अथातिकृच्छ्रलक्षणम् -
मनुः एकैकग्रासमश्नीयात् त्र्यहानित्रीणिपूर्ववत् । त्र्यहंचोपवसेदित्थमतिकृच्छ्रंचरन् द्विजः । त्रीणित्र्यहानिनवदिनानि पूर्ववत् एकभक्तादिकाले तन्नियमयुक्तः सन्नित्यर्थः याज्ञवल्क्यः अयमेवातिकृच्छ्रः स्यात्पाणिपूरान्नभोजनः । अयमेवपूर्वोक्तप्राजापत्यधर्मकएव अयंतुविशेषः एकभक्तनक्तायाचितदिनेषुपाणिपूरणमात्रंप्रसृतिपूरणमात्रमन्नंभुंजीत नतुपूर्वोक्तद्वाविंशत्यादिग्रासानिति अत्रच पाणिपूरणान्नमात्रमेवविधेयं नतुभोजनम् अतोयेषुदिनेषुप्राजापत्येभोजनंप्राप्तंतदनुवादेनपाणिपूरणताविधीयतेइति नोपवासदिनेषु पाणिपूरान्नभोजनप्राप्तिः । मनुयाज्ञवल्क्योक्तग्रासपाणिपूरान्नमात्रभोजनयोः शक्त्यपेक्षोविकल्पः पापापेक्षोवा अतिकृच्छ्रपादादिव्यवस्थाप्राजापत्यवदेवद्रष्टव्या इत्यतिकृच्छ्रलक्षणम् ।
आतां अतिकृच्छ्रलक्षण सांगतों .
मनु - " पूर्वीं प्राजापत्यकृच्छ्रास सांगितल्याप्रमाणें नियमयुक्त होऊन एकभक्त , नक्त , अयाचित यांच्या भोजनसमयीं नऊ दिवस एक एक ग्रास भक्षण करावा , आणि पुढचे तीन दिवस उपवास करावा , म्हणजे हा अतिकृच्छ्र होतो . " याज्ञवल्क्य - " प्राजापत्यकृच्छ्रास ज्या दिवशीं ज्या धर्मानें जसें भोजन सांगितलें आहे त्या दिवशीं त्या धर्मानें तसें भोजन , हातांत राहील तितक्या अन्नाचें भोजन करणें हा अतिकृच्छ्र होतो . " या कृच्छ्रांत सारे धर्म प्राजापत्याचे आहेत ; विशेष काय तो इतकाच कीं , एकभक्त , नक्त , अयाचित या दिवशीं पसाभर अन्न खावें , प्राजापत्यांत सांगितलेले ग्रास खाऊं नयेत . यावरुन उपवासाच्या दिवशीं पसाभर देखील अन्न खाव्याचें नाहीं . यांत मनूनें सांगितलेलें एकग्रासमात्र भोजन आणि याज्ञवल्क्यानें सांगितलेलें पसाभर अन्नाचें भोजन याची व्यवस्था शक्ति पाहून किंवा पाप पाहून करावी . अतिकृच्छ्राचे पादादिकांची व्यवस्था प्राजापत्याप्रमाणेंच समजावी .
आतां कृच्छ्रातिकृच्छ्र सांगतो .
अथकृच्छ्रातिकृच्छ्रः तत्रगौतमः अब्भक्षस्तृतीयः सकृच्छ्रातिकृच्छ्रइति । द्वादशरात्रमित्यनुवर्तते अतोद्वादशरात्रमुदकेनैववर्तनम् नान्नेनेत्युक्तंभवति । यमः एकैकंपिंडमश्नीयात् त्र्यहंकल्येत्र्यहंनिशि । अयाचितंत्र्यहंपिंडंवायुभक्षस्त्र्यहंपरम् । अतिकृच्छ्रंचरेदेतत्पवित्रंपापनाशनम् । चतुर्विंशतिरात्रंतुनियतात्माजितेंद्रियः । कृच्छ्रातिकृच्छ्रंकुर्वीतएकस्थानेद्विजोत्तमः । कल्येप्रातः एकभक्तकालेइतियावत् । एकस्थाने इति एकयत्नेनपूर्वोक्तद्वादशाहसाध्यातिकृच्छ्रयोरेकः कृच्छ्रातिकृच्छ्रोभवतीत्यर्थः । याज्ञवल्क्यः कृच्छ्रातिकृच्छ्रः पयसादिवसानेकविंशतिं । यमेनतुचतुर्विंशतिरात्रसाध्येकृच्छ्रातिकृच्छ्रेभोजनदिनेष्वेकैकग्रासमात्रविधानाद्दुग्धभोजनेपिपत्रपुटिकादिभिर्ग्रासपरिमाणंकृत्वैकग्रासपर्याप्तंदुग्धमश्नीयात् । एवंकर्तुमशक्तश्चेत्कृच्छ्रप्रकृतिभूतप्राजापत्योक्तरीत्यासायंतुद्वादशग्रासाइत्यादिग्राससंख्ययातावद्दुग्धंपातव्यं भोजनदिनेषुगौतमाद्युक्तकृच्छ्रातिकृच्छ्रपक्षेषुशक्त्यपेक्षयाविकल्पः इतिकृच्छ्रातिकृच्छ्रलक्षणम् ।
गौतम - " बारा दिवस केवळ उदक भक्षण करुन राहणें ; अन्न खावयाचें नाहीं , तो कृच्छ्रातिकृच्छ्र होय . " यम - " अतिकृच्छ्र करणारानें दोनप्रहरीं एकभक्तकालीं एक एक ग्रास तीन दिवस भक्षण करावा . रात्रीं नक्तकालीं एक एक ग्रास तीन दिवस भक्षण करावा . तीन दिवस अयाचिताचा एक एक ग्रास भक्षण करावा . आणि तीन दिवस वायुभक्षण करुन राहावें . हा अतिकृच्छ्र पवित्र करणारा व पापनाश करणारा आहे . याच नियमानें जितेंद्रिय होऊन चोवीस दिवस राहावें , म्हणजे दोन अतिकृच्छ्र एकापुढें एक असे करावे म्हणजे तो एक कृच्छ्रातिकृच्छ्र होतो , असा फलितार्थ . " याज्ञवल्क्य - " एकवीस दिवस दूध भक्षण करुन राहणें तो कृच्छ्रातिकृच्छ्र होतो . " ह्या याज्ञवल्क्यानें सांगितलेल्या कृच्छ्रातिकृच्छ्रांत दूध किती भक्षण करावें ? व तें कोणत्या दिवशीं ? असें कोणी म्हणेल तर सांगतो - यमानें सांगितलेल्या कृच्छ्रातिकृच्छ्रांत चोवीस दिवसांमध्यें भोजनदिवसांत एक एक ग्रासच सांगितल्यामुळें या ठिकाणीं दुग्धभक्षण सांगितलें तरी ग्रासपरिमित दुग्धाचें प्रमाण करुन एक एक ग्रासप्रमाणानें दुग्ध भक्षण करावें . असें करण्याविषयीं अशक्त असेल तर सर्व कृच्छ्रांची प्रकृति जो प्राजापत्य कृच्छ्र त्याच्या रीतीनें नक्त भोजनाचे बारा ग्रास इत्यादि जी ग्राससंख्या असेल तितकें दूध भोजनदिवसांचे ठायीं प्यावें . ह्या कृच्छ्रातिकृच्छ्रांत गौतमानें एक पक्ष ( केवळ उदकावर वर्तन ) सांगितला . यमानें चोवीस दिवसांचा सांगितला . आणि याज्ञवल्क्यानें एकवीस दिवसांचा सांगितला . ह्या तीन पक्षांतून ज्याची जशी शक्ति असेल त्यानें तो पक्ष घ्यावा .
इति कृच्छ्रातिकृच्छ्रः