख्य घरीं कन्या मृत असतां आईबापांना पूर्ण ( दहा दिवस ) आशौच . आणि भ्रात्याला तीन दिवस , असें कोणीएक सांगतो , त्याचें तें सांगणें निर्मूल असल्यामुळें व ‘ नाशौचं पितृपक्षे ’ ह्या वरील विष्णुवचनाशीं विरोधही येत असल्यामुळें तो भ्रांतिष्ठ झाला , असें समजावें . " दिलेली कन्या पित्याच्या मुख्य घरीं जेव्हां प्रसूत होईल किंवा मरेल तेव्हां तिचा पिता तीन दिवसांनीं शुद्ध होईल " असें कल्पतरुंत शुद्धितत्त्वांतही आहे . कन्या पतीच्या घरीं प्रसूत असतां पिता इत्यादिकांना आशौच नाहीं . मृत असेल तर तीन दिवस आशौच आहेच . कारण , " दिलेल्या व न दिलेल्या , संस्कार केलेल्या व संस्काररहित अशा कन्या मृत असतां आईबापांना तीन दिवस व इतरांना यथाविधि ( जसें उक्त असेल तसें ) आशौच समजावें . ज्यांना दंत उत्पन्न झाले नाहींत त्यांचें आईबापाला एकदिवस आशौच " असें माधवीयांत शंख कार्ष्णाजिनिस्मृतिवचन आहे . आणि " बीजसंबंध असल्यामुळें तीन दिवस " असें मनुवचनही उक्त आहे . स्मृत्यर्थसारांतही असेंच आहे .

माधवस्तुइदंत्रिरात्रंजातदंतपरम् ‍ दंतोत्पत्तेः प्रागेकरात्रंपित्रोः सद्यस्त्वप्रौढकन्यायांप्रौढायांवासराच्छुचिः प्रदत्तायांत्रिरात्रेणदत्तायांपक्षिणीभवेदितिपुलस्त्योक्तेरन्यत्रकन्यामृतौपित्रोः पक्षिणीत्याह षडशीतावपि पितृगेहादितोन्यत्रयदिपुत्रींप्रमीयते पक्षिणीतत्रपित्रोः स्यान्नान्येषामितिनिश्चयइति ग्रामांतरेइयमितिस्मृत्यर्थसारे भ्रातुस्तुपक्षिणी श्वशुरयोर्भगिन्यांचमातुलान्यांचमातुले पित्रोः स्वसरितद्वच्चपक्षिणींक्षपयेन्निशामिति वृद्धबृहस्पतिस्मृतेः शुद्धितत्त्वेकौर्मे आदंतात्सोदरेसद्यआचूडादेकरात्रकम् ‍ आप्रदानात्र्त्रिरात्रंस्याद्दशरात्रमतः परं पित्रोर्मृतौस्त्रीणांत्रिरात्रं पित्रोरुपरमेस्त्रीणामूढानांतुकथंभवेत् ‍ त्रिरात्रेणैवशुद्धिः स्यादित्याहभगवान्यमइतिमाधवीयेवृद्धमनूक्तेः इदंदशाहांतः ऊर्ध्वंतुपक्षिणी भ्रातुर्भगिनीगृहेतस्यावातद्गृहेमृतौत्रिरात्रमन्यत्रतुपक्षिणीतिषडशीतावुक्तं ब्राह्मेपि परस्परमृतौभ्रातृभगिन्योः पक्षिणीभवेत् ‍ मातुलाशौचवत्पुत्र्याः पितृव्याशौचमिष्यतइति शिष्टास्त्वस्यनिर्मूलत्वात्पितृव्येस्नानमात्रमाहुः ।

माधव तर - हें तीन दिवस आशौच दांत उत्पन्न झालेल्या कन्यांविषयीं आहे . दांत उत्पन्न होण्याच्या पूर्वीं आईबापांना एक दिवस . कारण , " अप्रौढ ( लहान ) कन्येविषयीं सद्यः शौच , प्रौढ असेल तर एक दिवसानें शुद्धि , दांत उत्पन्न झालेली असेल तर तीन दिवसांनीं शुद्धि , आणि दिलेली असेल तर पक्षिणी आशौच होतें . " ह्या पुलस्त्यवचनावरुन पित्याच्च घरावांचून इतर ठिकाणीं कन्या मृत असतां आईबापांला पक्षिणी आशौच , असें सांगतो . षडशीतींतही - " बापाच्या घरावांचून इतर ठिकाणीं जर कन्या मृत होईल तर आईबापांना पक्षिणी आशौच . इतरांना नाहीं , असा निश्चय आहे . " ही पक्षिणी अन्यगांवीं मृत असतां समजावी , असें स्मृत्यर्थसारांत आहे . भ्रात्याला तर पक्षिणी . कारण , " सासू , सासरा , बहीण , मातुलाची पत्नी , मातुल , आत्या व मावशी यांचें आशौच पक्षिणी करावें " अशी वृद्धबृहस्पतिस्मृति आहे . शुद्धितत्त्वांत कौर्मांत - " दांत उत्पन्न होईपर्यंत सोदराविषयीं सद्यः शौच . चौल होईपर्यंत एकरात्र . विवाहांत तिचें दान होईपर्यंत त्रिरात्र . याच्यापुढें पतिकुलांत दहा दिवस . " आईबाप मृत असतां स्त्रियांना तीन दिवस आशौच . कारण , " आईबाप मृत असतां ऊढ स्त्रियांना आशौच कसें होईल ? तीन दिवसांनींच शुद्धि होईल , असें भगवान् ‍ यम सांगतो " असें माधवीयांत वृद्धमनुवचन आहे . हें दहा दिवसांच्या आंत समजलें असतां आहे . दहा दिवसांनंतर समजेल तर आईबापांचें कन्येला पक्षिणी आशौच . बहिणीच्या घरीं भाऊ मृत असतां अथवा बंधूच्या घरीं बहीण मृत असतां एकमेकांना तीन दिवस . इतर ठिकाणीं मृत असतां पक्षिणी , असें षडशीतिस्मृतींत सांगितलें आहे . ब्राह्मांतही - " भाऊ व बहीण हीं मृत असतां परस्परांचें परस्परांला पक्षिणी आशौच . मातुलाच्या आशौचाप्रमाणें ( पक्षिणी ) पितृव्याचें ( चुलत्याचें ) आशौच कन्येनें करावें . " शिष्टतर हें वचन निर्मूल असल्यामुळें पितृव्याविषयीं स्नान मात्र सांगतात .

त्रिंशच्छ्लोक्यां प्रेतेष्वाचार्यमातामहदुहितृसुतश्रोत्रियार्त्विक् ‍ सयाज्यस्वस्त्रीयेषुत्रिरात्रंत्रिदिवसमशुचिः सोदकस्तूभयत्र पक्षिण्याशौचमृत्विक् ‍ दुहितृसुतसहाध्यायिबंधुत्रयांतेवासिश्वश्रूसुमित्रश्वशुरभगिनिकाभागिनेयप्रयाणे मातामह्यांचपित्रोः स्वसरिचविरतौमातुलेमातुलान्यांचाथोसज्योतिरेवस्वविषयनृपतौग्रामनाथेचनष्ठे शिष्योपाध्यायबंधुत्रयगुरुतनयाचार्यभार्यासगोत्रानूचानश्रोत्रियेषुस्वगृहपरमृतौमातुलेचैकरात्रं रात्रिंसब्रह्मचारिण्यथतुकथमपिस्वल्पसंबंधयुक्तेस्नानंवासोयुतंस्यादिदमपिसकलंसर्ववर्णेषुतुल्यमिति अत्रमूलंमिताक्षरादौस्पष्टं दौहित्रभागिनेययोरुपनीतयोस्त्रिरात्रं अनुपनीतयोः पक्षिणी संस्थितेपक्षिणींरात्रिंदौहित्रेभगिनीसुते संस्कृतेतुत्रिरात्रंस्यादितिधर्मोव्यवस्थितइतिवृद्धमनूक्तेः संस्कृतेदाहेन तेनदाहेत्रिरात्रंनान्यथेति गौडाः तन्न विशेषवैयर्थ्यात् ‍ मातुलादौसन्निधिविदेशाभ्यांपक्षिण्येकाहयोर्व्यवस्था मनुः त्रिरात्रमाहुराशौचमाचार्येसंस्थितेसति तस्यपुत्रेचपत्न्यांचदिवारात्रमितिस्थितिः श्रोत्रियेस्वगृहेमृतेत्रिरात्रं श्रोत्रियेतूपसंपन्नेत्रिरात्रमशुचिर्भवेदितिस्मृतेरितिमाधवः एकग्रामीणेत्वेकाहः ऋत्विक्षुबह्वल्पकालश्रौतस्मार्तयाजनपरेत्रिरात्रैकरात्रेज्ञेये यद्यपिकर्मकुर्वतएषवाचकः शब्दोभवतीतिशंबराचार्यैः कर्ममध्येऋत्विक्त्वमुक्तम् ‍ तथापिकर्मण्याशौचनिषेधात्तुदुत्तरमेवैतज्ज्ञेयं गौडास्तु समानोदकानांत्र्यहोगोत्रजानामहः स्मृतं मातृबंधौगुरौमित्रेमंडलाधिपतौतथेतिजाबालोक्तेर्मातृबंधुष्वेकाहमाहुः शिष्येस्वोपनीतेत्र्यहः शिष्यसतीर्थ्यब्रह्मचारिषुक्रमेणत्रिरात्रमहोरात्रमेकाहइतिमाधवीयेबौधायनोक्तेः अन्यत्रतुमनुः मातुलेपक्षिणींरात्रिंशिष्यर्त्विक् ‍ बांधवेषुचेति बंधुत्रयंआत्मपितृष्वसृमातृष्वसृमातुलपुत्राः पितुः पितृष्वसृमातृष्वसृमातुलपुत्राः मातुः पितृष्वसृमातृष्वसृमातुलपुत्राश्चेतिविज्ञानेश्वरः अत्रपक्षिणी पितृष्वस्रादिकन्यानामूढानांत्वेकाहः तद्बंधुवर्गस्त्वेकेनेतिपूर्वोक्तब्राह्मात् ‍ यत्तुषडशीत्यां एवंपित्रोर्भगिन्यौयेपितामहयोस्तथा येमातामहयोश्चैवभगिन्यौतत्प्रजाश्चयाः मातुलाः स्वस्यपित्रोश्चपत्न्यश्चैषांप्रजाश्चयाः भ्रातरश्चेतिसर्वेषुपक्षिणीस्वगृहेत्र्यहम् ‍ एवंश्वशुरजामातृदौहित्रविपदिस्मृतं यच्चयमः जामातरिमृतेशुद्धिस्त्रिरात्रेणोभयोः स्मृता पक्षिणीशालाकानांस्यादितिशातातपोब्रवीत ‍ इतितन्निर्मूलत्वान्मिताक्षरादिविरोधाच्चोपेक्ष्यम् ‍ ।

त्रिंशच्छ्लोकींत - " आचार्य , मातामह ( आईचा बाप ), कन्येचा पुत्र , श्रोत्रिय , ऋत्विज , यजमान , बहिणीचा पुत्र हे आपल्या घरीं मृत असतां तीन दिवस आशौच . समानोदक हा दोन्ही ठिकाणीं ( आपल्या घरीं व परगृहीं कोठेंही ) मृत असतां तीन दिवस आशौच . ऋत्विज , कन्यापुत्र , सहाध्यायी ( बरोबर अध्ययन करणारा ), तीन प्रकारचे बंधु , शिष्य , सासू , मित्र , सासरा , बहीण , बहिणीचा पुत्र , मातामही ( आईची आई ), आत्या , मावशी , मावळा , मावळ्याची पत्नी , हे मृत असतां पक्षिणी आशौच . आपल्या देशाचा राजा , ग्रामाचा अधिपति हे मृत असतां सज्योति आशौच . शिष्य , उपाध्याय , तीन प्रकारचे बंधु , गुरुपुत्र , आचार्य , पत्नीगोत्रज , अनूचान ( गुरुपासून सांगवेदाचें अध्ययन केलेला ), श्रोत्रिय , आणि मातुल हे आपल्या घरावांचून इतर ठिकाणीं मृत असतां एकदिवस आशौच . स्वाध्यायी ब्रह्मचारी मृत असतां एकरात्र आशौच . मरणाराचा कसाही अल्प संबंध असला तरी वस्त्रसहित स्नान करावें . हें सारें आशौच ब्राह्मणादिक चारी वर्णांना समान आहे . " याविषयीं मूलवचनेण मिताक्षरादि ग्रंथांत स्पष्ट आहेत . दौहित्र व भगिनीपुत्र हे मुंज झालेले मृत असतील तर तीन दिवस . मुंज झालेले नसतील तर पक्षिणी . कारण , " दौहित्र , आणि बहिणीचा पुत्र हे मृत असतां पक्षिणी आशौच . हे संस्कार केलेले मृत असतील तर तीन दिवस आशौच , असा धर्म व्यवस्थित आहे . " असें वृद्धमनुवचन आहे . या वचनांत संस्कार म्हटला तो दाहानें संस्कार केलेला असेल तर तीन दिवस आशौच . दाह नसेल तर आशौच नाहीं , असें गौड सांगतात . तें बरोबर नाहीं . कारण , संस्कार केलेला असेल तर हें विशेष सांगणें व्यर्थ होईल . वरील वचनांत मातुल , शिष्य , तीन प्रकारचे बंधु इत्यादिकांचें पक्षिणी व एक दिवस सांगितलें तें संनिध असतां पक्षिणी आणि विदेशीं असतां एक दिवस , अशी व्यवस्था समजावी . मनु - " आचार्य मृत असतां तीन दिवस आशौच असें सांगतात . आचार्याचा पुत्र व पत्नी मृत असतां एक दिवस आशौच , अशी मर्यादा आहे . " श्रोत्रिय घरीं मृत असतां तीन दिवस . कारण , " श्रोत्रिय मृत असतां तीन दिवस आशौच करावें " अशी स्मृति आहे , असें माधव सांगतो . एका गांवांत मृत असतां एक दिवस . ऋत्विज मृत असतां त्यानें श्रौत स्मार्ताचें यजन बहुत काळ केलें असेल तर त्रिरात्र , आणि अल्पकाळ केलें असेल तर पक्षिणी समजावें . जरी कर्म करीत असलेला जो विप्र त्याचा वाचक ऋत्विक् ‍ शब्द आहे म्हणून शंबराचार्यांनीं कर्मामध्यें त्यांना ऋत्विक् ‍ म्हणावें , नंतर ते ऋत्विक् ‍ नाहींत , असें सांगितलें तरी कर्मामध्यें आशौचाचा निषेध असल्यामुळें कर्म झाल्यावरच हें आशौच जाणावें . गौड तर - " समानोदकांचें आशौच तीन दिवस , गोत्रजांचें एक दिवस , मातेचा बंधु , गुरु , मित्र , व राजा हे मृत असतां एक दिवस " ह्या जाबालिवचनावरुन मातृबंधूंना एक दिवस सांगतात . आपण उपनयन केलेला शिष्य मृत असतां तीन दिवस . कारण , " शिष्य , सतीर्थ्य ( ज्यांचा गुरु एक ते परस्पर ), ब्रह्मचारी , हे मृत असतां अनुक्रमानें तीन दिवस , रात्रदिवस , एक दिवस आशौच " असें माधवीयांत बौधायनवचन आहे . इतर शिष्य मृत असेल तर सांगतो मनु - " मातुल , शिष्य , ऋत्विक् ‍, बांधव हे मृत असतां पक्षिणी आशौच . " तीन प्रकारचे बंधु म्हणजे आत्मबंधु , पितृबंधु व मातृबंधु समजावे ; ते असे - आपल्या आत्याचा पुत्र , आपल्या मावशीचा पुत्र , आपल्या मातुलाचा पुत्र हे आत्मबंधु . पित्याच्या आत्याचा पुत्र , पित्याच्या मावशीचा पुत्र , पित्याच्या मातुलाचा पुत्र हे पितृबंधु . मातेच्या आत्याचा पुत्र , व मातेच्या मावशीचा पुत्र , व मातेच्या मातुलाचा पुत्र हे मातृबंधु होत ; असें विज्ञानेश्वर सांगतो ; हे मृत असतां पक्षिणी आशौच . आत्या , मावशी इत्यादिकांची विवाहित कन्या मृत असतां एक दिवस आशौच . कारण , ‘ तिचा बंधुवर्ग एका दिवसानें शुद्ध होतो ’ असें पूर्वीं उक्त ब्राह्मवचन आहे . आतां जें षडशीतींत - " याप्रमाणें ज्या आईबापांच्या भगिनी , पितामह पितामहींच्या भगिनी , मातामह मतामहींच्या भगिनी , आणि त्यांच्या प्रजा ( अपत्यें ), आपले व आईबापांचे मातुल व त्यांच्या पत्नी आणि प्रजा ( अपत्यें ), हे सारे भ्राते ( बंधु ) आहेत , हे मृत असतां पक्षिणी आशौच . आपल्या घरीं मृत असतील तर तीन दिवस आशौच . याप्रमाणें श्वशुर , जामाता , व दौहित्र हे मृत असतां समजावें . " आणि जें यम - " जामाता मृत असतां दोघांची ( श्वशुर व सासू यांची ) तीन दिवसांनीं शुद्धि होते . शालकांची ( पत्नीच्या भ्रात्यांची ) पक्षिणीनें शुद्धि होते , असें शातातप सांगता झाला . " असें सांगतो तें निर्मूल असल्यामुळें व मिताक्षरा इत्यादि ग्रंथांशीं विरोध येत असल्यामुळें उपेक्षणीय ( अग्राह्य ) आहे .

मदनपारिजातेविष्णुः असपिंडेस्ववेश्यनिमृतएकरात्रं अत्रहरदत्तः अंतः शवेचेत्यापस्तंबसूत्रतः शवेग्रामेधनुः शतादर्वागन्नमभोज्यं दीपमुदकुंभंवोपनिधायतुभुंजीतयदिसमानवंशंनगृहमेवंसूतिकायामित्याह प्रधानगृहमृतौतु गृहेयस्यमृतः कश्चिदसपिंडः कथंचन तस्याप्यशौचंविज्ञेयंत्रिरात्रंनात्रसंशयइत्यंगिरसोक्तमितिमाधवः एतेन त्रिरात्रमसपिंडेषुस्वगृहेसंस्थितेषुचेति कौर्मंव्याख्यातं शुद्धितत्त्वेबृहन्मनुः श्वशूद्रपतिताश्चांत्यामृताश्चेद्दिजमंदिरे शौचंतत्रप्रवक्ष्यामिमनुनाभाषितंयथा दशरात्राच्छुनिमृतेमासाच्छूद्रेभवेच्छुचिः द्वाभ्यांतुपतितेगेहमंत्येमासचतुष्ट्यात् ‍ अत्यंत्येवर्जयेद्गेहमित्येवंमनुरब्रवीत् ‍ अंत्योम्लेछः अत्यंत्यः श्वपाकइतिवाचस्पतिः तत्रैवयमः द्विजस्यमरणेवेश्मविशुध्यतिदिनत्रयात् ‍ संवर्तः गृहशुद्धिंप्रवक्ष्यामिअंतस्थशवदूषिते प्रोत्सृज्यमृन्मयंभांडंसिद्धमन्नंतथैवच गोमयेनोपलिप्याथछागेनघ्रापयेद्बुधः ब्राह्मणैर्मंत्रपूतैश्च हिरण्यकुशवारिभिः सर्वमभ्युक्षयेद्वेश्मततः शुध्यत्यसंशयम् ‍ बृहद्विष्णुः ग्राममध्यगतोयावच्छवस्तिष्ठतिकस्यचित् ‍ ग्रामस्यतावदाशौचंनिर्गतेशुचितामियात् ‍ गृहेपश्वादौमृतेप्येवं ।

मदनपारिजातांत विष्णु - " आपल्या घरीं सपिंडव्यतिरिक्त मृत असतां एकदिवस आशौच . " येथें दरदत्त - ‘ आंत शव असतां ’ या आपस्तंबसूत्रावरुन गांवांत शव असतां शंभर धनुष्यांच्या आंत तें शवगृह असेल तर अन्न भोजन करुं नये . तें शवगृह आपल्या समान वंशांतील नसेल तर दीप किंवा उदकुंभ मध्यें ठेऊन भोजन करावें . सूतिकेविषयींही असेंच समजावें , असें सांगतो . मुख्य घरीं असपिंड मृत असेल तर - " ज्याच्या घरीं कोणी असपिंड मरेल त्यालाही आशौच तीन दिवस , याविषयीं संशय नाहीं . " असें अंगिरसानें सांगितलेलें करावें , असें माधव सांगतो . येणेंकरुन " आपल्या घरीं असपिंड मृत असतां तीन दिवस आशौच " ह्या कौर्मवचनाचें व्याख्यान झालें . शुद्धितत्त्वांत बृहन्मनु - " ब्राह्मणाच्या घरीं कुत्रा , शूद्र , पतित आणि अंत्य हे मृत असतील तर त्याविषयीं जसें मनूनें सांगितलें तसें सांगतो - कुत्रा मृत असतां दहा दिवसांनीं घर शुद्ध होतें . शूद्र मृत असतां एक महिन्यानें शुद्ध होतें . पतित मृत असतां दोन महिन्यांनीं घर शुद्ध होतें . अंत्य ( म्लेच्छ ) मृत असतां चार महिन्यांनीं घर शुद्ध होतें . अत्यंत्य मृत असतां घर वर्ज्य करावें , असें मनु सांगता झाला . " अत्यंत्य म्हणजे चांडाल , असें वाचस्पति सांगतो . तेथेंच यम - " घरांत ब्राह्मण मृत असतां तीन दिवसांनीं घर शुद्ध होतें . " संवर्त - " आंत शव राहून दूषित झालेल्या घराची शुद्धि सांगतो - मातीचीं भांडीं टाकून तसेंच शिजलेलें अन्न टाकून गोमयानें सारवून बोकडाकडून हुंगवावें . ब्राह्मणांनीं मंत्रांनीं पवित्र केलेलें असें सुवर्ण व कुशयुक्त उदक घेऊन सार्‍या घराला प्रोक्षण करावें , म्हणजे घर शुद्ध होतें यांत संशय नाहीं . " बृहद्विष्णु - " कोणाचाही शव गांवांमध्यें जोंपर्यंत राहिलेला आहे तोंपर्यंत गांवाला आशौच . शव गेलें असतां गांव शुद्ध होतो . " घरांत पशु इत्यादिक मृत असतांही असेंच समजावें .

यत्तुमाधवीयेप्रचेतसामातृष्वस्रादिषुत्रिरात्रमुक्तं मातृष्वसामातुलयोः श्वश्रूश्वशुरयोर्गुरोः मृतेचर्त्विजियाच्येचत्रिरात्रेणविशुध्यतीति गुरुराचार्यः ऋत्विककुलागतः तत्स्वगृहमृतौज्ञेयं श्वशुरयोरन्यत्रमृतावपि सन्निधौत्रिरात्रम् ‍ असन्निधौपक्षिणी देशांतरेएकरात्रम् ‍ वक्ष्यमाणविष्णूक्तेरितिमाधवगौडादयः अन्यत्रतुमातृष्वस्त्रादिषु पित्रोः स्वसरितद्वच्चपक्षिणींक्षपयेन्निशामितिवृद्धमनूक्तम् ‍ यत्तुवृद्धमनुः भगिन्यां संस्कृतायांतुभ्रातर्यपिचसंस्कृते मित्रेजामातरिप्रेतेदौहित्रेभगिनीसुते शालकेतत्सुतेचैवसद्यः स्नानेनशुध्यतीति तद्भ्रातृदौहित्रादौदेशांतरेशालकसुतजामात्रोः स्वदेशेज्ञेयं शालकेतुस्वदेशेएकाहः आचार्यपत्नीपुत्रोपाध्याय मातुलश्वशुरश्वश्रूश्वशुर्यसहाध्यायिशिष्येष्वेकरात्रमितिमाधवीयेविष्णूक्तेः हरदत्तीयेदशश्लोक्या मप्येवं श्वशुर्यः शालकः देशांतरेस्नानम् ‍ श्वशुरयोर्देशांतरेएकाहः जाबालः एकोदकानांतुत्र्यहोगोत्रजानामहः स्मृतं सर्वत्रमूल्याभावेपिक्रियाकर्तुर्दशाहः गुरोः प्रेतस्यशिष्यस्तुपितृमेधंसमाचरेत् ‍ प्रेताहारैः समंतत्रदशरात्रेणशुध्यतीतिमनूक्तेः शिष्यइत्युपलक्षणं निरन्वयेसपिंडेतुमृतेसतिदयान्वितः तदशौचंपुराचीर्त्वाकुर्यात्तुपितृवत् ‍ क्रियामितिमाधवीयेब्राह्मोक्तेः दिवोदासीये सगोत्रोवासगोत्रोवायोग्निंदद्यात्सखेनरः सोपिकुर्यान्नवश्राद्धंशुध्येच्चदशमेहनि यत्रैकविषयेपक्षिण्येकाहादिपक्षद्वयमुक्तं तत्रसन्निधिविदेशमैत्र्यादिकृता व्यवस्था ।

आतां जें माधवीयांत प्रचेतसानें मावशी इत्यादिकांचें तीन दिवस सांगितलें - " मावशी , मातुल , सासू , सासरा , गुरु ( आचार्य ), ऋत्विज ( कालपरंपरागत ) आणि यजमान हे मृत असतां तीन दिवस आशौच " असें तें आपल्या घरीं मृत असतां जाणावें . सासू सासरा हे अन्यत्र ठिकाणीं मृत असले तरी संनिध असतां तीन दिवस . असंनिध असतां पक्षिणी . देशांतरीं मृत असतां एक दिवस , असें पुढें सांगावयाच्या विष्णुवचनावरुन समजावें , असें माधव , गौड इत्यादिक सांगतात . मावशी इत्यादिक आपल्या घरावांचून इतर ठिकाणीं मृत असतील तर " आईबापांची बहीण मृत असतां पक्षिणी आशौच " हें वृद्धमनूनें उक्त समजावें . आतां जें वृद्धमनु - " संस्कार केलेली बहीण , संस्कार केलेला भ्राता , मित्र , जामाता , दौहित्र , बहिणीचा पुत्र , शालक , व शालकपुत्र हे मृत असतां सद्यः स्नानानें शुद्धि होते " असें सांगतो तें भ्राता , दौहित्र इत्यादिक देशांतरीं मृत असतां समजावें . शालकपुत्र व जामाता हे स्वदेशीं मृत असतां समजावें . शालक स्वदेशीं मृत असेल तर एक दिवस . कारण , " आचार्यपत्नी , आचार्यपुत्र , उपाध्याय , मातुल , सासू , सासरा , शालक , सहाध्यायी , आणि शिष्य हे मृत असतां एक दिवस " असें माधवीयांत विष्णुवचन आहे . हरदत्ताच्या ग्रंथांत दशश्लोकींतही असेंच सांगितलें आहे . श्वशुर्य म्हणजे शालक तो देशांतरीं मृत असतां स्नान . सासू , सासरा हे देशांतरीं मृत असतां एक दिवस , जाबाल - " समानोदकांना ( आठव्या पुरुषापासून पुढच्यांना ) तीन दिवस , आणि गोत्रजांना एक दिवस आशौच . " मूल्य घेतल्यावांचून देखील अंत्यकर्म करणाराला दहा दिवस आशौच . कारण , " मृत झालेल्या गुरुचें शिष्यानें त्याच्या सपिंडांसहवर्तमान राहून पैतृक कर्म ( अंत्यकर्म ) करावें . तो अंत्यकर्म करणारा शिष्य दहा दिवसांनीं शुद्ध होतो " असें मनुवचन आहे . या वचनांत ‘ शिष्य ’ हें उपलक्षण आहे . कारण , " संततिरहित असा सपिंड मृत असेल तर दयायुक्त होऊन त्याचें आशौच पूर्वीं आचरण करुन त्या सपिंडाची क्रिया पित्याप्रमाणें करावी . " असें माधवीयांत ब्राह्मवचन आहे . दिवोदासीयांत - " सगोत्र किंवा असगोत्र जो कोणी मृताला अग्नि देईल त्यानें देखील नवश्राद्ध करावें ; आणि तो दहाव्या दिवशीं शुद्ध होईल . " जेथें एकाविषयीं पक्षिणी व एक दिवस आशौच असे दोन पक्ष सांगितले आहेत तेथें संनिधि व असंनिधि , मैत्री इत्यादिकांवरुन व्यवस्था समजावी .

त्रिंशच्छ्लोक्याम् ‍ वानप्रस्थेयतौचोपरमतिकुलजेषंढकेवाप्लवः स्याद्योषिद्गोविप्रगुप्त्यैमृतवतितुदिनंयुद्धविद्धेतुसद्यः अत्रमूलमाकरेस्पष्टम् ‍ युद्धमूर्ध्निमृतस्यस्नानं उद्यतैराहवेशस्त्रैः क्षत्रधर्महतस्यच सद्यः संतिष्ठते यज्ञस्तथाशौचमितिस्थितिरितिमनूक्तेः यज्ञोंत्यकर्मसर्वंतदैवेत्यर्थः यस्तुभारतेराजधर्मेषु अशोच्योहिहतः शूरः स्वर्गलोकेमहीयते नह्यन्नमुदकंतस्यनस्नानंनाप्यशौचकमितिश्राद्धादिनिषेधः सपुत्राद्यभावपरः अतएवतत्रकर्णादीनांश्राद्धमुक्तम् ‍ अन्येतुदशपिंडनिषेधमाहुर्यतिवत् ‍ यत्तुपराशरः आहवेपिहतानांचएकरात्रमशौचकमिति तद्युद्धक्षतेनकालांतरमृतेज्ञेयम् ‍ असन्निधौस्नानमितिमाधवः शुद्धितत्त्वेग्निपुराणे दंष्ट्रिभिः शृंगिभिर्वापिहताम्लेच्छैश्चतस्करैः येस्वाम्यर्थेहतायांतिराजन् ‍ स्वर्गंनसंशयः सर्वेषामेववर्णानांक्षत्रियस्यविशेषतः यत्तुबृहस्पतिः डिंबाहवेविद्युताचराज्ञागोविप्रपालने सद्यः शौचंमृतस्याहुस्त्र्यहंचान्येमहर्षयः तच्छस्त्रं विनापराड्मुखहतेचत्रिरात्रं राज्ञावध्येहतेसद्यः शौचमन्यत्रत्रिरात्रं तत्रैवव्याघ्रः क्षतेनम्रियतेयस्तुतस्याशौचंभवेद्दिधा आसप्ताहात्रिरात्रंस्याद्दशरात्रमतः परं शस्त्राघातेत्र्यहादूर्ध्वंयदिकश्चित्प्रमीयते आशौचंप्राकृतंतस्यसर्ववर्णेषुनित्यशः शस्त्राघातेक्षतंविना शवस्पर्शेतुहारीतः शवस्पृशोग्रामंनप्रविशेयुरानक्षत्रदर्शनाद्राचौचेदादित्यस्य यत्तुमनुः अह्नाचैकेनरात्र्याचत्रिरात्रैरेवचत्रिभिः शवस्पृशोविशुध्यंतित्र्यहात्तूदकदायिनइति अह्नारात्र्याचेत्यहोरात्रमित्युक्तं त्रिभिस्त्रिरात्रैरितिनवरात्रमेवंदशरात्रमित्यर्थः तत्तदन्नाशनेतद्गृहवासेनापदिचज्ञेयं अंगिराः आशौचंयस्यसंसर्गादापतेद्गृहमेधिनः क्रियास्तस्यनलुप्यंतेगृह्याणांचनतद्भवेत् ‍ ।

त्रिंशच्छ्लोकींत - " आपल्या कुलांतील कोणी वानप्रस्थ , संन्याशी व नपुंसक मृत असेल तर स्नान करावें . स्त्री , गाई , ब्राह्मण यांच्या संरक्षणाकरितां कोणी मृत असेल तर एक दिवस आशौच करावें . युद्धामध्यें शस्त्रानें विद्ध होऊन मृत असेल तर सद्यः शुद्धि ( स्नान ) होतें . " याविषयीं मूलवचन आकर ग्रंथांत स्पष्ट आहे . समरांगणांत मृत असेल तर स्नान . कारण , " युद्धामध्यें शस्त्रांनीं एकामेकांस मारीत असतां क्षात्रधर्मानें मृत असेल तर तत्काल यज्ञ होतो , व तशीच तत्काल शुद्धि होते " असें मनुवचन आहे . यज्ञ म्हणजे सर्व अंत्यकर्म त्या वेळींच होतें , असा अर्थ आहे . आतां जो भारतांत राजधर्मांत - " युद्धामध्यें शूर मेला असतां त्याचा शोक करुं नये ; कारण , तो स्वर्गलोकामध्यें पूज्य होतो . त्याला अन्न व उदक द्यावयास नको . त्याच्या निमित्तानें स्नान व आशौच नाहीं " असा श्राद्धादिकांचा निषेध सांगितला , तो पुत्रादिकांचा अभाव असतां समजावा . म्हणून तेथें कर्णादिकांचें श्राद्ध सांगितलें आहे . इतर ग्रंथकार तर - संन्याशाप्रमाणें दशपिंडांचा निषेध सांगतात . आतां जें पराशर - " युद्धामध्यें मृतांचें देखील एक दिवस आशौच " असें सांगतो . तें युद्धांत क्षत होऊन कालांतरीं मृत असतां समजावें . असंनिध असतां स्नान असें माधव सांगतो . शुद्धितत्त्वांत अग्निपुराणांत - " चारही वर्णामध्यें जे कोणी आपल्या स्वामीसाठीं झटत असतांना व्याघ्र , महिष , म्लेच्छ , तस्कर ( चोर ) इत्यादिकांनीं मारले असतील ते स्वर्गास जातात , यांत संशय नाहीं . आणि अशा हेतूकरितां क्षत्रिय मृत असेल तर तो विशेषेंकरुन स्वर्गास जातो . " आतां जें बृहस्पति - " लुटारु लोकांच्या लढाईंत ; विजेनें ; राजानें ; गाई , ब्राह्मण यांच्या संरक्षणाविषयीं जो मृत असेल त्याचें सद्यः शौच ( स्नान ) होतें . इतर ऋषि तीन दिवस आशौच असें सांगतात " तें युद्धास पराड्मुख झालेला शस्त्रावांचून मृत असतां तीन दिवस समजावें . राजानें मारण्यास योग्य अशाला मारलें असतां सद्यः शौच . इतरांविषयीं तीन दिवस . तेथेंच व्याघ्र - " शस्त्रानें क्षत होऊन जो मरतो त्याचें आशौच दोन प्रकारचें होतें . सात दिवसांच्या आंत मरेल तर तीन दिवस . सात दिवसांनंतर मरेल तर दहा दिवस आशौच . शस्त्रानें क्षत झाल्यावांचून तीन दिवसानंतर कोणी मरेल तर चारही वर्णांमध्यें प्राकृत ( इतर मृतांसारखें ) आशौच सर्वदा समजावें . " शवाला स्पर्श केला तर सांगतो . हारीत - " शवाला स्पर्श करणारांनीं नक्षत्रदर्शन होईपर्यंत गांवांत प्रवेश करुं नये . रात्रौ स्पर्श करितील तर सूर्यदर्शनापर्यंत गांवांत प्रवेश करुं नये . " आतां जें मनु - " शवाला स्पर्श करणारे एका दिवसानें आणि तीन त्रिरात्रांनीं मिळून दहा दिवसांनीं शुद्ध होतात . उदक देणारे ( समानोदक ) तीन दिवसांनीं शुद्ध होतात . " असें दहा दिवस आशौच सांगतो , तें आशौचांचें अन्नभक्षण करीत असतां व त्यांच्या घरीं रहात असतां आणि आपत्काल नसतां समजावें . अंगिरा - " ज्या गृहस्थाश्रम्याला इतराच्या संसर्गानें आशौच प्राप्त होईल त्याच्या क्रिया ( कर्मै ) लुप्त होत नाहींत . कारण , तें आशौच गृह्यकर्मांना नाहीं . "

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP