कृतघटस्फोटाचा संग्रहविधि -
कृतप्रायश्चित्तस्यघटस्फोटेकृतेपिसंग्रहविधिमाहगौतमः यस्तुप्रायश्चित्तेनशुध्येत्तस्मिन्शुद्धेशातकुंभमयं पात्रंपुण्यहदात्पूरयित्वास्रवंतीभ्योवाततएनमुपस्पर्शयेयुरथास्मैतत्पात्रंदद्युस्तत्सप्रतिगृह्यजपेच्छांताद्यौः शांतापृथिवीशांतंविश्वमंतरिक्षंयोरोचनस्तमिहगृह्णामीत्येतैर्यजुर्भिः पावमानीभिस्तरत्समंदीभिः कूष्मांडैश्चाज्यंजुहुया द्धिरण्यंदद्याद्गांचाचार्याय यस्यतुप्राणांतिकंप्रायश्चित्तंसमृतः शुध्येत्सर्वाण्येवतस्मिन्नुदकादीनिप्रेतकर्माणिकुर्युरेतदेवशांत्युदकंसर्वेषूपपातकेष्विति घटस्फोटोत्तरंप्राणांतिकप्रायश्चित्तेकृतेतुमृतएवशुध्येन्नतत्रसंग्रहविधिः अतस्तेनविनापिप्रेतकर्मकुर्यादित्यर्थः उपपातकेष्वपिघटस्फोटेकृतेएवंकार्यमित्यर्थः याज्ञवल्क्यः चरितव्रतआयातेनिनयेरन्नवंघटं जुगुप्सेरन्नचाप्येनंसंवसेयुश्चसर्वशः कृतघटस्फोटस्यैवायंपरिग्रहविधिरितिमिताक्षरायामपरार्केच अन्यथाप्रायश्चित्तमात्रेएतत्प्रसंगात् मनुरपि घटस्फोटमुक्त्वा निवर्तेरंस्ततस्तस्मात्संभाषणसहासनैरित्युक्त्वा प्रायश्चित्तेतुचरितेपूर्णकुंभमपांनवं तेनैवसार्धंप्राश्नीयुः स्नात्वापुण्येजलाशये इतितच्छब्दंप्रायुंक्त अपरार्केवसिष्ठोपि पतितानांचरितव्रतानांप्रत्युद्धारोऽथाप्युदाहरंति अग्रेभ्युद्धरतांगच्छेत्क्रीडन्निवहसन्निव पश्चात्पातयतांगच्छेच्छोचन्निवरुदन्निवेत्याचार्यमातृपितृहंतारस्तत्प्रसादादपगतपापाएषातेषांप्रत्यापत्तिः पूर्णहदात्प्रवृत्ताद्वासकांचनंपात्रंमाहेयंवाद्भिः पूरयित्वापोहिष्ठीयाभिरेनमद्भिरभिषिंचेयुः सर्वएवाभिषिक्तस्यप्रत्युद्धारः पुत्रजन्मनाव्याख्यातइति प्रत्युद्धारः परिग्रहः तत्रोद्धरतांहसन्निवाग्रेसरः स्यात् पातयतांघटस्फोटंकुर्वतांशोचन्निवपश्चाद्गच्छेत् मातापित्रादिहंतृणांपरिग्रहोनकार्यः तत्प्रसादेसतिचीर्णव्रतानांकार्यः प्रवृत्तंनिर्झरः पुत्रजन्मनेत्यभिषेकोत्तरंजातकर्मादयः संस्काराः पुत्रजन्मवत्कार्याइत्यपरार्कोव्याचख्यौ अतएवविज्ञानेश्वरो घटेपवर्जितेज्ञातिमध्यस्थोयवसंगवां प्रदद्यात् प्रथमंगोभिः सत्कृतस्यहिसत्क्रियेत्यत्रगवांभक्षणाभावेपुनर्व्रतंचरेदित्येतत्प्रकृतेएवंचरितव्रतविधौविशेषोयमितिवदन् घटस्फोटोत्तरंपरिग्रहएवैतन्नसर्वत्रेत्याह तस्मात्कृतेपिघटस्फोटेप्रायश्चित्तंपरिग्रहविधिः पुनः संस्काराभवंतीतिसिद्धं तथाजीवच्छ्राद्धेकृते हेमाद्रौबौधायनः तत्राशौचंदशाहंस्यादित्यलंप्रसंगेन ।
घटस्फोट केला असतांही त्यानें प्रायश्चित्त केलें असतां त्याचा संग्रहविधि सांगतो गौतम - " जो प्रायश्चित्तानें शुद्ध होईल तो शुद्ध झाला असतां सुवर्णाचें उत्तम पात्र पुण्यकारक डोहांतून किंवा नदींतून भरुन आणून त्याच्याकडून स्नान करवून तदनंतर तें पात्र त्याच्याजवळ द्यावें . त्यानें ते घेऊन ‘ शांता द्यौः शांता पृथिवी शांतं विश्वमंतरिक्षं यो रोचनस्तमिह गृह्णामि ’ ह्या यजूंचा जप करावा . पावमानी ऋचा , तरत्समंदी ऋचा यांनीं त्या उदकाचें अभिमंत्रण करावें . कूष्मांडमंत्रांनीं त्यानें आज्यहोम करावा . आचार्याला हिरण्य द्यावें आणि गाय द्यावी . ज्याला प्राणांतिक प्रायश्चित्त असेल तो मेला असतां शुद्ध होतो , म्हणून त्याचीं उदकदानादिक सारीं प्रेतकार्यै करावीं . सार्या उपपातकांविषयीं हेंच शांत्युदक समजावें . " वरील वचनाचा भाव - घटस्फोटोत्तर प्राणांतिक प्रायश्चित्त केलें असेल तर मृत झाला असतांच शुद्ध होतो . त्याविषयीं संग्रहविधि नाहीं . म्हणून संग्रहविधि केल्यावांचूनही त्याचें प्रेतकर्म करावें . उपपातकांविषयींही घटस्फोट केला असतां असें करावें , असा इत्यर्थ आहे . याज्ञवल्क्य - " प्रायश्चित्त करुन आला असतां त्याच्या ज्ञातींनीं नवा घट भरुन आणून सर्वांनीं तें उदक घ्यावें . त्यानें वाईट कर्म पूर्वीं केल्यामुळें त्याची निंदा करुं नये . त्याच्याशीं सर्व व्यवहार करावे . " ज्याचा घटस्फोट केला असेल त्याच्याच या वचनानें सांगितलेला हा परिग्रहविधि आहे , असें मिताक्षरेंत व अपरार्कांत आहे . असें नसेल तर प्रत्येक प्रायश्चित्तांत याचा प्रसंग येईल . मनुही घटस्फोट सांगून " तदनंतर त्याच्याशीं संभाषण , एकत्र बसणें वगैरे सर्व व्यवहार बंद करावे " असें सांगून नंतर " त्यानें प्रायश्चित्त आचरण केलें असतां त्यासहवर्तमान सर्वांनीं पुण्यजलाशयांत स्नान करुन नवा कुंभ उदकांनीं भरुन आणून त्यासह तें उदक प्राशन करावें . " या वचनांत ‘ त्यासह ’ असें मनु सांगता झाला . अपरार्कांत वसिष्ठही - " पतितांनीं प्रायश्चित्त केलें असतां त्यांचा प्रत्युद्धार ( परिग्रह ) करावा . आणि असेंही सांगतात - ज्ञाति परिग्रह करीत असतां त्यांच्या अग्रभागीं क्रीडा करीत हंसत असल्याप्रमाणें जावें . आणि घटस्फोट करणार्यांच्या मागाहून शोक करीत , रोदन करीत असल्याप्रमाणें जावें . आचार्य , माता , पिता यांना मारणारे जे असतील त्यांनीं त्या आचार्यादिकांचा प्रसाद संपादन करुन पापरहित झाले असतील तर त्यांचा परिग्रह असा - सुवर्णाचें किंवा मृन्मय पात्र पूर्ण डोहांतून अथवा झर्यांतून भरुन आणून त्या उदकांनीं " आपोहिष्ठा " या ऋचांनीं त्याजवर अभिषेक करावा . अभिषेक केल्यावर त्याचा सर्व परिग्रह पुत्रजन्माप्रमाणें समजावा . " माता , पिता इत्यादिकांना मारणारांचा परिग्रह करुं नये . त्यांचा प्रसाद झाला असतां प्रायश्चित्त केल्यावर परिग्रह करावा . पुत्रजन्मानें व्याख्यात म्हणजे अभिषेक झाल्यानंतर जातकर्मादिक संस्कार पुत्रजन्माप्रमाणें करावे , असें व्याख्यान अपरार्क करिता झाला . वर सांगितलेला परिग्रह घटस्फोटोत्तर आहे म्हणूनच विज्ञानेश्वर - " घटस्फोट केला असतां प्रायश्चित्त करुन येईल तर ज्ञातींच्यामध्यें राहून गाईंना तृण द्यावें . कारण , पूर्वीं गाईंनीं शुद्धि केलेल्याची शुद्धि करावयाची आहे . " या ठिकाणीं गाईंनीं तृण भक्षण केलें नाहीं तर पुनः प्रायश्चित्त करावें . हें प्रकरण चाललें असतां - केलेल्या प्रायश्चित्ताविषयीं असा हा विशेष विचार आहे , असें बोलणारा विज्ञानेश्वर घटस्फोटोत्तर परिग्रहाविषयींच हा विधि आहे , सर्वत्र नाहीं , असें सांगतो . तस्मात् घटस्फोट केला असतांही त्याला प्रायश्चित्त , परिग्रहविधि आणि पुनः संस्कार हे होतात , असें सिद्ध आहे . तसेंच जीवच्छ्राद्ध केलें असतां हेमाद्रींत बौधायन - " त्या ठिकाणीं दहा दिवस आशौच होतें . " आतां हें प्रसंगानें सांगणें पुरे करितों .